पाहुणा

विराणी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 September, 2025 - 04:11

आला पाऊस पाहुणा
वाजे मल्हाराची धून
रान पेरते करून
उतरले लिंबलोण

त्याचं गाठोडं सुखाचं
खाऊ पाचूचा घेऊन
बीया रुजता भुईत
गेलं रान हरखून

रान आले बहरात
हिरवाई रानोमाळ
दरीखोरी घुमलेला
निर्झराचाच खळाळ

रानामधी लगबग
पीक कापणीला आले
आला अतिथी परत
शिवारी धिंगाणा घाले

दाटे आवंढा गळ्यात
त्याची मुजोरी थांबेना
अती मैत्रीत अवज्ञा
जीनं पडलं गहाणा

जीव मेटाकुटी आला
दारी पाहुणा उठेना
हिरावले सारे तरी
झिंग त्याची उतरेना

Subscribe to RSS - पाहुणा