दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!
चित्रपट अगदी दुसर्या दिवशी बघायचा असेल तरी जाण्याआधी आपण त्याचा थोडा अभ्यास करून जातो. चित्रपट कुठल्या विषयावर अन कुठल्या जॉनरचा आहे, कलाकार कोण आहेत, गाणी कशी आहेत वगैरे जुजबी माहिती घेतो. त्यासाठी ट्रेलर बघतो, youtube वर गाणी ऐकतो, सोशल मीडियावर रिव्ह्यू वाचतो. यातून चित्रपट कसा असेल याचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होते, आणि त्यातून चित्रपटाबद्दल आपल्या काही अपेक्षा निर्माण होतात.
अगदी शून्य माहिती घेऊन बहुधा एखादा वाळवीच मी बघायला गेलो असेन. आणि त्यानेही अचानक भयानक मध्ये सुखद धक्का दिला होता. पण दशावतारचा मात्र फर्स्ट टीजर जेव्हा आलेला तेव्हापासूनच याला बघायचे म्हणून शॉर्टलिस्ट केले होते. त्या टीजर मधील बॅकग्राऊंड म्युझिक प्रचंड आवडले होते. काल चित्रपट बघायला जाण्याआधी पुन्हा ट्रेलर पाहिले, एकदोन गाणी ऐकली आणि छान मूड तयार करून गेलो. पहिल्या शनिवारीच जात असल्याने रिव्ह्यू फार वाचनात आले नव्हते, पण जे काही वाचले त्यात दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यांना तश्याच ताकदीची भूमिका मिळाली तर ते काय करू शकतात याची कल्पना असल्याने त्यांना बघायची उत्सुकता दुप्पट होती.
चित्रपटाला सुरुवात झाली, प्रभावळकरांची एंट्री झाली आणि आज काही ते निराश करत नाही अशी बेअरींग त्यांनी पकडली. चुरचुरीत, हलकेफुलके आणि जगात गोड अश्या मालवणी भाषेतील संवादांसह चित्रपट पुढे सरकू लागला. मोजक्याच प्रसंगातून बापलेकाचे नाते खुलू लागले. लेकाच्या भुमिकेत सिद्धार्थ मेनन होता. दोघांतील केमिस्ट्री मस्त जुळत होती. सोबतीला कोकण होताच. कोकणातील घरे, पायवाट, मंदीर, तलाव, झाडे छान दाखवलीच, पण एका झाडाखालचा लव्हर स्पॉट फार आवडला. अरे हो, त्या भुमिकेत प्रियदर्शिनी होती. छान सुंदर दिसत होती. ईतर गावकर्यांमध्ये उठून दिसत होती. माझ्या एका मित्राला एवढ्यासाठीच तिचे कास्टींग ऑड वाटले. याऊलट मला चित्रपटातील आवडलेल्या गोष्टीत तो एक नेत्रसुखद भाग वाटला. कोणाचे काय तर कोणाचे काय
एकीकडे दशावतार म्हणजे श्वास असलेला बाप तर दुसरीकडे उतारवयात त्याचे हे असे नाटकात काम करणे त्याच्याच जीवावर उठेल याची कल्पना असलेला मुलगा. ज्याला आपल्या बापाचे हे नाटकाचे वेड माहीत असूनही त्याच्याच काळजीपोटी मनावर दगड ठेवून त्याच्या या वेडाला विरोध करावा लागतोय.
ही जर वेबसिरीज असती तर त्या बापलेकांची थोडी हसवणारी, तर थोडी हळवी करणारी द्रुश्ये मी ब्रिन्ज वॉच करत सलग अडीच-तीन तास सहज बघितली असती. पण चित्रपटात सुरुवातीच्या आर्ध्या पाऊण तासात ही पार्श्वभूमी तयार करून नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आणि तासाभरातच ईंटरव्हल झाला. ईथून पुढे जंगलाची/पर्यावरणाची रक्षा आणि त्याच्या जीवावर उठलेल्याविरुद्ध बदल्याचा खेळ सुरू होणार हे समजले.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच राखणदार म्हणून एक जंगली श्वापद दाखवले आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाची आठवण आल्यावाचून राहत नाही. मला कांतारा बिलकुल आवडला नव्हता म्हणून चटकन आठवण आली. तुम्ही ती काढू नका आणि काढली तरी कॉपीचा शिक्का मारू नका. कारण राखणदार ही कोकणवासीयांची ओरिजिनिअल कन्सेप्ट आहे. पुढे या लढ्यात दिलीप प्रभावळकर यांना तो राखणदार मदत करतो, की तो स्वतःच चमत्कार घडवून हे काम करतो हे चित्रपटातच बघा.
या रक्तरंजित खेळात आपल्याला भगवान विष्णूची दहा रुपे म्हणजे दशावतार बघायला मिळतात. हे दशावतार म्हणजेच चित्रपटाचा हाय पॉईंट. शीर्षकात उल्लेखलेली निराशा ईथे पदरी पडली. यातले काही जमले तर काही फसले, किंवा पुरेसा प्रभाव पाडू शकले नाही असे वाटले. मराठी चित्रपटात बजेट ईश्यू असू शकतो, त्याने स्पेशल ईफेक्ट द्रुश्यात मर्यादा येऊ शकतात, पण आपल्याकडे दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा बहुरुपी बहुआयामी कसलेला कलाकार असताना अश्या प्रसंगात त्यांच्या अभिनयक्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायला हवे होते. पण त्यांचा चेहरा रंगवून, माती चिखलाने माखवून, अंधारात आणि क्लोजअपमध्ये चित्रित केलेली द्रुश्ये फार प्रभाव पाडू शकली नाही असे वाटले. हे आपण अभिनयाची मर्यादा असलेल्यांसोबत करतो असे वाटले.
