आय अ‍ॅम द बेस्ट खान ! ( ऑनलाईन पोल )

Submitted by ऊर्जा on 17 November, 2012 - 12:54

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तीन खान आडनाव बंधू आपला दबदबा राखून आहेत. बाकी कित्येक आले, गेले आणि येत राहतील पण ह्यात तिघांवरुन चाहत्यांत थेट तुलना होत असते. गिरीविहार ह्यांनी इथे चर्चेसाठी एक धागा उघडलाच आहे.
पण चर्चांमध्ये फक्त शब्दांचे बुडबुडे उडतात आणि हाती काहीच लागत नाही म्हणून हा खास पोल Proud
ह्या धाग्यावर फक्त मत द्यावे. बाकी प्रतिक्रिया देऊ नयेत.
इथे फक्त आकडे बोलतील Wink तुम्हाला बोलायचे असल्यास गिरीविहार ह्यांच्या धाग्यावर जावे.

इथे फक्त तीन खानांची नावे आहेत. फक्त जन्मतारखेच्या आधारे क्रम लावला आहे. जो मोठा त्याचे नाव पहिले. बाकी त्या क्रमवारीला काही अर्थ नाही.

बाकी अभिनेत्यांची नावं मुद्दामच दिली नाहीत कारण ह्या तिघांमध्ये जशी चुरस आहे तशी इतरांत नाही. त्यांचे मोजमाप बरेचदा स्वतंत्रपणेच होते.

चला तर मग, सुरु करा मतदान !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब आणि आहना यांच्या पोस्टला जितकी मतं मिळतील तितकी त्या त्या खानाच्या वोट्समधून वजा केली जातील.

Vote up!

हृत्विक रोशनसाठी माझ्या पोस्टला जितकी मतं मिळतील तितकी त्याच्या वोट्समधून वजा केली जावीत

आतापर्यंतच्या निकालानुसार शाहरूखखान बाद झालेला आहे. उशिराने एण्ट्री घेतलेले रुत्विक आणि अक्शयकुमार पण पुढं गेले. काही वेळाने किशनकुमार आणि कमल सदाना पण जातील.

हा आहे कमल सदनाह, याने मोजके सिनेमे केले.
'बेखुदी' मध्ये काजोल तर 'रंग' सिनेमात त्याची हिरॉईन दिव्या भारती होती.

kamals.jpg

अरे ये कमल सदाना को नही जानती Proud

निगेटीव्ह व्होटिंगची पद्धत होती की पूर्वी. लिंबू याबद्दल अधिक सांगू शकेल. Happy

मठ्ठाधिपती अशी वेगळी कॅटेगरी काढा. त्यामधे भारत भूषण आणि त्यांचे वारसदार यांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून द्या. त्यामधे प्रेम धवन, नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्‍याने) विश्वजीत इत्यादि धुरंधरांना पण मानाची जागा द्या. अभिनेत्रींमधे प्रिया राजवंश ये एकही नाम काफी होगा. तिचे वारसदार पूजा भट्ट, कतरिना कैफ इत्यादि असणारच.

पिलर्स (खांब Wink ) ऑफ अ‍ॅक्टींग
भारत भूषण
प्रदीप कुमार
राजेंद्र कुमार
मनोज कुमार
विश्वजीत

त्यामधे प्रेम धवन, नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्‍याने)....

प्रेम धवन असा नट होता? खवचट लिहिण्यापूर्वी अचूक तरी लिहावे. नाही तर ज्ञान उघडे पडते. आता टायपिन्ग चूक होती म्हणू नका प्लीज.

नुक्कडचा गुरु म्हणजे कै. दिलीप धवन. (२००० साली ४५ व्या वर्षी त्याचे निधन झाले)
अनिल धवन म्हणजे चेतना, पिया का घर..

शुकु >>>>>>अरे इथे बाकीची नाव चांगली की वाईट म्हणुन दिली आहेत ????
मला तो त्यात आवडला म्हणुन मी लिहल आहे

मग मला काय भारत भूषण, प्रदीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, विश्वजीत हे लोक आवडत म्हणून मी नावं टाकलीयेत की काय... Wink

नीधप,

>> पिलर्स (खांब डोळा मारा ) ऑफ अ‍ॅक्टींग

पिलर्स (खांब) ऑफ अ‍ॅक्टींग याचं मराठीत भाषांतर मुखस्तंभ असं होईल काय? Lol की मूकस्तंभ पण चालेल? Proud

आ.न.,
-गा.पै.

मायबोली वरुन प्रेरणा घेवुन Hindustan Times वाल्यांनी सुद्धा खान मतदान सुरु केले आहे Happy
इथे बघा, सध्यातरी शाहरुख खानला जास्त मते आहे

Pages