Submitted by बेफ़िकीर on 12 April, 2026 - 05:55
आयुष्यात रिलेव्हन्ट राहण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण निसर्गाने अदृश्य केले.
आशा भोसले गेल्या.
'ती आशा भोसले' असा उल्लेख करायची अजिबात इच्छा नाही.
लता, मुकेश, रफी, किशोर, आशा -
असंख्य आयुष्ये घडवणारी नावे. रंजक होऊ शकतील असे अजिबात न वाटणाऱ्यांची आयुष्ये रंजक बनवणारी नांवे. त्यातील शेवटचा दुवा निखळला.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक असा दुवा निवर्तलेला आहे जो आपल्याला आता 'चला आता नवीन पिढीशी जोडून घेऊ' असे सुचवतो.
श्रद्धांजली!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा दुवा आहे अजून आपल्या
शेवटचा दुवा आहे अजून आपल्या पिढीचा सुमनताई, असं मनात आलं. त्यांनीही अल्प का होईना अवीट गोडीची गाणी दिली आहेत. अर्थात त्यांची गाणी येत नाहीत आता. वर Abuva यांनी आठवण काढली आहेच त्यांची.
बाकी लता गेली तेव्हाही सुन्न आणि आता आशासाठीही सुन्न
.
ह्यांच्या बंधूंची पत्रकार
ह्यांच्या बंधूंची पत्रकार परिषद बघितली. ते प्रकृती ठीक नसल्याने अंत्य विधीला जाऊ शकले नाहीत, हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले..
जाऊद्या हो.. ९४, ९१, ८८ ही
जाऊद्या हो.. ९४, ९१, ८८ ही वये आहेत तिघा भावंडांची. उन्हात प्रवास करुन मुम्बैला यायला नसेल जमले. उषा मंगेशकरही अगदी शेवटी आली. तीही खुप थकलीय. लताच्या वेळेस चारही भावंडे हजर होती असे आठवतेय.
काल टीव्हीवर ह्रदयनाथ मंगेशकर
काल टीव्हीवर ह्रदयनाथ मंगेशकर दिसले होते ते पत्रकार परीषदेसाठी का? व्हीलचेअर बाऊंड होते ना? खूप खंगलेले वाटले. सगऴी भावंडं अतिवृद्ध कॅटेगरीत आहेत. या वयात मानसिक फॅकल्टी ठीक आहेत हेच खूप. बऱ्याच घरांत तर एवढ्या वृद्ध/आजारी भावंडांना बातमीही वेळकाळ बघून सांगतात.
मलता दिदींच्या नावे आशियातले
लता दिदींच्या नावे आशियातले सगळ्या मोठे रुग्णालय बांधणार आहेत.
१६ एप्रिलला पुण्यात त्याचा मोठा भूमिपूजन समारोह आयोजित केला होता ज्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक लोक येणार आहेत. "आशा ताई गेल्यावर हा कार्यक्रम पुढे ढकलावा किंवा कसे यावर विचार करून लता दीदी आधी आपले कर्तव्य करावे सांगत म्हणुन दुःख बाजुला ठेवून तो कार्यक्रम पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आणि रुग्णालायचे नाव आता लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असेल" असे हृदयनाथ यांनी सांगितले. पत्रकार परिषद याबाबत होती. कार्यक्रमाला सगळ्यांनी पांढरे कपडे घालुन येण्याचे आवाहन केले आहे.
हो इथे वाचले आणि म्हणुन शोधुन
हो इथे वाचले आणि म्हणुन शोधुन ती बातमी पाहिली. मी त्यांना
लता गेल्यानंतर पहिल्यांदा पाहिले. खुपच खंगलेत. उषा मण्गेशकरही आधार घेऊन चालत होती. मीना खडीकरांना पाहिले नाही पण त्याही व्हिलचेअरवर होत्या म्हणुन वाचलेय.
लता गेल्यावर आम्हा सगळ्यांचा आधारवड गेला अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले होते. आशाने रेडिओवरच्या एका मुलाखतीत हृदयनाथला मी लहानपणी सतत कमरेवर घेऊन फिरलेय, मुलासारखे वाढवले आणि पोटच्या मुलापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम केले म्हणुन सांगितले होते.
त्यांची आजची तब्येत पाहता त्यांनी लताचे जाणे खुप मनाला लाऊन घेतले असे वाटते आणि आता आशा. त्या परिस्थितीतल्यआ माणसालाच कळणार त्याच्यावर कसला प्रसंग आलाय ते.
