रेशीमगाठी

Submitted by krupa on 15 July, 2009 - 10:12

पहिलाच प्रयत्न असल्याने सांभाळुन घ्या. जरा अशुद्ध लेखन पण होत आहे..
-----------------------------------------------------------------

"ए सँडी, काय लेका? कित्ती वेळ? तुला माहित आहे ना आजची अर्जंट मिटींग का बोलावली आहे ते," अभी जवळ येत असलेल्य संदिपकडे रागानेच बघत म्हणाला. त्याला बघुन मग पुर्ण टोळक्याने सांदिपच्या नावानेच बोटं मोडायला सुरुवात केली.
"हा सँडी तर न नेहमी महत्वाच्या मिटींगला उशीराच येतो. नाहितर बरं इतरवेळी वेळेवर येईल टावाळ्या करायला," ईति कॅरल.
"खरचं अ भी आज जरा तु ह्याला रागच दे रे. बघवं तेव्हा लेट, लेट लतीफ नुस्ता," दिप्याने देखील री ओढली.
जसजसा सँडीजवळ आला तशी ग्रुपमधली चळवळ जरा कमी झाली. "अरे थोडा डोळा लागला होता म्हणुन लेट झालो" सँडीने आपली बाजु मांडली.
"डोळा लागला होत? तुला बरां दुपारच्या झोपा येतात एरव्ही बरं रत्रभर जागरणां करत असतोस," मीनाक्षीने बाँब टाकला.
"अरे बस बस कित्तीजण एकदम बाँब टाकत आहात? जरा श्वास तर घेउ द्या त्याला. अरे पण तुला समस करुन कळावले होते ना आज का भेटायचे आहे ते. मग गजर लाउन झोपायचे ना लेका; फुकटत अम्ही इथे माश्य मारत बसलो ते," सौरभने पण टोला हाणलाच.
"फुकटात म्हणजे काय? इतर दिवशी पैसे घेतोस काय माश्या मारायचे?" सँडीनेसुद्धा तो टोला परतावला.
"अरे लोकांनो विषय कुठे साईड ट्रेकवर नेत आहत, जर मेन ट्रेकवर आणा की गाड्या. आपण इथे काउ सॉरी (चिं. कल्पेश ईनामदार ) आणि माउच्या (चिं. सौ. कां. पायल जोशीचच्या) लग्नाच्या सिक्ररेट प्लँनिंगनिमित्त जमलो आहोत आणि तुमचे तारु कुठल्या कुठे भरकटत आहे. तेव्हा सरळ मुद्द्यालाच हात घालुया," अभीने नेहमीप्रमाणे लिड घेतली.

मग सगळ्यांनी लग्नात काय काय धम्माल करायची ते ठरवु लगले. तसेच काका, काकुंनां काहि मदत हवी आहे का ते बघायचे पण ठरले. सगळे सामान, सोसायटीची साफसफाई, सुशोभिकरण आणि अजुन काहि कामे आपआपसात वाटुन घेतली. आणि सरतेशेवटी सर्वांनी त्या दोघांना लग्नात "सरप्राईज" कसे द्यायचे ते ठरवत होते. सगळेजण आपल्या घरात लग्न आहे असाच थातात बेत आखत होते. शेवटी एवढ्या वर्षांनी सोसायटीत लग्न होते, मग ते गाजतवाजत नको का व्हायला? तसे बघितले तर हि सोसायटी एका उच्च्भ्रु वर्गातली होति. पण सोसायटीतले सगळेच जण एकमेकांशी आपुलकिने वागत. हिच या सोसायटीची खासियत होती. नेहमी एकमेकांच्या म्दतीला धावुन जाणे, आपल्या सुखत सगळ्यांना सामवुअन घेणे अणि दु:खात लोकांना आधर देणे हे माघच्या पिढिचे गुण नवीन पिढिनेसुद्धा उचलले होते. सगळे काहि ठरवुन झाल्यावर अभीने सारांशासाठी म्हंटले.

" अरे यर काउ,माउच्या लग्नात अशी धम्मल आणु कि सगळ्य सोसायटीने आणि त्यंच्या घरातल्या सगळ्या पाहुण्यांनि लक्षात ठेवले पाहिजे. सगळ्यांन एक "गोड आठवण" म्हणुन हे लग्न नेहमीच लक्षात राहिले पाहिजे. पण त्यासाठी सगळ्यांनी नेमुन दिलेली कामे लक्षात ठेवुन वेळच्या वेळी पार पाडली पाहिजेत. अगदी चुकुनसुद्धा कधी "डोळा लागु" देउ नका, काय?" सँदीकडे एक मिस्किल कटाक्ष टाकुन अभीने जाताना एक बाँब फोडलाच आणि जोरात हास्याचा फवारा फुटला.

हे सगळे मगापासुन ऐकणारया देशपांडे काकुंना पण हसु आवरले नाही अणि आपल्या तळमजल्यावरच्या खिडाकितुन विचारले," अरे अभ्या तु कधी करतो आहेस लग्न? की सगळ्या टोळीचा म्होरक्या बनुन तुच सगळ्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करणार आहेस?"
ह्यावर फिल्मी होत अभीने उत्तर दिले," काकु, अभीतक ऐसी कोई लडकी मिली नाहि जो 'अभी' के दिल कि घंटी बजा सके."

तेवध्यत जोरात आलेल्या कारच्य ब्रेकसच्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. होंडसिटीची काच उघडुन एक चांगलीच शिवि हासडत तो म्हणाला. " अरे काय हे कुणी ठेवलं आहे हे मध्येच रस्त्यात? #@&च्या, अक्कल नाहि लोकांना सामन असे मध्ये ठेवतात का रस्त्यात?," विशितला एक पोरगेलसा तरुणा ओरडला. "अनु, चिल यार एवढ काय हायपर होतोस? जरा वळवुन घे ना रे गाडी," मागच्या सीटवर बसलेल्या पुस्तकामागुन न डोकावता तरुणीचा आवाज आला. तेवढ्यत अभी आणि सँडीने तत्परतेने ते अम्धले सिमँटचे पोते उचलुन ठेवले. थँक्सही न म्हणता मघाशच्या तरुणाने आपली गाडी पुढे दामटवली. थोडी पुढे जाउन ती गाडी थांबली आणि तो मघासचा मुलगा, एक वयस्कर बाई खाली उतरली.
तेवध्यात तो मगाचा मुलगा बोललाच," ए महाराणि, आता ते पुस्तक बाजुला ठेवुन जरा आम्हाला मदत करशील का? पोचलो आपण ईप्सित स्थळी.. ,"

"ए आई, हा बघ गं कसा बोलतोय मला," ती मुलगी गाडीतुन उतरत बोलली. उंच टाचांचे सुंदर नक्षीदार चप्पल, पायात नाजुकसे पण ड्रेसला मॅचिंग पैंजण, फिकट गुलाबी कलरचा चुडीदार अणि त्याच रंगाचा कुर्ता, लफ्फेदार ओढणी, त्याच रंगाच्या मॅचिंग किणकिणणार्या बांगड्या घातलेले गोरेपान हात. कमरेपर्यंत रुळणारे लांबसडक रेशमीकेसांचा बांधलेला हाफपोनी असलेली मुलगी वळली. नाजुक हनुवटी, गुलाबाच्या पाकळीपणे भासणारे ओठ, धारदार नाक, काळेभोर पण त्यात कोणिही हरवुन जावे असे बोलके डोळे... दोन मिनितं त्या मुलीला बघुन सगळेच गुंग झाले होते. परत तिच्या आईचा आवाज ऐकुन सगळे भानावर आले," अरे काये हे तुम्ही दोघं नेहमीच असे भांडत असता, मोठे झालात आत्ता हे सगळे सोडुन द्या."

ते समोरचे दृष्य बघुन अभीने मनाशीच एक सुस्कारा टाकत म्हंटले, "हाय, अभी लगता है दिल कि घंटी बज गयी.." हे बघुन देशपांडेकाकु अभीला बोलल्याच,"काय अभी दिल कि घंटी बज गयी क्या?" आपल्या मनातले पटकन ह्यांनी कसे ओळ्खले असे वाटुन त्याचा चेहरा क्षणभर गोरामोरा झाला, पण वेळ मारुन नेण्यासाठी तो बोलला," काय काकु कशाला गरिबाची थट्टा करत आहात?"

क्रमशः

" ए झंपे चल पटपट या बॅगा वर न्यायल मदत कर; नुस्ती शुंभासरखी बसुन राहु नकोस. चल कामाला लाग." अनुने चान्स घेतलाच.
"ए तुच झंपु, मी नाहि नेणार या बॅगा वर कित्ति जड आहेत त्या?," तिने तोंड वेंगाडुन प्रत्त्युत्तर दिले.
" हे काय एकमेकांना मदत करायची सोडुन इथेपण तुम्ही भांडत बसलात. चल मी उचलते त्या बॅगा." त्यांची आई म्हणाली.
"नको आई आम्हि दोघ घेउन येतो, तु वर जाउन घरचे दार उघड," तिने शांत होत उत्तर दिले. "ए चल रे टवळ्या मी लिफ्टपर्यंत तुला बॅगा आणुन देते तु वर घेउन जा. ए शहाण्या चालु काय पडलाच जाताजाता एक बॅग तर घेउन जा." तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करत तो निघुन गेला. "बघुन घेईन तुला, असे बोलुन तिने डीकिमधल्या बॅगा काढयला सुरुवात केली. एक एक करुन तिने बॅगा उतरवल्या.पणा असे करतानाच तिचे सगले केस अस्तव्यस्त चेहर्यावर पसरले शेवटी तिने क्लिप काढुन त्यंच मोठ्ठा अंबाडाच बांधला. अणि अप्रत पुराण ताकदिनीशी ती व्हिल बॅग ओढु लागली पण टी बॅग मत्र तिथल्या तिथे ढिम्म.. पर तिने एकदा जोर लावुन बॅगच पट्टा ओढला आणि तो पट्टा सरळ तिच्या हातातच आला.
"ओह शिट, दिस इज डिसगस्टींग..., काय वैताग आहे यार," असे ती स्वताशीच ओरडली.

एवढा वेळ हे सगळे उभे राहुन बघत असलेला अभी शेवटी तिच्या जवळ गेला अणि विचारले," मे आय हेल्प यु?" यावर फक्त वर बघुन ती म्हणली," नो थँक्स." आता एवढ्या जवळुन तिच्या नाकाचा तो लालबुंद शेंडा बघुन त्याल मनातल्या मनात हसुच आले. पण तिचे ते शरर्थिचे प्रयत्न हाणुन पाडायचेच असे जणु विधात्याने ठरविले होते कारण ति बॅग शेवटी शेवटी जोरात आपटली. आणि हे बघुन अभी न रहावुन बोललाच,"मॅडम, प्लिज आम्ही करतो मदत, नाहितर उगाच तुम्ही स्वताला दुखपत करुन घ्याल. ए सँडी, सौरभ, कॅरल, मीनु, यारे सगाळेजण जरा हात लाव बघु सामानाला. हा मॅडम कुठल्या मजल्यावर न्यायचे आहे हे सामान?" काहि कळायच्या आत सगळेजण येउन तिला मदत करु लागले. "अरे, अरे, पण जरा ऐकाल का? मी करेन ते, तुम्ही कशाला??" पणा तिचे कोणिच ऐकत नव्हते. तिला असे गोंधळलेले पाहुन अभीला अजुनच हसु आले अणि ते अस्फुटपणे त्याच्या तोंडुन बाहेरही पडले ते तिच्या नजरेतुन काही सुटले नाही आणि ती अभीकडे रागातच बघत होती.
रागात पण लोकं इतकी सुंदर दिसतात, हाय... असा राग तर आपण जन्मभर सहन करायला तयार आहोत त्याच्या नकळतच त्याचे हात हृद्यावर गेले आणि एक उसासा टाकला. तेवढ्यात मागुन आलेल्या एक प्रश्नाने त्यची तांद्री मोडली. " साहेब, हे सामान कुठे पोचवायचे आहे हो?" सँडिने लगावलेल्या षटकारावर त्याच्याकडे उत्तरच नव्हते. " ते मला काय मॅडमना विचारा की." अभीने तिच्याकडे इशारा करत म्हंटले. "अं सेकंड फ्लोर २०६ मध्ये," ती ओशाळतच म्हणली. अरे व्वा म्हणजे आपल्या शेजारच्या गुप्तांच्या घरात. अहा काय मस्तय मग, रोज दर्शन घडेल बाईसाहेबांचे; अभीने शक्य तितक्या चेहर्‍याच्या हावभावांवर नियंत्रण ठेवत म्हणंटले,"अरे व्वा!! मग तर भेट रोजच होईल आत्ता." तिला काहि कळले नाहि पण तिने ऐकुनही न ऐकलल्यासारखे केले.

