इथे दगडांच्याही पुन्हा भेटी होतात
याच आशेवर सुरु असावा श्वास..
नाहीतर थांबलाच असता प्रवास
चुकून लागलेला फोन
झालेली ओळख
जुळलेले बंध
सगळंच चुकून.. तरीही बरोबर वाटणारं
किती भर्रकन उडून जातात न सुखाचे क्षण
आणि
उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब
आठवतं एकमेकांना शिकवलेलं
खोटं बोलणं, वाट पाहणं
हसणं-रडणं, समजावणं
पण फसवणं मात्र तुलाच जमलं
आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा
वाढदिवस, ग्रीटिंग्स, भेटी
हॉटेलची बिलं, सिनेमाची तिकिटं
आईस्क्रिमचे चमचे, कोल्ड्रिंक्सचे स्ट्रॉ
रंगीत धागे........
काय काय साचलं होतं ना?
तरीही त्सुनामीपेक्षा तूच आठवतेस
आणि वाटतं
आज नक्कीच येशील...बास्स
याच आशेवर सुरु असावा श्वास..
.........................................,,,,,,,,,,,,,,,,,,,,..शाम
सुंदर ! चाचांना राहवलं नाही.
सुंदर !
चाचांना राहवलं नाही.
छान शेवट कविता मस्तच
छान शेवट
कविता मस्तच
वाह्....सुरेख.... उरलेल्या
वाह्....सुरेख....
उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब
हे आवडले.....:)
धन्यवाद दोस्तांनो!!!!
धन्यवाद दोस्तांनो!!!!
भेदक डचमळ
भेदक डचमळ
आवडली.
आवडली.
उरलेल्या आठवणी उकरत राहतात
उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब
आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा
अशा काही ओळी आवडल्या..
>> आता उध्वस्त होऊन निपचित
>> आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा
वाढदिवस, ग्रीटिंग्स, भेटी
हॉटेलची बिलं, सिनेमाची तिकिटं
आईस्क्रिमचे चमचे, कोल्ड्रिंक्सचे स्ट्रॉ
रंगीत धागे........
काय काय साचलं होतं ना?>>
आवडलं.