निळावंती
Submitted by Dhangya on 2 April, 2019 - 05:37
काल घरी जेवायला बसलो होतो, वडील फोनवर बोलत होते, तेव्हा ते निळावंती या ग्रंथाविषयी बोलत होते. मी आईला विचारले की निळावंती हा विषय काय आहे.तेव्हा आईने मला सांगितले निळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर माणूस वेडा होतो. मी या ग्रंथाविषयी पहिल्यांदाच ऐकत होतो.
मी: तुला कसं काय माहित?
आई: मी लहान असताना आमच्या गावात हे घडले होते.
मला ही स्पष्ट अफवा वाटली.व मी लगेच युट्यूबवर सर्च केलं. तेव्हा मला आईने सांगितल्या प्रमाणेच बरिच माहिती मिळाली.माझ्या आई-वडीलांना लिहिता वाचता येत नाही,ते आध्यात्मिक धोरणाचे आहेत.
शेअर करा