क्रमशः

" ए झंपे चल पटपट या बॅगा वर न्यायल मदत कर; नुस्ती शुंभासरखी बसुन राहु नकोस. चल कामाल लाग." अनुने चन्स घेतलाच.
"ए तुच झंपु, मी नाहि नेणार या बॅगा वर कित्ति जड आहेत त्या?," तिने तोंड वेंगाडुन प्रत्त्युत्तर दिले.
" हे काय एकमेकांना मदत करायची सोडुन इथेपण तुम्ही भांडत बसलात. चल मी उचलते त्या बॅगा." त्यांची आई म्हणाली.
"नको आई आम्हि दोघ घेउन येतो, तु वर जाउन घरचे दार उघड," तिने शांत होत उत्तर दिले. "ए चल रे टवळ्या मी लिफ्टपर्यंत तुला बॅगा आणुन देते तु वर घेउन जा. ए शहाण्या चालु काय पडलाच जाताजाता एक बॅग तर घेउन जा." तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करत तो निघुन गेला. "बघुन घेईन तुला, असे बोलुन तिने डीकिमधल्या बॅगा काढयला सुरुवात केली. एक एक करुन तिने बॅगा उतरवल्या.पणा असे करतानाच तिचे सगले केस अस्तव्यस्त चेहर्यावर पसरले शेवटी तिने क्लिप काढुन त्यंच मोठ्ठा अंबाडाच बांधला. अणि अप्रत पुराण ताकदिनीशी ती व्हिल बॅग ओढु लागली पण टी बॅग मत्र तिथल्या तिथे ढिम्म.. पर तिने एकदा जोर लावुन बॅगच पट्टा ओढला आणि तो पट्टा सरळ तिच्या हातातच आला.
"ओह शिट, दिस इज डिसगस्टींग..., काय वैताग आहे यार," असे ती स्वताशीच ओरडली.

एवढा वेळ हे सगळे उभे राहुन बघत असलेला अभी शेवटी तिच्या जवळ गेला अणि विचारले," मे आय हेल्प यु?" यावर फक्त वर बघुन ती म्हणली," नो थँक्स." आता एवढ्या जवळुन तिच्या नाकाचा तो लालबुंद शेंडा बघुन त्याल मनातल्या मनात हसुच आले. पण तिचे ते शर्थिचे प्रयत्न हाणुन पाडायचेच असे जणु विधात्याने ठरविले होते कारण ति बॅग शेवटी शेवटी जोरात आपटली. आणि हे बघुन अभी न रहावुन बोललाच,"मॅडम, प्लिज आम्ही करतो मदत, नाहितर उगाच तुम्ही स्वताला दुखापत करुन घ्याल. ए सँडी, सौरभ, कॅरल, मीनु, यारे सगाळेजण जरा हात लाव बघु सामानाला. हा मॅडम कुठल्या मजल्यावर न्यायचे आहे हे सामान?" काहि कळायच्या आत सगळेजण येउन तिला मदत करु लागले. "अरे, अरे, पण जरा ऐकाल का? मी करेन ते, तुम्ही कशाला??" पणा तिचे कोणिच ऐकत नव्हते. तिलाअसे गोंधळलेले पाहुन अभीला अजुनच हसु आले अणि ते अस्फुटपणे त्याच्या तोंडुन बाहेरही पडले ते तिच्या नजरेतुन काही सुटले नाही आणि ती अभीकडे रागातच बघत होती.
रागात पण लोकं इतकी सुंदर दिसतात, हाय... असा राग तर आपण जन्मभर सहन करायला तयार आहोत त्याच्या नकळतच त्याचे हात हृद्यावर गेले आणि एक उसासा ताकला. तेवध्या मागुन आलेल्य एक प्रश्नाने त्यची तांद्री मोडली. " साहेब, हे सामान कुठे पोचवायचे आहे हो?" सँडिने लगावलेल्या षटकारावर त्याच्याकडे उत्तरच नव्हते. " ते मला काय मॅडमना विचारा की." अभीने तिच्याकडे इशारा करत म्हंटले. "अं सेकंड फ्लोर २०६ मध्ये," ती ओशाळतच म्हणली. अरे व्वा म्हणजे आपल्या शेजारच्या गुप्तांच्या घरात. अहा काय मस्तय मग, रोज दर्शन घडेल बाईसाहेबांचे; अभीने शक्य तितक्या चेहर्‍याच्या हावभावांवर नियंत्रण ठेवत म्हणंटले,"अरे व्वा!! मग तर भेट रोजच होईल आत्ता." तिला काहि कळले नाहि पण तिने ऐकुनही न ऐकलल्यासारखे केले.

क्रमशः

२०६ मध्ये पोहोचल्यावर काकुंनी सगळ्यांचे स्वागत केले पण आधी एवढ्या सगळयांन बघुन त्या थोड्या भांबावल्यादेखील. मी नंतर सांगते अशाप्रकारची खुण करुन तिने विषय टाळला. दोन दिवसांनी सगळ्यांना "पुजेला या" असे आमंत्रण काकुंनी त्यांना देउनही टाकले, आणि त्याबरोबर हातावर एक मस्त बुंदीचा लाडुदेखील ठेवला. तेव्हा अभी बोललच,"काकु काहि मदत लागली तर कळवा, मी शेजरिच रहातो २०४ मध्ये." थोड्यावेळातच सगळि मंडळी पांगली पण आत्त्ता सगळे अनुचे मित्र मैत्रिणि बनुनच. "छान आहेत गं बाई सगळे," काकुंनी सुरुवात केली. "काय छान तो तर सगाळ्यात उद्धट आणि स्वताचेच खरे करणारा आहे." शेवटी मागापासुअन खदखदत असलेला राग आलाच बाहेर. "अगं पण तुला त्याने सामान वर आणयला एवढी मदत तर केली, तुझे आपले काहितरिच गं ऋता," असं म्हणत त्यांनी आपला मोर्च सामानाकडे वळविला.

अरे व्वा आईपण आत्ता त्याचीच बाजु घेउ लागली. समजतो काय स्वताला कोणी राजकुमार की काय? नुस्ता ऑर्डरी देत होता ते? तसा दिसायला काही वाईट नाहिय गोरापान रंग, कुरळे काळेभेर केस, ५.८' उंची, आणि धारदार नाक. हो ते हवंच ना नको त्या गोष्टीत नाक खुपसायला.. शी जाउ दे आपण त्याचा काय विचार करत आहोत, सामन लाउयात.

तिकडे सगळे आपआपल्या घरी गेल्यावर, अभीने घराची बेल वाजवली. आईने दरवाजा उघडताच विचारले," अरे व्वा, आज लवकर आलात घरि? कसे काय शक्य झाले तुम्हाला राजे?" "काय गं आई तु पण ना? तिथे बाजुला बघ नवीन शेजारी आले आहेत ते बघ जा त्यांना काही हवे आहे काते?" त्याने विषय टाळायचा म्हणुन म्हंटले. "हो ते बघितले मी मघाशीच खिडकितुन, तु बरा मदत करत होतास त्या मुलीला? आवडली का रे तुला?" आईने डोळे मिचकावतच विचारले. "काय आई तुझे आपले काहितरीच," तो थोडासा ओशाळत म्हणाला

क्रमशः

तो दिवस असाच गेला पण तिचा विचार काही केल्या अभीच्या मनातुन जात नव्हता. जणुकाही सगळं जगच थांबलय तिथे... तो रागावलेला चेहरा, ललबुंद झालेल नाक आणि बॅग खेचताना अचानक सुटुन चेहर्यावर आलेले ते रेशमी लांबसडक काळेभोरकेस आणि सर्वात कहर म्हणजे ते डोळे. कोणितरी बरोबरच म्हंटले आहे " डोळे ते जुल्मी गडे..." उफ्फ... दुसर दिवस पण असाच गेला तिच्या विचारातच एव्हाना अभीला त्याच्याच मनाने भंडावुन सोडले होते. त्याचे त्याच्याच मनाशी द्वंद्व चालु होते हे काय होत आहे? आपण दुसर्या गोष्टींमध्ये का मन रमवु शकत नाहिय? राहुन राहुन सारखे तिचेच विचार का बरं मनात येतात? त्याच्या मनात काय चाललय ह्याची कोणलाही कल्पना त्याला द्यायची नव्हती. पण एका आईच्या नजरेतुन ते कसं सुटेल तिने कालपासुन दोन-तीन वेळा विचारुन झाले होते.

काल खरंतर कॅरलला पण त्याच्या मनात नक्किच काहीतरी चाललय हे कळलं होत. तिने तसं एकदा "आर यु ओके अभी? तुझं लक्ष कुठे आहे?" असं विचारुन देखील झालं होत. कॅरलने दोनवेळा त्याला विचारायचा प्रयत्न केला पण अभीने अजिबात ताकास तुर लागु दिला नाहि. कॅरलला पहिल्यापासुन अभी आवडायचा पण कधी तिने हे त्याला सांगितले नव्हते.

तिसर्‍या दिवशी सकाळि सकाळी वाजलेल्या बेलने अभीला जाग आली. एवढ्या सकाळी कोण आलय? काय त्रास आहे? जराश्या अवतारातच आणि त्रासिक मुद्रेने त्याने दरवाज उघडला. समोरचे दृष्यपाहुन तर तो तिनताड उडालाच. ओल्या केसांना गुंडाळलेल टॉवेल, त्यातुनच निसटुन निघालेली एक बट त्या सुंदर चेहर्‍यावर भिरभिरत होती. नाजुकशी टिकली, आणि हलकासा मेकअप चेहर्‍याचे निरगसपण अजुनच खुलवित होते आणि चक्क आज अंजिरि आणि जर्द हिरव्या रंगाच्या साडिने तिचे सौंदर्य अजुनच खुलत होते. दोन मिनिटे तो तसाच स्तब्ध होत, ती काहितरी विचारत अहे ह्याकडे त्यचे लक्षच नव्हते. "हॅलो मिस्टर, कधीपासुन विचारतेय मी?? काकु आहेत का घरात? त्यांच्याकडे एक काम आहे." शेवटी कंटाळुन तिने त्याच्या चेहर्यासमोर हात हलविला तेव्हा कुठे तो तंद्रितुन बाहेर आला. समोर तिला बघितल्यावर त्याला थोडे ओशाळवाणे झाले. त्याला त्याच्या अवताराची लाज वाटत होती. अंथरुणातुन उठुन एकदम ध्यान दिसत असु आपण असे त्याला पटकन वाटुन गेले. "हॅलो, मी तुमच्याशीच बोलतेय. काकु आहेत का?" एव्हाना रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. दरवाज्यावर कोण आहे हे बघण्यासाठी आलेल्या अभीच्या आईने म्हणजेच श्यामा परुळेकर. "हा बेटा बोल काय झाले? काही काम होते का?" त्यांनी विचारले. "काकु, अहो पुजेला बसायच्या अगोदर आईची ओटी भरायची आहे तेव्हा तुम्ही अर्ध्यातासांत याल का? म्हणजे तुम्हाला जमेल का हो? कारण अजुन कोणिही नाही आलेत घरातले पाहुणे. तुम्हाला घाई तर न्ही ना होणार?" जराश्या अगतिकतेने ती बोलली. "हो बेटा, येईन मी. पटकन फ्रेश होते मी आणि येतेच तुमच्या घरि." त्या घाईने आत गेल्या. "थँक्स काकु." असं म्हणुन ती पटकन गेली सुद्धा. ती निघुन गेली तरी अभी अजुन दारातच रेंगाळत उभा होत, तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत. हे स्वप्न तर नव्हतां ना? रोज सकाळ जर अशी उजाडणार असेल तर मी रोज एवढ्या लवकर उठायला तयार आहे.

"काय महाराज आजचा दिवस काय दारातच घालवायचा आहे का?" ह्या आईच्या टोमण्याने तो भानावर आला. " नाही खुप सुंदर आहे मुलगी पण म्हणुन..." तिचे बोलणे पुरे होउ न देता त्याने आथरुममध्ये पलायन केले. शी काय बावळटासारखे आपण तिल बघत होति. आत्त आईल पण कळले असेल. श्या... आज काही एक खरं नाही आपलं. पण मॅडम मात्र काय दिसत होत्या.. आज आपण एकदम क्लिन बोल्ड...

क्रमशः

संपादन krupa | 28 जुलै, 2009 - 09:06
आज आपल्याला संध्याकाळी जायचे पण आहे मॅडमच्या घरी चला सगळ्यांना त्याची आठवण करुन देउया. आणि जाताना व्यवस्थित कपडे घालुन इंप्रेशन पाडले पाहिजे सकाळी तर नुस्ती फजिती झाली आहे. अगदी सुटबुटात नाही पण चार लोकंवर छाप पडेल असे.
इथे ऋता विचार करत होती; एवढ्या वाजेपर्यंत कोणि झोपत का? आळशीच दिसतात शेजारची लोकं जरा. कायपण ध्यान दिसत होतं? जाउदे भरपुर कामं उरकायची आहेत. तेवढ्यात दरवाज्यावर कोणाची तरी हालचाल झाली म्हणुन ती पुढे सरसावली.
"अरे व्वा काकु, काय सुंदर दिसत आहत तुम्ही या शालुमध्ये काकातर एकदम फिदा झाले असतील ना??", ऋता त्यांच्याकडे बघुन म्हणली.
"हो नक्कीच, २४ वर्षापुर्वी तरी फिदा होते आत्ताचे माहित नाहि," त्यांनी हसत ह्सतच म्हंटले. "बरं ज्या कामासाठी आले आहे ते आधी करते मग गप्पा मारुया काय?"
"हो, हो या ना आत या. आई शेजारच्या काकु आल्यात गं," तिने बाहेरुनच सांगितले. त्यांनी पटकन ओटी भरुन घेतली अणि पुजेला सुरुवात झाली.
"बेटा काही मदत हवी आहे का? काय करायचे आहे? अगदी न संकोचता सांग बरं यासोसायटीतले लोक मिळुनमिसळुन वागणारे आहेत."
"नाही काकु, जेवणाची ऑर्डर तर बाहेरच दिली आहे काहि काम नाहिय आत्ता. तुम्ही जेवायला या बरं तसं तर आईने आमंत्रण दिलेच असेल पण मी परत एकदा आग्रहाने सांगत आहे."
"हो हो येईनच पण नक्की नाहि सांगु शकत जर काहि अर्जंट काम आलेतर येउ नाहि शकणार बेटा. चल निघते मी, मदत लागली तर हाक मारच." असं बोलुन त्या निघु लागल्या.
"बघा काकु , नक्की येउन जा. अच्छा बाय." असं म्हणुन ती त्यांना दारापर्यंत सोडुन आली.

