जन गण मन हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे हे मायबोली.कॉमवर वाचल्यावर माझ्या नेहमीच्या "टी.व्ही.वर आल्यावर बघू" ह्या ब्रीदवाक्याचा जप मनात करत पुन्श्च कामात डोकं घालणार इतक्यात अनपेक्षितपणे चिन्मयचा (चिनुक्स) फोन आला की "जन गण मनच्या प्रिमिअरची मायबोलीला पाच तिकिटं मिळत आहेत, जाणार का?" मागच्या वेळी असाच एक चित्रपट बघण्याची संधी गमावल्याने या वेळी काहीही करुन जमवायचंच असा विचार केला, आणि माणशी एकच तिकीट मिळणार असल्याने गृहमंत्र्यांना भरपूर मस्का लावून चिन्मयला होकार कळवला. चित्रपटाचा प्रथम प्रदर्शन सोहळा म्हणजेच प्रिमिअर सिटिप्राईड कोथरुडलाच असल्याने फार लांबही जायचा प्रश्न नव्हता.
"कुणाला तरी शोधत असलेला गोंधळलेला चेहरा" हे मायबोली गटगला घेऊन जायचे व्यवच्छेदक का काय म्हणतात ते लक्षण घेऊन अस्मादिक सिटिप्राईड कोथरुडमधे दाखल झाले. कोण कोण येणार याची चिनुक्सने साधारण कल्पना दिलेली असली तरी फोन झाल्यानंतरच्या दोन दिवसात दाबून काम आल्याने ती यादी संपूर्णपणे विसरून गेलो होतो. सिटिप्राईडच्या सरकत्या जिन्यावरुन वर येत प्रवेशद्वारातून आत शिरताच नेहमीच्या परंपरेला (याला पामर लोक सवय म्हणतात) अनुसरुन लहान पोरं दरवाज्याआड लपून एकमेकांना "भोsss" करतात तसं धाडकन् समोर येत दक्षिणाने "मंद्याssss" अशी चित्कारीवजा आरोळी ठोकली आणि 'कोकण मीट्स कोल्हापूर'चा छोटासा एपिसोड पार पडला. मग सुरू झाला तो इतर सदस्यांचा शोध. चिनुक्स पाच मिनिटात पोहोचत असून बाकीचे तिथेच क्रॉसवर्डच्या आसपास असल्याचं समजलं आणि मग हिम्सकूल (हिमांशू कुलकर्णी), चारुदत्त, आणि अमृता भिडे (आस) हे सदस्य भेटले. चिनुक्सही लगेच पोहोचला आणि आपण चित्रपट बघायला आलेलो नसून फक्त तुम्हाला भेटायला आलो असल्याचे सांगत आम्हाला थोडंसं आश्चर्यात टाकलं, पण लगेच चित्रपट आधीच बघितल्याचं प्रांजळपणे सांगूनही टाकलं.
चिनुक्स, चारुदत्त, हिमस्कूल आणि दक्षिणा
मग पार पडला तो चित्रपटातल्या कलाकारांबरोबर छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम. माझी मेहुणी संदीप खरेची प्रचंड, लय मोठी, खूपच जबरदस्त वगैरे फॅन आहे. त्यामुळे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे दिसल्यावर त्यांच्या बरोबर छायाचित्र काढून घेण्याची आणि पर्यायाने भरमसाठ धूर बघण्याची संधी मी दवडणार नव्हतोच.
अस्मादिक म्हणजेच मंदार_जोशी, संदीप खरे, आणि आस (अमृता भिडे)
डॉ. सलील कुलकर्णी, नंदू माधव, आणि दक्षिणा
आस (अमृता भिडे), डॉ. सलील कुलकर्णी, मंदार_जोशी, आणि नंदू माधव
डॉ. सलील कुलकर्णी आणि मधुरा
दक्षिणा, मधुरा, आणि चारुदत्त
दक्षिणा आणि संतोष जुवेकर
दक्षिणा, संतोष जुवेकर, आणि आस (अमृता भिडे)
बबलीची भूमिका करणारी अस्मिता जोगळेकर, चारुदत्त, आणि काटूच्या भूमिकेतला चिन्मय संत
मधुरा आणि नंदू माधव
आस (अमृता भिडे) आणि मधुरा
अशा रितीने फोटो काढण्याची हौस पूर्ण झाल्यावर चित्रपट बघण्याची उत्सुकता असलेले सगळे चित्रपटगृहात प्रवेश करते झाले.