चौकट राजामधील चारचौघांपेक्षा वेगळा नंदू, झपाटलेला मधील तात्या विंचू, पछाडलेलामध्ये सूड दुर्गे सूड, ते मराठी मालिकेतील गंगाधर टिपरे आणि हिंदी चित्रपट लगे रहो मुन्नाभाई मधील बापू अश्या कैक कॅरेक्टरना त्यांनी अजरामर करून सोडले आहे. हा चित्रपट संपता संपता यातील "बाबुली" या सर्वांच्या पलीकडे जाईल असे वाटले होते पण ती पुरेशी संधी त्यांना मिळाली नाही असे वाटले.
अर्थात, वयोमानानुसार फिजिकल एनर्जीबाबत त्यांच्या मर्यादा सुद्धा आता लक्षात घ्यायला हव्यात. हे वाक्य लिहितानाच गूगल केले तर ८१ वर्षे वय दाखवत आहेत त्यांचे. म्हणजे जिथे त्यांनी बापाचा रोल केला तिथे ते प्रत्यक्षात आजोबांच्या वयाचे होते. हे आधीच गूगल करून आणि ध्यानात ठेवून गेलो असतो तर कदाचित आदर अजून दुणावला असता.
चित्रपटात कोकणातील दशावतार दाखवला गेला. तो किती तंतोतंत जमला हे तिथले प्रेक्षकच सांगू शकतील. पण ज्यांच्यासाठी तो नवीन आहे त्यांना हे नव्याने माहीत पडलेले प्रकरण आवडेल असे वाटते. मी कोकणात गणपतीतील भजने पाहिली आहेत, त्यावेळचा माहोल अनुभवला आहे. त्यामुळे दशावतार तेथील लोकांसाठी किती जिव्हाळ्याचे प्रकरण असावे हे समजू शकतो.
शेवटचे पथनाट्य वाटावे असे सामाजिक संदेश देण्याचे द्रुश्य मात्र अनावश्यक आणि चित्रपटाची गंभीरता घालवणारे वाटले. पर्यावरणाच्या संरक्षणाचा जो विचार मार्मिक पद्धतीने सांगायची संधी या चित्रपटाने दिली होती ती अशी बाळबोध पद्धतीने सांगण्यात वाया घालवली असे वाटले. तो संदेश या चित्रपटाचा आत्मा होता तो अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या मनावर ठसायला हवा होता.
बॅकग्रांऊड म्युजिकबद्दल ट्रेलर बघूनच अपेक्षा फार होत्या. त्याने निराश नाही केले. ना कॅमेरा वर्क वगैरे ईतर तांत्रिक बाबींनी केले. फक्त वर उल्लेखलेली क्लोजअप द्रुश्ये यातून वगळा. उत्तरार्धात संकलन अजून चांगले होऊ शकले असते.
बापलेकाचे गाणे आवशिचो घो फार आवडले. त्यातील शब्दात चित्रपटात दाखवलेल्या बापलेकाच्या नात्याचे सार उतरले आहे. त्यामुळे चित्रपटात अजून आवडले.
रंगपूजा हे दुसरे आवडते गाणे. ते ऐकताना ज्या भावना मनात उतरतात त्या भावना चित्रपटात ज्या ज्या द्रुश्यात जाणवल्या ती द्रुश्ये आवडली.
ऋतुचक्र म्हणून जे रोमँटीक गाणे आहे त्याचा स्वानंदी सरदेसाई मुळे एक वेगळाच फॅन क्लब तयार झाला आहे.
चित्रपटात महेश मांजरेकर सुद्धा आहेत. त्यांची मध्यतरानंतर स्पेशल एंट्री आहे. त्यांना भावखाऊ भुमिका आणि संवाद दिले आहेत. त्यांची आणि प्रभावळकरांची जुगलबंदी अजून बघायला आवडली असती. ते एक कुठेतरी मिस झाले असे वाटले.
छोट्याश्या भुमिकेत भरत जाधव आहेत. आपल्या सर्वांचेच आवडते कलाकार असतील. पण यात ते नकारात्मक भुमिकेत आहेत. आता हे छान की वाईट हे तुम्हीच ठरवा. त्यांच्यासोबत सुनिल तावडे यांना मोठी भुमिका आहे हे बघून मात्र छान वाटले.
अभिनय बेर्डे देखील यात आहे हे मला आताच समजले. चित्रपटात मी त्याला ओळखलेच नाही. तसे तर नकारात्मक भुमिकेत होता, पण आधी कल्पना असती तर कदाचित लक्ष्याचा मुलगा म्हणून एक जिव्हाळा वाटला असता.
सस्पेन्स आणि थरारनाट्य असलेल्या चित्रपटात पटकथा घट्ट बांधलेली असावी आणि लूपहोल कमीत कमी असावेत अशी ढोबळमानाने अपेक्षा असते. यात त्या अनुषंगाने फार विचार केला असे वाटत नाही. त्यामुळे एखाद्याने शोधल्यास चटकन काही लूपहोल सापडतील. चित्रपट प्रेक्षकांना आवडल्यास त्यांना याचे काही घेणे देणे नसते हे ही तितकेच खरे. पण न आवडल्यास मात्र काही खरे नाही.
कोणाला कुठला चित्रपट आवडेल आणि त्यात नेमके काय आवडेल हे अगदीच वैयक्तिक असते. मला जिथे पुर्वार्ध आवडला आणि उत्तरार्धाने माझ्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत असे वाटले तिथे माझ्यासोबत पुर्वार्ध संथ वाटून उत्तरार्ध नाट्यमय म्हणून जास्त आवडणारे देखील होते.
जर तुम्हाला दोन्हीपैकी एखादे अर्ध आवडणे पुरेसे असेल तर चित्रपट थिएटरात जाऊन बघायला हरकत नाही. किंबहुना मी म्हणतो बघूनच या. म्हणजे चर्चा करता येईल. प्रत्येकाची वेगवेगळी मते वाचायला आवडतील 
धन्यवाद,
- तुमचा अभिषेक
फाविद,
फाविद,
या चित्रपटाने ब्लफ केले अशी भावना फार लोकांच्या मनात नाहीये. त्यामुळे तुम्ही म्हणता ते लगेच या चित्रपटाने तरी होणार नाही. पुढे होऊ शकते पण वारंवार झाल्यावर. मराठीत इतके मोठे बॅनर आहेत का याची कल्पना नाही जे असे चित्रपट वारंवार यावेत.
