कृष्ण एक भावना.....
श्रीकृष्ण कसा याबद्दल अनेक मतप्रवाह.. गोकुळातल्या समस्त गोपिकांना रिझवायला तो नंदलाला, कन्हैय्या झाला..लहानमोठी प्रत्येक स्त्री त्याच्या बाललीलात रंग़ुन गेली..पुत्रप्रेम..बालमित्राचं प्रेम..तारूण्यातला उत्फ़ुल्ल जोश यांचा रसरसुन आनंद घ्यायला शिकवले या श्रीरंगाने.. रासलिला मध्ये रमणारी प्रत्येक गोपी निश्चितच विसरली असेल ती रास रचताना आपल्या दु:खाला.. आपल्या विवंचनेला..एक फ़ुंकर ठरली असेल ती तिच्या दु:खावर..एक खळाळता उत्साह आला असेल तिच्यात.. तिच हरवलेल बालपण कदाचित हरवलेल तारुण्यही गवसलं असेल तीला त्या कृष्ण क्रीड मध्ये
स्वतंत्र ओळख ..एक स्वातंत्र्य .. प्रत्येक व्यक्तीची एक स्व:तांची ओळख एक स्वतंत्र स्पेस असते.. या सगळ्या कुटुंब, संसार समाजा पलिकडेही हीच जाणिव दिली त्या अबोध गोपिकांना श्रीकृष्णाने..जेव्हा जेव्हा त्या रास क्रीडेचा विचार करते त्यावेळेस मला श्रीकृष्णचे ते केवळ रमणे , किंवा खेळ हे जाणवतच नाही मला दिसते त्या पाठची प्रत्येकीची स्पेस जपण्याची भावना..त्या रासरंगात कुठलीही शारीरीक आसक्ती नव्हती तर परमात्म्याशी आत्म्याचे तादात्म्य पावण्याची भावना होती आणि असे आत्म्याचे परमात्म्यात तादात्म्य पावले की मग भौतिकतेच्या पलिकडे जाउन अंतरात्मा परमात्म्यात सामावल्याने संपूर्ण भानविरहीत असे होऊन जात.केवळ ग़ोपिकाच नव्हे तर त्याचे सवंगडी गोप देखिल त्याच्या समवेत यमुने काठी क्रिडा करीत असोत वा दह्या हंड्या फोडून दही खात असोत अगदी तन्मयतेने त्याच्या समवेत समरसून त्याचा आंनद घेत.तो मुरली मनोहर आपल्या बासुरीवर सुरेल ताना घेऊ लागला की भोवतालचे संपूर्ण चराचर अमृतानुभव घेत आणि त्या सुरामृतात तल्लीन होऊन आत्मभान विसरून त्या परमात्म्याच्या सुरेल उत्सवात सामावून जात त्याचा खोडकरपणा ही हेच दाखवतो..प्रत्येकाच्या मनातल्या सुप्त बालमनाला त्याने कुठेतरि जागते ठेवले ..त्याच्या खोड्याना लटके रागवतानाही त्या खोड्या हव्या हवयाश्या होत्याच ना प्रत्ये़कीला.. यशोदे बाबतीतही हेच जन्मतःच तीने तिच्या कन्येला गमावले पण ते अपत्य विरहाचे दु:ख जाणवु दिले नाही कन्हैयाने तिला.तिलाही नाही आणि नंद राजालाही नाही.. हि स्त्री मनाची जपणुक मला सातत्याने दिसते कृष्णा मध्ये
मग तो संदर्भ अगदि कुब्जेचा असलतरी त्यामागे श्रीकृष्ण मला जाणवतो ते एक विचार म्हणुन... तिच्या कुरुपतेतीलही तिचे सुरुप मन ओळखले त्याने... आणि त्यानेच..कुरुपता ही पुर्ण पणे कुरुपता नसतेच त्यातही कुठेतरी सुरुप, स्वरुप असतेच. सत्यभामा किंवा रुख्मिणी मानवी स्त्री सुलभ भावनाचा अविष्कार पण त्या दोघीनाही सांभाळताना त्याने साधलेला समतोल शिकवुन जातो समतोल वृती.. प्रत्येकीचा हट्ट पुरवणार तो पती..