पुजा लवकर आटोपली आणि सगळ्यांनी उपवास सोडला. संध्याकाळीच सगळे पाहुणे येणार होते आत्ता फक्त घरातले काही नातेवाईक आले होते. ऋता सगळ्यांना काय हवनको ते बघता बघता दमुन गेली होती. थोडा निवांत वेळ मिळाल्यावर तिने सांध्याकाळची तयारी सुरु केली. सगळि सजावट पुर्ण करुन तिने स्वताची तयारीसुद्धा केली. एव्हाना सोसायटीमधली लोकं आणि अजुन काही पाहुणे मंडळीपण येत होती. तयार होउन बाहेर येउन तिने एक कटाक्ष टाकला तर सगळि तयारी अगदी व्यवथित झाल्याची पावती लोकंच्या कौतुकातुनच मिळत होती. तेवढ्यात त्या सगळ्या कंपुची एंट्री झाली आणि आईने पुढे होउन बाबांना सगळ्यांची ओळख करुन दिली. हम्म आज साहेब छान दिसत आहेत अरे पण हे काय सेम कलर कॉम्बिनेशन... ओह शीट.
"मुलांनो पाया पडुन घ्या मी जरा आलेच," म्हणुन आई निघली आणि बोलली ऋता जरा बघ ह्यांना. हे ऐकताच थोड्याश्या नाराजीनेच पण ऋता त्यांच्यजवळ गेली तिर्थप्रसाद दिला आणि वळणार तेवढ्यात तिची आणि अभीची नजरानजर झाली. तो बहुतेक खुपवेळ तिच्याकडे एकटक बघत असावा पण तिने बघितल्यावर त्याने दुसरीकडे बघितले; तिने सगळ्यांना जेवायला जायला सांगितले. मोतीकलरच्या साडीवर मरुनकलरची नाजुकपण सुरेख नक्षी असलेली साडी अगदी सेमकलर कॉम्बिनेशन.. आणि तितकेच मोजकेच पण सुंदर एक्सेसरिज आजतर कोणिही घायळ होईल अशी अदा होती. सगळे जेउन काका,काकुंचा निरोप घेउन निघाले. पुढचे काही दिवस काउ आणि चिउच्या लग्नाच्या गडबडीतच गेले त्यात अधुनमधुन कधीतरी मॅडमचे दर्शन व्हायचे पण कधी बाल्कनीत, कधी लिफ्टमधे तर कधी पार्किंगमधे पण ते तेवढेच फक्त एक हलकेसे स्माईल.

क्रमशः

दोन दिवसांपासुन तर मॅडमचे दर्शन दुर्लभ झाले होते, कुठे गायबल्या होत्या काय माहित??? सगळं आलबेल आहे ना? बरं नाहिय का? अशा सगळ्या शंकाकुशंका येउन अभीचे मन जरा अस्वस्थ झाले म्हणतात ना "मन चिंती ते वैरी न चिंती". त्याने आडुनआडुन आईला पण बोलुन दाखविले पण तिलाही काहि माहित नव्हते. मग गपचुप जेवण करुन तो असाच तीव्ही बघत बसला होता पण लक्ष तर टीव्हीकडे नव्हतेच. मनात राहुन राहुन तिचेच विचार येत होते अणि तो नको त्या विचारांना बाजुला सारत होता आणि आपल्या मनाची समजुत घालत होता. तेवढ्यात रात्री बेल वाजली आणि एवढ्या रात्री कोण आले ह्या विचारातच त्याने दरवाजा उघडला. समोर तर मॅडमच उभ्य होत्या पण चेहरा काहिसा चिंताग्रस्त दिसत होता.
"काकु आहेत का घरात? जरा बोलावता का प्लीज त्यांना" ती हळुच म्हणाली.
आज तिच्या स्वरात नेहमीप्रमाणे बेफिकिरी किंवा राग अजिबातच नव्हता. आणि तिचा चेहरा बघुन ती कधीही रडायला लागेल असेच वाटत होते.
" हो आई आहे, पण काय झालय?" आता त्याला धीर धरवेना.
"तुम्ही त्यांना बोलवाल का प्लीज." अगदी काकुळतीला येउन तिने त्याला विनवले.
"आई लवकर ये गं, तुम्ही काय झालय मला सांगाल का प्लीझ" त्यानेही तितक्याच नम्रतेने विचारले.
"बाबांना जरा छातीत दुखतय आणि ..." पुढचं काही बोलण्याअगोदर दोन टपोरे थेंब तिच्या गालांवर ओघळले आणि ती वाक्य पुर्ण करु शकलीच नाही.
"बेट कोण आलयं? ऋता, तु इथे अचानक? काय झालय?" त्यांनी विचारलं.
"आई चल लवकर आय थिंक इटस ईमरजन्सी. तु पुढे हो मी आलोच," असं म्हणुन त्याने आईला पुढे पाठवुन पटकन घरात गेला. मोबईल, गाडीची चावी, पाकिट आणि थोडी कॅश घेउन तो लॅच लावुन तो घराबाहेर पडला.
श्यामा परुळेकरांना पटकन समजले की खरच ईमजेन्सी होती, तिच्या बाबांना माईल्ड हार्टअटॅक आला होता. त्याने पटापट तिच्या भावाच्या (अनुच्या) मदतीने त्यांना गाडीत नेउन जवळच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. आणि सगळ्यांना पटपट फोन लावुन सगळ्या फॉरमॅलीटीज पुर्ण केल्या. आत्ता ५ तासांनंतर तिचे बाबा थोडे थोडे नॉर्मल होत होते.
ऋता तिची आई आणि अनु सगळेच घाबरुन गेले होते या प्रकाराने. त्यांन हळुहळु तो नॉर्मल करायचा प्रयत्न करत होता पण ते सुतकी वातावरण काहि केल्या संपत नव्हते. एव्हाना रडुन रडुन तिचे आणि तिच्या आईचे डोळे अक्षरक्ष सुजले होते.
पहाटेचे पाच वाजले तेव्हा त्याने चौघंनाही घरी जायला सांगितले आणि "मी इथे आहे तुम्ही काळजी करु नका. काही लागलेच तर मी तुम्हाल कळवीन," असे म्हणुन जबरदस्तीने घरी पाठवले.

क्रमशः

ते सगळे गेल्यावर अभी विचार करु लागला. सगळं सुरळीत चालु असताना असं अचानक विपरित घडलं. आज अक्षरक्ष तिला रडताना बघवत नव्हतं कुठेतरी आत खोलवर एक सुक्ष्म कळ अणि मग तिच्या वेदना कधी माझ्या झाल्या काही कळलच नाही. असं कधीच आपल्याला वाटले नव्हते कोणाबद्दल; आज अचानक असं अचानक आपण इतके भावनाविवश कसे झालो काही कळत नाहिय. त्या दोन टपोर्‍या अश्रुंमध्ये एवढं काय होतं जे माझं मन गलबलुन गेलं.
तेवढ्यात डॉक्टरांकडुन बोलावणे आले म्हणुन तो आत गेला. डॉक्टरंनी सांगितले, "काळजीचे काहि करण नाहिय. तुम्ही अगदी योग्य वेळेवर त्यांना घेउन आलात? चार पाच दिवसांनी ते घरि जाउ शकतील. फक्त सांगितलेली पथ्य, औषध आणि दगदग कमी करायला हवी."
अभी म्हणाला," डॉक्टर तसं काळजीचे काहि कारण नाहिय ना? म्हणजे त्यांन लवकरात लवकर आराम पडेल ना?"
"हो हो आत्ता घाबरण्यासारखे काहि एक कारण नाहिय. जरा दोन चार दिवस ऑब्जर्वेशनसाठी ठेवावे लागेल पण नंतर डीस्चार्ज मिळेल."
"ओके डॉक्टर थँक्स." अभी केबिनमधुन बाहेर पडला आणि लगेच त्याने आईला फोन लावुन कळविले.
थोड्यावेळने परत अनु, ऋता आणि तिची आई हॉस्पिटलमध्ये आली. सगळ्यांच्या चेहर्यवरची काळजी स्पष्ट दिसत होती. ऋताच्य आईने बळेबळेच अभीला घरी पाठविले आणि अनुने डॉक्टरांकडुन सगळे समजावुन घेतले. घरी येउन फ्रेश होवुन अभीने आपल्या सगळ्या सोसायटीतल्या मित्रांना सांगितले तशी दोन चार दिवस सगळेच आळिपाळीने हॉस्पिटलमध्ये जाउ लागले आणि काकु, ऋता आणि अनुला आराम देत होते. दोन तीन दिवसांत मिळालेल्या इतक्या घरगुती वातावरणाने त्यांच्या मनावरचा ताण पण कमी झाला आणि एकदाचे कारेकर काका घरी आले. आत्ता त्यांना जाउन भेटणे त्यांची विचारपुस करणे ही तर नित्याचीच गोष्ट झाली होती. एव्हाना अभीचा पुर्ण कंपु त्यांच्या घरातलाच एक सदस्य होउन गेला होता आणि ऋता अणि अनुची त्यांच्याशी चांगलीच मैत्री झाली होती. राहुनराहुन ऋताला एकच गोष्ट खात होती ते सुरुवातीला अभीशी थोडेसे फटकुन वागल्याचे वाईट वाटत होते. आत्ता या कंपुमध्ये सामील झाल्यावर एकमेकांची काय कामं, प्रत्येकाचे करिअर ह्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती.
दिवस सरता सरता अचान्क "फ्रेंडशीप डे" जवळ येउन ठेपला होता. सगळ्यांनी त्या दिवशी पिकनीकला जाउन मस्त धम्माल मस्ती करुन घरी परतले. त्यादिवशी शेवटी ऋताने आणि अनुने अभीला एक सुंदरसे प्रेझेंट आणि कार्ड दिले.

