ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

Submitted by बस्के on 21 July, 2009 - 15:19

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. Sad "
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! Wink "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. Sad "

"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )

"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! Lol ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. Happy "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! Happy )

सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..

सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!

आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? Sad इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्‍याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! Happy नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले.. थोडं exaggerated सत्यकथन असं म्हणता येईल याला..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! Happy

गुलमोहर: 

नक्कीच आवडले - मनापासुन लिहीलेले आवडनारच!
<<सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच!>> - हे ठिक आहे मात्र कधिकधि असा पन अनुभव आहे कि आपले भारतियच येथे आपल्या देशाबद्दल उगिचच बोम्बा मारतात, मला त्रास होतो. तुलना अव्यश करावि, इकडच्या चांगल्या गोष्टि मान्य आहेत पन भारताला (मात्रुभूमिला शिव्या?) - मला तर रागच येतो.
~अविनाश.

एक सांगा, जेन्वा अमेरिकेचे नागरीकत्व मिळते तेन्वा छातीवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते की आता माझी LOYALTY या देशाशी आहे. तेन्वा नक्की ह्रिदयात काय होते? गरीब भारतापासून सुटका झाली व स्वातंत्र्यदेवीने आपल्याला कडेवर घेवुन लिमिट नसलेले क्रेडीट कार्ड दिले आहे असे वाट्ते का? उद्या भारताशी युद्ध पुकारले तर मनात काय येइल? मरो ते जवान?

देश सोडणे हा पूर्ण विचारानन्तर घेतलेला निर्णय असतो. मग ही रडारड का बरे? सगळेच भारतीय जळ्फळत नाहीत हो. प्रत्येकजण सुख सम्रुद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करीतच असतो. आपापल्या लेवलवर. इथले जीवनही तितके वाइट नाही.( मध्यम वर्गासाठी तरी) आहात तिथे मजा करा ना. दोन्ही कसे मिळणार?

भाग्याश्री खुप छान लिहिलयस. आवडल. अनुभवल नसल तरीही वाचताना पाणी आल डोळ्यात

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

<<देश सोडणे हा पूर्ण विचारानन्तर घेतलेला निर्णय असतो. मग ही रडारड का बर<<

लग्न करतानापण मुलगी रडतेच ना? ते का?ते काही तिला दुखः देणारं असतं म्हणून नाही.
पण एक नातं जोडताना कुठेतरी एका 'जन्माच्या' नात्यापासून दूर जातोय हे वाटतं म्हणून.
मला अजूनही माहेरहून निघताना आणि मुंबईला फ्लाईट्मध्ये बसताना सेम फीलींग येतं.
सासर कितीही सुखाचं असलं तरीपण माहेर ते माहेरच नाही का?
आहोत तेथे सुखात आणि मजेत राहणं बुद्धीला पटलं तरी कधी कधी मन ऐकत नाही.
आणि शेवटी माणसाला जे जवळ नाही त्याचीच जास्त ओढ असते.
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

पीव्हीने मनातले लिहीले माझ्या..

अश्विनी मामी, अहो अमेरिकेला येणं म्हणजे अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारणे असं समजताय का तुम्ही?? मधल्या स्टेजेस असतात हो! अमेरिकेला येऊन जास्तीचा पैसा मिळवण्यासाठी मला माझ्या देशाचे नागरिकत्व नाही सोडावं लागत..
उगीच काय ब्लॅकमेलिंग केल्यासारखे युद्ध झाले तर कुठला देश... प्रश्नच कसा पडतो हा?? हे म्हणजे सांभाळणारी बाई जास्त आवडते की आई?? मला हाच अ‍ॅटीट्युड आवडत नाही! Sad

आणि तुम्ही याला रडारड समजत असाल, तर समजा! मला माझ्या आईची आठवण आली की मी रडते.. तुम्ही काय करता?

www.bhagyashree.co.cc/

छान लेख आहे. माझ्या मनातलच लिहील्या सारखे वाटते. पहीला भाग म्हणजे तर अगदी रोजच्याच भावना झाल्यात माझ्या.