कितीतरी रुपे त्याची द्रौपदीचा सखा..तिच्या धाव्यावर तीचे पती देखील खाली मान घालुन बसलेले असताना..तिचे स्वत्व जपायला पुढे आला फ़क्त तोच..तीचा कृष्णसखा..तिची थाळि ..तिची काळजी पुर्ण केली त्याने..तिच्या अस्मितेला..तिच्या भावनाना जपले त्याने कायम.आणि प्रत्येक स्त्रीला हवी असते अशीच एक पाठीशी राहाणारी..कायं जपणारी भावना ती स्वत: जरी कणखर असली तरी तिच्या कणखरतेला अजुन कणखर करणारी..तिच्या विचारांना धार देणारी ही बळकट भावना आणि ती भावना म्हणजे कृष्ण..मग मीरेच्या निष्काम भक्तीला ओ देणारा कृष्ण असो किंवा मधुरा भक्तीत रंगलेला श्रीरंग असो..दोन्ही रुपे स्रीच्या जवळचीच.निष्काम निष्कलंक प्रेम, निष्काम भक्ती म्हणजे फक्त श्रीकृष्ण...स्त्रीचं सगळ्याच अर्थाने स्वातंत्र्य जपलेले दिसते मला कृष्ण चरित्रात...अध्यात्म भावनांचा रसपरिपोष आढळतो ठायी ठायी...प्रत्येक आत्म्याच्या ठायी असलेली उपजत ओढ, उर्मी जागवलीये त्या माधवाने सतत..मग तो अर्जुनाला गीता सांगुन सत्याबाबत कणखर व खंबीर रहाण्या साठी केलेला यत्न असो वा सत्याची बाजु सावरण्यासाठी कधीतरी युक्तीने केलेला सामना असो....
मी जेव्हा जेव्हा विचार करते श्रीकृष्णाचा तेव्हा मला जाणवते व्यक्तीपेक्षाहि ती एक भावना ...कृष्ण एक भावना आहे . प्रत्येक स्त्रीचा पाठीराखा आहे तो..ती भावना त्या कोवळ्या बालमनाला फ़ुलायला शिकवते तारुण्यातल्या भावनांना हळुवार खुलवते..वेदनांमध्ये ही सुखावते.. ह्या संसाराच्या तापातही एक शीतल झुळूक होते व अवकाश आहे स्वतंत्र तुझे ह्याची जाणिव प्रत्येकीला करुन देते तुझ्या पाठी माग़े मी सदैव आहेच.. हा विचार कृष्ण मला कायम देतो..कृष्ण...माझ्यासाठी एक भावना.. अगदी बालवयापासुन..पावलापावला वर साथ करणारा माझा सखा... माझा दिपस्तंभ..
अतिशय
अतिशय सुंदर मांडणी आणि उत्कट आविष्कार.
विशेषतः कृष्णाच्या 'दुर्लभ' योजकत्वाची छान ओळख कुब्जेच्या आणि रुख्मिणीच्या उदाहरणांनी स्पष्ट केलीय.
बापू करंदीकर
लेख आवडला
लेख आवडला .श्री बापू करंदीकर याना अनुमोदन .श्रीकृष्णाकडे सर्वव्यापी परमतत्व म्हणून पहाण मला
योग्य वाटत .या लीलापुरुषोत्तमाच कार्य १ गोवंशाच रक्षण .२ स्त्री शिक्षण ३सात्विकांच संगठण ३आसुरी
तामसी शक्तीचा नाश ४ मानव धर्माच पुनरूज्जीवन .जेव्हा गोहत्येच प्रमाण वाढू लागल ,स्त्रीशक्ती समाज
धारणेला कमकुवत झाली ,सात्विकांच बळ खच्ची करणारे सबळ प्रयत्न सहज यशस्वी होउ लागले ,आसुरी
शक्तीना ऊत आला ,स्वधर्माच आचरण लोप पावल तेव्हा सर्व विनाशाची चिन्ह दिसू लागली .तेव्हा पृथ्विला
सर्वव्यापी शक्तीने सांभाळाव या शुद्ध हेतुने ऋषिमुनिनी अनुष्ठानाद्वारे शरीरातीत असा क्षीरसागर गाठला .
पृथ्वी सर्व सात्विकता एकवटून जणूकाही दयनीय अशी गोस्वरूपा झाली .क्षीरसागराच्या तीरावरील धावा
क्षीरसागरवासीने ऐकला व'' ना भी ''अशी गर्जना झाली ,व कृष्णजन्म झाला .
