मी अरू बोलतोय...

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 June, 2009 - 14:26

"तुला सांगतो अरू, ही बिग माणसं असतात ना, त्यांच काही टॄ नस्त बघ." शुभम त्याचे इवलेशे डोळे मोठे-मोठे करत बोलला.
"म्हंजे काय रे शुभम ?" मीही एकदम त्याच्या जवळ सरकून विचारलं. आम्ही दोघंही आमच्या सिक्रेट जागेत खेळत होतो. शुभमची ’ए’ विंग आणि माझी ’बी’ विंग. दोन्ही विंगच्या मध्ये एक स्मॉल लेन होती आणि पुढे मोठा स्क्वेअर होता. आम्ही दोघे तिथेच खेळतो.
"अरे मम्मी मला नेहमी टॄ बोल.. टॄ बोल.. असं सांगते. पप्पा म्हणतात, टॄ बोललं की स्वीटस मिळतात." शुभम त्याच्या मम्मी पप्पाबद्दल नेहमी मला काही ना काही सांगत असतो.
"मग नाही दिले तुला मम्मी पप्पाने स्वीटस ? " मी विचारलं.
"तसं नाही रे. मॉर्निंगला मम्मीने मला विचारलं... ओरडून विचारलं... शुभम, हा पॉटमधला प्लान्ट कोणी काढला ?... मग मी तिला टॄ सांगितलं. मी काढला. तसं तिने मला स्लॅप केलं आणि पप्पाला पण कंप्लेट केली." शुभमने त्याचा चिक मला दाखवला.
"लागलं काय रे तुला ?" मी त्याच्या चिकला हात लावला.
"थोडसं. मी लिटल लिटल विप केलं. पण मी ना वन थिंग ठरवली. आता मी कधी मम्मीला टॄ नाही सांगणार. तू पण सांगू नकोस." त्याने मला ऑर्डर दिली.
"नाही सांगणार." मी शुभमच नेहमी ऐकतो. मम्मी म्हणते मोठ्यांचं ऐकावं. तो फोर्थ स्टॅडर्डला आहे आणि मी थर्डला. तो एक स्टँडर्ड मोठा आहे ना !
"गॉड प्रॉमिस कर." शुभमने गळ्याला हात लावला. मग मीही लावला.
"गॉड प्रॉमिस. पण तू मम्मीचा प्लांन्ट का काढला रे ?" मला कळायला नको त्याने तसं का केलं ते.
"अरे, मी त्या प्लांटला लव केलं तर त्या प्लांटचे काटे लागले ना मला. मला नाही आवडलं ते. हर्ट झालं ना माझ्या फिंगरला. मग मी तो प्लांटच काढून टाकला." शुभमला अगेन एन्ग्री झाला मला सांगताना. मला वाटल तो आता एन्ग्रीली बाकी प्लांटपण काढणार. शुभम एन्ग्री आला की खुप खुप एन्ग्री होतो.
"पण माझी मम्मी सांगते की इवनिंगला प्लांटला हात नाही लावायचा. तो त्यांचा स्लिपिंग टाईम असतो. तू त्याची स्लिप डिस्टर्ब केली ना म्हणून त्याने तुला काटे लावले असणार." मी हुशार आहे आणि मला प्लांटसबद्दल नॉलेज आहे हे शुभमला कळलं.
"म्हणून काय झाल ? मला मम्मी कधी स्लिपमध्ये टच करते, पप्पी करते तेव्हा मी नाही मारत तिला. आप्ल्याला जर कोणामुळे त्रास झाला तर त्याला मारायचं. माहीत आहे का तुला ? " शुभम पुन्हा डोळे मोठे करत सांगितलं.
"मारायचं म्हणजे किल करायचं ? " मी घाबरून त्याला विचारलं. मला वाटतं माझे डोळे पण तेव्हा मोठे झालेले.
"एक्जाक्टली तसं नाही रे. पण मी जेव्हा पप्पांना बोललो की ऋग्वेद... तुला ऋग्वेद माहीत आहे का ?" मी 'नाही’ म्हणालो नाही. पण माझी मान हलवली. त्याला माझं 'नाही’ कळलं.
"मी तुला दाखवीन. ही इज वेरी बॅड बॉय. मी जेव्हा पप्पांना बोललो की ऋग्वेद मला त्रास देतो, तेव्हा पप्पा बोलले, 'त्याने त्रास दिला की तू त्याला मार. गर्ल्ससारखा मुळूमुळू रडू नको." शुभम पुन्हा आपल्या पप्पांबद्दल सांगायला लागला.
"मग तू मारलं ऋग्वेदला ? " मी त्याला क्विकली विचारलं.
"मग. पप्पा बोलले ना. मी मारलं त्याला. ती माझी स्टीलची स्केल आहे ना. त्याने मारलं. तुला माहीत आहे, त्याच्या हातातून ब्लड पण आलं."
"मग ? "
"मग काय, मला टिचरने पनिश केलं आणि मम्मी पप्पांना वोलवायला सांगितलं. मी पप्पांना सांगितलं. पण पप्पांनी टिचरसमोर माझाच इअर.. अस्सा पकडला आणि ओरडले. तेव्हा खुप हर्ट झालं होत." मला आता शुभम खुप्खुप ग्रेट वाटला. पण त्याचे मम्मी पप्पा नाय आवडले. ह्या बिग लोकांच काहीच टॄ नसते. मला जेव्हा संकेतने मारलं तेव्हा मी मम्मीला बोललो. मम्मी बोलली, टिचरला कंप्लेट करायची. पण टिचर संकेतला मारतच नाय. फक्त 'डोन्ट डु दिस अगेन’ बोलते. पण तो मला परत मारतो. मी आता संकेतला मारणार. शुभमसारखा. बिग माणसांच काहीच टॄ नसते.

