तू आलास तर!

Submitted by shuma on 7 January, 2008 - 22:18

अर्ध्यावरच थांबलय आयुष्य माझं
तू आलास तर पूर्ण करीन म्हणते
रिकाम्या मनाच्या कानाकोपर्‍यातून
ताज्या आठवणी भरीन म्हणते

थोडं कडू थोडं गोड
वाटून खाऊ कैरीची फोड
अगदी पूर्वी सारखी चिमणीच्या दातांनी जरी नाही
तरी पाट्या वरवंट्यावरही सही

रेंगाळणारा संधीप्रकाश
कधी उंबरठ्यावर बसून पाहू
तर कधी एकमेकांच्या डोळ्यांतून सांडणार्‍या
उबदार उन्हात नाहू

पण कसं जमायचं हे सारं?
आपल्या पावलांत तर सात जन्मांचं अंतर!
असं सहजी नाही कापता येणार
एक श्रद्धा एक विश्वास माझा
कुठल्याच नात्यात नाही नापता येणार!

पणं मग सात जन्मांनी का होईना तू ये!
आयुष्याच्या घरट्याला प्रेम तुझं फांदी होईल
मन अगदी मोकळं मोकळं अन
सप्तपदीची चांदी होईल

अख्खी कवीता शब्दांच्या पलीकडची....

आयुष्याच्या घरट्याला प्रेम तुझं फांदी होईल
मन अगदी मोकळं मोकळं अन
सप्तपदीची चांदी होईल

ह्या ओळी मी माझ्या वहीत जपणार आहे...

रिकाम्या मनाच्या कानाकोपर्‍यातून
ताज्या आठवणी भरीन म्हणते >>> वा काय छान लिहिलय..

नापता शब्द खटकला. मापता चालेल का?
चिमणीच्या दातांनी नाही जमल तर पाटा वरवंट्यावर सही >> अई शाबास! ये हुई ना बात Happy
सप्तपदीची चांदी काय पटलं नाई.. विचार करत्येय.
कविता छान.

ती परत आली आहे, उगाच सफाईदारपणे अडखळत पावलं टाकते आहे...:)

मस्त शमा सुंदर,

रिकाम्या मनाच्या कानाकोपर्‍यातून
ताज्या आठवणी भरीन म्हणते वाह...

काहीच्या काहित? छे! काहीच्या काही. ती परत आली आहे...

शमा, काय गं कित्ती दिवसांनी !! काय म्हणतेयस, ,ईमेल टाकते आज तुला..
कविता फस्क्लास ऍज युज्वल Happy

शमा, खूप सुंदर आहे कविता. कशी आहेस?

क्या बात है जानेमन..... मी आज?वाचली तु़झी कविता....... !!
आहेस कुठे ?

शमा, अतीव सुरेख कविता. 'काहीच्या काहीच' सुंदर आहे!
(पण काहीच्या काही मध्ये का?)
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

शमाजी,
एक दम छान आहे कविता!!!

वाह, केवढं सुरेख लिहीलेयस !!

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

अनंतकाळापर्यंत तुझी वाट पाहीन!
प्रेमासाठी वाट्टेल ते...!
मस्तच!!
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

शमा, छानच लिहीली आहे कविता. अगदी आतुन, ह्रुदयातून. सुंदर.

सुंदरच आहे कविता. काहीच्या काही मुळीच नाही.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

एक दम छान , पन काहीच्या काही मुळीच नाही

द निल
'नापता' शब्द खुप दिवसांनी वाचला. अन भुतकाळ आठवला !

हिला इथुन उचलुन "कविता" या सदराखाली टाक बरं.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

सर्वांच्या म्हणण्यानुसार मी पण हेच म्हणेल कि काहिच्या काही कवितेत का बरं टाकली तुम्ही हि कविता.... तुम्हाला काही तरी वेगळं सुचवायचं होतं का..? कारण कविता खुप छान जमलीये....!

************************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>>>>

तुम्हा सर्वांचे परत आभार
आजकालच्या काळानुसार ही कल्पना काहीच्या काही आहे असं मला वाटलं
म्हणून मी इथे ही कविता टाकली होती.

शुमा, कविता खूप छान आहे पण अस प्रेम आता अस्थित्वात नाही अस म्हणायच आहे का तुला?
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

ही पाहिलीच नव्हती. मस्त ग शमा! सुरेख आहे.

अतिशय छान कविता...
सुंदर...
Happy
गोबु!
भुल शायद बहुत बडी कर ली.....दिल ने दुनियासे दोस्ती कर ली..