हॉस्पिटल बांधताहेत ही चांगली बातमी आहे. गरिब रुग्णांसाठी मोफत किंवा कमी खर्चात उपचार मिळाले तर लोक दुवा देतील.
अठरा तारखेपासुन विविधभारती संगित सरितामध्ये आशा, आर्डी व गुलजार त्यांच्या गाण्यांची चर्चा करणार आहेत. रोज सकाळी व संध्याकाळी ६.४५ ला हा कार्यक्रम असणार आहे. चाहत्यांनी जरुर ऐका.
माझेमन चे पटण्यासारखे असले
माझेमन चे पटण्यासारखे असले तरी ती बातमी वाचल्यावर माझ्याही मनात लंपन प्रमाणेच विचार आले. हृदयनाथ माणूस म्हणून न आवडणे, गाण्यातल्या एवरेस्टने संगीतासाठी काही न करता दुसरे हॉस्पिटलं बांधणे हे माझ्या मेंदुला न झेपणे हे ही कारण असेल असं वाटायचे. असो. ज्याचं त्याला.
काल एकामागुन एक आशाच्या मुलाखतींचे तुकडे, क्लिप्स बघत होतो. कोणी नव्वदीत किती रसरशीत जिवंत असावं! डोळ्यात पाणी नाही तर चेहर्यावर हसुच येतं आशाला बघितलं की!
पाच वर्षापूर्वी सुधीर गाडगीळ
पाच वर्षापूर्वी सुधीर गाडगीळ ह्यांनी दीनानाथ पार्ले ला घेतलेली मुलाखत दोन भागात यू ट्यूब वर आहे, बघितली नसेल त्यांनी नक्की बघा खूप छान आहे.
काल एकामागुन एक आशाच्या मुलाखतींचे तुकडे, क्लिप्स बघत होतो. कोणी नव्वदीत किती रसरशीत जिवंत असावं! डोळ्यात पाणी नाही तर चेहर्यावर हसुच येतं आशाला बघितलं की! Happy >> मी पण तेच करतेय. पण वर लिहिलेल्या मुलाखतीचा शेवट बघताना पाणी आलं डोळ्यात.
काल एकामागुन एक आशाच्या
काल एकामागुन एक आशाच्या मुलाखतींचे तुकडे, क्लिप्स बघत होतो >>> मी ही तेच करतेय आणि सोबत गाणी ऐकते आहे. काल मराठी गाणी ऐकत होते, आज हिंदी.
जिथे साधे गार-गरम पाणी प्यायले तरी आवाजावर फरक पडू शकतो त्यात इतकी वर्षे करिअर करणे खायचे काम नाही.
आज माझी मुलगी तिची आजी तरुण असताना निर्माण झालेली गाणी तेवढाच इंटरेस्ट घेऊन ऐकते, गुणगुणते यालाच कालजयी म्हणावं का?
पुण्यात 24 एप्रिल ला मोठा
पुण्यात 24 एप्रिल ला मोठा कार्यक्रम आहे गणेश कला क्रीडाला. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बहुदा. तो तीन एक तासांचा नक्कीच असेल. तिकडे हृदयनाथ असणार आहे उपस्थित म्हणजे अशी सकाळला बातमी होती, आशा जायच्या आदल्या दिवशी. तो बहुदा रद्द करतील आता.
सध्या आशा च्या मुलाखती ऐकणे चालू आहे. खरेच एकदम जिंदादिल. सुधीर गाडगीळ आणि ती म्हणजे तर बेस्ट च.
ममो, पार्ल्याची मुलाखत आत्ता
ममो, पार्ल्याची मुलाखत आत्ता परत बघितली. ८५ वर्षाची आशा किती स्टॅमिनाने बोलते. उत्स्फुर्त सुरेल गाते. सुस्पष्ट विचार मांडते. शार्प आठवणी, शार्प मेमरी, जादुई आहे ती!
परत जन्म मिळाला तर आशा बनयला आवडेल का? प्रश्नाला हो तर म्हणतेच, पण पुन्हा आशा झाले तर शिक्षण घेईन. ते मला नाही मिळाळं म्हणते. मला या जन्मात परदेशात पोहोचता नाही आलं, तिकडच्या संगीतात काही करता नाही आलं. हे ती बोलते. मला खरंच गदगदून आलं.
आशा भोसले यांच्या मुलाखती
आशा भोसले यांच्या मुलाखती ऐकते आहे. सिम्प्ली सुपर्ब! व्हॉट अ लव्हेबल पर्सनॅलिटी.