"मावशी, मला भुक लागलीय."
"काय खाणार आमचा अरूबाबा ? "
"मावशी मॅगी बनवना."
"बस इथे आणि बघ कशी मस्त मॅगी बनवते ते." मावशीने मला स्टूलवर बसवलं. मावशी आमच्याकडे सगळं काम करते. मम्मी सारखी फाईल, पेपर्स, कॉम्पुटर याच्यातच बिजी असते.
मावशीने क्विकली कॅरट आणि बीट कट केलं आणि ग्रीन पीज वॉश केलं आणि मॅगीचं पॅकेट काढलं आणि..
"आई गं " पॅकेट खाली पडलं मावशीच्या हातून. तिने तिचा हॅंड जोरात हलवला, तेव्हा फ्लोरवर दोन ऍन्ट पडल्या. तिने क्विकली त्याच्यावर लेग ठेवला आणि आणि त्याला किल केलं.
"मावशी तू त्या छोटूश्या ऍन्टला का मारलसं ? "
"चावली मेली मला. कुठेही ठेवा, पण मुंग्या येतातच." मावशीने पॅकेट हलवलं आणि अजून एक ऍन्ट किल केली. मला शुभम आठवला. तो पण तेच बोलला होता.

"संकेत, माझी पेन्सिल दे." मी संकेतला बोललो.
"नाय देत ज्जा." संकेतने मला पेन्सिल शो केली नि बोलला. मला संकेत आवडत नाय. तो मला एन्ग्री करतो.
"मी टिचरला सांगेन." मी त्याला सांगितलं. पण तो घाबरला नाय.
"जा सांग ज्जा." संकेतने मला चिडवलं आणि बाहेर रन केलं. मी पण मग रन केलं. मला बाहेर शुभम भेटला.
"अरू, कुठे धावतोस ?"
"त्या संकेतने माझी पेन्सिल घेतली. देत नाय मला." त्याला बघून मी हॅप्पी झालो. " शुभम, तू ऋग्वेदला मारलसं तसं त्याला मार ना, मग तो पेन्सिल देईल."
"मी कशाला मारू ? त्याने काय माझी पेन्सिल घेतलीय ? तू मार त्याला." शुभमने मला फाईटचा पंच दाखवला. डब्लु डब्लु एफ मध्ये असतो ना तसा. मी बघितलं, संकेत क्लासमध्ये गेला. मी त्याच्या मागे धावलो आणि त्याला एक मोठा पंच केला. त्याच्या बॅकवर. तो पडला आणि स्नेहा जोरात हसली. मी त्याच्या बॅकवर बसलो आणि पेन्सिल घेतली. सगळे मला बघत होते.
"अगेन माझी कधी पेन्सिल घेतली तर मी खुप मारणार." मी संकेतला बोललो आणि उठलो. शुभम दरवाज्यात उभा होता. मी बघितलं. तेव्हा तो स्माईल करत होता.

"मम्मी, तू खुप खुप इट नको करू." मी डिनरला मम्मीला स्ट्रेट सांगितलं.
"का रे ? काय झाल ? "
"तुझं स्टमक बघ कसं मोठ झालं ? तू कित्ती फॅट दिसते. मला नाय आवडत."
"बरं मी नाय जेवणार जास्त. मग तर झालं."
"हां. मग तू हॅना मोन्टानासारखी दिसणार."
"ही मोन्टाना कोण रे ? तुमची नवीन मॅथ टिचर ? " मम्मीने विचारलं. मम्मी पण ना .. तिला काहीच माहीत नसतं.
"मम्मी, ती पॉपस्टार आहे. सिंगिंग करते."
"रिअली. सॉरी अरू, मला माहीत नव्हतं रे बेटा."
"पप्पा, उद्या आपण बीचला जायचं."
"अरे, उद्या विजूमावशी येणार आहे."
"कधी येणार ?"
"इवनिंगला."
"वाव. मज्जा."

"अरू, तुझी मम्मी तुझ्यासाठी आता एक छोटसं खेळणं आणणार आहे." विजुमावशीने मला हळूच सांगितलं.
"मम्मीने मला का नाही सांगितलं ? कधी आणणार आहे मम्मी ? " मी खुप एक्साईट झालो. मला गिफ्ट मिळणार असलं की मी खुप एक्साईट होतो. मला टॉयज खुप खुप आवडतात.
"त्याला अजून चार महिने आहेत." मावशी हळूच मला बोलली. माझ्या कानात. मम्मीने ऐकू नये म्हणून.
"मावशी, चार मैने म्हणजे ? " मी पण मावशीच्या कानात विचारलं. मला आवडतं तसं बोलायला. स्लो.. स्लो... मज्जा येते.
"चार महिने म्हणजे फोर मंथस." मावशीने परत माझ्या कानात सांगितलं.

माझ्याकडे छान छान कार्स, वॉकीग रोबोज आणि व्हिडीयो गेम्स आहेत. मम्मीने मला माझ्या बर्थडेला स्मॉल लॅप्टॉप गेम प्रॉमिस केला होता. पण आणला नाही. तिच्याकडे मनी नव्हते तेव्हा. तिने पप्पांसाठी शॉपिंग केलं तेव्हा सगळे मनी संपले. आता तोच आणणार असेल. फोर मंथस ती पैसे जमा करेल. मग आणेल. मम्मीला मला सरप्राइज द्यायचं असणार. पण मावशीने तिचं सिक्रेट फोडलं. पण मी मम्मीला सांगणारचं नाही की मला तिचं सिक्रेट माहीत आहे म्हणून. माझ्या पिगी बॅंकमध्ये खुप पैसे आहेत. मला पियुआत्याने दिलेली ही बँक. त्यात ना कॉईन एका ब्लॅक बटनवर ठेवायचा आणि प्रेस करायचा. मग डोर ओपन होतो आणि एक पपी येऊन कॉईन घेऊन जातो. मला ही बॅंक खुप आवडते.
"काय रे अरू, मावशी काय सांगत होती ?" मम्मीने मावशी गेल्यावर मला विचारलं.
"ग्रॅंडपाची गंमत सांगितली तिने मला. मम्मी गॅंडपाना स्पेक्टस त्यांच्या हेडवर ठेवतात आणि सगळीकडे शोधतात. ग्रेडपा आता ओल्ड झाले ना. त्यांना काय कळतच नाय." मी मम्मीला टॄथ सांगितलच नाही. शुभम बोलला होता ना.