क्रमशः

आत्त तर काय सगळ्यांची एकमेकांशी थट्टामस्करी चालुच असायची अणि एकमेकांकडे येणेजाणे वाढले होते. आत्त तर काय रोज या-ना त्या कारणाने भेट होतच होती. असच एकदा संध्याकाळी अभी आपल्या गाडीने घरी परतत होता. पण रस्त्यात भरपुर ट्रॅफिक होते अणि तो वैतागुन खिडकीबाहेर डोके काढत त्या स्कुटरवाल्याला चांगलेच दोन शब्द सुनावले आणि परत गाडी पुढे न्यायचा निष्फळ प्रयत्न करु लागल. एवढ्यात त्याला समोरुन ऋता रस्ता क्रॉस करत असतान दिसली; त्याने लगेच तिला हाक मारली.
ती स्माईल देत गाडीजवळ गेली तर अभी बोलला, "घरी जात आहेस का? "
तेव्हा ती म्हणाली," हो पण मला थोडे काम होते इथे पुढे. तेव्हा तु जा अणि थँक्स."
पण मग अभी बोललाच,"मग आपण ते काम करुनच पुढे जाउया. मला काही घाई नाहिय घरी जायची."
"ठिक आहे, तु कधी कोणचं ऐकशील का?" म्हणुन ती गुपचुप गाडीत बसली.
दोन एक मिनिटं शांत गेल्यावर अभी म्हणला,"हम्म... मॅडम मग कुठे जायचे आहे तुम्हाला? म्हणजे ड्रायव्हरला ठिकाण तर सांगितले पहिजे ना."
"ओह हा इथे जवळच एम. जी. रोडला एक अनाथआश्रम आहे. तिथेच सोड तु मला." ऋता म्हणली.
"अनाथआश्रम?" गोंधळलेल्या स्वरात अभी म्हणला.
"हो मी इथे आठवड्यातुन दोन तीन वेळा येउन सर्व मुलांना भेटुन जाते रे; थोडीफार मदतही करते. त्यांच्या शिक्षणासाठी आणि रोजच्या खर्चासाठी स्पॉन्सर मिळवुन देते मी. आणि खुप बरं वाटतं त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा."
हे ऐकुन भारावुन गेल्यावर अभीने म्हंटले," ग्रेट यार, खुप चांगलं काम करत आहेस तु. मी पण येउ का आज तिथे? म्हणजे चालेल का?"
"हो का नाही चालणर? यु आर मोस्ट वेलकम." ऋताने आनंदाने उत्तर दिले.
मग दोघेहि तिथे पोहोचल्यावर जशी ऋता गेट उघडुन आत गेली तसा सर्व मुलांनी एकच गलका केला आणि तिच्याकडे धावत आले. ती पण आत्ता त्यांच्यातलीच होउन गेली होती आणि आनंदाने त्यांच्याबरोबर बागडत होती दोन मिनिटांसाठी तिला आपल्याबरोबर अभी आहे याचादेखील विसर पडला होता.दोन तीन मिनिटांनी भानावर आल्यावर तिने त्याची ओळख सगळ्यांशी करुन दिली. सगळ्या मुलांनी त्याल एकसाथ नमस्ते केले आणि पुढचे दोन तीन तास कसे गेले ते अभीला कळलं देखील नाही. सगळ्यांबरोबर खेळुन खुप धम्माल करुन ते दोघेही घरि जायला निघाले.
गाडीत बसल्यावर अभीने संभाषणाला सुरुवात केली,"ऋता, यु आर रीअली ग्रेट यर. खुप छान काम करत आहेस तु. एवढं सगळं करणे ते पण आपला व्याप सांभाळुन म्हणजे ग्रेट यार. हॅटस ऑफ टु यु,"
"अरे त्यात एवढं काही ग्रेट नाहिय अभी; हे तर काय तुही करु शकतोस. आपल्या रोजच्या कामातुन थोडासा वेळा काढला म्हणजे झाले. पण तु जे काही केलेस ना ते खरच खुप ग्रेट होते आणि त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ॠणी राहिन."
"काय बोलते आहेस तु? मला काहिच कळत नाहिय," जरासा गोंधळुन तो म्हणला.
" त्यादिवशी तु जी काही पुढाकार घेउन मदत केलीस ना त्यामुळेच आज मी माझ्या पप्पांना बघत आहे आणि त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी आहे. त्यदिवशी तु जे काही केलेस त्यासाठी तुझे आभार कसे मानु हेच मला कळत नाहिय. पहिल्यांदा मी तुला चुकीचे समजले होते. तुझ्याशी खुप उद्धट वागले होते. पण चुका ह्या माणसांकडुनच होतात ना? मग तु मला त्यासाठी माफ करशील अशी आशा करते," थोड्याश्या पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणली.
"अरे काय हा वेडेपणा. मी काही ग्रेट केले नव्हतेच, त्यावेळी मला जे योग्य वाटले तेच मी केले. माझ्याजागी दुसरा कोणि असला असत तर त्यानेही हेच केले असते." अभी थोडासा ओशाळत आणि तिला कम्फर्टेबल करत म्हणाला.
"जाउ दे जे झाले ते चांगलेच झाले त्याने मनातली सगळी किल्मिष दुर तर झाली. हो की नाहि?" पुन्हा संभाषण नॉर्मल करण्याच प्रयत्नात तो म्हणला.
"तो आत्ता सगळी किल्मिषं दुर झाली आहेत आणि आकाश अगदी निरभ्र , नितळ झालय." ऋता हसतहसतच म्हणाली.
"चलो फिर एस बात पे एक एक आईस्क्रिम हो जाये?" अभीने नॅचरल्सक्डे बोट दाखवत म्हंटले.
"हो, बट ट्रीट माझ्याकडुन," ऋताने त्याच शैलीत त्याला उत्तर दिले.
मस्त संध्याकाळी आईस्क्रिमची ट्रीट ती पण मॅडमबरोबर.. आज अभी तर एकदम धुंदीतच घरी पोहोचला.
घरी आल्यावर अभील आईने पण विचरले," काय साहेब आज आपके अंदाज कुछ बदले बदलेसे है? काहि खास घडलं का आज?"
"नाही गं मॉम," बोलुन तिला टाळत तो आपल्या खोलीत गेला.
हुह... काय मस्त दिवस होताआपण पण जॉईन करायला पाहिजे ती संस्था, थोडीफार मदत पण होईल. उद्याच पुर्ण कंपुला सांगायला पाहिजे हे.

एकडे ऋता विचार करत होती, खरच कित्ती चुकीचं समजत होतो आपण अभीला. कधी कधी आई म्हणते तेच खरं उगाच आपण एखाद्या माणसाबद्दल आपला पुर्वग्रह दुषित करतो आणि मग त्या व्यक्तीचा स्वभाव समजल्यावर उगाच अपराधी वाटत रहातं की उगाच आपण मनात नको ते विचार करत होतो म्हणुन.. ही सवय सोडली पाहिजे ऋता... हे सगळं झालं नसतं तर उगाच एका चांगल्या माणसाबद्दल आपण वाईट विचार करत राहिलो असतो. हा विचार करतकरतच ती बाल्कनीत आली, खरच आज आभाळ मस्त निरभ्र झालय अगदी आपल्या मनासारखं... सगळ्या शंकाकुशंका जाउन अगदी नितळ, आरस्पानी...

दुसर्‍या दिवशी अभीने थोडक्यात आपल्या पुर्ण कंपुला सगळे कालचे डीटेल्स दिले आणि ह्य बाबतीत आपण काय करु शकतो त्यावर चर्चा केली. सर्वानुमते एक ठराव पास झाला की त्यांच्यासाठी एक पिकनिक काढायची जमेल तेवढे स्पॉन्सर शोधायचे आणि बाकिचे पैसे आपल्या खिशातुन घालयचे. ही आयडीया त्यांनी लगेच संध्याकाळी ऋताला सांगितली आणि तिने आनंदाने मान्य ही केली. फक्त आत्ता अनाथाश्रमातुन परवानगी मिळवायची होती; ते काहि ऋतासाठी कठिण नव्हते. ती पटकन मिळली पण बाकिचे स्पॉन्सरचे काम आणि सगळ्या डीटेल्सवर काम करणे जरुरी होते. दोन दिवसांनी सगळे डीटेल्स घेउन मिटींग जमली आणि शेवटी एकदाचे डेस्टीनेशन फायनल झाले आणि दोन चार स्पॉन्सरही मिळाले होते. बाकीच्या सगळ्या गोष्टींवर एकत्र काम करताना तर सगळे रोजच भेटत होते. पण अभी आणि ऋताचे येणे-जाणे, बोलणे खुपच वाढले होते आणि हि गोष्ट पुर्ण गृपच्या एव्हाना लक्षात आली होती.
पिकनीक, पिकनीक करता करता तो दिवस शेवटी उजाडला. सगळा कंपु आणि मुले अगदी खुषीत होती, जोषात होती, सगळे कार्यक्रम अगदी यथोचित पार पडले आणि रात्री उशीर सगळ्यांना सोडुन पुर्ण कंपु घरी पोहोचला.

क्रमशः

सगळे पुर्णपणे थकले भागले होते म्हणुन लवकर एकमेकांना बाय करुन सगाळे थेट आपआपल्या घरी निघुन गेले. रात्री फ्रेश होउन ऋताने अभीला थँक्स बोलाण्यासाठी कॉल केला. खरंतर अभी अर्धवट झोपेतच होता पण "ऋता कॉलिंग" बघुन त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. "हॅलो ऋता, बोल काय झालं?," अभी अगदी एक्साईट होत म्हाणाला.
"हॅलो, अभी, झोपला होतास का तु? सॉरी यार बट मला तुला थँक्स म्हणायचे होते म्हणुनच फोन केला होता. सॉरी मी तुला डीस्टर्ब केलं चल ठेवते मी फोन, सकाळी बोलुया."
"अगं नाही बोल मी झोपलो नव्हतो असाच जरा पडलो होतो. आणि थँक्स कसले म्हणते आहेस खरतर आम्हीच तुझे आभार मानले पाहिजेत. आम्ही त्या मुलांना एक आनंदाचा दिवस देउ शकलो."
"अरे तसे नाही अभी खुप कमी लोकं असतात जे असे करतात म्हणुन खरचं आभार मानते मी तुझे आणि सगळ्यांचेच.."
"बरं तुला आभार मानायचेच आहेत ना मगं असं कर मला एक ट्रीट दे मग तुझा प्रशन मिटेल पण चालेल का तुला?"
"हो हो चालेल ना, बोल कधी आणि कुठे हवीय तुला ट्रीट??"
"उम्म्म्म्म... उद्या सांध्याकाळी चालेल का?"
"हो चालेल ना, कुठे पण?" "कुठे ते आत्त नाहि सांगत मी तेव्हा फोन करुन सांगेन.. उद्या संध्याकाळी ठिक ७.०० वाजता फोनेन मी तुला," अभी म्हणाला.
"हो ठिक आहे, अच्छा मग गुडनाईट. उद्या भेटुया."
"हो गुडनाईट." म्हणत अभीने फोन ठेवला. खुप एक्साईट होत आणि मनातुन एकदम आनंदत अभी गॅलरीत आला अणि बघतो तर काय समोरच्या गॅलरीत ऋता उभीच होती. अहाहा मग आज तर दोन चंद्राचे दर्शन झाले पण दुसरा नक्कीच जास्त सुंदर आहे. आत्त उद्याची सांध्याकाळ कधी येते असं वाटतय. दुसर्‍या दिवशी अभी ऑफिसला निघालाच ते एकदम वेगळ्याच मुडमध्ये आज त्याला आपली ऑफिसमधली सगळी कामं भरभर आटपायची होती. कारण आजची संध्याकाळ नक्कीच वेगळी असणार होती.

क्रमशः

सकाळपासुन अभीने कामं पटपट उरकायला सुरुवात केली होती. सकाळाची सगळी कामं आटोपुन त्याने आज कधी नव्हे ते वेळेवर लंचदेखील केले होते. लंच करुन तो परत सगळी कामे उरकायच्या मागे लागल तो त्याने सगळी कामे संपवुनच दम घेतला. घाड्याळात बघितले तर ५.१५ झाले होते. ऑफिसमधुन निघतानिघताच त्याने ऋताला फोन लावला. मॅडम जरा बिझी होत्यात त्यांना अजुन अर्धातास लागणार होता. अभीने मध्येच गाडी थांबवुन एक छोटासा बुके आणि एक चॉकलेटबॉक्स खरेदी केले. आणि थेट तिच्या ऑफिसकडे गाडी वळवली. स्वताचे काम उरकल्यावर ऑफीसमधुन बाहेर पडतानाच ऋताने अभीला फोन लावला आणि अभीला आपल्या ऑफिसच्या खाली पार्किंगमध्ये वाट बघत उभा असलेला बघुन एकदम तिला सरप्राईज मिळाले.
"अरे तु इकडे कसा?" ऋताने गाडीत बसतच विचारले.
"नाही माझ्याकडे वेळ होता म्हंटलं कुठेतरी शोधत भेटण्यापेक्षा इथेच भेटावं म्हणजे चुकामुक टळेल." अभीने उत्तर दिले.
"बरं मग आपण आत्त कुठे जात आहोत? म्हणजे तुला कुठे हवीय ट्रीट?," ऋताने विचारले.
"अहं आज तुला ट्रेट मी देत आहे बोल तुला काय खायचे आहे? वेज की नॉनवेज?" अभीने विचारले.
"आपण जेवायला जात आहोत का? आय मीन मला तसे घरी कळविले पाहिजे," काहिसे गोंधळतच ऋता म्हणाली.
"म्हणजे जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तरच आपण जेवायला जाउ," थोडेसे खट्टु होत तो बोलला.
"नाही मला काही प्रॉब्लेम नाहिय पण घरी आईला कळवावं लागेल अणि अत्ता अजुनतरी भुक लगली नाहिय रे मला," ती बोलली.
"हा भुक तर मलापण नाहीय, पण आईल घरी फोन करुन कळव, म्हणजे चालत असेल तर? नाहितर आपण मग असंच काहितरी खाउन जाउया," अभी अजीजीने बोलला.
"नाही तसं काहि नाहिय, मी घरी फोन करतेच की मला वेळ होईल पण आत्ता मग करायच तरी काय??" ऋताने प्रश्नार्थक चेहरा करत विचारले.
"बघं इथेच जवळच एक थिएटर आहे तिथे नवीन पिक्चर लगला आहे "लव आजकल", तुला चालेल का?" अभीने खुश होत विचारले.
"हो चालेल," ऋताने म्हंटल्यावर अभीने लगेच गाडी थिएटरच्या दिशेने वळविली.

अभीने तिकिटं काढेपर्यंत ऋताने घरी फोन लावुन सांगितले होते. दोघंनी पिक्चर बघितला अणि पिक्चर संपल्यावर जवळच्याच एका नॉनवेज हॉटेलमध्ये गेली.
जेवण ऑर्डर करुन झाल्यावर काहीतरी बोलावे म्हणुन अभीने विचारले," पिक्चर कसा वाटाला?"
"हम्म. ठिक होता नाहितरी आजकलची जनरेशनच अशी आहे," ऋता बोलली.
"आजकलची जनरेशन म्हणजे?" काही न कळल्यामुळे अभीने विचारले.
"हो म्हणजे बघ ना. आजकलच्या नवीन जनरेशनला सगळं कसं फास्ट हवं असतं.. पटकन ओळख, मैत्री, प्रेम मग लगेच कळतं की हे प्रेम नाहिय मग ब्रेकऑफ वैगरे वैगरे वैगरे."
"असं सगळ्यांच्याच बाबतीत नसतं गं, ते फक्त पिक्चरमध्ये दाखविले आहे," अभी म्हणला.
"हो असेलही कदाचित पण सध्या तरी सगळीकडे मला असच दिसतं. लोकांचा लग्नसंस्थेवरुन हळुहळु विश्वास उडत चालला आहे," ऋता बोलली.
"नाही गं निदान माझातरी विश्वास उडाला नाहिय." अभी म्हणाला.
"होक्का मगं तु टीपिकल अरेंज मॅरेज करणार आहेस का? कशी मुलगी हवीय तुला?" ऋताने थोडेसे चिडवत त्याला विचारले.
एवढ्यात वेटरने स्टार्टरची प्लेट आणुन ठेवली आणि तो विषय तिथेच बंद झाला. जेवताना काही हलकंफुलकं बोलु म्हणुन अभीनेही जाणुन बुजुन तो विषय तिथेच संपविला. जेवण सांपल्यावर दोघेही गाडीत बसले तेव्हा अभीने तिला तो बुके आणि चॉकलेटचाबॉक्स दिला.
तेव्हा तिने त्याला विचारले,"हे काय आहे?"
"काही खास नाही गं असच मला तुला थँक्स म्हणयचं होतं म्हणुन हे," त्याचे वाक्य तिथेच तोडत ती थोडी सिरियस होत म्हणाली," दोस्ती मैं नो सॉरी नो थँक्यु बॉस..."आणि दोघंही हसत खिदळत आपआपल्या घरी पोहोचली.