१ गोवंशाच रक्षण
गाईच्या केवळ श्वासोश्वासाने वातावरण शुद्ध होत .गोमुत्र ,गोवर्या औषधी आहेतच ,गाईच तूप आयुर्वेदात
औषधांची औषधी म्हणून सर्वमान्य आहेच .गाईच दूध सर्व सस्तन प्राण्यांच्या अर्भकाना तसच रुंग्णाना
जीवदान देत म्हणून ती गोमाता .गोवर्या व गाईच तूप यानी संपन्न अग्निहोत्र व इतर यज्ञ वातावरणाचा
समतोल राखतात हे तर वाढत्या अग्निहोत्राने सर्वमान्य झाल आहेच .जन्मताच गोकुळात प्रयाणाच हेच
कारण .
२ स्त्री शिक्षण
स्त्री ही समाजाची धारणशक्ती आहे .ती कमकुवत असून चालणार नाही .तिचे विचार प्रगल्भ व शरीरातीत
असायलाच हवे .कुठल्याही समाजात कुठल्याही काळी स्त्रीयामध्ये मिसळण्यासाठी परब्रह्म बाळ्स्वरूप
झाल.स्त्रीयाना शरीरातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी भाग पाडल .नारदमुनी ,उद्धव तसच अन्य मुमुक्षाना
गोपिकानी केवळ सदाचरणाने गूढ तत्वज्ञानाचे धडे द्यावे इतकी स्त्रीयांची प्रगती केली .
३ सात्विकांच संगठन .
सात्विक शक्ती संगठीत झाल्याशिवाय समाजाची उन्नत्ती होउ शकत नाही .गोपाळ्काला,दहीहंडी ही
संगठनाची बालमनावरची रुजवात .
४ आसुरी ,तामसी शक्तीचा नाश .
प्रत्येकात तामसी गूण असतात .ते अभ्यासाने नियंत्रणात आणावेच लागतात .याची शिकवण देण गरजेच
असत .तसच नियंत्रीत न होणार्या तामसी श़क्तिंचा नाश होण तितकच महत्वाच .
५ मानव धर्माच पुनरुज्जीवन
स्वधर्म म्हणजे काय याचीच जाणीव नसली की पशूवत आचरण हा समाजाचा स्थाइभाव होतो .म्हणून
भगवत् गीता .
श्रीकृष्ण हे एक आदर्श चरीत्र आहे .याची प्रेरणा घेवून आपल्या देशात अनेक समाज कार्यकर्ते झाले पुढेही होतील यात शंका नाही .
खूप छान
खूप छान लेख.
मी खूप
मी खूप वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचल होतं त्यात कृष्णावर खूप छान लेख होता. आता मला पुस्तकाचे नाव नाही आठवत पण आजोबांनी परदेशी वाढणार्या नातवंडासाठी लिहिलेले पुस्तक होते.
अतिशय
अतिशय सुंदर मांडणी आणि उत्कट आविष्कार.
विशेषतः कृष्णाच्या 'दुर्लभ' योजकत्वाची छान ओळख कुब्जेच्या आणि रुख्मिणीच्या उदाहरणांनी स्पष्ट केलीय.>>>>> बापू धन्यवाद ..आणि खरच जेव्हा जेव्हा मी कृष्णाकडे बघते मला त्याचे हेच गुण प्रकर्षाने जाणवतात..
छाया प्रथमतः आभार..खुप सुंदर विवेचन.. अतिशय छान्..मला अजुन व्यापक दृष्टि मिळाली श्रीकॄष्णाकडे बघण्याची. इथे लिहिताना खरतर मी फक्त स्त्रीयांबाबत श्रीकृष्णाच्या असलेल्या भुमीकेचा विचार केला होता पण तुमचे हे मुद्दे वाचुन वाट्ले क अरे आपण खुपच त्रोटक लिहिले
.१ गोवंशाच रक्षण .२ स्त्री शिक्षण ३सात्विकांच संगठण ३आसुरी
तामसी शक्तीचा नाश ४ मानव धर्माच पुनरूज्जीवन .>>>> श्रीकृष्ण कार्या बद्दल इतके मुद्देसुद विचार मांडल्या बद्दल अभिनंदन..:)
परत एकडा बापू , छाया आणी स्वाती मनःपूर्वक आभार..:) तुमच्या अश्या अभ्यासु प्रतिक्रिया खर तर खुप शिकवुन जातात आणि अजुन लिहिण्यासाठी उद्युक्त करतात.
आणी अजुन जाता जाता एक..ईथे ते संदर्भहिन आहे तरीही...