सॅटरडे मला खुप आवडतो आणि संडे पण. स्कुलला सुट्टी असते. अर्ली मॉर्निंग उठायचं नसतं. मी नाईन ओ क्लॉकला उठतो. मग बाथ, ब्रेकफास्ट आणि मग शुभम आणि मी खुप खेळतो. आम्ही आकाशला घेत नाय खेळायला. तो चिटर आहे. दिपक इज ओ.के. तो सगळ्या गेममध्ये हरतो. काल दुर्वा आली होती गेम खेळायला. तिच्या अंकलचं मॅरेज आहे. दुर्वा बोलली ’मस्त पोरगी आहे" मग तिने दोन्ही हॅंड साईडला केल आणि मग अगेन बोलली, ’मस्त पोरगी आहे... अश्शी.’ मला माहीत आहे, फॅट लोकांना असं बोलतात. आता मम्मीला बोलत असणार. ती पण आता फॅट आहे ना !

सॅटर्डे इवनिंगला मी टॉम एन जेरी मुवी बघितला. आय लव्ह टॉम एन जेरी. पण टॉम सारखा जेरीला मारत असतो. मग जेरी पण त्याला मारतो.
"मम्मी, टॉम जेरीला का मारतो ?" मला माहीत असलं पाहीजे. मग मला सगळे स्कॉलर बोलणार.
"अरे, जेरी त्याला सारखा डिस्टर्ब करतो ना, म्हणून टॉम त्याला मारतो." मम्मीने तिच्या फाईलमधून माझ्याकडे बघितलं आणि तिचे स्पेक्टस खाली केले आणि बोलली.
"आणि बेन टेन एलियंसना का मारतो ?" मी खुप खुप क्वेश्चन्स विचारतो. टिचर सांगतात, खुप खुप क्वेश्चन्स विचारणारे चिल्ड्रनस स्कोलर असतात.
"अरे, एलियंस लोकांना मारतात, त्रास देतात म्हणून तो त्यांना मारतो." मम्मीने परत स्पेक्टसवरून बघितलं. मम्मी तशी बघते तेव्हा मला गंमत वाटते. ती जरा फन्नी दिसते.
"हे बघ अरू, मला हा प्रोजेक्ट कंप्लिट करायचाय, तेव्हा तू आता प्रश्न नको विचारत बसू. लिंक तुटते माझी. ओ.के." मम्मी परत फाईल बघायला लागली.
"ओ.के. मम्मी." बिग माणसांच काही खरं नसते. ते क्वेशन्स विचारायला सांगतात आणि विचारू नको असं पण सांगतात. मी शुभमला सांगणार सगळं.

"शुभम, कोथळा म्हणजे काय रे ? "
"तुला कोथळा नाही माहीत. अरू, तू पण ना एक नंबरचा येडचाप आहेस." शुभमला एखादी गोष्ट माहीत असली तर तो दुसर्‍यांना येडचाप बोलतो. काल दिपकला पण बोलला.
" कोथळा म्हणजे स्टमक"
"पण स्टमक म्हणजे पोट ना ? " माझ्याकडे दुसरा क्वेश्चन तयार होता.
"तुला किंग शिवाजी माहीत आहे."
"हां. आमच्या घरी त्यांचा स्टॅच्चु आहे."
"ते स्टमकला कोथळा म्हणायचे." शुभमने मला छातीवर हात ठेवून सांगितलं.
"तुला कुणी सांगितलं ? "
"आम्ही लास्ट विक एक मराठी मुव्ही बघितला. त्यात किंग शिवाजी होते. त्यांनी एका दाढीवाल्या माणसाला पोटात मारलं आणि किल केलं. तेव्हा पप्पा बोल्ले, महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. तुला माहीत आहे, किग शिवाजींची डेथ होऊन ३०० इअर्स झालेत. पण माझ्या पप्पांना त्यांची लॅग्वेज माहीत आहे."
"शुभम तुझे पप्पा ग्रेट आहेत रे."
"पण तू का विचारलंस ? " शुभमने मला जवळ येऊन सिक्रेटली विचारलं.
"काल पप्पा ऑफिसमधून आले तेव्हा फार ऍंग्री होते. मम्मीने विचारलं तेव्हा बोलले,’ एक दिवस मी त्या व्हीपीचा कोथळाच बाहेर काढणार आहे. त्याच्यामुळे माझी युएस ट्रिप कॅंसल झाली. इट वॉज गोल्डन चान्स टु प्रुव मायसेल्फ."
"म्हणजे तुझे पप्पा त्याला किल करणार ? " शुभमचे डोळे खुप मोठे झाले.
"मला नाही माहीत. पण मम्मी म्हणाली त्यांना एकदा, ’त्याला गरजच काय असा उठसुठ तुम्हाला त्रास द्यायची ?’ कोणी त्रास दिला की त्याला मारायचं असते ना ?"
"हो. मग."
"मला वाटते पप्पा मारणार त्यांना." शुभमचं कसं सगळं बरोबर असते. पप्पा पण शुभमसारखं बोलतात.

मम्मी आता खुपच फनी दिसते. तिचा कोथळा खुप वाढलाय. ती आता थर्ड फ्लोरच्या डॉगवाल्या आंटीसारखी फॅट दिसते. ती आता सगळं काम स्लो स्लो करते. सारखी ओरडत राहते. पप्पा तिला सारखं कुल राहायला सांगतात. मग ’तुझं कार्ट खुप त्रास देते रे.’ अस्सं बोलते.

मी शुभमला मम्मीच्या स्टमक बद्दल बोललो. त्याच्या कानात. दिपकने ऐकलं तर त्याच्या मम्मीला सांगेल ना ? मम्मी सांगते, आपण आप्ल्या घरातलं कोणाला सांगायचं नाय.
"अरे म्हणजे तुझ्या मम्मीच्या स्टमकमध्ये बेबी आहे." शुभम त्याच्या मोठ्या डोळ्यांनी बोलला.
"नाय. कुणाच्या स्टमकमध्ये बेबी असते का ? तू कायपण बोलतो ?" शुभमपण येडचाप आहे.
"अरे असते. बेबीज मम्मीलोकांच्या स्टमकमध्ये असतात. मग ते स्टमक मोठं झालं ना की कट करतात आणि बेबी बाहेर काढतात."
"शुभम, तुला कोणी सांगितलं ?" मला तो काय बोलतो ते टॄ वाटतच नव्हतं.
"मी डिस्कवरी चॅनलवर पाहील ते."
"मी पण आज डिस्कवरी चॅनल बघणार." शुभम रियली ग्रेट आहे. त्याला कसं सगळं आधीच माहीत असतं.