ती संध्याकाळ अभीसठी एकदम संस्मरणीय झाली. अहाहा मॅडम एकदम खुषीत होत्या आणि त्याबहण्याने थोडावेळ एकंतातदेखील मिळाला. मोबाईल वाजला म्हणुन अभीने बघितले तर ऋताचाच मेसेज होता.

कुछ रिश्ते उपरवाला बनाता है,
कुछ रिश्ते लोग बनाते है;
पर कुछ लोग बिना किसि रिश्ते के हि रिश्ते निभाते है,
शायद वहि "दोस्त" कहलाते है...

क्रमशः

दुसर्‍या दिवशी खुषीतच अभी ऑफिसमध्ये गेला. पण सकाळपासुन कामात एकएक अडचणी येत होत्या. त्यामुळे तो फारच वैतागलेला होता. तेवढ्या मोबाईल वाजला कोणी फोन केलाय हे न बघताच त्याने फोन उचलला. "हॅलो, कोण बोलतय?" जरा वैतागलेल्या स्वरातच तो बोलला.
"हॅलो, अभी मी ऋता बोलतेय. बट आय थिंक आय हॅव कॉल्ड ऑन राँगटाईम. मी नंतर फोनते तुला." ऋता बोलली.
"नाहि गं तसं काहीच नाहिय जर वैतागलो होतो म्हणुन. एक एक अडचणी येत आहेत कामात; तु बोल कशासाठी फोन केला होतास?" अभी ओशाळतच म्हणला.
"नाहि बाय मिस्टेक माझा पेनड्राईव तुझ्या गाडीत राहिला आहे का? कारण तो मला कुठेच मिळात नाहिय. तुला जर वेळ असेल तर चेक करशील का? आय मीन प्लिझ त्यात माझ्या क्लायंटाचे काही महत्वाचे डीझाईन्स होते." ऋता कळकळीने बोलली.
"अरे हो नो प्रॉब्स आत्ताच चेक करतो मी. तुला आत्ता अर्जंटली ते हवे आहेत का?" अभीने विचारले.
"हो म्हणजे जर मिळाले तर खुप बरं होईल जर प्रेजेंटेशनमध्ये अ‍ॅड करायला हवे होते, नाहितर आज रात्री अणि उद्या विकेंडमध्ये काम करावे लागेल." ऋता बोलली.
"हं आत्ताच बघतो मी आणि मिळले तर तुला परत फोनतो, आचा चल बाय फोर नाउ."

अभीने गाडी चेक केली तर खरच बाजुच्या सीटच्या कोपर्‍यात एक पेनड्राईव मिळाले. तिला फोन करुन त्याने तिने सांगितल्याप्रमणे सगळ्या फाईल्स दिल्या आणिस आंध्याकळी तिला ते परत देउ हाही निरोप दिला. काहि दिलेल्या फाईल्समध्ये तिने एकापेक्षा एक सरस अ‍ॅडव्हटायझिंग कन्सेप्टस अणि फोटो बघुन तोदेखील हरखुन गेला आणि अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला की आपण ज्या कामात अडकलो आहे त्यात कदाचित ऋताच आपल्याला मदत करु शकेल. कारण ती एका अ‍ॅड्व्हरटायझिंग कंपनीमध्ये कामाला होती आणि त्यालासुद्धा आपल्या कंपनीची एक अ‍ॅड बनवायची होती ती पण एका नव्या कन्सेप्टने. ओह येस याबाबतीत आज आपण तिला बोललेच पाहिजे. आज संध्याकाळी तिला याबाबतीत विचारलेच पाहिजे असे मनाशी पक्के ठरवुन तो कामाला लागला.

संध्याकाळी अभी घरी येउन फ्रेश वैगरे होउन त्यांच्या घरी गेला तेव्हा मॅडमना लेट होणार होता म्हणुन उशीरा घरी येणर असे कळले. तर तो अनु आणि काका, काकुंशी गप्पा मारत बसला होता. थोडे लेटच मॅडमचे आगमन झाले. त्यापण अर्थातच सगळ्यांना जॉईन झाल्या. अभीने तिला तिचे पेनड्राईव दिले त्याबद्दल ती त्याला थँक्स म्हणाली.
तेव्हा तो बोलला,"याबदल्यात मला एक फेवर पाहिजे होते तुझे."
"बोल, काय मदत करु शकते मी तुझी?"
"अगं मला आमच्या कंपनीसाठी एक नवीन अ‍ॅड करायची आहे. तु पण अ‍ॅड एजन्सीमध्येच तर काम करतेस. मग जरा मला मदत करशील का? आय मीन आमच्या कंपनीचे कॉन्ट्रँक्ट मी तुलाच देतो आहे तर," अभीने एका दमातच सगळे बोलुन टाकले.
एकदम अचानक आलेल्या या प्रपोजलमुळे ती एकदम काहि न सुचुन गांगरुनच गेली. तिला काय बोलावे तेच कळेना. "म्हणजे.. अ‍ॅक्चुली .."
"अगं प्लिज नाहि बोलु नकोस. आमची जुन्या अ‍ॅडएजन्सीचा आत्ता कॉन्ट्रँक्ट संपला आणि तो रिन्यु करण्यत अमाला काहि इंटरेस्ट नाहिय. हो मी तुला सगळी मदत करिन हवीतर पण यार मला जरा मदत कर. फारच गोंधळुन गेलोय मी ह्यात," अभी अजीजीने बोलला.

तिला त्याचे मन मोडवत नव्हते पण सगळे काम आपण स्वतः हे सगळे करु शकु कि नहि याबद्दल ती साशंक होती. "अरे पण हे पुर्णपणे मी करु शकेन की नाहि याची काळजी वाटतेय."
"अगं तुझ्या सोबतीला मी तर आहेच ना. आपण पुर्ण दोघे मिळुन पुर्ण करु हे काम आणि हे फक्स्त मी तुझ्यासाठी नाहि बोलत आहे असं मला खरच वाटातय.." अभी आत्मविश्वासाने बोलला.

हे सगळं एवढावेळ बघत असेलेल ऋताचे आई वडील आणि भावाने देखील तिला याबाबतीत प्रोत्साहन दिले तेव्हा कुठे तिने हे मंजुर केल. पण एका अटीवर या पुर्ण प्रोसेसमध्ये अभी तिच्या बरोबर असेल तरच ती हे करेल. ही अट अर्थातच अभीने मान्य केली आणि त्यावर कामदेखील एकदाचं सुरु झालं. आत्त त्यांच भेटणं , बोलणं रोजच सुरु होतं. आणि त्यांच्या दोघंच्या घरातलं वातावरणं पण एकदम खेळीमेळीचं होउ लागलं होत.

एव्हाना दोघंच्या घरातही एकमेकांबद्दल पसंती मनातल्या मनात झाली होती पण गाडं शेवटी दोघांच्या निर्णयाकडे येउन अडत होतं. खुप मेहनत आणि अथक परिश्रमाने केलेली ती अ‍ॅड एवढी सक्सेसफुल झाली की सगळ्यांनीच दोघंचं खुप कौतुक केलं. आत्ता परिस्थिती अशी आली होती की दोघंही दिवस भरात एकमेकांना एकदा भेटल्याशिवाय रहात नसत. पण पहिल्यांदा कोण बोलणार हेच कळत नव्हते.

क्रमशः

शेवटी तो एकदाचा मुहुर्त आलाच. असंच नेहमीप्रमाणे एकत्र दोघं अनाथाश्रमात मुलंना भेटायला गेली होती. आणि अंगणात जोरात वळिवाचा पाउस सुरु झाला. पहिल्यांदा सगळे आत पळाले पण मुलंच ती ,ती कसली ऐकताहेत. त्यांनी सगळ्यांना ओढत बाहेर भिजायला आणि खेळयला लावले. मग थोड्यावेळाने दोघेही घरी जायला निघाली पण रस्त्यातल्या ट्रॅफिकमध्ये अडकुन पडली . समोरच अभीला मकेवाल दिसला ट्रॅफिकमध्ये काहीतरी टाईमपास हवा म्हणुन तो मका घ्यायला गेला. दोघंचाही मका खाउन संपला तरी ट्रॅफिक हलायची चिन्हं दिसेनात म्हणुन त्याने एफएम लावला. आणि काय आश्चर्य त्याचे एकदम फेवरेट गाणे लागले होते एफएमवर... एकदम मुडमध्ये येउन तो म्हणाला,'अरे हे तर माझे फेवरेट गाणे आहे," त्याच्याच सुरात ऋताचा सुरदेखील मिळला होता. दोघंही एकाच वेळेला एकच वाक्य बोलले होते. ते ऐकुन दोघेही एकदम खळाळुन हसले आणि ऋता बोलली,"आपली दोघंची आवड कित्ती जुळले ना रे अभी?"
"हो, बघ न म्हणजे तुलाही पावसात भिजायल, मुलांबरोबर खेळयला, थंडीत आईस्क्रिम खायला, आकाशात रात्री चांदणं बघायला आवडते आणि मलाही," अभी डोळे मिचकावत म्हणला.
"हो मलसुध्धा... पण मला रात्री चांदणं बघायला आवडते हे तुल कसां माहित? म्हणजे मी तर तुला कधी बोलले नव्हते?" आश्चयाने तिने विचारले.
"म्हणजे काय रोज रात्री तु टेरेसवर तर असतेस," अभी पटकन बोलुन गेला पण आपण काय बोललो हे लक्षात येताच त्याने जीभ चावली.
"म्हणजे, मी तुला खुप वेळ बघितलं आहे रात्रीचे म्हणुनच बोलतोय गं," अभी सावरासावरीच्या प्रयत्नात होता.
"रोज रात्री म्हणजे?? तु काय रात्रीचे बर्ड वॉचिंग करतोस कि काय?" तिने मिशिक्लपणे प्रश्न केला.
"बर्ड वॉचिंग म्हणजे??" काहिही न कळल्याचा त्याने आव आणला.
"होक्का? आत्ता तुल बर्डवॉचिंग म्हणजे काय हे तुला मी सांगायचे का? चल खोटारडा.. कोणाला बघत असतोस? आत्त तुझे गुपित कळले मला..." ती खट्याळपणे चिडवत बोलली त्याला.
"गुपित काय त्यात? गुपित असं काहिच नाहिय त्यात," तो ओशाळत बोलला.
"हम्मं मज्जा आहे बुवा एका माणसाची. हाय कोई यहां प्यार मैं डुब जारहा है और अहमें उसकी खबर तक नही. बडे छुपे रुस्तम हो यार!! अपने दोस्तोंसे छुपा कर रखा, ये अछी बात नहिं है अभीसाहब...." ऋता परत त्याला चिडवत बोलली.
"अगं जरा माझं ऐकशील का?"
"हम्मं, उफ्फ ये मोहोब्बत... काकुंना सांगायला हवं पोरगा प्रेमात पडलाय, लवकर लग्न करुन द्या." ऋता फिल्मीपणे बोलली.
"ऋता, अगं ऐक तरी स्मोरच्या पार्टीकडुन होकार आल्याशिवाय घरी कसां सांगणार मी?" "ओह असं आहे होय.. मग विचारलसां की नाहि तु तिला?" तिने डायरेक्ट गुगलीच टाकला.
"नाही अजुन... धीरच होत नाहिय.." तो बोलला.
"काय रे असा तु? प्रेम आहे पण बोलता येत नाहिय? काहि एक कामच नाहिस तु. अगदी ढ आहेस..." ऋता काहिसां रागावतच बोलली.
तेवढ्यात अभीचा उदास चेहरा बघुन तिला आपण काहितरी चुकीचं बोललो असां वाटलं. "आय मीन आज ना उद्या विचारावं तर लगणारच आहे न? मग 'कल करे सो आज, आज करे सो अब' बोलुनच टाक ना. म्हणजे मनातली हुरहुर तरी संपेल."
"हो ते कळतय मला पण कुठुन सुरुवात करु..... आय मीन या बाबतीत मी खुप सिरियस आहे. फक्त थोड्या दिवसांसाठी नाहि तर आयुष्यभराची साथ हवीय मला..." अभी उदास झालेला बघुन तिलापण वाईट वाटलं अणि दोघंही अचानक गप्प झाले. थोडावेळ असाच शांतपणे गेला आणि अचानक अभीने शांतता भंग करत ऋताला बोलला.
"तुला आठवतय ऋता एकदा तु मला विचारले होतेस मला कशी मुलगी हवीय म्हाणुन?" "हो , आठवतय ना?" "मग आज मी सांगतो मला कशी मुलगी हवीय ते... मला आयुष्यभराची साथ हवीय ती पण... तुझ्याकडुन.. देशीला का मला तु साथ?" अभीने अगदी हळुवारपणे ऋताला विचारले.
जणु दोन मिनिटं सगळं स्तब्धच झालां होतं. कसलाच आवाज ऋताला जाणवत नव्हता; काळ जणु त्या दोन मिनिटांसाठी थांबला होता. अजुनही अभीने आपली नजर ऋतावर खिळवुन ठेवली होती... तिच्या उत्तरासाठी. पण तिच्या मनात चाललेल्या खळबळिचा त्याला थांगपत्ताच नव्हता. त्याला दिसले ते फक्त तिच्या गालावर ओघळलेले ते दोन टपोरे अश्रु.....