बाकी मला हा मार्ग तितका चुकीचा वाटत नाही. तुमची कला लोकांना तेव्हा आवडेल जेव्हा पहिले ती लोकांपर्यंत पोहोचेल.
मी स्वतः जरी एखाद्या थिएटरचा मालक असतो तरी मराठी चित्रपटाला तेव्हा जास्त शो दिले असते जेव्हा त्यांनी मला फायदा मिळवून दिला असता.
चित्रपटाची हवा करून तो चांगला आहे की वाईट हे लोकांना समजेपर्यंत पैसे छापा हे हिंदी चित्रपट करतातच. त्यांच्यासोबत स्पर्धेत टिकायचे असेल तर त्या मार्गाने जावे लागणारच. आणि त्या स्पर्धेत टिकाल आणि पैसे यायला सुरुवात होईल तेव्हाच जे काही चांगले चित्रपट आहेत ते बनवायला सुद्धा चार पैसे हातात शिल्लक राहतील.
हा स्लिपरी स्लोप असला तरी हाच मार्ग आहे. हा पकडून यश पक्षी चार पैसे मिळवून पुढे जाऊन केव्हा थांबायचे हे समजायला हवे. ज्यांच्यातील कलाकार जिवंत आहे त्यांना हे समजेल आणि संतुलन राखतील अशी आशा करूया.
सर
सर
दशावतार हा एक चांगला पिक्चर आहे.
मला आवडला.
मी तेच म्हटले आहे वर..
मी तेच म्हटले आहे वर..
पहिले वाक्य वाचा
Submitted by ऋन्मेऽऽष on 20
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 September, 2025 - 12:48>>>> काही प्रमाणात पटतयं... हिदी सोबतच्या तुलनेत फक्त हिंदीमधे तसं होतयं म्हणून मराठीतही खपून जाईल ही तुलना करताना मात्र दोन्ही चित्रपटसृष्टीची व्यवसाईक समिकरणं(ROI च्या संदर्भात), प्रेक्षकसंख्या, रीच यांच्यातील तफावत नक्कीच ध्यानात घ्यावी लागेल.
हल्ली काहीतरी स्पेशल आहे,
हल्ली काहीतरी स्पेशल आहे, थिएटर मटेरियल आहे अशी हवा झाली की मुंबईतील अमराठी लोकं ज्यांना मराठी समजले ते सुद्धा ग्रुपसोबत हजेरी लावतात.
तसेच मराठी लोकांमध्ये सुद्धा एक स्वताला हायफंडु समजणारा वर्ग आहे जो मराठी चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघण्याला प्राधान्य देत नाही पण एखाद्या चित्रपटाला अशी हाईप मिळाली असेल तर जाऊन बघतो आणि स्टेटस लावतो.
इतके नावाजलेले कलाकार, कोकणी
इतके नावाजलेले कलाकार, कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय, सुंदर सिंधुदुर्ग आणि गुरु ठाकूर -अजय अतुल असताना ह्यापेक्षा वाईट चित्रपट काढणे अशक्य आहे.
चित्रपट आवडला.
चित्रपट आवडला.
त्यातील मला भावलेल्या ह्या काही गोष्टी..
१. दिलीप प्रभावळकर - अप्रतिम अभिनय, बॉडी लँग्वेज -
कोकणातील बेरकी, मिश्किल, कष्टकरी, हेकट म्हातारा,
प्रेमळ आली पुत्रवियोगाने झुरणारा बाप,
सच्चा / हाडाचा कलाकार,
त्या मायबापासम असणाऱ्या कातळोबावर निस्सिम श्रद्धा ठेवणारा भक्त,
जंगलच्या अस्तित्वासाठी झगडणारा शिपाई अशा अनेक भूमिका उत्तम रीतीने वठवल्या आहेत.
अर्थात रंगभूमीवर ‘हसवाफसवी’ च्या माध्यमातून अगदी स्त्री पात्रापासून ते सत्तरीतील ज्येष्ठ रंगकर्मीपर्यंतच्या सहाही भूमिका लीलया पेलणाऱ्या कसलेल्या अभिनेत्यासाठी दशावतार म्हणजे तसा सोपा पेपर होता.
साधा भोळा कुटुंबवत्सल चिमणराव, गंगाधर टिपरे, चौकट राजा, तात्या विंचू या अनोख्या भूमिकांच्या पंगतीत बाबुली दिमाखात आसनस्थ झाला असंच वाटून गेलं.
२. सिनेमाटोग्राफी - हिरवंगार कोकण, झाडी, जंगल, जंगलातील पायवाट, नदी, धुकं, गाव, देऊळ, उत्सवातील वातावरण सगळंच छान दाखवलंय. दशावताराची सोंगं घेऊन खलनायकाचा संहार करतानाचे दृश्य फारच भेदक झाली आहेत.
३. दशावतारातील कलाकारांना/ गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे
४. गाणीही सुश्राव्य.. विशेष करून अजय गोगावले यांच्या च्या आवाजातील रंगपूजा हे गाणं जास्त आवडलं
५. बाप लेखकाची ही वेगळी कथा आहे. त्यामध्ये दशावतारा सारख्या एका जुन्या चांगल्या परंपरेचा इतका सुंदर मिलाफ साधला आहे. जाता जाता कोकणातील सद्य परिस्थिती, रोजगाराची चणचण, कोकणचा विकास या नावाखाली हरपत चाललेले कोकणचे वैभव ( निसर्गसंपत्ती) ह्या विषयांनाही स्पर्श केलाय.
६. बाकी कलाकारांचीही कामे चांगली आहेत. सिद्धार्थ मेननला राजवाडे अँड सन्स नंतर पहिल्यांदाच सिनेमात बघितलं. इकडेही काम छान केलंय.
प्रियदर्शनीच पहिल्या भागातील काम तिच्या हास्य जत्रेतील कामाला अनुसरूनच आहे. मात्र उत्तरार्धात तिने अभिनयाची वेगळी चुणूक दाखवली आहे.