आता परत मायबोलीवर लिहावेसे वाटायला लागलेय..खरतर मी आज पासुन मायबोलीवर लिखाण नको टाकायला या निर्णयाप्रत आले होते..कारण अजिबात म्हणजे वाईट लेखनाला वाईट सुध्दा प्रतिक्रिया न देणे म्हणजे लेखकाला ती सुचना असते की तु लिखाण बंद कर.अर्थात लेखन बंद नाही होणार फक्त ते ईथे पोस्ट नाही करायचे हे ठरवले होते.. पण तुमच्या प्रतिक्रियांमुळे माझा निश्चय डळमळीत होतोय का असे मला वाटायला लागले..:)
बासुरि
बासुरि तुमचे लेख नेहमि छान असतात. मला तरी खूप आवड्तात
खरच खूप
खरच खूप छान!!!!!!!!! मस्त लिहिलयं.....
त्या श्यामसुंदर घननीळ्या कृष्णाची खरी ओळख हीच आहे..... अंतर्यामीचा सखा....
-----------------------------------------------------------------------
स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहत मी म्हटलं,
'माझं नशीब मीच घडवीन'
तेंव्हा डोक्यावरचं आभाळ पोक्तपणे हसलं- म्हणालं
ठीक आहे.........इतक्यातच कोसळणार नाही
खूप सुरेख
खूप सुरेख लिहीलं आहेस बासु! विवेचन आवडलं.
छायाताईंनी मांडलेलंही आवडलं.
________________________________________
प्रकाश
>>ह्या संसाराच्या तापातही एक
>>ह्या संसाराच्या तापातही एक शीतल झुळूक होते व अवकाश आहे स्वतंत्र तुझे ह्याची जाणिव प्रत्येकीला करुन देते तुझ्या पाठी माग़े मी सदैव आहेच<<
कृष्णसखा! सध्या कठीण वेळेतून जातेय. कधी कधी वाटते, बघतोयस ना कृष्णा तू? वाचून खूप छान वाटले. तो आहेच आपल्या पाठी माग़े. पुलेशु
बासुरी ..... खरोखर माझ्याकडे
बासुरी ..... खरोखर माझ्याकडे शब्दच नाही . खुपच छान लिहीलय .
मी मागे म्हंटलं होत कि तुमच्या कवितेत कृष्ण असतोच. पण मी चुकीचा होतो , तुम्ही स्वतःच कृष्णमय झाला आहात.
असचं लिहीत रहा , आणि तुमचं कृष्णामृत असच आम्हाला वाटत रहा.
धन्यवाद प्रिती, साक्षी,
धन्यवाद प्रिती, साक्षी, प्रकाश,vdk, श्री...:) अगदी मनापासुन
बासुरी, तुझ्यातून तो सखा
बासुरी, तुझ्यातून तो सखा भेटतो आहे. लिहित राहा. तू अगदी मनातलेच लिहिलेस. किती कान्हामय आहेस ग तू?
परवा रात्री मी एकटीच घरापासुन दूर कामासाठी गेलेली. रात्री २ वाजता मुलीचा फोन आला. तुझी आठ्वण येते आहे
रडू येत आहे असा. तिला समजावोन फोन ठेवला पण मग मीच तुटून गेले. शेवटी ती हॉटेल मधे गीता असते ना
ती उघडली अन वाचली. मन शांत केले त्या गीतेने. ओरिसात पण शाम मन्दिरात गेले व भजन ऐकले. तो एक वेगळाच अनुभव आहे बघ. आपले कोणीच नाही असे जेन्वा आतुन समजते तेन्वा कान्हा आपला होतो. आणी
आपण त्याचे.
बासुरी, तुम्ही सुंदर लिहिता.
बासुरी,
तुम्ही सुंदर लिहिता. तुमचा हा लेख मी माझ्या थोरल्या बहिणीला [तिचा संतवा॓ङ्मयाचा खूप अभ्यास आहे] आणि काही मित्रांना पाठवला. त्या सर्वांनाच तो खूप आवडला.
'कृष्ण-लीला' या नावाने श्रीमती लीला कुलकर्णी यांनी [सेवा-निवृत्तीनंतर] श्रीकृष्ण-भक्तिपर कवने मराठी, कन्नड, संस्कृत आणि ईंग्रजी अशा चार भाषात लिहिली. त्याचे एक पुस्तकही श्रीकृष्ण-भावायन या नावाने प्रकाशित झाले आहे. हायस्कूलमधे त्या माझ्या ईंग्रजीच्या शिक्षिका होत्या. त्यांनी मला शाळेतले विषय उत्तम शिकवलेच पण माझ्यावर काटेकोर संस्कार केले, आईसारखी मायाही केली. मी त्यांनाही तुमचा लेख पाठवला.
