टॉन्सिल्स काढून टाकल्यावर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात का?
Submitted by शैलपुत्री on 2 February, 2020 - 02:55
मला साधारण तीन महिन्यांपासून सर्दी होती. सर्दी वाहत नव्हती तर फक्त नाकपुड्या बंद असायच्या. मी बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही. मी राहते तेथे अक्षरशः बोचरी थंडी असते. त्याचाही परिणाम होतो. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की माझी रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. गेली आठ दिवस झाले माझे टॉन्सिल्स सुजले आहेत. त्यामध्ये पस झाले आहे. सध्या फक्त द्रव अन्नपदार्थ सुरू आहेत. मला बोलताना ही अतिशय त्रास होतो. जरासुद्धा तोंड उघडे राहिले की त्यात हवा जाऊन कोरडेपणा येऊन प्रचंड वेदना होतात. हेवी एंटीबायोटिक्सचा डोस सुरू आहे परंतु काहीच उपयोग होत नाहीये. दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे.
शेअर करा