Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2011 - 06:36
तरही गझल मैफिलीतील माझा सहभाग! डॉ. कैलास यांचे आभार! या तरही ओळीमुळे माझ्या नोव्हेंबर २००९ मधील एका अपूर्ण गझलेतील एक शेर (शेर क्रमांक ३) कामास (कामी) आला याबद्दल विशेष आभार!
-'बेफिकीर'!
==============================================
बाप दारूड्या मुलाला पोसतो जगवायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
सोडले न्यायालयाने आत्महत्या मानुनी
सून ज्यांनी जाळली ते लागले मिरवायला
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
लोटल्या घाणीत अस्थी, लाजली इंद्रायणी
माउली बाहेर तुम्हीही निघा लाजायला
पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला
गुलमोहर:
शेअर करा
वा!! भूषणजी, चक्क सामाजिक आशय
वा!!
भूषणजी, चक्क सामाजिक आशय असलेली गझल!!
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला>>>>
हे दोन शेर आवडले
सगळेच शेर अप्रतिम .........
सगळेच शेर अप्रतिम .........
अप्रतिम सत्य कथन. बाप
अप्रतिम सत्य कथन.
बाप दारूड्या मुलाला पोसतो जगवायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
सोडले न्यायालयाने आत्महत्या मानुनी
सून ज्यांनी जाळली ते लागले मिरवायला
हे दोन्ही जवळून पाहिलेलं आहे.
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
एकसे एक आहेत सगळे... मस्तच..
बेफिकीरजी, खूप कांही संगणारी
बेफिकीरजी,
खूप कांही संगणारी अन अंतर्मुख करणारी गजल.
पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला , हा शेर थेट भिडला. अभिनंदन
उत्तम गझल, निशिकांतजींशी
उत्तम गझल,
निशिकांतजींशी सहमत.
भाकरीसाठी निघाले तालुके
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
आवडला..
भाकरीसाठी निघाले तालुके
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
पाळले कर्तव्य त्यांनी, एवढा संताप का?
चालले नव्हतेच दादोजी शिवाजी व्हायला>>>>
जबरदस्त !!!!!!!!!!!! गजलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, याचा अप्रतिम नमुना.......
आवडलं.
आवडलं.
उत्तम !! आवडली !!
उत्तम !!
आवडली !!
सुंदर रचना
सुंदर रचना
गझल आवडली
गझल आवडली
भाकरीसाठी निघाले तालुके
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
हे आवडलं.
त्रिवार मुजरा सरकार !
त्रिवार मुजरा सरकार !
दादोजी अफाट, अचाट,
दादोजी अफाट, अचाट, विराट!!!!!!!!!!!!!
भाकरीसाठी निघाले तालुके
भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला
सत्यवचन!!!
'दादोजी' खूप आवडला. बाजरीचा
'दादोजी' खूप आवडला.
बाजरीचा उल्लेख समजला नाही.
'सून ज्यांनी जाळली' सुद्धा खूप आवडला
(No subject)
एकदम छान गझल! अगदी खरे लिहिले
एकदम छान गझल!
अगदी खरे लिहिले आहे.
मस्त खुप छान
मस्त खुप छान
“भाकरीसाठी निघाले तालुके
“भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला”
....वास्तव…. जास्त आवडलं हे
बेफिकीरजी, ऐसी गझल ( कविता )
बेफिकीरजी, ऐसी गझल ( कविता ) वाचण्या खरोखर आनंद जाहला. प्रत्येक शेर खरोखर 'शेर' आहे.
बाजरीचा शेर खूप
बाजरीचा शेर खूप आवडला...
लिहीत रहा,
शुभेच्छा!
- चैतन्य.
लिहीत रहा>>> आभारी आहे
लिहीत रहा>>> आभारी आहे चैतन्यराव!
आत्महत्या ,भाकरी आणि दादोजी
आत्महत्या ,भाकरी आणि दादोजी
आवडले.
आभारी आहे.
आभारी आहे.