Submitted by रसप on 1 May, 2013 - 00:51
कोपिष्ट ऋषी
संतापावा
याव्यात झळा
त्या डोळ्यांतुन
अन् शाप झणी
उच्चारावा -
"नजरेत असे
जी आग तुला
ती भस्म करो !"
तैसेच जणू
आकाशाने
संतापावे
ह्या धरणीवर
सविता-नयनी
फुलता ज्वाळा
कणकण धरणी
पेटून उठे
पोळून बने
केविलवाणी
प्रत्येकाची
लाही लाही
पण एक तरू
खंबीर असे
जो ज्वाळेतुन
बहरून उठे
झाडुन पाने
ओकाबोका
झाला तरिही
अंगावरती
पसरून फुले
दु:खामध्ये
आनंदभरे
निर्व्याज हसे
षड्शत्रूंशी
विजयी होउन
कोsहम जाणुन
नि:संग बने
जणु एक ऋषी
गुलमोहर तो !
निर्व्याज हसे
गुलमोहर तो..!
....रसप....
२९ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप आवड्ली. गुलमोहर----माझा
खूप आवड्ली.
गुलमोहर----माझा आवडते झाड
ज्वाळेतून बहरून उठे.. नि:संग जणू एक ऋषी...हे फार आवडले
अतीशय उत्तम रे अभिनंदन
अतीशय उत्तम रे
अभिनंदन जितू
कवितेच्या या अवघड अशा यमकलेस फॉर्म वर तुझी पकड दिवसेंदिवस बेमालूमपंणे अधिकच घट्ट होत जात आहे
वेगळा विषय आणि वेगळा फॉर्म
वेगळा विषय आणि वेगळा फॉर्म ...... थोडक्यात पण छान मांडलंय.
शेवटचा खंड सर्वात विशेष.
आवडली कविता.
आवडली कविता.
मस्तच. फार आवडलं हे यमकलेस
मस्तच. फार आवडलं हे यमकलेस (शब्द वैवकुंकडून साभार) गाणं
आवडली...!
आवडली...!
सुंदर.
सुंदर.
कविता वाचल्याचा पुरेसा आनंद
कविता वाचल्याचा पुरेसा आनंद मिळाला. चांगली झालेली आहे. तसेच, वेगळीच झालेली आहे.
धन्यवाद.
निर्यमक पण कमनीय रचना.
निर्यमक पण कमनीय रचना. अभिनंदन रसप.
छान आहे कविता!
छान आहे कविता!
आवडली
आवडली
धन्यवाद !!
धन्यवाद !!