"मम्मी, तुझ्या स्टमकमध्ये बेबी आहे ? " मी मम्मीला डायरेक्ट विचारलं.
"तुला कोणी सांगितलं रे सोन्या ? " मम्मी कधीच क्वेशन्ला नीट ऍन्सर देत नाय. परत क्वेश्चन विचारते.
"तू क्वेश्चन नको विचारू. सांग ना."
"हो रे आहे." मम्मीने थोडं थिंक केलं आणि बोलली.
"आं....मम्मी तू कुणाची बेबी इट केली ? " मी घाबरलो मम्मी बोलली तेव्हा.
"अरे वेड्या इट नाही केली. बाप्पाने त्यांच्या कडची बेबी माझ्या पोटात ठेवली." मम्मीने माझा गालगुच्चा घेतला. मला नाही आवडत असं कोणी गाल धरले तर. गाल धरून ओढतात आणि गालगुच्चा म्हणतात. मला नाही आवडत.
"म्हंजे तुझं स्टमक कट करणार बेबी काढताना ?" मी तिच्या स्टमकला हात लावला.
"नाही रे. ते डॉक्टर अंकल आहेत ना त्यांच्याकडे मॅजिक आहे. ते माझ्या स्टमकला मॅजिक करणार आणि मग बेबी येणार. आता तुझे क्वेश्चनस बस झाले. तू खेळ. मला आराम करायचा आहे." असं म्हणून मम्मीने मला थोडं पुश केलं.
मी मग माझ्या रुममध्ये गेलो आणि डिस्कवरी चॅनल लावलं. एक लायन एका डिअरच्या पाठी धावत होता. त्याने जंप केलं आणि मग डिअरला पकडलं आणि त्याला इट केलं. मी आता हे शुभमला सांगणार.

"अरू, चल बस झाल. तो टिव्ही बंद कर आणि झोप पाहू." पप्पाने मला डिस्टर्ब केलं.
"बट पप्पा, हा मुव्ही छान आहे. याच्यात खुप खुप फाईट आहे. मला बघायचाय." मी पप्पाला बोललो.
"अरू, सकाळी स्कुलला जायचयं. तुला उठवायलाच किती वेळ जातो." पप्पा डेली हेच बोलतात.
"बट पप्पा.... "
"नो वे अरू." पप्पांनी टिव्ही आणि लाईट ऑफ केला. मी पप्पांवर खुप ऍंग्री झालो तेव्हा. मला आवडत नाही पप्पा मग. ते ऑलवेज मी फाईटचा मुव्ही बघताना मला डिस्टर्ब करतात. पॉवर रेंजर पण कधी कधी बघायला देत नाय.

"शुभम, पप्पांनी मला मुव्ही बघूच दिला नाय काल."
"मग तू डोर लॉक करून का बघत नाही ?"
"मी वन्स तसं केलेलं. पण पप्पाला तरी कळलं. मग त्यांनी सांगितलं, नेक्स्ट टाईम असं केलं तर केबल बंद करणार. म्हणून मी तसं नाही केलं."
"अरू, तुझे पप्पा एकदम बॅड आहे रे."
"नाय रे, तसे गुड गुड आहेत. पण कधी कधी बॅड होतात. एकदा बॅड झाले की खुप बॅड होतात."

"का मारलसं तू संकेतला ?" पप्पांनी मला स्ट्रिक्टली विचारलं.
"तो मला मारतो. स्टडी करताना डिस्टर्ब करतो." मी त्यांच्याकडे बघत त्यांना टृ ऍन्सर दिलं.
"तुला टिचरला कंप्लेंट करता येत नाही ? " पप्पांनी मम्मीसारखं विचारलं.
"नाही. मी नाही करणार. तो मला मारतो. मी त्याला मारलं. टिचर त्याला पनिशपण करत नाही. शुभमला मात्र त्याच्या टिचर पनिश करतात. म्हणून मग मीच त्याला पनिश केलं." मी एकदम एन्ग्री झालो. माझे आईज मोठे झाले हे मला कळलं.
"अरू, शहाणपणा नकोय. पनिश करायचं म्हणजे तू कुणाचही डोकं फोडणार ? तीन टाके पडलेत त्या संकेतला. माहीत आहेत का तुला ? एकतर इथे तुझ्या मम्मीची पोजिशन अशी. कधी काय होईल सांगता येत नाही. आणि त्यात तुझ्या या अशा भानगडी. नाऊ गो टू युवर रुम." पप्पा ओरडले. बट मी हॅप्पी होतो. आता संकेत मला मारणार नाही आणि कोणीच मला मारणार नाही. मी अजून शुभमला बोललोच नाही ही गंमत. तोपण हॅप्पी होईल. आज तो आलाच नाही.

"काय झालं मावशी ? तुम्ही कशाला विपींग करताय ?"
"काही नाही रे." मावशीने पटकन त्याचे आईज त्यांच्या साडीने पुसले. मम्मी एप्रनला हात पुसते तसं. त्यांना विपींग करताना बघून मला खुप सॅड वाटलं.
"मावशी तुम्ही विपींग करू नका." मी बोललो मावशीला.
"नाही रे सोन्या, मी नाही रडणार." मावशीने माझी पप्पी घेतली.
"गॉड प्रॉमिस." मी मावशीच्या गळ्याला हात लावला.
"गॉड प्रॉमिस रे बाळा." मावशीने मला जवळ घेतल आणि माझ्या हेअरमध्ये एक ड्रोप पडला. मावशीपण लायर आहे. गॉड प्रॉमिस केलं आणि परत विप करते. या बिग माणसांचं काही टृ नस्ते.