त्यांच्या एका कवितेत दोन मैत्रीणींचा संवाद आहे आणि त्यात स्त्री-मनाला त्या सावळ्याची किती जवळीक वाटते त्याचं फार सुंदर वर्णन आलं आहे. त्या भावनेला पुष्टी देणारा तुमचा लेख आहे.
त्यांचं वय ८५ आहे आणि स्मरणशक्ति क्षीण झाली आहे. त्यांच्या काही कवितांचा एक आल्बम निघणार आहे. त्यासाठी निरुपणात्मक एका निवेदनाची संहिता लिहिण्याच्या कामाकरता त्यांनी माझी निवड केली, नव्हे प्रेमळ 'आदेश' दिला. भक्तिपर कवनांवर माझ्यासारखा अनभिज्ञ माणूस काय लिहिणार, कप्पाळ? पण निरूपायाने मी ते करायला घेतले.
तुमचा लेख वाचत असताना मला गीतेतला एक संदर्भ अंधुकसा आठवत होता पण मी त्यावर तेंव्हा फारसा विचार केला नव्हता पण आता निवेदन लिहायचे म्हणून मला हाती 'गीता जशी आहे तशी' हे पुस्तक घेणं आणि 'संशोधन' करणं भागच पडलं. शेवटी मला तो श्लोक [किंवा अर्धा श्लोक] एकदाचा सापडला!
" कीर्ति: श्रीवार्क च नारीणाम स्म्रुतिमेर्धा धृति: क्षमा" [अध्याय १०]
स्त्रीमधील कीर्ति, औदार्य व संपत्ती, वाचा, [न्याय-विवेक]बुद्धी, स्मृती, धृती, क्षमा अशा सात शक्ती किंवा विभूती म्हणजे मीच आहे, त्या मीच निर्माण केल्या आहेत असं श्रीकृष्ण-भगवान म्हणतात.
मला वाटते की तुमच्या लेखात व्यक्त झालेल्या विचारांना हाच संदर्भ असावा.
तुम्ही लिहिणे तर थाम्बवू नकाच पण मा.बो. वर नियमितपणे पोस्ट करत चला.
अश्विनी मामी..धन्यवाद्..खरय
अश्विनी मामी..धन्यवाद्..खरय तुमच तोच सखा आहे सगळ्यांचा.. तुम्हालाही तोच धीर देईल आनी सावरेल सतत बघा...:) तो आहे.
करंदीकर,
प्रथमत: तुमचे आभार. आवर्जुन वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. अन हा लेख इतक्या सगळ्या परिचितांना वाचावयास दिल्याबद्दल.
मला खरतर तुमच्या बहिणीशी व कुलकर्णी ताईंशी बोलायला आवडेल. इतका कृष्णा बद्दल त्यांचा अभ्यास असेल तर खरोखर भेटावसाय हवे.
गीतॆमधे जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण वाचावा तेव्हा तेव्हा तो मला निराळा जाणवतो.आनि त्याचा प्रत्येक पैलु मला स्त्रीयांच्या संदर्भात खुप जवळचा वाटतो.तो सखा आहे, सांगाती आहे ,मार्गदर्शक आहे. खरोखर स्त्री मधील कीर्ती, ओदार्य, वाचा , स्मृती, क्षमा हे सगळे गुण म्हणजे तो घननीळच आहे.
मी लिहित जाईल पण तुम्ही असेच आवर्जुन वाचत रहा...:)
अवश्य वाचत जाईन. बापू
अवश्य वाचत जाईन.
बापू
मस्त ! श्री कृष्णाय नमः
मस्त ! श्री कृष्णाय नमः
बासुरी, आपण आपले लिखाण थांबवू
बासुरी, आपण आपले लिखाण थांबवू नये.
तुमच्या माबो आयडीच कॄष्णप्रेम सांगते .... हे मनापासून सांगतेय
माधवी आणि गालव ह्यांविषयी लिहीलेला आपला लेख आपल्या सर्व लिखाणातील निव्वळ अप्रतिम होता. (वेगळा विषय हे ही कारण) हा अनोखा विषय मी घरी आणि ठाण्यातील आमच्या माबो मंडळात सांगितला आणि त्याचे वाचनही केले - मोजक्या मंडळीं मधे(आपली पुर्व परवानगी घेतली नाही, पण हे वाचन सार्वजनीक ठिकाणी नव्हते)
पण आता असे काही वाचले की वाटते --- आपण हे लिखाण लोकांपर्यंत पोहोचवावे.