क्रमशः

अरे हे काय? मी काहि चुकीचे बोललो नाहि ना? हिला अचानक असां रडायला काय झालं?
"ऋता, मी काहि चुकीचं तर बोललो नाहिय ना?" अभीने गोंधळुन प्रश्न विचारला.
"नाही अभी, तु काही चुकीचं बोलला नाहिस पण हे शक्य नाहिय." ऋता रडत रडतच म्हणली.
"पण का? असं काय कारण आहे?" अभीने कळ्जीने विचारले.
"अभी तुला माझ पास्ट माहित नाहिय. हे कधीच होणे शक्य नाहिय," तिने सरळ अश्रुंन वाट करुन दिली.

आत्ता काही बोलण बरोबर नाही हे ओळखुन अभी शांत बसला. घर येईपर्यंत दोघे एकही अवाक्षर न काढता शांत बसुन होते. वातावरणात उगाचच एक प्रकारचा तणाव निर्माण झाला. घरी पोहोचल्यावरदेखील काही न बोलता ऋता लगेच गाडीतुन उतरुन निघुन गेली. अभी तसाच उद्विग्न मनस्थितीत कधी घरी आला ते त्याचे त्यालाच कळले नाही.
कित्तिही कुस बदलली तरी झोप येईनाशी झाल्यावर शेवटी न रहावुन त्याने ऋताला सेलवर फोन लावला. पण तिने तो कट केला असे २-३ दा झाल्यावर शेवटी त्याने तिला सरळ समस केला.
"प्लीज टॉक टु मी हा माझ्यासाठी खुप महत्वाचा प्रश्न आहे." त्यावर
त्याला आलेल्या रिप्लायने तो तीनताड उडालाच.
"अभी मला वाटते हा विषय इथेच बंद करुयात. मला पुन्हा संपर्क करु नकोस."
हे वाचल्यावर त्याने परत ऋताला फोन लावायचा प्रयत्न केला पण तिचा सेल स्वीच ऑफ होता.

त्याने बाल्कनीत येउन तिच्या घराच्या बाल्कनीकडे बघितले तर आज ऋता तिथे नव्हतीच. रात्रभर विचार करत कधीतरी पहाटे त्याला झोप लागली.

९.३० झाले तरी अभी आज उठला नाही म्हणुन श्याम परुळेकरांनी अभील उठविले. पण त्याला बघताच क्षणी काहीतरी घडलय याची जाणिव त्यांना झाली.
"बरं वाटतं नाहिय का रे आज?' त्यांनी विचारले.
"नाही गं बस जरा रात्री उशीरा झोपलो," जमेल तितक सावरायच प्रयत्न करुन तो पटकन फ्रेश व्हायला गेला.
सगळं आवरुन ऑफिसला निघायला आज त्याल बराच उशीर झाला. पण रत्रीचे विचार कही मनातुन जात नव्हते. त्याने रात्रभर विचार करुन भरपुर विचार केला पण त्याचे कुठे काय चुकले ते काही कळत नव्हते अणि ऋता काही फोनवर बोलायला तयार नव्हती. आज काहीही करुन तिला भेटुन काय ते जाणुनच घ्यायच या विचाराअंती तो कामाला लागला.

क्रमशः

आज काम लवकर उरकुन आपण कसंही करुन ऋताला तिच्या ऑफिसमध्येच गाठयच या ध्येयाने अभी कामाला लागलेला तो त्याने ब्रेकही न घेता एकदम पाचलाच आपले काम संपविले. आणि तडक तो तिच्या ऑफिसच्य दिशेने गाडी घेउन निघाला. बरोबर ५.२५ ला तो तिच्या ऑफिसच्यासमोर होता गाडीतुनच त्याने तिला फोन लावला पण ऋताने काही फोन उचलला नाहि. शेवटी त्याने रीसेप्शनवरुन तिला फोन लावला.

"ऋता, मी इथे खाली रिसेप्शनला आहे. तुला अजुन कित्ती वेळ लागणार आहे?" शक्य तितक्या हळु आवाजात आणि आपली हुरहुर कळु न देता त्याने विचारले.
समोरुन अचानक आलेल्या अभीच्या आवाजाने दोन सेकंदांसाठी का होईना ऋता गोंधळली. "हा अभी अजुन अर्धा तास लागेल," तिनेही आवाज संयतच ठेवला.
"ठीक आहे मी खाली गाडीतच तुझी वाट बघतोय,"असे म्हणुन त्याने लगेचच फोन ठेवुन दिला.

पण त्या अर्ध्या तासातला प्रत्येक क्षण त्याला एका युगासारखा वाटला. अर्ध्या तासाने ऋता गुपचुपपणे गाडीत येउन बसली. १० मिनिटं गाडीत एकदम शांततेत गेल्यावर अभीने पुढाकार घेउन बोलायला सुरुवात केली.
"मला काहितरी कळेल का?"
"..." "ऋता कहीतरी बोल, ही शांतता मला रात्रभर छळतेय..." अभी कळवळीने बोलला.
"अभी गाडी थांबव. प्लिज गाडी बाजुला घे आणि थांबव," ऋता विनंतीपुरवक पण मोठ्य निग्रहाने बोलली. अभीने एका वळणार गाडी बाजुला घेउन उभी केली.

"हे बघ अभी मला माझा भुतकाळ कधीच कोणला सांगायच नव्हता. पण कालच्या सगळ्या प्रसंगाने एकदम शांत, निरभ्र पाणी अचानक एका दगडाने गढुळ व्हावे तसा तो पुर्णपणे ढवळुन निघाला आहे. तुला ऐकायचेच आहे तर ऐक. मी कॉलेजमध्ये असतानाच शेवटाच्या वर्षत आमच्या गृपमधल्या एका मुलाने मला रितसर प्रपोज वैगरे केले होते. पण मी त्याला होकार न देता घरी विचारुनच मग काय तो निर्णय घेईन असे म्हणाले. यावर तो घरी पण येउन गेला, घरुन पण आमच्या लग्नाला होकार वैगरे मिळाला. थोड्याच महिन्यात आम्ही एका छोट्याश्या समारंभात साखरपुडा उरकुन घेतला. असेच एकदा सगळे मित्रमैत्रिणी एका पार्टीवरुन उशीरा घरी परतत होतो. शेवटी आम्ही दोघेच होतो तो मला सोडुन मग घरी जाणार होता. मध्येच एका रस्त्यावर त्याने गाडी थांबविली आणि मला बोलला उतर खाली फक्त एक मिनिटं. खरतरं मला तिथे निर्जन रस्त्यावर उतरायल भिती वाटत होती पण त्याचा आग्रह पण मोडवत नव्हता. तबाहेर उतरल्यावर त्याने अचानक एक रिबीनने डोळे बांधले आणि शांत उभे रहायला सांगितले. त्याने हळुच डिकीमधुन एक बुके, छानसा केक आणि सरप्राईज भेट म्हणुन नाजुकसा नेकलेस हातात ठेवला. ते बघुन मला थोडं भरुन आलं.

"अगं वेडे रडतेस काय एक छान बातमी द्यायची होती म्हणुन हा सगळा खटाटोप. मला ३ वर्शंसाठी युएसला जायची ऑफर आली आहे. आणि ही बातमी मला पहिल्यांदा तुझ्याबरोबर शेअर करुन सेलीब्रेट करायची होती."
मला खुपच आनंद झाला, "पण तीन वर्ष युएस???"
"हो मला माहित आहे तीन वर्ष युएसला पण आपण लग्नानंतरच जयचे आहे. मी तुला इथे एकटीला ठेवुन जाणर नाही. हे तुझ्यामुळेच तर होत आहे, तु खुप लकी आहेस माझ्यासाठी." हे ऐकुन तर मला आकाशच ठेंगणे झाले.

पण न जाणो आमच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली होती. आम्ही इथे केक कापत असतानाच तिथे मधुनच कुठुनतरी एक अतिशय वेगात जिप्सी येउन थांबली. ५-६ मुलंचे टोळके अचानक खाली उतरुन काहिबाहि बरळु लागली. आणि बघताबघता त्यांनी आम्हाल वेढाच घातला. त्यंन सगळ्यांना मद्यधुंद अवतारात बघुन मला खुपच भिती वाटली आणि मी त्याला नकळत बिलगले होते. शक्य तितकी आवाजात जरब आणुन तो त्यांच्याशी बोलत होता. पण त्याचा काहिएक फायदा होत नव्हता अणि ते अजुनच आरडाओरडीने बोलत होते. बोलणे आत्ताशी हमरातुमरीवर आले होते आणि तेवध्यात त्यांच्यातल्या एकाने मोठे चाकुसदृश हत्यार बाहेर काढले. आणि त्याला मारायला सुरुवात करणार तेवढ्यात मी,
"तुम्हाला काय हवे ते घ्या म्हणुन हातातले ब्रेसलेट, अंगठी वैगरे काढुन देउ लागले," तर त्यांनी सरळ माझ हात पकडुन ओढत घेउन जायला लागले. हे बघुन त्याने आरडाओरड अक्रायला सुरुवात केली अणि पाहुत्न जोरात त्याच्या डोक्यावर बाटलीचा वार केला आणि तो जागीच बेशुद्ध झाला. पण पडतापडता त्याने मला ते लोकं बळजबरीने नेत आहेत एवढेच बघितले.

मी त्यांना हरतर्हेने प्रयत्न करुन "मला सोडा.. मला सोडा.." एवढेच विनवत होते. बरेच दुर गेल्यावर दुरवर एक पोलीसवॅन दिसली म्हणुन त्यांनी मला एकटांच रस्त्यावर सोडुन दिले. मी त्या वॅनच्यमागे पळायचा प्रयत्न केला पण त्यात मी असफल झाले आणि मधेच जास्त श्रमाने रस्त्यातच बेशुद्ध पडले.
दुसर्‍या दिवशी उठले तेच मुळात हॉस्पिटलमध्ये आणि त्याचे नाव घेतच. पण दुर्दैवाने त्याचा अतिरक्त्स्त्रावामुळे कोणि पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. हे समजल्यावर मी खुप दिवस डीप्रेशनमध्ये गेले होते पण मॉम,डॅडने मला ह्यातुन बाहेर यायला खुप मदत केली. पण लोकं अजुनही माझ्याबद्द्दल एकतर दयेने किंवा मग कुत्सित नजरेने बोलतात. त्याच्या आईवडीलांनी तर त्या दिवसांपासुन माझ्याशी सगळे संबंधच तोडले."

"खरच जर का मी त्याच्यासाठि एवढी लकी होते तर मग तो का वाचला नाही? दोनच मिनिटांत सगळं होत्याच नव्हतं झालं. का हे सगळं माझ्याच बाबतीत घडलं? खरच लोकं बोलतात तेच खरं मीच वाईट आअहे ; माझ्याच पायगुणामुळे हे सगळं घडलय. आणि मला अजुन कोणाचं आयुष्य खराब करायचं नाहिय म्हणुन मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे." एवढे बोलुन ऋता गाडीबाहेर निघुन रडायला लागली.

क्रमशः

खरं जाणुन घ्ययच्या प्रयत्नात आपण हे काय करुन बसलो ह्याची जाणिव अभीला झाली. नकळत का होईना त्याने भरलेल्या जखमेवरची खपली काढली होती आणि जखम पुन्हा भळभळुन वाहु लागली. त्याला आपल्या या आततायी कृत्याचा खुप पश्चाताप झाला. आत्ता ऋताला सावरणे खुप गरजेच आहे हे समजुन तो तिच्या पाठोपाठ बाहेर गेला.
"ऋता, सांभाळ स्वताला... असं आयुष्य जगणं सोडुन द्यायचं नसतं. या एका प्रसंगाने तु इतकी निराश होउन कसे चालेल? हे बघ..."
"अभी, तुला जे जाणुन घ्यायचे होते ते मी बोलले आहे. मला वाटतं आत्ता अजुन या विषयावर चर्चा नकोय."
"असं करुन कसं चालेल आज कोणसाठी कुणी जगणं सोडत नाहि. कोणमुळेही जगं पुढे जायचं थांबत नहि. तुला पुढे जायलाच हवे कोण कुठली लोकां तुला बोलतात आणि त्याच तु आजपर्यंत नको तो विचार कुरवाळत बसतेस. हा शुद्ध मुर्खपणा आहे."
"असेल मुर्खपणा असेल पण माझ्यामुळे मी पुन्हा कोणाच्याही आयुष्याशी खेळायला तयार नाहिय."
"असं काहीही नाहिय आणि असलं तरिही मी तयार आहे."
"पण मला हे मंजुर नाहिय आणि ते मी होउहि देणार नाहि."
"ते आपण बघुया, आत्ता सध्यातरी घरी जाउया."
"तु पुढे हो, मी मागुन येते," ऋताने डोळे पुसत म्हंटले.
"नाही मी इथेच अहे, निघायचे असेल तेव्हा हो बोल," अभी निग्रहाने बोलला.
"हे बघ मी लहान नाहिय, एकटी येउ शकते. तु गेलास तरी चालेल."
"पण मी तुला इथे एकटीला सोडुन जाणार नाही." अभी इरेल पेटला होता.
"हे बघ अभी, मी मॉम डॅडपुढे अशी जाउ शकत नाही, मला जरा वेळ लागेल," ऋता बोलली.
"मी थांबयला तयार आहे अगदी अनंतापर्यंत.."
".... तुझ्यासमोर वादात कोण जिंकेल??" ऋता रागाने म्हणली.
"तुच.." डोळे मिचकावत अभी बोलला.