मी माझ्या कॉम्पुटरवर रोड रॅश खेळत होतो. मम्मी बेडरूममध्ये झोपली होती. सडनली तिने जोरात शाऊट करायला सुरुवात केली. मी तिच्याकडे धावलो. ती स्टमक पकडून जोरजोराने शाऊट करत होती. तिचं स्टमक आता खुप मोठं झालं होतं. पप्पा पण आले.
"शेखर, वी मस्ट गो. आय कान्ट.... " मम्मीने तिचे लिपस तिच्या टिथमध्ये धरले. पप्पा किती पॅनिक दिसत होते. त्यांनी मम्मीला बोथ हॅन्डसमध्ये पिक केल. कधी कधी मला करतात तसं आणि लिफ्टकडे गेले. जाताना त्यांनी नेक्स्ट डोरच्या शुभामावशींना कॉल केलं. मावशी बाहेर आल्या आणि मम्मीला बघून ’अग्गोबाई’ म्हणाल्या. त्यांच्या बॅकला अंकल पण आले.
"शेखर, यु मुव्ह. आय विल ब्रिंग द की." त्यांनी आमच्या घरात येऊन कार की घेतली आणि स्टेपसकडे धावले. फर्स्टटाईम.... मला कोणी काही विचारलच नाही. मावशी माझ्या मागे होती. मी ’मम्मी-पप्पा’ बोललो, पण त्यांनी ऐकलच नाही.
"अरू बेटा, मम्मी तुझ्यासाठी बेबी आणायला गेली." मावशीने मला टर्न केलं आणि सांगितलं.
"मग ती स्टमक धरून रडत का गेली ? " मला नेलं नाही म्हणून मी विप करत होतो. दोन्ही आईज फुल ऑफ टिअर्स होते.
"अरे, तिच्या स्टमकमध्ये दुखत असेल." मावशी माझे डोळे तिच्या साडीने पुसत बोलली.
"बेबी दुखवते स्टमक ?" मी विचारल.
"हो रे... तिला तुझ्याकडे यायची फार घाई झाली आहे. चल, आता रडू नकोस. आपण चॉकलेट खाऊ चल." मला उचलून मावशी किचनमध्ये गेली. मला डेअरी मिल्क खुप आवडते.

नेक्स्ट डे पप्पा मला मम्मीकडे घेऊन गेले. मम्मी तेव्हा बेडवर स्लिपिंग करत होती.. तिने लाईट ब्लु कलरचा फनी फ्रोक घातला होता. मला नाही आवडला तो. मम्मीकडे किती छान छान ड्रेसेस आहेत. पप्पांनी तिला तो रेड ड्रेस आणायला पाहीजे होता. मम्मी त्याच्यात एकदम क्युट दिसते, अस पप्पा बोलतात. मला ती नेहमीच क्युट दिसते. पण आता ती एकदम पेल दिसत होती.
"ते बघ तिकडे कोण आहे ? " पप्पांनी मला क्रेडल दाखवलं. मी तिकडे गेलो. आतमध्ये एक स्मॉल बेबी स्लिप करत होती. स्मॉल आईज, स्मॉल नोज, स्मॉल माऊथ, स्मॉल हॅंडस अँड लेग. तिचा कलर पिंक होता. मला ती खुप आवडली.
"पप्पा मी घेऊ खेळायला ? "
"खेळायला ...? अरे आता नको, ती झोपलीय ना. नंतर." पप्पाने मला स्टॉप केलं आणि क्वायटली बाहेर आणलं. बाहेर ग्रॅंडपा आणि विजूमावशी होती. पियुआत्यापण होती.
"अरू..." पियुआत्या मोठ्याने ओरडली. ती मला बघितलं की नेहमी ओरडतेच. पप्पांनी तिला क्वायट केलं. हॉस्पिटलमध्ये ओरडायचं नसते, असं बोलले. पण कोणतरी मोठ्याने विप करत होतं.
"अरू... तुला आता एक बेबी सिस्टर मिळाली. आता तू दादा झालास. बेबीकडे लक्ष ठेवायचं हं. आता तू मोठा झालास." पियुआत्या बोलली.
"बेबी आली म्हणून मी मोठा झालो ? " मी पियुआत्याला विचारलं.
"हो. आता ती छोटी. लाडाची. सगळे आता तिचे खुप खुप लाड करणार." पियुआत्याने गालगुच्चा घेतला. मला नाही आवडलं. मला गालगुच्चा आवडत नाही.
"माझे लाड नाही करणार ?" मी विचारलं.
"करणार. पण आता जास्त लाड बेबीचे. ती छोटी आहे ना. तू पण तिचे लाड करायचे. करशील ना ? " मी मान हलवली. पियुआत्याला माझं 'हो’ कळलं.

मग बेबी घरी आली. मम्मी आणि पप्पा हॅप्पी होते. पण मग मम्मी खुप बिजी झाली आणि मावशीपण. सारखे सारखे सगळे बेबीच्या मागे. बेबी खुप डर्टी होती. स्लिपिंगमध्येच टॉयलेट करायची. मम्मी कंटाळायची आणि मग मावशीला बोलवायची. सगळीकडे तिच्या वाईट कलरच्या नॅपी लागल्या होत्या. आता पप्पा पण घरी आले की आधी बेबीकडे जायचे. मला नाही विचारायचे. मला फार हर्ट झालं तेव्हा. पण मी कोणाला काही बोललो नाही. मी आता मोठा झालो होतो ना. पण म्हणून काय मला ब्रशपण नाही करायचं, मला फीडपण नाही करायचं, मला युनिफॉर्मपण नाही घालायचा, मला शुजपण नाही घालायचे. सगळं माझं मीच करायचं ? यस्टर्डे मी इतका टायर्ड होऊन स्कुलमधून आलो, पण मला ब्रेकफास्टपण दिला नाही कुणी. बेबी विपींग करत होती म्हणून सगळे तिच्याच मागे रन करत होते. शेवटी मीच ब्रेडला जाम लावून खाल्ला.
बेबी खुप त्रास द्यायची मम्मीला. मम्मी काल बोलली पप्पांना.
"शेखर, तुझी पोरगी छळते बघ. मी झोपायचं म्हटलं तर ही टक्क जागी आणि माझ्या कामाच्या वेळी ही मात्र ताणून देते. अधून मधून शी शू चालूच. त्यातूनही डोळा लागलाच तर मग टाहो फोडलाच समज." मम्मी फार सॅड होती हे बोलली तेव्हा. तिच्या आईजला ब्लॅक सर्कलपण झाले त्यामुळे. पण पप्पा मात्र लाफींग करत राहीले.
"तरी मी सांगितलेलं, अरू इज इनफ. तुलाच हौस होती. हम दो हमारे दो. अ कंप्लीट स्क्वेअर. ट्रेंगल काही वाईट नव्हता."
"ऍग्री रे. वॉट कॅन वी डू नाऊ ? बट वन थिंग. अरूने त्या मानाने त्रास दिलाच नव्हता."
"वेल. आय ऍग्री फोर दॅट. नॉर्मली मुलगे जास्त त्रास देतात. पण अरू तसा नव्हता. पण हल्ली तो थोडा ऍग्रेसिव्ह होत चाललाय. इटस नॉट अ गुड साईन."