आपण आपले लिखाण थांबवू नये. ही मात्र कळकळीची विनंती
अरे वा हे वाचलच नव्हतं मी.
अरे वा हे वाचलच नव्हतं मी. कित्ती छान लिहिलय.
सुरश यांच्या लिखाणावरून कळलं, का लिहायचं थांबवलं ? इतकं आतून लिहिणारे कमी असतात हो, नका थांबवू, पुन्हा लिहाना .....
हा लेख बासुरी या आयडीचा नसून
हा लेख बासुरी या आयडीचा नसून सूरमयी आयडीचा आहे, असे असताना लोक बासुरीला लेख लिहित रहा असे का म्हणत आहेत ? बासुरी या आयडीने लिखाण बंद करण्याचे जाहिर केले आहे की काय ?
महेश, सूरमयी यांचा आधी बासुरी
महेश, सूरमयी यांचा आधी बासुरी हा आयडी होता, नंतर त्यांनी तो बदलून सूरमयी असा केला. परंतु जुने माबोकर त्यांना बासुरी नावानेच हाक मारतात.
वाह सूरमयी बासुरी, कित्ती छान
वाह सूरमयी बासुरी, कित्ती छान
धन्यवाद .. अगदी
धन्यवाद ..
अगदी मनापासुन
अजुन तुम्ही बासुरीला विसरले नाही हे वाचुन खरतर मला आश्चर्याचा धक्का तर बसला पण डोळेही भरुन आले.
महेश, अवल, सुरश, आसुचि धन्यवाद
सुरश... मला ही माझ्या विसरलेल्या लेखनाची आठवण करुन दिल्याबद्दल आभार!!..:)
वा वा वा वा ....... काय छान
वा वा वा वा ....... काय छान लिहिलंय...
कृष्णावर असं काही "गोड" लिहिलेलं असेल तर मग विचारायलाच नको.
प्रतिसादही किती सुंदर........
एस एल भैरप्पा लिखित आणि सॉ
एस एल भैरप्पा लिखित आणि सॉ उमा कुलकर्णी अनुवादित पर्व ही कदंबरी वाचा.क्रुष्ण काय होता ते कळते.
वाह ! कृष्ण,बासुरी म्हणजेच
वाह ! कृष्ण,बासुरी म्हणजेच सुरमयी सगळं.. आवडलं लिखाण. यापुर्वीही इथेच वाचलं होतं आणि आज पुन्हा एकदा वाचून प्रसन्न वाटलं.
खरच खूप छान!!!!!!!!! मस्त
खरच खूप छान!!!!!!!!! मस्त लिहिलयं.....
मस्त लिहिलंय! शुभेच्छा...
मस्त लिहिलंय!
शुभेच्छा...
धन्यवाद शशांक, कैवल्य,
धन्यवाद शशांक, कैवल्य, नादखुळा, वेदनगंधा, आनंदयात्री..:)
उशीरा धन्यवाद दिल्याबद्दल मात्र मनापासुन क्षमस्व..
सूरमयी, लेख मनापासून लिहिलेला
सूरमयी,
लेख मनापासून लिहिलेला आहे. त्याचं नावंच मुळी कृष्ण मग तो सर्वांना आकर्षित करणारंच! मात्र एक गोष्ट विचारावीशी वाटली :
>> ...स्त्रीचं सगळ्याच अर्थाने स्वातंत्र्य जपलेले दिसते मला कृष्ण चरित्रात...
हे वाक्य उदाहरण देऊन स्पष्ट कराल काय? या विधानामागची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.
असो.
श्रीकृष्णाचं व्यापक रूप निर्गुण आहे. सगुणातील सखा जसा तुम्हाला जवळचा वाटतो तसाच निर्गुणातलाही वाटो.
आ.न.
-गा.पै.
गा. पै सर्वात प्रथम
गा. पै सर्वात प्रथम धन्यवाद..:)
हे वाक्य उदाहरण देऊन स्पष्ट कराल काय? या विधानामागची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.
>>>>>>नक्कीच..मलाही आवडेल त्यावर चर्चा करायला..परंतु आता कार्यबाहुल्यामुळे जमत नाहीये...:) पण नक्कीचे करेल मी स्पष्ट ते विधान..:)