पातोळ्या

झटपट होणा-या हळदीच्या पानातील सुगंधी पातोळ्या.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 August, 2021 - 10:09

हळदीच्या पानातील पातोळ्या हा कोकणातील आवडता नैवेद्याचा पारंपारिक पदार्थ. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी जिन्पनसात होणारा हा मधुर एक चवदार पदार्थ आहे. नैवेद्यासाठी, नाश्त्यासाठीही हा पातोळ्यांचा प्रकार कमी वेळ असताना करायला असदी सोयीस्कर पडतो. पीठ व मीठ घालून दाटसर पेस्ट करायची. आपल्या मोदकांच्या सारणाला करतो तसेच ओला नारळ, गुळ वेलची व आवडत असल्यास सारणाची श्रीमंती वाढवायला थोडे आवडते ड्रायफ्रुट घालून मस्त चवदार सारण बनवायचे.

Subscribe to RSS - पातोळ्या