"पप्पा, मॉर्निंगला मावशीने तुमच्या पर्समधून ५०० रुपीजची नोट काढली."
"तुला कुणी सांगितलं ?" पप्पांनी लॅपटॉपवरची टिकटिक बंद करून विचारलं.
"मी पाहीलं पप्पा. माझ्या आईजनी."
"शांभवी, अरू बघ काय म्हणतोय ? शांभवी..." पप्पा किती मोठ्याने ओरडतात समटाईम.
"काय झाल ओरडायला ? काय केलसं रे अरू ?" मम्मी तिच्या ऍप्रनला हात पुसत आली.
"त्याने काही केलं नाही. तो म्हणतोय सकाळी काशीने माझ्या पर्समधून पाचशेची नोट काढली."
"व्हॉट ? सकाळी माझ्याकडेही मागितले तिने. दोन दिवसांपुर्वीच दिलेले मी तिला तीनशे रुपये. हल्ली सारखी पैसे मागत असते ती. निक्षून नाही म्हणाले मी तिला. अरू, तू स्वत: पाहीलसं ?"
"यस मम्मी."
"येऊ द्या तिला उद्या ? चोरी करण्यापर्यंत मजल गेली हिची. कामावरूनच काढून टाकते तिला." मम्मी फार एन्ग्री होती तेव्हा.

"काशी, तू यांच्या पाकीटातून काल ५०० रू. काढले ? " मम्मी एन्ग्रीली बोलली. मावशी तिचे आईज खाली करून होती. वर केलेच नाही तिने.
"काशी, काय विचारतेय मी ? उत्तर दे मला." मम्मीचा वॉईस किती हाय होता.
"जी. पण ते...." मावशीच्या आईजमध्ये वॉटर होतं.
"म्हंजे तू खरचं.... आय कान्ट बिलिव्ह दिस... इतका विश्वास होता तुझ्यावर आणि तू.... " मम्मी अपसेट झाली एकदम.
"पोरं खुप आजारी आहे मॅडम. औषधाला खुप पैसे लागतात. एकुलती एक आहे मॅडम. पैशांची खुप गरज होती" मावशीच्या आईजमधून वॉटर फ्लोरवर पडत होतं.
"काही एक सांगू नकोस. चालती हो आधी इथून. तुझ्यासारख्या चोरट्या बाईची मला काही गरज नाही." मम्मी अपसेट झाली की खुप ओरडते. ती मावशीला खुप ओरडली. मी उगाच पप्पांना टृ सांगितलं. मम्मीने मावशीला हात धरून बाहेर काढलं. मावशी खुप विप करत होती. सॉरी सॉरी होती. पण मम्मीने ऐकलं नाही.
"मॅडम, असं करू नका. पगारातून कापा. पण कामावरून काढू नका. पोरगी आजारी हाय. तिला जगवायची हाय मला. दया करा." पण मम्मीने ऐकलं नाय. मम्मी तेव्हा एकदम बॅड झाली. मी सांगणार आता शुभमला.

बेबी सारखी रडायची. मम्मी पप्पा तिला घेऊन डॉक्टर अंकलकडे गेले. ते दोघे रिटर्न आले तेव्हा दोघेही अपसेट होते. मम्मी सारखी बेबीला घेऊन बसायची. पप्पा ब्रेकफास्ट बनवायचे आणि लंच डिनर पण. पण ते टेस्टी नव्हतं. कधी कधी हॉटेलमधून मागवायचे. बेबी सारखी रडायची आणि मग मम्मी पण रडायची. पप्पा मग ऑफिसला गेले. मम्मीने मला काहीच हेल्प नाही केली. मीच ब्रश केला, बाथ घेतला, ब्रेड जाम खाल्ला. स्कुलल गेलो. मग मला रोज करायला लागलं. मला ब्रेड जामचा कंटाळा आला. सॅटर्डे संडे पण मम्मी पप्पा बेबीला घेऊन बसायचे. एकदा मावशी घरी आली. डोरच्या बाहेरून तिने मम्मीला खुप रिक्वेस्ट केली पण मम्मीने तिला घरात घेतलचं नाय. मग मीच डोर उघडला. मावशीने मला खुप खुप पप्पी केली. मम्मीने बघीतलं तेव्हा खुप ओरडली. मला पण ओरडली. बेबी तेव्हापण रडत होती.
"मॅडम, तुमच्यामुळे दोन घरांची कामं पण गेली. मेहरबानी करा मॅडम, मी कोणत्याच वस्तुला हात नाय लावणार. कामावर घ्या. मी तुमच्या पाया पडते. पोरीला दोन दिस औषध नाय दिलं. थोडं पैसे द्या मॅडम." मावशी विप करत होती आणि बेबी पण. मम्मीने मावशीला पुन्हा बाहेर नेलं. मीपण विप करू लागलो. मावशीला कॉल करू लागलो. तसं मम्मीने मला स्लॅप केलं. मला माझ्या रुममध्ये लॉक केलं आणि बेबीकडे गेली. त्या दिवशी मी खुप विप केलं. पण मम्मी आलीच नाही. ती बेबीकडेच बसली. बेबी सारखी विप करत होती.

मी शुभमला सगळं सांगितलं. मम्मी पप्पा आता छान छान नाय बोलत माझ्याशी. तो पण हर्ट झाला. तो बाप्पाला थॅंक्स बोलला.
"तू बाप्पाला थँक्स का बोलला ? " मी त्याला विचारलं.
"अरे त्याने माझ्या मम्मीला बेबी दिली नाही ना म्हणून. बेबी आली तर मग माझे मम्मी पप्पा पण असेच करतील ना ? "
"म्हंजे बेबी आली म्हणून माझे मम्मी पप्पा मला लव नाय करत."
"मग. बेबी नव्हती तेव्हा करायचे ना ?"
"हो. आता मी काय करू ?"
"तू एक काम कर. बाप्पाला सांग बेबीला घेऊन जायला."
"बाप्पा नेईल ?"
"नेईल. त्यानेच दिली ना बेबी. तू त्याला सांग असली विपींग करणारी बेबी नको. चांगली बेबी द्या. स्माईल करणारी. बेबी विपींग करते म्हणून मम्मी पप्पा तुला लव नाय करत." शुभमला सगळं माहीत असतं. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी आता बाप्पाला सांगणार बेबी घेऊन जा म्हणून.

