भावनांनी शब्दांच्या वेशीला शिवलं होतं,
कधी काळी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहीलं होतं..
ओळख, मैत्री, जिवलग मैत्री बरीच नाती झाली,
आता पुढे काय? विचारायची वेळ आली,
कसं विचारु म्हणता म्हणता मला हे सुचलं होतं
कधी काळी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहीलं होतं..
काय असावं-नसावं, पत्रात काय सांगावं बोलावं?
स्तुती-स्मृतींच्या सुमनांना कुठल्या तराजूत किती तोलावं?
सारं सारं काही मला प्रेमाने शिकवलं होतं
कधी काळी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहीलं होतं..
मग कुणी सांगितलं कागदाला गुलाबी रंगवावं,
दरवळणार्या शब्दांना मनाचं अत्तर लावावं,
सगळं काही करुन तुझ्यात बॅगेत सरकवलं होतं
कधी काळी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहीलं होतं..
भेट सांगणं, थेट विचारणं, त्यापेक्षा पत्रच बरं.
तयारच होतं तुझ्याकडे पोचायला माझं वेडं वारं.
तुझं गंधीत उत्तर फक्त मिसळायचं राहीलं होतं
कधी काळी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहीलं होतं..
वा वा. प्रेमी जीव ई मेल न
वा वा. प्रेमी जीव ई मेल न करता प्रेमपत्रे पण लिहीत ही गोड आठवण करून दिलीस सुमेधा.
छान कविता. बाय द वे, पुढे काय झाले त्याचे?
छान आहे.... तुमच्या कवितांतला
छान आहे.... तुमच्या कवितांतला रीदम मस्त असतो...आवड्ली !
गिरीश
काहीच्या काही मधून हलवा हो.
काहीच्या काही मधून हलवा हो. मस्त कविता आहे, दिमाखात येउ द्या कवितांच्या सेक्शन्मध्ये.
छान आहे
छान आहे
छान आहे. उम्या, इतरांच्या
छान आहे.
उम्या, इतरांच्या खाजगी गोष्टीत खुपसायला नाकाचा वापर करू नकोस. मी तुला कधी विचारल का तुझ्या कॉलेजच्या तिसर्या वर्षाच्या चवथ्या गर्लफ्रेंडचं काय झाल म्हणून.
काय कौतुक? अरे मी
काय कौतुक? अरे मी प्रेमपत्राचे काय झाले ते विचारले; जे बॅगेत सरकवले होते.
धन्यवाद पब्लिक!! उमेशजी, त्या
धन्यवाद पब्लिक!!
खुप छान वाटलं.
उमेशजी, त्या साठी कवितेचा पुढचा भाग लिहावा लागेल. बघुया कधी जमतंय ते.
गिरीशजी, तुम्ही असे पहिले वाचक आहात जे मला रीदम बद्दल सांगत आहात, thanks a lot
बाकी सगळ्यांचेही मनापासुन आभार !
छान लिहीता तुम्ही...
छान लिहीता तुम्ही...:)