Submitted by बेफ़िकीर on 14 November, 2013 - 11:15
पशूंपुढे काढतो फणे मी
कसे शिकू माणसाळणे मी
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी
नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी
कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी
दिसू दिली ना कधी जगाला
तुझ्यातली खिन्न लक्षणे मी
तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?
बघून टीका निलाजर्यांची
फुशारलो 'बेफिकिर'पणे मी
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विचारणे कोण मी तुझा हे स्वतः
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी
नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी
सुंदर शेर...
प्रत्येक शब्द अनमोल .
प्रत्येक शब्द अनमोल .
कसे शिकू माणसाळणे मी <<वाह !
कसे शिकू माणसाळणे मी <<वाह !
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी
नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी
सुंदर !
कधी कुणाच्या घरी न
कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी
व्वा व्वा
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी
तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?
हे शेरही आवडले.
'अंगणे' आणि 'म्हणे' हे सर्वात
'अंगणे' आणि 'म्हणे' हे सर्वात विशेष वाटले.
पशूंपुढे काढतो फणे मी कसे
पशूंपुढे काढतो फणे मी
कसे शिकू माणसाळणे मी>>>>>>>>सुंदर मिसरा
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी...वा !
नव्यात शोधू नकोस चिन्हे
जुन्या नभातील चांदणे मी......क्या बात !
तुझ्यावरी तर विसंबलेलो
परावलंबी कसा म्हणे मी?....ये बात !
अंगणेचा शेर झक्कास ! गझल
अंगणेचा शेर झक्कास !
गझल आवडली !
अप्रतिम मतला… विचारणे कोण मी
अप्रतिम मतला…
विचारणे कोण मी तुझा हे
स्वतः स्वतःला विचारणे मी
सुंदर…
गझल आवडली.
कधी कुणाच्या घरी न
कधी कुणाच्या घरी न गेलो
विटाळली फक्त अंगणे मी
दिसू दिली ना कधी जगाला
तुझ्यातली खिन्न लक्षणे मी
व्वा व्वा.