काल मावशी परत आलेली. मम्मी तेव्हा बाथरूममध्ये होती. मी मावशीला आत घेतलं आणि मम्मीला जाऊन सांगितलं. बेबी तेव्हाच रडायला लागली. मग टेन मिनिटस मघ्ये मम्मी आली. मी कॉम्पुटरवर गेम खेळत होतो. मम्मी मावशीकडे गेली.
"मॅडम, तुमच्यामुळे माझी एकुलती एक पोर गेली. आता पोरीला जाळायला पण पैसा नाय घरात. थोडी मेहेरबानी करा. लाकडासाठी पैसं द्या. जगायला दिलं नाय तुम्ही. सुखानं मरू द्या तिला." मावशी विप करत बोलली. मी ऐकलं ते. पण मम्मी ओरडली तिला.
"तुझी नाटकं दुसरीकडे जाऊन कर. इथे नको." तेव्हाच बेबी रडायला लागली आणि मम्मी आत गेली. मी मावशीकडे आलो. मावशी खुप खुप विप करत होती. मी मम्मीला सांगायला गेलो तर मम्मी किचनमध्ये मिल्क बॉईल करत होती. बेबी खुप विप करत होती. मावशी बाहेर विप करत होती. मम्मी किचनमध्ये मिल्क बॉटल बनवत होती. मी माझ्या रुममध्ये जाऊन कॉम्पुटर बंद केला आणि रोबोमध्ये सेल घातले आणि खेळायला लागलो. मला कंटाळा आला त्या बेबीच्या आणि मावशीच्या विपचा.

आता विपींग बंद झालं. मी बाहेर आलो. मावशी गेली होती. मम्मी मिल्क बॉटल घेऊन गेली. मी अगेन रोबो घेऊन खेळत बसलो. सडनली मम्मीने जोरात शाऊट केलं.
"बेबी...."
मी मम्मीकडे गेलो. मम्मी बेबीकडे बघून विप करत होती. मम्मीला बघून मग मीपण विप करायला लागलो. तेव्हा शुभामावशी आली. तिने मम्मीचं शाऊट ऐकलेलं. त्यांनी क्विकली डॉक्टर अंकलला कॉल केला. डॉक्टर अंकल आले आणि बेबीला घेऊन गेले. शुभा मावशीने मला त्यांच्या घरी अंकलबरोबर ठेवलं. अंकलने पप्पांना फोन केला. नाईटला घरी खुपजण आलेले. विजू मावशी, ग्रॅंडपा, पियुआत्या, आजी, सगळे नेबरस. सगळे खुप विप करत होते. मी पण विप केलं. विजूमावशी मला धरून ’ आपली बेबी गेली रे अरू’ असं जोरजोरात विपींग करून सांगत होती. मी फर्स्ट टाईम पप्पांना विप करताना बघितलं. टू थ्री डेज मी स्कुलला गेलोच नाय. मम्मी पप्पा एकदम क्वायट क्वायट होते.

शुभम आणि मी आमच्या सिक्रेट प्लेसमध्ये खेळत होतो. तेव्हा एक पोलिस अंकल घरी आले. मी आणि शुभम घरी गेलो. पोलिस अंकलने मम्मीला मावशी कुठे राहते ते विचारलं. मम्मीने त्यांना ऍड्रेस सांगितला. मग खुप खुप उशीराने पोलिस अंकल व पोलिस आंटी मावशीला घेऊन आले. मी तेव्हा शुभमबरोबर खेळत होतो. मग मी घरी गेलो.
"मॅडम, मी नाय मारलं तुमच्या लेकीला. माझ्या पोरीची शपथ. काळुबाईची शपथ. मी नाय मारल. मी कशाला मारू ? " मावशी खुप मोठ्याने विप करत होती. पोलिस आंटी मावशीला ओरडत होती. मम्मी मावशीला खुप बॅड वर्डस बोलत होती. शुभा मावशीपण बोलत होती. मी सॅड झालो आणि मग परत शुभमकडे गेलो. मग पोलिस अंकल आणि पोलिस आंटी मावशीला घेऊन गेले.

शुभमला काहीच कळलं नाही.
"अरू, काय झाल तुमच्या घरी ? "
"अरे तू बोललास ना बाप्पाला सांग म्हणून. मी बाप्पाला सांगितल. मग बाप्पा घेऊन गेला बेबीला."
"म्हणून पोलिस अंकल आले होते ? "
"हां... मम्मी बोलते, मावशीने बेबीला मारलं. म्हणून पोलिस आंटी आणि अंकल मावशीला घेऊन गेले."
"बापरे ! तिने किल केलं. डेंजर आहे ना ती." शुभमने केवढे मोठे डोळे केले. मी खुप हॅप्पी होतो. आता बेबी विपींग करणार नव्हती, मम्मी पण विपींग करणार नव्हती आणि पप्पापण. आता मला परत सगळे लाड करणार. मला ब्रश करणार, बाथ घालणार, छान ब्रेकफास्ट देणार. पण मी आता शुभमसारखं ठरवलंय, आपण कुणालाच टृथ सांगायचं नाय. आपण कुणालाच नाय सांगायचं की बेबी विपींग करायची, मम्मी, पप्पा व मला त्रास द्यायची.

मी एक ट्रिक एचबीओवर एका मुव्हीमध्ये बघीतलेली. त्या मुव्हीमध्ये प खुप फाईटस होत्या. मस्त मुव्ही होता. मी तो ट्वाईस बघितला. मला त्या दिवशी विपींग बेबीचा खुप कंटाळा आला. मग मीच तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला गप्प केलं. मुव्हीत केलेलं तसं. शुभमला काहीच माहीत नाही. तो येडचाप आहे आणि मम्मी, पप्पा, पोलिस अंकल पण.

गुलमोहर: 

बापरे!!! भलतीच निघाली गोष्ट!!!

अपेक्षीत शेवट्.... गोष्ट रचली...मांडलीये छान.