चित्रपट बघितल्यानंतर या चित्रपटाने आपल्याला काय दिलं (key takeaways) असा विचार माझ्या मनात हटकून येतो. या चित्रपटाने जे दिलं ते मात्र शब्दांत मांडणं अशक्य आहे. नंदू माधव यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धिमत्ता ही एकाप्रकारची कधीच नसते — पण हे न समजल्याने त्यांनी साकारलेले सोनटक्के मास्तर यांची नेहमी घुसमटच होते. हीच कथा देशातल्या बहुसंख्य शिक्षकांची आहे. पाड्यावरच्या, आदिवासी मुलांना शहरी मुलांसारखंच शिक्षण देण्याच्या नादात आपण त्यांच्या मनातली शिक्षणाविषयीची उरलीसुरली आस्था घालवून बसत आहोत. टक्केगुरुजींप्रमाणे आपली लेव्हल आणि त्यांची लेव्हल यात आपण उच्च आणि नीच असा फरक करून शिक्षणाचा खेळखंडोबा करतच आहोत.
गरीब आणि श्रीमंत यातली दरी या विषयी आपण बोलतो ते नेहमी शहरातल्या उंच इमारती आणि झोपडपट्ट्या यांच्याकडे बघून. आपण शहरात आणि गावात राहून देश, देशभक्ती, जात, धर्म, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, इतिहास, ब्रिटीश राज कसे जुलूम करणारे होते वगैरे भाष्य करतो. पण देश म्हणजे काय, आपल्या देशाचं नाव काय, जुलूम कशाला म्हणतात हे प्रश्न टक्केगुरुजींनी विचारल्यावर मख्ख चेहर्याने बघणारी पाड्यावरची मुलं बघून आपल्याला निश्चितच धक्का बसतो. हे चित्रपटातलं दृश्य असलं तरी आज अनेक खेड्यापाड्यातलं जळजळीत वास्तव आहे. Grass root level - तृणमूळ पातळी म्हणजे काय हे या पाड्यावरचं जगणं बघितलं की लक्षात येतं आणि एक राष्ट्र म्हणून आपण अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.
चित्रपटाच्या बाबतीत आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अचूक पात्रनिवड. चित्रपट बघताना अर्थातच प्रेक्षकांना सर्वप्रथम भेटतात ते अभिनेते, आणि हा एका चित्रपट अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर जवळजवळ सबकुछ नंदू माधव आहे. "बच्चन" म्हणजे सर्वोत्कृष्ठ असण्याचा मापदंड असं मानणार्या आणि आपण शिकवत असलेली शाळा आपल्या 'लेव्हलची' नसल्याने सदैव तिथून आपल्या गावी बदली करुन घेणे या ध्येयाने पछाडलेल्या आणि तरीही या पोरांना होईल तितकी मदत करणार्या म्हाळुंगे इथल्या एका पाड्यावरच्या शाळेतील शिक्षक रामचंद्र सोनटक्के साकारणारे नंदू माधव यांचे या आधी बघितलेले सिनेमे म्हणजे ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ’वळू’. मायकल क्लार्कने दुपारभर भारतीय गोलंदाजीला धू धू धू धुवून शतक झळकावल्यावर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा मागल्या पानावरुन पुढे धुलाईला सुरवात करुन द्विशतकी मजल मारावी तद्वत् नंदू माधव यांनी आधीच्या चित्रपटांतील कसदार अभिनयावर कळस चढवणारी कामगिरी या चित्रपटात करुन त्यांच्याविषयीच्या असलेल्या सगळ्यांच्याच अपेक्षांची पूर्ती केली आहे.
दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांनी अत्यंत सहज आणि अभिनय वाटू नये असं त्यांच्याकडून काम करुन घेतलं आहे असं वाटत राहतं. किंबहुना नंदू माधव यांना काही सांगावं लागलं नसावंच! असंच सहज काम चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी केलं आहे. इतर कलाकारात सर्वप्रथम संतोष जुवेकरचा विशेष उल्लेख करायलाच हवा. हा असा दुर्मिळ नट आहे की जो बिझनेसमन, शहरी मध्यमवर्गीय, गावगुंड किंवा या चित्रपटात काटू-बबलीचा बापासारख्या कुठल्याही भूमिकेत शोभून दिसतो. जीव ओतून काम करणे म्हणजे काय ते संतोषच्या अभिनयाकडे पाहून समजतं. मधुरा वेलणकर यांनी काटू-बबलीची आई छानच साकारली आहे. काटूच्या भूमिकेतला चिन्मय संत आणि त्याची बहीण बबलीच्या भूमिकेतली अस्मिता जोगळेकर यांचा जबरदस्त अभिनय बघून असं नक्कीच वाटलं की बालकलाकार हा शब्द चित्रपटविषयक लिखाणातून तरी हद्दपार करुन फक्त कलाकार किंवा नट हाच शब्द वापरायची सक्ती करायला हवी. हे दोन्ही कलाकार शहरी मुलं आहेत हे सांगून खरं वाटलं नसतं आणि आम्ही त्यांना प्रिमिअरला भेटलो नसतो तर त्यावर कदाचित कधीच विश्वास ठेवला नसता. चित्रपटातल्या या प्रमुख भूमिका वगळता इतर लहान भूमिकांच्या बाबतीतली पात्रनिवडही वाखाणण्यासारखी आहे. स्त्रीलंपट आणि पंचक्रोशीतली बडी आसामी असणार्या शेटच्या भूमिकेतले संदीप मेहता हे जुन्या हिंदी चित्रपटांतल्या प्रेम चोपडा-छाप हलकटपणाची आठवण करुन देतात. जेष्ठ अभिनेता उदय सबनीस यांनी भ्रष्टाचारी आणि चालू शिक्षणाधिकारी गायधनी साहेब उत्तमरित्या उभा केला आहे. टक्केगुरुजींच्या बायकोच्या भूमिकेत पूजा नायकही धमाल करुन जाते.