भरत जाधव यांना खलनायकी भूमिकेत पहिल्यांदाच बघितलं. सुनील तावडे, महेश मांजरेकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे यांची सगळ्यांचीच कामे चोख.
चित्रपट बघत असताना, तीन - चार वेळेला जेवढे कोकण बघायला मिळाले ते सर्व आठवल्यामुळे अजून छान वाटलं. तसेच कोकणातील खेळे हा प्रकार अनुभवला होता आणि दशावतार विषयी ऐकून होते. त्यानिमित्ताने त्याची झलक बघायला मिळाली. हे थोडे वैयक्तिक कारणही आहेच.
थोड्याफार काही जाणवलेल्या उणीवा किंवा काही गोष्टी अजून छान झाल्या असत्या असेही वाटून गेलं त्या म्हणजे
सिद्धार्थ म्हणून जास्त जाणवलं मध्येच मध्ये तो नॉर्मल मराठी बोलत होता आणि मध्ये मालवणी ते थोडं जास्त जाणवलं.
योगायोगांची मालिका, खलनायक वगैरे गोष्टी चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी आवश्यक (?) त्या इथेही येतात.
उत्तरार्धा थोडा जास्त आवडला असं म्हणता येईल कारण तो खूप फास्ट पण आहे.
चित्रपट पाहिल्यावर एक विचार आला, ह्यातून ही कला, ते कलाकार ह्यांची काही उन्नती झाली. यासारख्या लोककलांना व्यासपीठ मिळाले, लोकाभिमुखता मिळाली तर फारच छान होईल.
Spoiler
Spoiler
दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!
माझी तर पूर्ण निराशा झाली . विथ ड्यू रिस्पेक्ट टू दिलीप प्रभावळकर कास्टिंग एकदम चुकले. सिनेमातला बाबुली एकदम थकलेला वाटतो. मत्स्य अवतारामध्ये तो होडीतच बसून असतो मग पाण्यात तांडेल ला कोण मारतो . बाबुली पाण्यात जातो कधी मारतो कसा आणि बाहेर येतो कधी काहीच नाही दाखवले. निदान त्याला माधव मदत करतो किंवा राखणदार असे काही तरी दाखवायला हवे होते. लॉजिक कुठेच नाहीय .
तीच गोष्ट नरसिंह अवताराची , तो मानसुखानी चे पोट फाडतो पण ते अशक्य वाटते. मांजरेकर समोर असून पण त्याला पकडत नाही. कैच्याकै .
हे बघतांना अप्पूराजा आठवला. त्यात किती हुशारीने मर्डर्स दाखवले आहेत.
यात direction एडिटिंग सगळंच गंडलंय . नाना पाटेकर हवा होता यात . सिनेमा थोडा मोठा चालला असता.
कोकणातला निसर्ग सुरेख पण बाकी सगळा आनंदीआनंद .
गाणी सगळीच आवडली
मायबोलीवर एकूणच सगळ्यांना
मायबोलीवर एकूणच सगळ्यांना वयाचा / की वयस्कर लोकं पडद्यावर बघण्याचा भारीच प्रॉब्लेम असलेला दिसून येतो.

रूपकं वापरली आहेत.
मारामारी दाखवणे हा मुख्य मुद्दा नाही.
रूपकं वापरली आहेत.> नुसती
रूपकं वापरली आहेत.> नुसती रूपके दाखवून बदला कसा घेणार?
लॉजिक पण असुदे ना थोडेतरी. मारामारी नसली तरी चालेल . पण पटण्यासारखे काहीतरी पाहिजेच ना .
सामी
सामी
हे बघतांना अप्पूराजा आठवला. त्यात किती हुशारीने मर्डर्स दाखवले आहेत.
>>>
याला +७८६ किंबहुना सेम पिंच
मलाही अप्पू राजा आठवलेला. स्पेशली ते वाघाचे सोंग घेऊन केलेला मर्डर या अनुषंगाने..
म्हणून माझीही निराशा सगळी दुसऱ्या भागातच झाली आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्या जागी
दिलीप प्रभावळकर यांच्या जागी सचिन महागुरू पिळगावकर हवे होते, believable झाला असता चित्रपट
पाहिला आणि आवडला. विशेषत:
पाहिला आणि आवडला. विशेषत: पहिला अर्धा भाग. नंतर खुप घाई केली असे वाटले. एडीटींगपण गंडले बहुतेक. मधे एका सिनमधे परबच्या पाटीवर डिकास्टा वाचले. आणि नंतर मांजरेकर आल्यावर त्यांची ओळख डिकास्टा आहे. तसेच मांजरेकरांना दिवसा फोन येतो. पण खून होताना रात्र कशी काय बरे.. खलनायकपण अजून establish करायला हवे होते असे वाटले. अभिनय बेर्डे फारच जाडजूड दिसतोय.
छान सगळे चालू असताना एकदम मूड स्विंग झाल्यासारखे बदला मोड ऑन होतो असे वाटते.
तरीही पहिल्या भागात कोकण, बाप मुलाचे नाते फार छान दाखवले आहे. दिलीप प्रभावळकर जरी वयस्कर वडील असले तरी अशी काटकीटी पण चिवट कोकणी माणसे जवळून पाहिली आहेत. त्यामुळे वेगळे नाही वाटले. उलट त्या कोकणी माणसांना भेटल्या सारखे वाटले. तोच भाबडेपणा, सिस्टीम वरील जुन्या कोकणात गेल्या सारखे वाटले. नुसता सिनेमा म्हणून पहाण्यापेक्षा लहान मुलांचा सिनेमा म्हणून आवडला
कोकणप्रेमामुळे चुका पदरात घेतल्या गेल्या हेही खरेच !
Spoiler Alert :
Spoiler Alert :
मला तरी रुपकच वाटली. पण नक्की सांगता येत नाही.
भरत जाधवकडे एक पाण्याचा flask असतो , त्याच उल्लेख आहे . तांडेलचा पाय पाणवेलीत अडकतो . मनसुखानीला बगीरा मारतो असं समजू शकतो.
तरी अशी काटकीटी पण चिवट कोकणी
तरी अशी काटकीटी पण चिवट कोकणी माणसे जवळून पाहिली आहेत.