आपले निर्णय आपल्यावर बन्धन कारक ना. तुमच्या कम्युनिटीचा(टेम्परवारी अमेरिकन ) अ‍ॅक्चुअल अमेरिकन लोकाशी असा किती संबंध येतो? तेथील विचारधारा चळवळी यात अस किती सहभाग असतो? त्यान्च्या धोरणांचा जगावर कसा व काय परिणाम होतो याचा तुम्हाला कधी विचार करावा वाटतो का? जगातील
नैसर्गिक रीसोरसेसचा मनमानी वापर, युद्धखोरी, कमालीचा व्यापारी व धन्देवाइक द्रुष्टीकोण, अर्थव्यवस्थेतील
भयन्कर गोलमाल हे त्यान्चे मला न पटणारे काही मुद्दे आहेत. अर्थात नोकरदार लोकाना या बाबत विचार करायची फारशी गरज वाटत नाही तसेच त्यात त्यान्चा काय दोष, हे मला समजते. तसे तर भारतातही कमी
त्रास आहेत का? भारतीय धोरणे सुद्धा काहिना नक्किच जाचक वाटत असणार. पण जर पगाराच्या चेक कडे
नजर ठेवूनच जगायचे आहे तर आरामात व आनन्दात का जगू नये? थोडा वस्तुनिष्ठ विचार करायला हवा.

तसे म्हणाल तर मी स्वतः दत्तक मुलगी म्हणून मोठी झाले आहे. आपल्या स्वभावाची खरी परीक्षा
संकटातच होते. मेरे हिस्से का रोना मैने रो लिया है.

<<अ‍ॅक्चुअल अमेरिकन लोकाशी असा किती संबंध येतो? >>

अगदी रोजचाच. भारतीयच शनिवार, रवीवार कधी भेटले तर.
त्याशिवाय का दनाद्दन अमेरिकन मुलामुलींशी लग्ने केली भारतीयांनी?

<<तेथील विचारधारा चळवळी यात अस किती सहभाग असतो? >>
अनेक भारतीय यात सक्रीय सहभाग घेतात.

<<त्यान्च्या धोरणांचा जगावर कसा व काय परिणाम होतो याचा तुम्हाला कधी विचार करावा वाटतो
का? >>

पक्के समजते नि विचार करतो. 'हे विश्वचि माझे घर' ही उदात्त संकल्पना भारतीयांसारख्या हजारो वर्षे सुसंस्कृतीत वाढलेल्या लोकांना मूलभूत वाटते. अमेरिकन लोक तेव्हढे सुसंस्कृत नाहीत. म्हणूनच गुलामगिरी जोरात चालू होती, नि अजूनहि काळ्या लोकांची तक्रार आहेच.

स्वार्थ, नि पैसा या दोनच गोष्टींना अमेरिकेत प्राधान्य व किंमत आहे. ते लोकशाही वगैरे नुसत्या गप्पा! फक्त अमेरिकेला जे फायदेशीर असेल, ते करायचे. रशिया, चीन, भारत इ. डोके वर काढू पहाणार्‍या लोकांना दाबून खाली ठेवायचे, नि बाकीचे गेले उडत. अश्या पायावर येथील सरकार व इतर लोक व्यवहार करतात. त्यांना ते बरोबर वाटते. त्यामुळे भारतातले लोक काही म्हणाले तरी ते लक्ष देत नाहीत. हे सत्य आहे, चांगले नसले तरी.

शिवाय भारतातली '(हु)' उच्च संस्कृति, तिथल्या राजकारणात अथवा लोकांच्या व्यवहारात कितपत वापरली जाते, याची सर्व माहिती इथल्या सी आय ए कडे आहे. तेंव्हा त्या संस्कृतीबद्दल भारतीयांनी इतरांना न सांगणेच बरे.

पण मी माझे पैसे उदारबुद्धीने दुसर्‍या अभागी व्यक्तीला दिले, माझा धर्म मी पाळला, हे 'विश्वचि माझे घर' असे ओरडून सांगितले तरी मला काही कुणि त्रास देणार नाहीत. पण मतेहि देणार नाहीत, म्हणून निवडून येणार नाही, म्हणून मी फक्त महाराष्ट्र फाऊंडेशन वगैरे संस्थांना पैसे देतो. (फेकत नाही). ते 'म्हणे' महाराष्ट्रातल्या जनतेला मदत करतात!

<<नैसर्गिक रीसोरसेसचा मनमानी वापर, युद्धखोरी, कमालीचा व्यापारी व धन्देवाइक द्रुष्टीकोण, अर्थव्यवस्थेतील भयन्कर गोलमाल हे त्यान्चे मला न पटणारे काही मुद्दे आहेत. >>

ते इथेहि कुणाला पटत नाहीत. जसे भारतातहि सगळ्यांना कळते की जातिभेद, लाचलुचपत, कामात दिरंगाइ, वेळेवर न येणे, इ. गोष्टी चांगल्या नाहीत. त्याबद्दल भारतीय खूप विचार करत असतीलच.