थोड्यावेळाने मावळतिच्या सुर्याला साक्षी ठेवुन दोघेही घरी निघाले. कालच मळभ आत्ता पुर्णपणे जाउन आकाश मोकळं झालं होतं.

घरी गेल्यावर अथपासुन इतिपर्यंत अभीने सगळा वृतांत श्यामा परुळेकरांना सांगितला आणि ऋताच्या आईशी लग्नाबद्दल बोलण्याचे सुतोवाचदेखील केले. ही हकिकत पुर्णपणे ऐकताच त्यांना खुप आनंद झाला आणि उद्याच आपण त्यांच्याशी बोलतो असे आश्वासन देउन त्या आनंदाने आपल्या खोलीत गेल्या.

क्रमशः

दुसर्‍या दिवशीच अभी एकदम खुषीत ऑफिसला गेला. श्यामा परुळेकर पण जरा दुपारचा निवांत वेळ बघुन ऋताच्य घरी गेलुया. त्यांनी सगळी हकिकत त्यांना सांगितली आणि आम्ही लग्नाला तायार आहोत हेदेखील सांगितले. हे ऐकताच त्यांचे डोळे आंदाश्रुने भरुन घळघळा वाहु लागले अणि दोघिही देवापुढे हात जोडुन साखर ठेवुन एकमेकंचे तोंड गोड केले. ऋताच्या आईने ही खुशखबर तिच्या वडीलांनाही दिली आणि इथे अभीच्या आईनेदेखील अभीच्या बाबांनादेखील कळविले. सगळेच आनंदात होते अणि दोघंच्याही घरी येण्याची वाट बघत होते. आज घरी आल्यावर दोघांनाही एकत्रच बोलावुन हे सांगायचे असे ठरले. संध्याकाळी सगळे ऋताच्या घरी जमले होते आणि तेवढ्यात ऋताने घरात प्रवेश केला.

सगळ्यांना एकदम घरात जमलेले बघुन तिला जरा शंकाच आली पण तिने तसे काही दाखविले नाही. हसत खेळत सगळेच गप्पा मारत होते अणि तेवढ्यात श्यामा परुळेकरांनी विषय काढला.

"ऋता, काल तुला अभीने विचारले त्यावर काय ठरविले आहेस?" असे म्हणत त्यांनी थेट मुद्द्यालाच हात
घातला.

ऋतासाठी हा प्रश्न एकदम अनपेक्षीत होता. काय बोलावे हे न कळल्यामुळे ति एकदम गप्पच झाली पण तिच्या चेहर्‍यावरचे भाव खुपच बदलले होते.

"ऋता, काकी काय विचारत आहेत गं?," ऋटाच्य बाबांनी प्रश्न विचारला.

चेहरा जरादेखील वर न करता ऋता एकदम खिन्न मनाने बसुन होती. पुढे कोणी काही बोलायच्या अगोदर अभी मध्ये पडला.
"काका, तुमच्या मुलीला म्हणजे ऋताला.. मी काल लग्नाची मागणी घातली होती. अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या परवानगीची आणि आशिर्वादाची गरज आहे मला." अभीने एका दमात सगळे बोलुन टाकले आणि सगळ्यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात उभा राहिला.

" बेटा, आमच्या सगळ्यांची परवानगी आणि आशिर्वादही आहे तुझ्या पाठीशी," ऋताचे बाबा बोलले.

"धन्यवाद काका. पण मला ऋताचे काय म्हणणे आहे हे पण जाणुन घ्यायचे आहे." अभी ऋताकडे बघत बोलला.

आता सगळ्यांचे लक्ष ऋता काय म्हणते त्याकडे लागले होते पण तिच्या तोंडुन एक अस्पष्ट आवाजही ऐकु येत नव्हता..

शेवटी दोन मिनिटे वाट बघुन अभी बोललाच,"ऋता, तुझ्या मर्जीशिवाय काहीच होणार नाहिय. तुझा जो काही निर्णय असेल तो मला सर्वस्वी मान्य आहे. जे काही मनात असेल ते कोणत्याही दडपणाशिवाय बोल पण अशी शांत राहु नकोस."

"अभी, मला तुझ्याबद्दल, काकु आणि काकांबद्दल पुर्ण आदर आहे. तु अतिशय चांगला, समंजस मुलगा आहेस. इतके चांगले स्थळ मला शोधुनही सापडणार नाही कदाचित. पण... पण मला थोडा वेळ हवाय," ऋता बोलली.

"ऋता, बेटा...." ऋताची आई तिला समजवायचा प्रयत्न करत होत्या.

"दिला... वेळ दिला तुला बेटा.. काहिच घाई, कसलेच बंधन नाहिय. सगाळे तुझ्याच मर्जीप्रमाणे होईल अगदी निश्चिंत रहा." श्यामा परुळेकर तिला समजावत बोलल्या.

थोड्यावेळाने अभी अणि त्याच्या घरातले सगळे पांगले अणि इथे ऋताला तिच्या आईने समजवायचा प्रयत्न केला आणि मग ऋताने सांगितले की तिला आत्ता एक प्रोजेक्टसाठी ३ महिने बाहेरगावी जायचे आहे. त्याच वेळात तिला या बाबतीत विचार करायला आणि निर्णय घ्यायला उपयोग होईल. पण हे ऐकुन ऋताची आई थोडी सुखावली आणि दुखावलीसुद्धा. सुखावली यामुळे कि ऋता थोडतरी अभीचा विचार करत होती आणि पहिल्यांदाच आपली मुलगी एकटी रहाणार म्हणुन दुखावली ते पण एकदम तीन महिने.

इथे ऋता विचारात पडली की ह्याचा निर्णय लवकरांत लवकर घेताल की अभी सुटला त्याला उगाच आपल्यामुळे वाट बघायला लागायला नको.. आणि "निर्णय" काय तो आपला ठरलेलाच आहे फक्त जास्त कन्व्हिन्सिव्ह शब्दांत तो मांडता यायला हवा..

अभीच्या डोक्यात इथे वेगळेच चक्र सुरु होते. मॉमने असे का म्हणावे ते त्याल कळले नव्हते. तो विचारांच्या नादातच जेवुन झोपायला गेला पण झोप कुठे येत होती त्याला.. शेवटी अजुनही त्याच खोलीतला दिवा चालु आहे बघुन श्यामा परुळेकर त्याच्या खोलीत गेल्याच. तर तो पलंगावरच पडल्यापडल्या विचारमग्न असलेला त्यांना दिसला.

"अभी, झोप येत नाहिय का?," असे म्हणत त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला.

अचानक आलेल्या प्रश्नाने तो जरा भांबावलाच आणि सावरायचे म्हणुन बोलल," नाही गं मॉम, आता झोपतच होतो..." म्हणुन तो दिवा बंद करायला उठला.

"अरे, मला माहित आहे तुझ्या मनात काय चलबिचल चाललीय ती. शेवटी आई आहे मी तुझी," त्या बोलल्या.

"नाहि गं मॉम तसं काहिच नाहिय.." अभी म्हणला.

"आज ओळखते का रे मी तुला? नाहि बोललास तरी कळ्तं हो तुझ्या मनातलं मला.. तुला हाच प्रश्न पडलाय ना की मी अशी का बोलले मगाशी म्हणुन?? तर ऐकं.. अरे आजवरच्या आयुष्यात खुप नको ते सहन केलं त्या बिचार्‍या पोरीने. आजही आपण एकदम पुर्व कल्पना न देता तिला एकदम विचारले. ती खरच या परिस्थितीत नव्हती की लगेच उत्तर द्यावे. जरा तिच्या बाजुने पण विचार करायल नको का? एकदम प्रेशर देउन काय होणार आहे? तिला स्वताच्या आयुष्याचा, जोडीदाराच्या निवडीचा पुर्ण हक्क आहेच ना?" त्या बोलल्या.

"हो आई, मी कुठे म्हणतोय की मला "हो" उत्तर हवय म्हणुन.." अभी गोंधळत म्हणाला.

" नाही बाळ हे मी देखील म्हणत नाहिय पण. तिच्या दृष्टीने विचार करुन बघ.. कित्ती अवघड आहे हे डीसीजन.. कारण यावर तुअमह्च्य दोघांचे आयुष्य अवलंबुन आहे. जर तुझ्याबरोबर राहुन देखील ती त्याचाच विचार करेल? तुझी त्याच्याशीच तुलना करेल तर ते चालेल का तुला?," त्यांनी प्रश्न उपस्थित केले. हे ऐकल्यावर अभी पण तसाच विचार करु लागला.

"बघ थोडा वेळ दे तिला... असां कुणीही लगेच आपला भुतकाळ विसरत नसतं. आठवणी म्हंटलं तर आयुष्यभर पुरतात आणि म्हंटलं तर आयुष्यभर छळतात.. जरा समजुन घे.. वाट बघण्यात काहिच त्रास नाहिय.. आणि मला पुर्ण खात्री आहे की तिचे उत्तर शेवटी होकारार्थीच असेल म्हणुन." हे ऐकल्यावर अभीची कळि थोडी का होईना खुलली. हे बघुन समधानी होत त्या म्हणल्या.

"जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा एकच नियम लक्षात ठेवायचा..
If You love someone set it free,
If it is your's it will come back to You
If don't , it was never....
चल झोप आत्ता. खुप रात्र झलीय गुडनाईट." असं बोलुन त्या निघुन गेल्या.

अभी पण एकदा ऋताच्या बाल्कनीत कोण दिसतय का बघुन गेला पण नाही तिथे कोणिच नव्हते..

क्रमशः

दुसर्‍या दिवशी सकाळी अभी लवकर उठला आणि आवरुन त्याने लगेच ऋताला फोन केला. आपण दोघे ऑफिसला एकत्रच निघु म्हणुन तर मॅडम अगोदरच घरातुन निघालेल्या होत्या. पार्किंगवरुन थोडेसे खट्टु होत त्याने पार्किंगमधुन गाडी बाहेर काढली तर मॅडम छत्री पकडुन कसरत करत बसस्टॉपवरच उभ्या होत्या. अभीने आवाज देउन तिला गाडीत बसायला सांगितले पण तिने नको म्हंटले. तरिही अभीने तिला कसेतरी पटवुन गाडीत बरोबर घेतलेच.

"तुला राग आलाय का कालचा?", अभी बोलला.

"नाही."

"मग तु गाडीत येत का नव्हतीस?"

"नाही तसं काही नाहिय... मला"

"मग कसं आहे? हे बघ ऋता काहीही झालं तरी आपण मित्र असुच असे मला वाटते. पण तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर..."

"नाही रे.. पण मला आज ऑफिसला न जाता बाहेर जायचे होते... म्हणजे थोडी शॉपिंग करायची आहे. म्हणुनच मी तुला नाही बोलले.."

"काही स्पेशल ऑकेजन?"

"नाही, मी.... म्हणजे..... खरंतर तुला कालाच सांगायचे होते पण... मी तीन महिन्यांसाठी बंगलोरला चालली आहे ऑफिसतर्फे.. आमचे वर्कशॉप आणि नंतर फॅशन शो आहे. मला जरा त्याचीच तयारी करायची आहे म्हणुन मी हे २-३ दिवस रजेवर आहे."

"ओह.... कधी जाणार आहेस?"

"शनिवारी दुपारची फ्लाईट आहे."

"पण एकदम सगळं अचानक?"

"हो आम्हालापण कालच कळलं, खरंतर नावं अजुन डीसाईड नव्हती झाली म्हणुन मी कोणलाच सांगितले नव्हते. अगदी घरिसुद्धा कालच सांगितले मी."

"ओह.. मग फक्त तीन दिवस उरलेत तयारीला.."

"तीन नाहि रे दोन आजचा दिवस तर हा असा जाईल.. एक दिवस मला शाळेत जाउन यायचय सगळ्या मुलांना भेटुन आणि एक दिवस तर तयारितच जाईल. अभी गाडी थांबव मी रिक्षा घेते, चल मी उतरते इकडेच. बाय."

"ऋता, मला थोडा वेळ मिळेल का ह्यातला?"

"अभी, तुला ऑफिसला पोचायला उशीर होईल रे.."

"अगं ते मी मॅनेज करिन गं.."

"अरे पण तु का उगाच त्रास करुन घेत आहेस, मी मॅनेज करेन ते.."

"हो तु मॅनेज करशील माहितीय.. मी आलो म्हणजे बघ कसं होईल? तु आज शॉपिंगला एकटीच आहेस. त्यामुळे तुला एक कुली लागणारच आहे नाही का.. त्यापेक्षा मी आहेच ना मदत करायला.. ते काही नाही बोल कुठे जायच."

"अरे पण माझं जरा ऐकशील का रे? अनु येणार आहे थोड्यावेळाने गाडी घेउन.. मग मी.."

"तुला काही प्रॉब्लेम आहे का मी आलो तर??"

"नाही.. तसं काही नाहिय पण..."

"मग झालं तर.. चल कुठे जायचय? शॉपर्सला की पँटालुन्स की अजुन काही?"

"अरे जरा माझं ऐकतोस का तु?"