>>>>>>
कोकणात कित्येक जुनी खोडं अशीच असतात
बघितला दशावतार. अगदी ग्रेट
बघितला दशावतार. अगदी ग्रेट वगैरे नाही. पण बघायला इन्टरेस्टिंग होता. सिनेमॅटोग्राफी सुंदर. पार्श्वसंगीत आणि गाणी आवडली. त्यात ते बाप लेकाचे गाणे तर फार मस्त आहे!
दशावताराची वातावरणनिर्मिती मस्त आहे. कथा , ती दशावतार थीम ने खून करण्याची कन्सेप्ट चांगली आहे, अजून कल्पक पद्धतीने मर्डर्स चालले असते
पण मला दिलिप प्रभावळकरांचे काम चांगले असले तरी तिथे त्यांना न घेता जरा कमी वयस्क, ६५-७० वयाच्या माणसाला घ्यायला हवं होतं असं वाटलं. वर कुणी म्हटले तसे नाना शोभला असता. त्या माणसाने सूड घेणे, ४ लोकांना मारणे हे बिलिव्हेबल वाटले असते. आणि माधव लहान ९-१० चा असताना बाबुली तरुण म्हणजे ३५-४०चा वाटतो. मग माधव तरुण होतो - फार तर ३०चा दाखवला आहे, तेव्हा त्याचे वडील एकदम ८० वर्षाचे कसे असतील?! ते गंडलेले आहे.
माधव चे काम केलेला मुलगा चांगला आहे. पण मला प्रियदर्शिनी मिसफिट वाटली. दिसते छान पण तिची भाषा फारच शहरी वाटते. मांजरेकरचे पात्र ओके होतं. भरत जाधव चं छोटंसं कॅरेक्टर आणि काम अॅक्चुअली मला चांगले सरप्राइज वाटले. विनोदी म्हणून टाइपकास्ट झालेले असताना असा एक्सपेरिमेन्ट करावासा वाटला याचे कौतुक आहे नक्कीच. एकूण हा सिनेमाही मराठीत नक्कीच एक वेगळा प्रयत्न आहे.
असे अजून प्रयोग मराठीत व्हावेत ही आशा ! नैतर आहेच झिम्मा १, झिम्मा २, झिम्मा ३ सो ऑन !
पाहिला. वर लिहिलंय तसंच फार
पाहिला. वर लिहिलंय तसंच फार अपिलिंग वाटला नाही. एकट्या दिलिप प्रभावळकरांच्या जिवावर ओढण्याचा प्रयत्न केलाय.
कन्सेप्ट खूप मस्त होती खरंतर पण एवढा प्रभाव नाही पडला. एकतर सगळे अवतार दाखवलेच नाहीयेत, आहेत ते पण क्रमाने नाहीत बहुतेक.
ममांचा ढेरपोट्या, सुजकट स्कार्फची गरजच नसलेला पोलिस अज्जिबात आवडला नाही.
शेवटी हनुमान, रामलीला वगैरे काही झेपलं नाही.
भरत जाधव सरपाईजिंग.. जे मिळालंय ते चांगलं केलंय काम. करावे त्याने असे वेगळे रोल.
तेव्हा त्याचे वडील एकदम ८०
maitreyee
तेव्हा त्याचे वडील एकदम ८० वर्षाचे कसे असतील?! ते गंडलेले आहे.
>>>>>
८० वर्षाचे दिलीप प्रभावळकर आहेत. पण चित्रपटात बाबुली वय ८० असा उल्लेख आहे का? कदाचित मी मिस केला असेल..
पण चित्रपटात बाबुली वय ८० असा
पण चित्रपटात बाबुली वय ८० असा उल्लेख आहे का?>>> बहुतेक नाही...पण कोकणात फिरले असता एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे नव्वदीतले म्हातारे सुद्धा बाबूलीपेक्षा तरुण भासतात/दिसतात (जर ते तिथवर पोहचले तर). त्या तुलनेत बाबूलीचा गेटअप अगदी भिष्म पितामह शोभेल असा केला आहे.
एक निराळा अँगल :::
...
भरत जाधव चं छोटंसं कॅरेक्टर
भरत जाधव चं छोटंसं कॅरेक्टर आणि काम अॅक्चुअली मला चांगले सरप्राइज वाटले. विनोदी म्हणून टाइपकास्ट झालेले असताना असा एक्सपेरिमेन्ट करावासा वाटला याचे कौतुक आहे >> मी हा पिक्चर नाही पाहिला, पण भरत जाधवचं विनोदी नसूनही अत्यंत सुंदर काम "आता थांबायचं नाय" ह्या पिक्चरमध्ये पाहिलंय. हा माणूस खरा अभिनेता आहे याची खात्री पटते.
(विनोदी नट चांगले अभिनेते नसतात असं म्हणायचं नाही, उलट ते अवघडच आहे. पण केवळ एक तो एकच अभिनय करणं, कुठल्याही प्रकारचा, त्यामुळे तशी शंका येते.)
ज्यांनी भरत जाधवला सही रे सही
ज्यांनी भरत जाधवला सही रे सही करताना पाहिले असेल ते कधी त्याच्या अभिनयावर शंका घेणार नाहीत.. किंवा ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत ही नाटके सुद्धा त्यात जोडा. स्टेजवर विदाऊट रिटेकचा अभिनय.. पछाडलेला मध्ये देखील शेवटी अंगात यायच्या सीन मध्ये धमाल उडवली होती.
आता थांबायचे नाही मध्ये चांगलाच अभिनय केला, पण तेवढी तर मला अपेक्षा होतीच त्याच्याकडून
दशावतार मध्ये चांगला की वाईट असा प्रश्न पडलाच नाही. म्हणावे तशी उठावदार भूमिकाच लिहिली नव्हती. त्यालाही पुरेसे वापरले नाही असे वाटले.
अच्छा. सॉरी
अच्छा. सॉरी
मधे अस्तित्व नावाचं चाळीतील
मधे अस्तित्व नावाचं चाळीतील जीवनावर आधारित भरत जाधव आणि चिन्मयी सुमित यांचं सिरीयस नाटक आलं होत.
