कोंबडीवडे रेसिपी

कोंबडीवडे रेसिपी शोध

Submitted by पन्तश्री on 29 October, 2022 - 07:23

मनीमोहोर ह्यांचा कोकणी वड्यांवरचा लेख वाचून एकदम तोंडाला पाणी सुटले. बाकी सर्व खवय्यांच्या प्रतिक्रियाहि वाचल्या. कुठेतरी प्रतिक्रियांमध्ये ह्याची रेसिपी मिळेल म्हणून शोधही घेतला पण सापडली नाही. लहानपणी  पासून माझी आज्जी एकदम खमंग कोंबडी वडे बनवायची. मग शहरात राहायला आल्यावर तसे वडे नंतर मिळालेच नाहीत. आता ती आजीही राहिली नाही नि तिची रेसिपीही. बऱ्याच रेसिपी पायावरून बघितल्यात. बहुतेक सगळ्या तांदळाच्या पिठाच्या होत्या. पण तो खमंगपणा तिखटपणा आणि तो मंद सुंदर वाड्याचा वास काही सापडला नाही. कृपया कोणा खवय्याकडे कोंबडी वड्याची रेसिपी असेलतर कृपया द्यावी. 

Subscribe to RSS - कोंबडीवडे रेसिपी