पण इथे विचार करण्यापेक्षा कृति करण्यावर भर आहे, जसे काल परवा यहुदी लोकांचे धर्मगुरू, निवडून आलेले नेते या सर्वांना लाचलुचपतीबद्दल चक्क अटक केली व त्यातल्या बर्‍याच जणांना नक्कीच तुरुंगवास होईल अशी खात्री आहे. इथे नेहेमीच ऐकू येते, की कुणा धर्मगुरुला, निवडून आलेल्या, खाजगी किंवा सरकारी कामातील उच्च अधिकार्‍यांना निरनिराळ्या गुन्ह्यांबद्दल पकडून शिक्षा झालेली आहे.

Happy Light 1

अश्विनीमामी, तुमच्या प्रतिसादांचा माझ्या लेखाशी संबंध मला खरंच कळत नाहीये.. Sad
दुसरे म्हणजे कोण म्हणते इथे आरामात आणि आनंदात जगत नाहीये? माझ्या लेखातही लिहीलेय मी, की भरपूर गोष्टी करतीय मी ज्या भारतात करू शकले नसते, भरपूर स्वतःसाठी वेळ मिळतो मला.. प्रचंड मोकळेपणा मिळतो इथे, भटकंती करायला आणि त्या सोयीच्या व्हाव्यात म्हणून सोयी-सुविधा आहेत.. एक ना हजार गोष्टी.. पण म्हणून कोणी होमसिक होणारच नाही का? Happy

www.bhagyashree.co.cc/

अहो bsk, कुणिहि काहीहि लिहीले तरी शेवटी सगळे विषय भारत वि. अमेरिका असेच होतात. याचे कारण दोन्ही देशातल्या संस्कृतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे कुठल्याही, अगदी आईची आठवण, असला अगदी १०० टक्के वैयक्तिक विषय असला नि त्याबद्दल तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहीले तर फार थोड्या लोकांना, जे तुमच्यासारख्या अनुभवातून गेले आहेत, त्यांनाच समजते, कळते. बाकीचे आपले लवकरच भारत वि. अमेरिका वर उतरतील.

भारतातली मुलगी पुणे सोडून लग्न करून मुंबईला गेली नि म्हणाली, आईच्या आठवणीनी रडायला येते, तर लोक म्हणतील 'अरेरे, गरीब बिचारी, खरच मायाळू पोर आहे हो.' पण तीच अमेरिकेला गेली तर म्हणतील, 'मग, लग्नाला संमति होती ना तुझी, मग आता कशाला रडतेस?'

तर असू दे. असेच असते. हे नाही तर दुसरे काहीतरी दु:ख. एकूण एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे. आपले दु:ख आपल्या मनाला सांगावे. अगदी प्रत्यक्ष आईला सुद्धा काही काही दु:खे कळत नाहीत आपली, तर इतर लोकांचे काय?

Happy Light 1

अश्विनी, तुझा कुठलाही मुद्दा बिएसके ने मांडलेल्या विचारांशी संगत वाटत नाहिये...प्लिज लेख परत एकदा वाच आणि मग प्रतिक्रीया दे.....

आश्विनी मामी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बीएसकेचा लेख पुन्हा एकदा वाचा. तिचा लेख होमसिकनेस दाखवतोय... तुम्ही भारत वि अमेरिका का समजताय?

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

तुमचे खरे आहे. मला वाद करायचा नाही. मधे एकदा सुद्धा, आन्तरराष्ट्रिय सौजन्य या लेखावरील माझी प्रतिक्रिया
टोकाची झाली होती. मी खूप विचार केला. तुम्हाला दुखवायचे तर अजिबात मनात नाही. होमसिक होतच असणार. त्यात तुमचे वयही लहान असणार. मी चाळीशी ओलान्ड्लेली, चार धक्के सहन केलेली, एकट्याने व्यवसाय चालविणारी. त्यामुळे प्रत्येक इश्श्यू कडे confrontation च्या स्वरूपात बघायची सवय लागलेली आहे. त्यात तुम्ही विश्ववासी मराठी अश्या भावना मायबोलीत व्यक्त करणार नाही तर कुठे? हा सर्वस्वी तुमचा
प्लॅट्फॉर्म आहे. मी या डेमोग्राफिक मधे बसत नाही. हे मला कळले. तुम्हा सर्वाना शुभेच्छा.

Pages