एक वेगळा अँगल
एक वेगळा अँगल
दशावतार - माओवादी दहशतवादाचे टूलकिट
दशावतार चित्रपट पाहिला. कुणाचाही अभिनय आणि शूटिंगविषयी भाष्य इथं करायचं नाहीये, कारण ते सगळं छानच झालंय. पार्श्वसंगीत सुद्धा छान झालंय. प्रश्न मात्र कथेचा आहे. या चित्रपटाची कथाच माओवाद - नक्षलवाद यांना प्रमोट करणारी आहे.
नाव जरी 'दशावतार' असलं आणि त्यात काही अवतार जरी नाट्यमय पद्धतीनं दाखवले असले तरी कथेचा गाभा तो नाही. कथेचा गाभा आहे 'खाण'. खाणी असाव्यात की नसाव्यात, खाणी आणि विकास, वगैरे मुद्द्यांच्या खोलात न जाता सरधोपटपणे 'खाणी वाईटच असतात' असं गृहीत धरुन कथा लिहिली आहे.
'कोकणाचा विनाश खाणींमुळे होतोय' असा दावाच लेखक दिग्दर्शकानं केलेला आहे. पण फक्त खाणींमुळेच कोकणातले डोंगर पोखरले जातायत का? घरं बांधण्यासाठीसुद्धा लोकं डोंगर पोखरतायतच की. वाढत्या मानवी वस्तीमुळे हे होतंय. सगळीकडेच होतंय.
गोष्ट कोकणात घडते आहे, तिथले लोक कोकणी पद्धतीनं बोलतायत आणि मुख्य पात्राला 'दशावतारात' भूमिका करायला आवडतंय या तीन गोष्टी सोडल्या तर कोकण हे फक्त तोंडी लावायलाच वापरलं आहे. ही सेम गोष्ट कुठेही होऊ शकते आणि इतकेच नाही तर सर्वत्र होत आहे असंही नकळतपणे ध्वनित केलेलं आहे.
खाणी, खाणमालक, मोठे उद्योगधंदे, व्यावसायिक, त्यांचे मॅनेजर्स हे दुष्ट असतात आणि त्यांचे हेतू देखील वाईटच असतात असा एक टिपिकल विद्रोही डाव्या, कम्यूनीच, सोशालीच कथालेखकांचा गैरसमज आहे. या सगळ्यां डाव्यांना गरिबी आवडते. गरिबीचं ग्लोरिफिकेशन करायलाही आवडतं. इतकंच नाही तर विकासासाठी प्रयत्न सुरु झाले की ते प्रयत्न आडवून शिवाय वर 'कोकण आणि भारत विकासात मागे का?' हे तोंड वेंगाडून विचारणाऱ्यांतही हेच पुढे असतात.
बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोणत्याच कामाचं आपण समर्थन करु शकत नाही आणि करणारही नाही. पण भारताच्या भूमीत भारत सरकारला जर सरकारी मालकीची खाण सुरु करावी वाटली तर बाजारभावाप्रमाणे मोबदला देऊन लँड्स ॲक्वायर करणे आणि खाण सुरु करणे हा केन्द्र सरकारचा अधिकार आहे. कुणाला मोबदला मान्य नसेल तर लवाद असतात. कोर्टात जाता येते. खाजगी कंपनी जर खाण तयार करणार असेल तरीही तीच पद्धत मात्र आधी टेंडर काढणे वगैरे कामं सरकारला करावी लागतात. असो. तर जर सरकार किंवा खाजगी कंपनी अथवा व्यक्ती काहीही बेकायदेशीर करत असेल तर न्यायपालिका आहे.
आणि खाणी खरंच इतक्या वाईट असतात? तुम्हाला मोबाईल वापरायचा असतो. लॅपटॉप, टिव्ही वापरायचा असतो. इलेक्ट्रिक वेहिकल (EV) वापरायचं असतं. या सगळ्या गोष्टींसाठी मिनरल्स लागतात. रेअर अर्थ मिनरल्स सुद्धा लागतात. हे सगळं मिळतं खाणींमधूनच. मग खाणी वाईट? आजघडीला या रेअर अर्थ मिनरल्सवर चिनी वर्चस्व आहे. आपल्याकडेही रेअर अर्थचे मोठे साठे आहेत असं आता तज्ञ सांगतायत. आणि त्यातून पर्यावरणाला कमीत कमी हानी पोचेल असं पाहून उत्खनन करता येऊ शकतं असं तंत्रज्ञान भारताकडे आहे. चीनचं उत्खनन हे पर्यावरणासाठी आणि कामगारांसाठी घातक आहे. भारताने खाणी आणि खाणीतून मिळणाऱ्या मिनरल्सच्या माध्यमातून स्वयंपूर्णता आणली नाही तर आपल्याला चीन किंवा अन्य देशांकडून आयात करावी लागेल. आयातीवर अवलंबून राहावं लागेल. आपल्याकडे निसर्गदत्त खाण आहे पण तरीही इतर देशांवर परावलंबित्व ठेवावं लागेल. परिणामी आपलंच त्यात नुकसान आहे. हे आपल्याला चालणार आहे का?
आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या चित्रपटात नक्षलवाद माओवाद यांबाबत नेमकं काय दाखवलंय? तर थेट सांगायचं झालं तर तीन-चार गोष्टी दाखवल्या आहेत.
१] दाट झाडी, जंगल याचा वापर करुन 'गुरिला वॉरफेअर' पद्धतीने माओवादी हे ठरवून हल्ले करत असतात. ते त्यांचा शत्रू निवडतात आणि स्थानिक भूगोलाच्या आधारे विविध सापळे रचून ते शत्रूंना टपकवतात.