मंदार नामजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद या तीनही विभागात कुठेही कमकुवत दुवे न सोडता जबरदस्त कामगिरी केली आहे ती समीर जोशी यांनी. डो. सलील कुलकर्णी यांचं संगीत आणि संदीप खरे यांचे शब्द यांनी नेहमीप्रमाणेच आपली जादू दाखवली आहे.
कथा-पटकथा-संवाद विभाग सांभाळणारे समीर जोशी आणि दिग्दर्शक अमित अभ्यंकर
चित्रपट संपल्यानंतर झालेल्या अनौपचारिक ओळख कार्यक्रमात कलाकारांचा संच
सहाय्यक दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या मदतीने दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांनी आपल्यासमोर एक नितांतसुंदर कलाकृती ठेवली आहे. तेव्हा "टिव्हीवर लागेल तेव्हा बघू" असं ज्यांचं ब्रीदवाक्य आहे त्यांनी निदान या सिनेमाच्या बाबतीत तरी ते गुंडाळून ठेवावं आणि चित्रपटगृहात जाऊन हा डोळे उघडणारा अनुभव जरूर घ्यावा.
छान!
छान!
धन्यवाद मंद्या..... अरे मी
धन्यवाद मंद्या.....
अरे मी आधीच लिहिलं होतं त्यात "कदाचित मी चुकत असेन" कारण तुरुपवाडी, म्हाळुंगे आणि शेवटचे ते "हरफळे पोलिस स्टेशन" आणि शिवाय सायकलवरून जाता येण्याइतक्या अंतरावरचं सोनटक्केचे स्वतःचे गाव यात जरा मीच कनफ्युज होतो....... हिम्सकुलने ती शंका लगेच दूर केल्याने मी लगेच तिथे त्याला धन्यवाद दिले.
तू दाखवलेल्या तत्परतेबद्दल मनःपूर्वक आभार. रच्याक दोन दिवसापूर्वीची ती उडवलेली पोस्ट पण तुझ्याकडे सेव्ह होती???
या वेळी चिनूक्स मला विसरला
या वेळी चिनूक्स मला विसरला काय
जोक्स अपार्ट, छान वृ आणि फोटो
चान्गली ओळख करुन दिली आहे या
चान्गली ओळख करुन दिली आहे या चित्रपटाची. बघितला तर पाहिजेच, पण पोरान्नाही दाखविला पाहिजे असे वाटते.
एका मराठी सिनेमाच्या प्रिमियर शोमधे मायबोलीकरान्च्या उपस्थितीचे परिश्रमपूर्वक यशस्वी आयोजन केल्याबद्दल मराठमोळ्या "चिनुक्स आणी मण्डळाचे" विशेष अभिनन्दन व आभार.
>>>. रच्याक दोन दिवसापूर्वीची ती उडवलेली पोस्ट पण तुझ्याकडे सेव्ह होती??? <<<<<
मन्दार, बायचान्स, माझ्या जुन्या पोस्ट्स असतील कारे तुझ्याकडे सेव्ह केलेल्या?
चित्रपटाची छान तोंडओळख.
चित्रपटाची छान तोंडओळख.
फोटोपण मस्त.
>>, पण पोरान्नाही दाखविला
>>, पण पोरान्नाही दाखविला पाहिजे असे वाटते
अगदी लिंबूकाका. नात्यात/ओळखीत शा़ळकरी मुलं असतील तर त्यांना हा चित्रपट अवश्य दाखवला पाहीजे किंवा बघण्याचा आग्रह तरी केला पाहीजे.
.
.
मस्त रे मंदार,
मस्त रे मंदार,
मस्त वृत्तांत रे मंद्या... या
मस्त वृत्तांत रे मंद्या...