"अरे यार, इथे लोकांना हक्काचा कुली कम ड्रायव्हर मिळतोय तरी प्रॉब्लेम आहे. काय पण दुनीया आहे... कलियुग बाबा कलियुग..."

"अरे देवा मीपण कोणाशी वाद घालत आहे.. चल बाबा चल तुला कुठे आवडतं तिथे चल.."

"ठीकॉय मग चल सेंट्रलला जाउ.." डोळे मिचकावत अभी म्हणला.

"जशी आपली ईच्छा.." हात जोडत ऋता म्हणाली.

इथे शॉपिंग करत असतानाच अभीने २-३ दिवस ऑफिसमध्ये येणार नाहिय, जर मॅनेज कर म्हणुन सेक्रटरिला कळविले. इकडे सगळी शॉपिंग उरकुन घरी यायला ४ वाजलेच आणि बाहेर मस्त पाउस सुरु झाला होता.

"बापरे, खुपच दमायला झालय." ऋता बोलली.

"हो, फक्त चॉईस करुनपण खुपच दमायला झालय नाहि.." अभी तिला वेडावत बोलला.

"हो... म्हणजे फिरुन फिरुन पाय दुखतात समजलं," त्याला अजुनच वेंगाडत तिने उत्तर दिलं.

"हो इथे आमचे हात दुखले सगळ्या शॉपींग बॅग पकडुन त्याचे काहीच नाहिय इथे.. कलियुग आहे कलियुग."

"मी बोललेले का तुला यायला? सांगत होते ना ऑफिसला जा म्हणुन.. अरे बापरे तु ऑफिसला तर गेलासच नाहीस. सॉरी अभी माझ्यामुळे तुला...'

"ए वेडी का तु? मी कधीच कळवलय ऑफिसमध्ये की मी येणार नाहिय. एवढा गोल्डन चन्स कोण चुकवेल??"

"गोल्डन चान्स??"

"हो मग आता तु दोन दिवसांनी गेलीस की मग मला तीन महिने वाट पहावी लागेल तुला बघायला.. मग हाच होता माझ्याकडे गोल्डन चान्स तुझ्याबरोबर रहाण्याचा."

"अभी...."

"नाही ऋता मला तुला दुखवायचे नव्हते पण जे बोलतोय ते खरं आहे. मला खुपच त्रासदायक जाणार आहेत ते तीन महिने."

"..... सॉरी अभी"

"ते जाउ दे, तु गरमागरम कटींग पिणार की कॅपुचिनो हवीय? आणि काही खाणार आहेस का? हमाली केल्यावर खुपच भुक लागते माहिती आहे का तुला?"

"हो कटींग तर हवीय.. आणि काय खाणार आहेस? ट्रीट मी देतेय.."

"नको तुझी ट्रीट मला.. बोल काय खाणार आहेस?"

"देवा इथे ट्रीट मिळतेय तर नकोय.. कलियुग बाबा कलियुग.." ऋताने असं बोलल्यावर दोघही खळाळुन हसु लागली.

क्रमशः

दोघेही संध्याकाळी घरी परत येतान ऋताच्या आईने बघितले अणि थोड सुटकेचा श्वास टाकला. सगळ्या बॅगा घेउन घरांत आल्यावर ऋता लगेच फ्रेश व्हायला गेली. तेवढ्यात आईने चान्स घेउन अभीला म्हंटलेच, "दमला असशील ना रे?"

"हो जरा दमलोच पण चालतय ना काकु.. आपल्या माणसासाठी एवढं तर करुच शकतो ना मी."

"हो रे, पण इथे 'कळत असुन वळत नाहिय' ना.. पण ती पण काय करणार एकदा ठेच लागल्यावर दुसर्यांदा मार्ग बदलतोच ना माणुस.. तस तिने..."

"काकु, अहो समजतय मला.. मला काही एक तक्रार नाहीय त्याबद्दल फक्त थोडी काळजी आहे पण ह्या सगळ्याचा शेवट छानच होईल अशी आशा नक्कीच आहे मनात. तुम्ही बघाच.."

"काय बघायचे आहे रे अभी?" ऋता तिथे येत बोलली.

"अं अगं तो आपल्या कामाबद्दल बोलत होता." विषय बदलत काकु बोलल्या.

"हो ना, थोड्याच दिवसांत मी एक दुसरा प्रोजेक्ट कराय्चे म्हणतो आहे. बघुया कसं काय जमतं ते?"

"बरं पोरांनो काही खाणार आहात की आधीच खाउन झालय?"

"आई, एक मस्त गरमागरम आल्याचा चहा कर ना गं."

"ए ढमे तु आईला काय बोलते आहेस? तुच कर ना आम्ही जरा गप्पा मारतोय." अभी तिला वेंगाडत बोलला.
"मी खुप दमलेय रे.. आणि ए तु कोण मला ऑर्डर देणारा?"

"म्हणजे आई दमली नाहिय का? काही नाही आई तुम्ही इथे बसुन माझ्याशी गप्प्पाच मारा आज."

"अरे आता दोनच दिवस फक्त तिच्या हातचं सगळं मिळणार आहे मला म्हणुन म्हणतेय मी.."

"अरे अभी राहुदे मीच करते चहा जर मला पण तलफ आलीय.."

"राहुदे मग मीच करतो चहा. तुम्ही मायलेकी जरा गप्प मारा मी आलोच."

"अरे अभी राहुदे.."

"नाही काकु, आज पिउनच बघा तुम्ही माझ्या हातचा चहा. एकदम मस्त बनवतो मी."

" जाउ दे आई तो कधी कोणाचे ऐकणार नाही. करुदेच चहा त्याला बघुया एवढ्या बढाया मारतोय तर कसा चहा करतो ते."

"अगं ऋता, काय बोलतेस तु? तुला तरी..."

"बघ जरं मी चांगला चहा केला तर तुला काहितरी ऐकावे लागेल माझे. लावतेस पैज?"

"हो लागली पैज, बघुयाच आत्ता..."

"ठीक आहे पण मग मी काय बोलतो ते करायला तयार रहा.."

"हो हो बघुया आपण.. आधी तु चहा तर कर, मग पुढचे पुढे."

"आई तुम्ही साक्षिदार आहात हा माझ्या.."

"हो हो, तु चहा तर कर रे मग पुढच्या बाता कर...", ऋताने अजुनच डिवचले त्याला. असे म्हंटल्यावर अभी किचनमध्ये निघुन गेला.

"ऋता, हे शोभतं का तुला? त्याल कसला चहा करायला लावतेस?"

"अगं तोच एवढ्या बढाया मारत होत म्हणुनच मी..."

"हो तो लाख बोलेल म्हणुन तु ऐकशील लगेच त्याचं? मग सगळच ऐक ना त्याचं."

"आई..."

"अगं खरं तेच बोलतेय, एवढा सोन्यासारखा मुलगा कुठे ही मिळणार नाहि बाळा तुला. तु बघितले आहेस त्याने वेळोवेळि आपल्याला कित्ती मदत केलीय ते."

"हो गं आई पण मी इतक्या पटकन कसा डीसीजन घेउ. आणि तो खुप चांगला आहे हे मला पण माहित आहे. पण मला ह्यावर विचार करायला वेळ हवा आहे, तुला बोललेय ना मी की तिथे गेलयवर मी विचारांती निर्णय घेईन म्हणुन... "

"बरं बाई, तुच काय तो निर्णय घे. आम्ही बोलुन काय होणार? तुम्ही मुलं कधी आमचं ऐकता होय?"

"आई.."

"काय गप्पा चालल्या आहेत मायलेकींच्या?" अभीने चहाचा ट्रे सांभाळत विचारले.

"अरे मी तिला सांगत आहे नीट जपुन रहा तिथे. स्वताची काळजीघे, रोज आम्हाला फोन कर. बरं वैगरे नसेल तर जास्त स्ट्रेस करु नकोस वैगरे.. " थोडं हळवं होत त्या म्हणाल्या.

"आई, नको गं काळजी करुस, मी व्यवस्थित राहीन.. "

"हो काकु, तेवढीतरी मॅच्युअर ती आहे. आणि बँगलोर कितिसं लांब आहे फक्त ३ तासांवरच तर आहे. चला हा चहा घ्या बघु उगाच थंड होतोय तो."

"हो गं आई, उगाच काळजी करत आहेस तु?? चहा घे बघु तु.. बघ तरी या ठोंब्याचा चहा कसा झालाय ते???" आईच्य हातत चहाच कप देत ती बोलली.

"अभी खरच खुप छान झालय चहा.."

"मॅडम तुम्ही काय बोलता??"

"हो एवढा काही वाईट नाहीय ठिक ठिकच आहे."

"क्काय?"

"नाही म्हणजे चांगला आहे हे मी मोठय मनाने मान्य करतेय."

"मोठ्या मनाने का??? मॅडम पैज जिंकलोय मी आता मी सांगेन ते करायची तयारी ठेव.."

"ते बघु आपण तेव्हाचे ते.."

"अहं, काकु तुम्ही सक्षीदार आहात हा.. बघा ही चिटींग करत आहे."

"ऋता, बघ तो बोलतोय ते बरोबरच आहे, तुला पैज पुर्ण करावी लागेलच."

"बरं बरं ठिक आहे; मला पॅकिंग करायची आहे मी जातेय."

"मदत हवी आहे का?"

"नको मी करेन एकटीनेच मला नकोय मदत कोणाची."

"काकु चिडलं कोणितरी, हार सहन झाली नाही" अभी वेंगाडत बोलला.

"तसं काहीही नाहिय, तु काय मदत करणार मला? मुलं एकदम अव्यवस्थित असतात म्हणुनच बोलले मी तुला. ऋतानेही वेंगाडतच उत्तर दिले.

"एकदा हो तर म्हणुन बघ, मग समजेल."

"अरे काय भांडताय तुम्ही लहान मुलांसारखे? ऋता तुला मदत लागेलच पॅकींग करायला आता तो करत आहे तर का नाही म्हण्ते आहेस? अभी जा तु खरच तिच्या मदतीला नाहितर उगाच रात्री माझे डोके खाईल अजुन पॅकिंग झाली नाही म्हणुन."

"आई, तु का त्याला.."

"जशी आपली आज्ञा काकु. चल ग ए ठोंबे.." तिला एक टपली मारत अभी बोलला.

क्रमशः

गुलमोहर: 

छान सुरवात! पुढचे भाग पटापट येउ द्या!

ह्म्म सुरुवात तर चांगलीच झालेय... उत्कंठावर्धक!! पण शुद्धलेखनाच्या चुकांमुळे मध्येच ठेचकाळाला होतंय.. पण चांगली चालली आहे कथा... लवकर लवकर पोस्टा..

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

येउ दे लवकर पुढचा भाग....... मस्त आहे

अहो भाग्यम! १ दिवसात २ -२ पोस्ट!!!

पोस्टा पटापट... चांगल चालू आहे...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

कृपा, पहिला प्रयत्नं कथेच्या दृष्टीने वाटत नाहीये इतका छान ओघ आहे. (टायपिंग आणि व्याकरणासाठी मात्रं... किंचित लक्षं दे).
आणि, तू लिखाण अप्रकाशित अवस्थेत लिहून ठेऊ शकतेस. सगळं लिहून झालं की प्रकाशित करायचं.
किंवा तोच लेख प्रकाशित केल्यावरही संपादनमधे जाऊन पुढचं लिहू शकतेस.
असा पोस्ट्समधे वाहून जाईल गं.

क्रुपा मस्तच आहे गं कथा... छान ओघवतं लिहितेस..
अजिबात वाटत नाहि पहिला प्रयत्न आहे ते....:)

..................................................................................
"Ours is Essentially a Tragic age, So we refuse to live it Tragically"

सुंदर ओघवती भाषा... लिहा ना पटापट प्लीईईईईईईईईज...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

लोकेश शेवाळे

खुप छान..... समोरचे लेख लवकर लिहावे ..... विनन्ति.....

धन्स लोक्स.. पण सध्या कामात बिजल्यामुळे लवकर लवकर पोस्टता येत नाहिय...

क्षमस्व.

मस्त रंगवतीहेस बॉय मीटस गर्ल गोष्ट. पुढच्या भागाची वाट पाहेन. Happy

सॉरी लोक्स जर तापाने आणि सर्दी-खोकल्याने आजारी होते आणि ऑफिसमध्ये प्रचंड काम होते. त्यामुळे पोस्टु शकले नाहिय; लवकरच पुढचा भाग पोस्टते..

क्रुपा, अग किती वाट पहायला लावायची...... बर काळजी घे आणि लवकर पोस्ट यार.... मी नविनच जॉइन केलय मायबोली एकदम मस्त वाटतय.

आत्ताच वाचलं तुमचं लेखन, खरंच छान आहे... Keep it Up...

कुतुहल म्हणुन विचारतोय, 'हे लेखन अगोदर 'कागदावर उतरवून' नंतर ईथे प्रसिद्ध केलय की एकदम 'मनात येईल तसं' डायरेक्ट प्रसिद्ध करताय?'....

धन्स लोक.. मी बरी आहे आत्ता.. Happy
रवी, श्वे, साज, विवेक, प्रीती, हसरी, किशोर, मंजिरि धन्स... Happy
सॉरी लोक्स खुप वाट बघायला लावली पण प्रयत्न करेन लवकरात लवकर पुर्ण करण्याचा. कामाच्या व्यापापुढे वेळच मिळत नाहिय.. Sad

Pages