२] नक्षलप्रभावित किंवा माओवाद प्रभावित क्षेत्रात गावातलं मध्यवर्ती देऊळ किंवा एखादी महत्वाची जागा वगैरे हेरुन माओवादी, नक्षलवादी दहशतवादी हे तिथे वेळोवेळी भित्तीपत्रकं चिकटवून ठेवतात. गावकऱ्यांना धमकीवजा सूचना करणं, ठरवलेला शत्रू म्हणजेच टारगेटला सिंगल आऊट करुन धमक्या देणं, लोकांना भडकवणं, सरकारला कर न भरणं, सरकारकडून कोणत्याही विकासाच्या योजना येऊ न देणं, भारत सरकारविरुद्ध क्रांती करणं वगैरे गोष्टी त्यात लिहिलेल्या असतात. अगदी तीच मेथड वापरुन चित्रपटातला तथाकथित हिरो गावातल्या मंदिराच्या घंटेत वेळोवेळी चिठ्ठ्या लिहून त्याच्या शत्रूला धमकावत असतो.
३] सगळ्यात शेवटी चित्रपटातल्या खलनायकाला सगळे गावकरी हातात मशाल धरुन गराडा घालतात आणि मग मात्र त्याच्या भोवती फेर धरुन हातात मशाली घेऊन उलट फुलट फेर घेत राहतात. आणि तेव्हा चित्रपटाची नायिका नाकपुड्या फेंदारुन विचारते लोकांना "सांगा याचं काय करायचं". ज्यांनी कुणी माओवाद/नक्षलवाद कसा काम करतो, त्यांची मोडस ऑपरँडी काय असते हे वाचलं असेल, ज्यांनी कुणी माओ त्से तुंगचं चरित्र वाचलं असेल (माओ - क्रांतीचे चित्र आणि चरित्र), ज्यांनी कुणी १९६७ साली नक्षलबाडी इथे चारु मजुमदार आणि कनू सान्याल यांनी माओवादी क्रांतीच्या नावाखाली रक्तरंजित खूनखराबा कसा सुरु केला हे सगळं वाचलं अभ्यासलं असेल त्यांना चित्रपटातला हा शेवटचा सीन बघताना मी काय म्हणतोय ते कळेल. हिंदीत काही वर्षांपूर्वी एक फ्लॉप पिक्चर आला होता. 'मटरु की बिजली का मन डोला'. तो सिनेमा आणि दशावतार याच्या कथासूत्रात कमालीचं साम्य आहे. माओ, चारु मजुमदार, कनू सान्याल, नेपाळचा पूर्वाश्रमीचा माओवादी प्रचंडा उर्फ पुष्पकुमार दहल आणि असेच देशोदेशीचे सशस्त्र माओवादी दहशतवादी हे सर्व गावापुढे (अर्थात शस्त्राच्या धाकाखाली) पीपल्स कोर्ट भरवतात. म्हणजेच 'लोक अदालत' भरवतात. त्यात त्यांच्या दृष्टीने अपराधी असलेली माणसं जसे की धनिक, व्यापारी, सरकारी अधिकारी, वगैरे लोकांना ओळीने उभं केलं जातं. त्यांचे जे काय खरे खोटे समजले जाणारे अपराध असतील त्या अटराधांचं जाहीर वाचन केलं जातं. त्यावर त्या तथाकथित अपराध्यांना त्यांची बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य नसतं. तिथं जज असतात माओवादी, वकील असतात माओवादी, पोलीसही माओवादी आणि शिक्षा देणारेही माओवादीच. ते अपराधांचं वाचन झालं की सेम त्या नायिकेप्रमाणे "सांगा यांचं काय करायचं?" असा प्रश्न दरडावून उपस्थितांना विचारला जातो. उपस्थितांनी मृत्यूदंडाची मागणी करावीच लागते, नाहीतर त्यांनाही अपराधी गणलं जातं. अशा रितीने त्यांना मृत्यूदंड जो दिला जातो तोही किती भयंकर असतो आणि नंतर मृतदेहाची विटंबनाही कशी करतात हे समजून घ्यायचं असेल तर गेल्या वर्षी आलेला 'बस्तर' हा चित्रपट बघा.
तर थोडक्यात म्हणजे चित्रपटाला नाव दिलंय दशावतार, पण विषय भलताच आहे. 'माओवाद' हे नाव चित्रपटाला दिलं असतं तर शोभून दिसलं असतं. तिकडे देशाचे गृहमंत्री आणि देशभरातल्या एजन्सीज जिवाचं रान करतायत आणि देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी कसून प्रयत्न करतायत. आणि इकडे आमचे सिनेमावाले 'माओवादाचं' रोपटं कोकणात आणि महाराष्ट्रात रुजवू बघतायत. गंमत ही आहे की माहिती प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्ड नेमकं काय करतंय गेल्या दहा वर्षांत? त्या जॉली LLB 3 ची थीमही अशीच साधारणपणे. श्रीमंत आणि श्रीमंती कशी वाईट आणि दिल्लीत झालेलं शेतकरी आंदोलन किती छान हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यात. त्या आंदोलनाला विदेशी शक्ती आणि सोरोस सारख्यांचा आर्थिक पाठिंबा होता, त्यांचे तंबू एसीचे होते आणि त्यांचे ट्रॅक्टर लाल किल्ल्यात चढले आणि काही नराधमांनी तिरंगा खाली खेचण्याचं दु:साहस केलं या कशाही बद्दल त्यात एक अवाक्षर नाही.
तिकडे राऊल विंची जेन झी ला उचकवतोय. नेपाळ मध्ये झालं तसं भारतात करायची रक्तरंजित स्वप्नं बघतोय. आणि त्याला साथ द्यायला अमेरिकन सीआयए आणि देशोदेशीच्या शक्ती आहेतच. आणि त्यांच्या इशाऱ्यावर भारतात रान पेटवायला आणि बुद्धीभेद करायला तयार असलेले पंचमस्तंभी लेफ्टिस्ट कल्लाकार...!! असं सगळं मेतकूट जुळून आल्यावर सायनो-लेफ्ट-लीबरल-वहाबी कबाल आणि डीपस्टेटच्या इच्छेनुसार भारतात 'लालक्रांती' किंवा 'गझवा' होणारच, स्वाभाविक आहे.
-- केदार केसकर
दशावतार' पाहिला. चांगला आहे.
दशावतार' पाहिला. चांगला आहे. बंडल वगैरे नाहीये.