या रवीवारी बघायलाच हवा हा चित्रपट
चाफ्या, विशल्या, नक्की बघा रे
चाफ्या, विशल्या, नक्की बघा रे
छान.. पूर्ण वाचत नाहि नाहितर
छान.. पूर्ण वाचत नाहि नाहितर पिक्चर पहाण्यात मजा राहणार नाहि.. :p
लायब्ररीतून सिडी आणून पाहिन आता सवडीने.. :
सम्या, आत्ताच लागला आहे तर
सम्या, आत्ताच लागला आहे तर बघून ये की सिटिप्राईडला.
समीर पण मंदारने सिनेमाची कथा
समीर पण मंदारने सिनेमाची कथा लिहिलेलीच नाहिये.
मंद्या तुझा आहे काय पिक्चर?
मंद्या तुझा आहे काय पिक्चर?
दक्षे सम्या, माझा नाहीये रे,
दक्षे
सम्या, माझा नाहीये रे, पण मायबोलीचा माध्यम_प्रायोजक या माध्यमातून सहभाग आहे म्हणून म्हणतोय.
धन्यवाद आपल्या मोलाच्या
धन्यवाद आपल्या मोलाच्या सल्ल्याबद्दल.. बाकि निर्णय घ्यायला मी समर्थ आहे.. :p
मंद्या आपुलकी करू म्हणून
मंद्या आपुलकी करू म्हणून निर्माण होत नसते..
त्यामुळे तुझे शब्द (मायबोलीसाठी) जिव्हाळा असणार्या माणसावर खर्च कर..
सत्कारणी लागतील.
मस्त , मस्त !
मस्त , मस्त !
हम्मम, भारी चर्चा
हम्मम, भारी चर्चा सुरुये....
मंदार - वृत्तांत चांगला लिहीला आहेस. फोटोंना मजबूत नॉईज आला आहे. याचबद्दल विचारत होतास का. पण छान आलेत फोटो.
मस्त चित्रपट आणि वृतांतही.
मस्त चित्रपट आणि वृतांतही. मायबोलीकरांना मी पहिल्यांदाच भेटले. पण मी पहिल्यांदाच यांना भेटतेय असे अजिबात वाटले नाही. थॅक्स टू मायबोली.
तसेच एका चित्रपटाच्या प्रिमीयरला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल मा.प्रा. चे खास आभार.
मंदार, आजच विपु पाहिला. छानच
मंदार,
आजच विपु पाहिला. छानच वृतांत. चित्रपट बघणार.
दक्षे चक्क संतोष जुवेकर सोबत फोटु काढलायेस.
सगळे फोटो छान.
आपुलकी करू म्हणून निर्माण होत
आपुलकी करू म्हणून निर्माण होत नसते>>>>>>>>> वेल सेड दक्षे.
मंदार, चित्रपट परीक्षण आणि
मंदार,
चित्रपट परीक्षण आणि प्रकाशचित्रे देखील उत्तम! हा चित्रपट पहायची आता उत्सुकता आहे.
मंदार्,लिन्क दिल्याबद्दल धन्स
मंदार्,लिन्क दिल्याबद्दल धन्स रे. चुकून मिस झाला असता हा वृतांत तर फार वाईट वाटलं असतं....फोटो पण सुंदर आलेत...
थांकु!!!!
>>फोटोंना मजबूत नॉईज आला
>>फोटोंना मजबूत नॉईज आला आहे.
हो आशु, अरे मॅन्युअल मोड मधे अजून धडपडतोच आहे. धन्स फोनवर मार्गदर्शन केल्याबद्दल.
चित्रपटही बघ रे बाबा.
मंदार, सादर केलेला चित्रपट
मंदार,
सादर केलेला चित्रपट पाहिला. तुम्ही सुरेख वर्णन केलेला बोलपट पहाण्याची अतीव इच्छा मनात निर्माण झाली आहे. यावेळी भारतात येईन तेव्हा नक्की पहाण्याचा निश्चय केला आहे.
खूप छान. ह्या सिनेमाची
खूप छान. ह्या सिनेमाची चित्रफित परदेशात लवकरात लवकर पोचवा. धन्यवाद.
बी, हा चित्रपट ऑनलाईन
बी,
हा चित्रपट ऑनलाईन www.mundu.com या संकेतस्थळावर $२.९९ भरून पहाता येतो. मराठीत हा पहिलाच चित्रपट असेल जो एकाच वेळी चित्रपटगृहात आणि ऑनलाईन प्रदर्शीत झाला.
मंदार, छान वृतांत.<<लहान पोरं
मंदार, छान वृतांत.<<लहान पोरं दरवाज्याआड लपून एकमेकांना "भोsss" करतात तसं धाडकन् समोर येत दक्षिणाने "मंद्याssss" अशी चित्कारीवजा आरोळी ठोकली आणि 'कोकण मीट्स कोल्हापूर'चा छोटासा एपिसोड पार पडला>>
मस्त चितारलंय परीक्षण! लवकरात
मस्त चितारलंय परीक्षण! लवकरात लवकर पहावासा वाटतोय
Pages