मनातला एक कवडसा

Submitted by कविन on 3 July, 2009 - 08:00

सहज मनात जरा डोकावुन बघत होते. स्वतःचेच विचार जरा तपासुन, घासुन पुसुन बघत होते. तेव्हा जाणवल ते हे की -

मला अभंग येत नाहीत पण आवडतात
मला सत्संग, गुरु, सोवळ ओवळ जमत नाही
मला देव देवळात असतो का ते देखील ठावुक नाही
पण समर्पण म्हणजे देव, सत्य म्हणजे शक्ती हे मला पटत
दया क्षमा शांती देवा दे तू माझ्या अंगी हा माझा अभंग
मी माझ्या पुरता गाते. नेहमीच यश येत नाही कारण ..
कारण मी घसरण्याला हरणं मानते
तस नसत, प्रयत्न सोडणं म्हणजे हरणं हे मनाला कळायला हव
मंदिरात माझ मन रमो न रमो, दगडात मला देव दिसो न दिसो
त्याच चैतन्य मला प्रत्येक चराचरात दिसो
माझ मन ही प्रार्थना रोज करत,
कधी यश येत कधी येत नाही
हा माझा दोष, त्याचा नाही.
चुकत माकतच शिकायचं
तसही "श्री" गिरवायला घेतला,
तेव्हा "श्री" म्हणताही येत नव्हतच की
जमेल असच हळु हळू
स्वत:ला तपासत चालत मात्र रहायला हव

हे काव्यही नाही, ललितही नाही. मग प्रश्न पडला हे इथे काय म्हणुन टाकु? मुळात टाकु की नको टाकु? मग विचार केला कोणी ह्याला काहीही म्हणो. चांगले वाईट काहीही किंवा काहिही म्हणण्या इतकेही त्यात काय आहे असा विचार करुन दुर्ल़क्ष करो. जे मनाच्या आरश्यावर उमटले, जे प्रतिबिंब मला स्वच्छ दिसले ते इथे मांडले इतकेच. कॅमेराने काढलेल्या प्रकाश चित्रांसाठी विभाग आहे. माझ्या मनातल्या कॅमेराने टिपलेल्या ह्या कवडश्यांचे काय? कुठे टाकु ते? म्हणुन टाकले शेवटी इथे.

गुलमोहर: 

कविता, छान लिहीलयस...

<<पण समर्पण म्हणजे देव, सत्य म्हणजे शक्ती हे मला पटत>> अगदी खरय...

__/\__ शब्द न शब्द पटला बघ... अधुनमधुन मन असं घासुन पुसुन बघीतलंच पाहिजे.. खुप आवडलं ...:-)

सारेगामा मधे मंगेशकरांनी एक छान कविता वाचली होती..

जो कर्म करी अहेतु, वेद तयास कळो न कळो रे..
ओळख पटली ज्यास स्वत:ची, देव तयास मिळो न मिळो रे..

या दोन ओळी वरील लेखाचे एकंदर सार आहे असे वाटले Happy

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

Happy क्लीन बोल्ड.... मस्तं...

कवे अप्रतिम, मनाच प्रकाश चित्र एकदम पर्फेक्ट उतरवलयस Happy
एकदम सिक्सर

कविता,
तुझा कवडसा छान आणि वर केदारनेही उल्लेख केलेल्या ओळी मस्त.
मला रफीने गायलेले मराठी गाणे आठवते.
'शोधिसी मानवा राऊळी, मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी '
आपल्यात चैतन्य असेल तर बाहेरच्या चैतन्याशी आपण एकरूप होतोच. तोच देव गं.
एकांतात मनाचा तळ पिंजून काढला, की मग असं काही तरी जेन्युईन गवसतं.
-योगेश-

धन्यवाद सर्वांना Happy

-------------------------------------------------------------------------
आम्ही कायम अधले मधले, आम्ही कायम तळ्यात मळ्यात
ह्याचेही पटते आम्हा, त्याचेही पटवुन घेतो

कवे.... लहान पणी आपण सेम पिंच म्हणायचो ना तसेच मला आत्ता म्हणावेसे वाटत आहे. बाकी तू समजून घे. Happy

छान. वर्षा आणि केदारला माझंही 'सेम पिंच' Happy

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

तु मला आधी विचारलं होतस हे नक्की कशात मोडतं म्हणुन? हे काय आहे माहितीय तुला कविता...
यालाच अद्ध्यात्म म्हणतात. आधि + आत्म . आधि म्हणाजे आत, आत्म म्हणजे मी. माझ्या आत दडलेल्या मीला शोधणे त्याला स्वतःपासुन दुर करणे किंवा स्पष्ट शब्दात स्वत्व शोधणे म्हणजे अध्यात्म. त्यासाठी आवश्यक आहे ते आत्मचिंतन म्हणजे स्वतःच स्वतःला तपासत राहणे. तु सुरुवात केली आहेस...
शुभेच्छा ! Happy

***********************************
एक नवीन सुरुवात : http://www.maayboli.com/node/9171

नमस्कार्. सुप्रभात.....

मस्तच

मी खुप खुप आपला आभारी आहे.