निवडक शेर

Submitted by सतीश देवपूरकर on 22 February, 2013 - 10:34

निवडक शेर
अनाहताचा नाद घालतो एकसारखी साद मला!
सर्वांगाचे कान करोनी, देऊ दे तिज दाद मला!!
.......................................................................
निळ्या नभाच्या निळेपणाची ओढ लागली डोळ्यांना.....
अथांगतेचा जणू जाहला स्पर्श माझिया पंखांना!
.........................................................................
प्रकाशात नखशिखांत भिजता प्रकाश झालो मीच स्वत:!
क्षितिजांच्या पाठीस धावता ,मीच जाहलो क्षितिज स्वत:!!
.......................................................................
वा-याचा घेवून वेग मी लकेर झालो पाण्याची!
पानपान सळसळताना मी ओळ जाहलो गाण्याची!
.........................................................................
चराचराच्या धमन्यांमधुनी वहात होतो मीच जणू!
मलाच डोळे भरून तेव्हा पहात होतो मीच जणू!!
...................................................................
एक शेर खास मायबोली गुलमोहरच्या सद्य:स्थितीवर..........
काय अवस्था गझलांची अन् काय त-हेची दाद पहा...
दगड मारल्यागत माबोवर कोसळती प्रतिसाद पहा!!

...................................................................
------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users