कुणी मला अंडी टोमॅटो फेकून
मला आशाची व्हाईब नेहमी अप्रोचेबल, हसरी, खेळकर वाटली आहे. आशा गुणदोषासगट आपली वाटावी अशी होती. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. गाणी तर काय, नेहमी हसऱ्या खेळकर नायिकांना हिचीच गाणी असायची. हिने नाही गायचं तर कोण गायचं असं वाटावं इतका तो तारुण्याचा सळसळता उत्साह!
काल छोट्याशा क्लिपमधे पाहिले. सोळाव्या वर्षी घरची नाराजी स्विकारून दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न केले. नंतर तीन लेकरं घेऊन वाळीत टाकणाऱ्या माहेरी परतावं लागलं. मग पडेल ती गाणी गावी लागली, सुरवातीला कॅब्रे किंवा उडत्या चालीची, खास करून त्या काळात मान नसणारी गाणी गावी लागली. तीन मुले पदरी असल्यावर किती कठीण गेले असेल सगळं. मग उडे जब जब जुल्फें तेरी गाण्यानंतर करियरची दिशा बदलली व हिरोईनची गाणी व प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.
आम्ही शाळा, कॉलेज मधे असताना तिच्या साड्या, तिचा गजरा, तिची टिकली, तिच्या मोठ्या मोत्यांचे नेकलेसेस घातलेले तिचे अल्बम "जानम समझा करो" वगैरे आले. मला तेव्हा ॲक्चुअली ती फेअरी गॉडमदर सारखी वाटली. आपल्या फेअरी गॉडमदर व्हर्जन सारखी.
कुणी तिला "सुंदर नाही" म्हटलं तरी मला ती सुंदरच वाटायची. अजूनही वाटते. इतकी प्रसन्न व इतकी सकारात्मक व्यक्ती फक्त सुंदर असू शकते. ती इतका आनंद घ्यायची या सगळ्या प्रक्रियेचा की तो ऐकणाऱ्यांपर्यंत झिरपायचा. मधे कसलं किल्मिष उरायचंच नाही - यासाठी मला तिचं गाणं आणि पर्सनॅलिटी दोन्ही फार, फार आवडलं आहे. फार, फार कमी लोकांना पाहून वाटतं की ते हेच करण्यासाठी जन्माला आले आहेत, इतकं ते सहज, सुंदर असतं. मुझे नौलखा मंगा दे रे ओ सैंया दिवाने, ले गयी - ले गयी, तनहा तनहा, अभि ना जाओ छोडकर, राधा कैसे ना जले , इन आंखोंकी मस्ती के, आईये मेहरबान, ये है रेशमी जुल्फों का अंधेरा, जाईये आप कहां जायेंगे, झुमका गिरा रे, निगाहें मिलाने को, मेरा कुछ सामान..... ...... किती व्हर्साटाईल असावं माणसानं! अंगावर शहाराच आला तिच्या अंत्यसंस्काराच्या क्लिप्स बघताना.
जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं - अगदी.
स्मृतींना वंदन /\
आशा आणि लता दोन हिमालय.
आशा आणि लता , दोन हिमालय.
सतत दोघी बहिणींची तुलना होणं अपरिहार्य होऊन बसले आहे >> खरंतर गरज नाही. पण बहुसंख्य लोक, ‘आशा आवडते‘ सांगताना उगाच लताला मधे का आणतात कळत नाही.
पटलं सुनिधी.
पटलं सुनिधी.
>>खरंतर गरज नाही. पण बहुसंख्य
>>खरंतर गरज नाही. पण बहुसंख्य लोक, ‘आशा आवडते‘ सांगताना उगाच लताला मधे का आणतात कळत नाही.<< +१
अॅब्सोलुटली! अनॅलजी द्यायचीच झाली तर गावसकरची तुलना ब्रॅडमन बरोबर व्हायची, तेंडल्याची तुलना गावसकर बरोबर व्हायची पण अशी तुलना होउच शकत नाहि. आणि जे अशी तुलना किंवा बेंचमार्क चर्चेत आणतात त्यांच्याबद्धल मला सहानुभुती आहे...
asha2.pdf (1.11 MB)asha3.pdf
(No subject)
.
मला आशाचा 'ऋतु हिरवा' अल्बम
मला आशाचा 'ऋतु हिरवा' अल्बम फार आवडतो.
बेफी -जी बरेच दिवसांनंतर
बेफी -जी बरेच दिवसांनंतर तुमचे लेखन नजरेस पडले, "आशा ताई " बद्दल अगदी मनातलं लिहिलं आहे ! __/\__
Pages