'मायबोली'वर आपण नेहमीच नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवत असतो. तुमच्या सहभागामुळेच ते उपक्रम वाढीस लागतात.
'मायबोली'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हाही या नव्या उपक्रमांचाच एक भाग आहे. याची सुरुवात झाली ती आपल्याच मायबोलीकरांच्या 'शब्द झाले मायबाप' या कार्यक्रमापासून.
आता पुढचे पाऊल टाकत आहोत 'देऊळ' या नवीन मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून.
’वळू’ आणि ’विहीर’नंतर उमेश विनायक कुलकर्णी आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी घेऊन येत आहेत
एका इरसाल गावाची हलकीफुलकी कथा - ’देऊळ’.
एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.
४ नोव्हेंबर, २०११ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या या चित्रपटाच्या निमित्तानं मायबोलीवर असतील कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं..
तर मंडळी, तयार व्हा 'देऊळ'चं स्वागत करायला..मायबोली.कॉमवर..
देउळ टीमचे आणि माध्यम
देउळ टीमचे आणि माध्यम प्रायोजक झालेल्या आपल्या मायबोलीचं खूप खूप अभिनंदन.
"समीक्षक आणि प्रेषकांनी उचलून
"समीक्षक आणि प्रेषकांनी उचलून धरलेल्या देऊळ या मराठी चित्रपटाने ५९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे !!" अभिनंदन !!
मायबोली आणि या चित्रपटाशी
मायबोली आणि या चित्रपटाशी सर्व संबंधितांचे अभिनंदन.
एफ.एम. च्या आर.जे. ने
एफ.एम. च्या आर.जे. ने सुरुवातीला "देऊळ" आणि गिरिश कुलकर्णी यांचेच उल्लेख केल्याने वाटले की फक्त याच चित्रपटाचा गौरव झाला आहे. पण पुढे आकाशवाणीवर 'बालगंधर्व" आणि "शाळा" यांचीही नावे ऐकल्यावर 'मराठी मायबोली'चा त्रिवार जयजयकार दिल्लीत झाला अशी भावना मनी निर्माण झाली. माझ्या माहितीप्रमाणे एकाच वेळी एकदम तीन मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत (अन् तेही अग्रक्रमाने) झळकण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.
असो. तिन्ही चित्रपटांशी संबंधित असणार्या सर्व घटकांचे तसेच माध्यम प्रयोजक 'मायबोली टीम' चेही हार्दिक अभिनंदन.
अशोक पाटील
अभिनंदन अभिनंदन त्रिवार
अभिनंदन अभिनंदन त्रिवार हार्दिक अभिनंदन
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
खुप खुप अभिनंदन
खुप खुप अभिनंदन
अभिनंदन. खूप खूप आनंद झाला.
अभिनंदन. खूप खूप आनंद झाला.
लईच भारी,
लईच भारी, अभिनंदन!
संवादासाठीचे पारितोषिक हे तर फारच बेष्ट!
मनःपुर्वक अभिनंदन उमेश, गिरीश
मनःपुर्वक अभिनंदन उमेश, गिरीश आणि टीम, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..!!
प्रायोजकत्व स्वीकारलेल्या मायबोलीचाही यावेळी अभिमान वाटला.
Pages