Submitted by -शाम on 6 March, 2013 - 02:27
अजून नाही श्वासांवरती
वार्याने कर लागू केला
अजून नाही आभाळाने
पाउस निर्यातीला नेला
अजून पृथ्वी फिरते आहे
सूर्यसुधा नियमाने येतो
अजून छाती धडधड करते
अजून आत्मा ग्वाही देतो
अजून उठते एखादी कळ
अजून रक्त सळाळुन येते
अजून खपलीमागे कोणी
घाव आठवुन जखमी होते
अजून पुरते गुलाम कोठे?
इतकी नाही जुलमी सत्ता
अजून आशा स्वातंत्र्याची
येइल! येइल! येता येता
..............................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून उठते एखादी कळ अजून रक्त
अजून उठते एखादी कळ
अजून रक्त सळाळुन येते
अजून खपलीमागे कोणी
घाव आठवुन जखमी होते
आह! विदिर्ण करुन गेल्या या ओळी
सगळी कविताच मनाचा तळ गाठणारी.
धन्यवाद!
येइल! येइल! येता येता>>>>
येइल! येइल! येता येता>>>> व्वा!
आशावाद आवडला.
अतीशय सुरेख खूप खूप आवडली मी
अतीशय सुरेख
खूप खूप आवडली
मी शेवटची ओळ वैयक्तिक वाचनाकरिता अशी बदलून वाचली ............
येईल !...येईल!!. ..अत्ता !.. अत्ता !!
(बदलाची गरज/सूचना /विनती /आग्रह इत्यादी काहीही म्हणत नाहीये कृ गै न शामजी :))
जबरी, जबरीच लिहिलंस
जबरी, जबरीच लिहिलंस रे........
फार सुंदर लिहिलंत शाम.
फार सुंदर लिहिलंत शाम.
खूपच आवडली .
खूपच आवडली .
व्वा....क्या बात है!!!
व्वा....क्या बात है!!!
अजून पृथ्वी फिरते
अजून पृथ्वी फिरते आहे
सूर्यसुधा नियमाने येतो
अजून छाती धडधड करते
अजून आत्मा ग्वाही देतो
व्वा. सहजता भावली.
मस्तच....
मस्तच....
मस्त रचना !
मस्त रचना !
छान मनाचा ठाव घेणारी.
छान मनाचा ठाव घेणारी.
धन्यवाद! दोस्तांनो
धन्यवाद! दोस्तांनो
फार आवडली ही कविता. मस्त.
फार आवडली ही कविता. मस्त.
सुंदर !!
सुंदर !!
वा! सुंदर कविता .आवडली..
वा! सुंदर कविता .आवडली..
शाम मस्तच...!!
शाम मस्तच...!!
लई भारी...!
लई भारी...!
सुरेख रचना...
सुरेख रचना...
व्वा ! ..... छानच.
व्वा ! ..... छानच.
अप्रतिम ! "अजून" काय बोलू?
अप्रतिम !
"अजून" काय बोलू?
मस्त... संदीप खरे ची अशा
मस्त...
संदीप खरे ची अशा आशयाची कविता आठवली
एकदम सहज सुंदर.....
एकदम सहज सुंदर.....
मस्त..!!
मस्त..!!