>>"नेईल. त्यानेच दिली ना बेबी. तू त्याला सांग असली विपींग करणारी बेबी नको. चांगली बेबी द्या. स्माईल करणारी. " Happy
छान आहे कथा.

बाप रे, भयंकर कथा आहे. बोलतीच बंद झालिये.

काय काय विचार करत असतिल नाही लहान मुलं. आपल्याला वटत अजुन तर लहान आहेत, त्याना काय कळणार, पण ते त्यांच्या परीने अर्थ लावत असतात. त्यातुन टी. व्ही. तर दोस्त कमी आणि दुश्मन च जास्त वाटतो आजकाल.

<<मग मीच तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला गप्प केलं. मुव्हीत केलेलं तसं.>> Sad

जाम सुन्न झालय डोस्क....

बाप रे काय भयानक कथा आहे , हल्लीची मुल खुप पझेसिव्ह आहेत , आपल थोड जरी त्याच्यांकडे दुर्लक्ष झाले तरी वेगळाच विचार करतात
<<मग मीच तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला गप्प केलं. मुव्हीत केलेलं तसं.>> Sad Sad

****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निर्विघ्नं कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा ||||

कथा जबरदस्त आहे. अंगावर काटा आला. डोक सुन्न झाल वाचुन. ह्याला जबाबदारपण आपणच असतो ना?

बापरे... शेवट वेगळाच केलाय..... कल्पना केली नव्हती कथा असं वळण घेईल ते.
----------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

बापरे... शेवट वेगळाच केलाय..... कल्पना केली नव्हती कथा असं वळण घेईल ते.
----------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

एकदमच डांगेर कथा... मुलांच्या बोलण्याचा लेहेजा मस्त पकडला गेलाय... शेवट टोटली अनपेक्षित...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

असे होऊ शकते. अरे देवा...( OMG)

एकदम वेगळी कथा. मुल आणि मोठी माणसे याच्या वेगवेगळ्या भावविश्वाचे अचुक चित्रण.

बापरे! काय जबरदस्त कथा आहे! डोक सुन्न झालं..
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

कौतुक,

मला अज्जिबात नाही आवडली कथा... कसंतरीच झालं वाचून...
बेचैन झालेय वाचल्यापासून अजून बरंच वाटत नाहीये. Sad

<मला अज्जिबात नाही आवडली कथा... कसंतरीच झालं वाचून...>
मलापण....

दुसरं मूल हे आइबाबांसाठी एक चॅलेंजच असतं... पहिल्या मुलाला वाटणारी असुरक्षितता सहीसही शब्दांकित केलीये. माझा नवरा मला लहान्पणीच्या आठवणी सांगतो...तो लहानपणी अतिशय गरीब गाय होता (गरीब गाय होता... Happy ) पण पाठीवर भाऊ झाल्यावर तो खुपच आक्रमक झाला. भाऊ झाल्यापासुन तो आईच्या कुशीत कद्धीच झोपु शकला नाही याचं शल्यं अजुनही त्याला बोचतं. आजारी मुलाकडे अती लक्श देताना आपण पहील्या मुलाकडे दुर्लक्श करतोय हे बर्‍याच पालकांच्या गावीही नसते. चॅलेंजींग असलं तरी खुप महत्वाचं आहे हे... शेजारपाजारचे, आत्या मावशा आधी हे मुलाच्या मनात भरवतात की आता छोट्याचे लाद होणार, तुझे नाही, तर पहील्या मुलाला विश्वासात घेउन हे पटवुन दिले पाहीजे की छोट्याची जबाबदारी आता ते तिघं मिळून घेणारेत. छोटा त्याचा स्पर्धक नाहीय तर त्याचा आइबाबांपेक्शही जवळचा असा हक्काचा सवंगडी आहे. कौशल्य आहे पण जरूरी आहे.

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

अंदाज आला आधी, भयंकर गोष्ट आहे.. Sad काय काय विचार करतील सांगवत नाही लहान मुलं.. Sad
एक जुनी - बहुतेक जीएंची गोष्ट आठवली,, असच दहा-अकरा वर्षाच्या मुलाने आधी मित्राला अन नंतर आजीला मारलं. दुभंग व्यक्तिमत्त्वाचं मुलं असाव बहुतेक ते.. केदार्१२३ची पण अशी एक कथा आली होती.. Sad

कौतुक,
कथा म्हणून जबरदस्त आहे, पण मलाही ह्या अशा कथा नाही आवडत. खुप कसंतरी झालं वाचुन.
धनु.

मी नाय देणार प्रतिक्रिया Wink

***********************************

नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !

जरा विषय बदल्ते, पण खूप वर्षांपूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही च्या जमान्यात एक नाटक आलं होतं. सदाशीव अमरापूरकरचे , तो टेलेफोन मेकॅनीक म्हणून घरात शिरतो आणि खून करतो.
त्या नाटकानंतर खूप जणांनी टीका केली होती की अशी नाटकं दाखवू नका,
धनु.

खूप लांबलचक झाली पण चांगली आहे. लहान मुलांना समजावून साब्गावे लागते आणि TV वर काय बघावे आणि बघू नये हे पण ठरवावे. TV वर Censorship हवी आहे, जर सरकार काही करू शकत नसेल तरी रेमोते आपल्या कडे असतो याचे भान ठेवावे. Anyway, थोडी छोटी कथा खूप interesting वाटली असती.

कथा छान आहे पण शेवट भयानक!!

सुन्न झाले. कौतुक काय लिहीली आहे कथा तुम्ही... शब्दच नाहीत.
अतिउत्तम.

कथा छान आहे . पहिल्या मुलाला वाटणारी असुरक्षितता छान शब्दांकित केले आहे .पण शेवट वाचुन धक्काच बसला .....असेही होत असेल? Sad
लाजो ,ड्रिमगर्ल .. अनुमोदन !

कथा नाही आवडली- थीम मुळे नव्हे- भाशे मुळे(पोटफोडड्या श कसा लिहितात इथे?)
मराठी ही नाही आणि ईन्ग्रजीही!

मतकरीची अशी एक कथा आहे - विल्कु नाव असत बहुतेक मुलाच.

शिरिष,
पोटफोड्या ष असा लिहा = Sha

हो आणि ती मतकरींचीच गोष्ट होती, विल्कूच नाव त्यांचं.

Pages