पण मनाला भिडला नाही.
पहिला हाफ ऊगाचच वेळ घालवलाय. जो problem दाखवायचाय तो नंतरच्या एका तासात घाईघाईने मांडल्यासारखा वाटला.
एका तासात problem, लगेच सोल्युशन की संपला चित्रपट.
शेवटचं मशाल घेऊन रिंगण तेही ऊगाचच वेळकाढूपणा आहे असं वाटलं.
Interval च्या आधीपासूनच जर हा problem दाखवायला सुरुवात केली असती तर सोल्युशन दाखवायला अजून थोडावेळ जास्त मिळाला असता.
कोकणातील निसर्ग भरभरून दाखवलाय असं वाचलं होतं.. पण तो तेवढा दिसला नाही.
दिलीप प्रभावळकर खरेच थकलेत.
पण तो रोलही तसाच आहे. वडिल थकलेत.. रात्रीचं दिसत नाही म्हणून मुलगा रात्रीचं बाहेर पडणं थांबवा म्हणत असतो.
महेश मांजरेकरचा ऊगाचच attitude. त्या दुसर्या पोलीसाला पोट आत घे आत घे म्हणताना तुझं पोट बघ की बाबा किती बाहेर आहे.
त्याचं नाव dicosta दाखवायचं काय कारण?
बाबुली इतक्या सहजपणे मोबाईल पोलीसांच्या हवाली करेल असं वाटलं नाही.
Voice मेसेज ऐकल्यावर, त्यातले फोटो पाहिल्यावर तो 'मी बघतो पुढं काय करायचं ते' असं म्हणतो.
गावचा सरपंचच यात सामिल आहे म्हंटल्यावर पोलीस आपल्याला मदत करणार नाहीत याचा अंदाज बाबुलीला आलाय. (शिवाय मुलाच्या मैत्रीणीचे फोटो व लव मेसेजेस त्यात असताना)
आता हा मोबाईल सापडल्याचं सांगणारच नाही कोणाला आणि स्वतःच बदला घेणार असं मला वाटलं..तर ऊलटच झालं..
अगदी शेवटी सगळे गाववाले एकत्र येऊन खाणीला विरोध करतात नाहीतर चित्रपट भर कोणीही खाणींना विरोध करताना निसर्गाची काळजी करताना दाखवलं नाहीये.
राहवलं नाही म्हणून ही पोस्ट!
राहवलं नाही म्हणून ही पोस्ट!
दिलीप प्रभावळकर ८१ वर्षाचे आहेत पण त्यांना प्रत्यक्षात बघितलं तर ते साठी सत्तरीतील एखाद्या ज्येष्ठ नागरिकापेक्षा ही उमदे ( फ्रेश) ,काटक दिसतात.
ते आणि विजय केंकरे दोघच ( साधारण सारख्याच वयाचे ८० या आसपास असावेत) दोन तासांचा पत्रापत्रीचा प्रयोग करतात याहून अधिक त्यांच्या क्षमतेचा काय पुरावा द्यायचा!
हे लिहिण्यामागील कारण - ते ८१ वर्षाचे आहेत म्हणून बाबुली तसा दिसतो असे नाही... आणि बाबुली थोडा कमी म्हातारा म्हणजे ६०-७० च हवा म्हणून दुसऱ्या कोणाला घ्यायला हवे हा विचारच हास्यास्पद वाटला.
अर्थात आपल्या वाटण्या न वाटण्याने त्यांच्या तसूभरही फरक पडत नाही हा भाग वेगळा.
दिलीप प्रभावळकरांनी त्यांच्या चाळिशी पन्नाशीतच (?) आपल्याहून काही दशके मोठ्या असलेल्या आबा टिपरेंची भूमिका अजरामर केली होती.
थोडक्यात किती म्हातारे दिसायचे/ दाखवायचे हे दिग्दर्शक ठरवतो . मेकअप आर्टिस्ट ते घडवतो.
त्यासाठी उगा एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नटाविषयी /त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणे अवाजवी वाटते.
केदार केसकरचा राईटअप तिकडे
केदार केसकरचा राईटअप तिकडे काकाफॉवर टाकायचा तो इकडे कसा काय आला ब्वा????
केदार केसकरच्या म्हणण्यात
केदार केसकरच्या म्हणण्यात तथ्य आहे मात्र.
एखादा खूप कनवाळू गुजराती बिलेनियर कोकणातल्या पडक्या जमिनी घेऊन सरकार देते त्यात स्वतःचे एडिशनल पैसे घालून शेतकऱ्यांना पाच ते सहापट भाव आणि होणाऱ्या फॅक्टरी मधे प्रत्येक कुटुंबातील एकाला तरी किमान परमनंत नोकरी देतो असे का दाखवत नाहीत? कोंकणात रोजगार वाढणार मग कोकणी माणसाचे स्थलांतर होणार नाही, त्याना घराजवळच काम मिळणार, एक मोठी पाइपलाइन टाकून सगळे दूषित पाणी गल्फच्या आखातापर्यंत नेऊन सोडता येते आजच्या टेक्नॉलॉजीने ते शक्य आहे. दळणवळण सुधारणार, कोकणी लोकांना पोर्शे सारख्या गाड्या चालवायला मिळणार आणि ते मग माओवाद्यांना रात्री चिरडून जाणार, बिलेनियर शेवटी आपल्या कोकणात येऊन स्थायिक होणार आणि मग एखाद्या मोठ्या पडक्या घरात पितळेच्या आणि मातीच्या भांड्यात केलेला स्वयपाक खाणार, गावात गजाल्या हाणत बसणार आणी कालांतराने तो मुलांना नातवंडांना मालवणी शाळेत घालणार असे का दाखवत नाहीत? चित्रपटाचा कळसाध्याय म्हणजे हा बिलेनियर दशावतारात भाग घेऊन रात्रभर सोंग वठवणार, आणि त्याची डान्सर बायको कौतुकाने ते पाहत बसणार असा एक कोट्यावधीचा दशावतार इवेंट भरवणार त्यासाठी परदेशी पाहुण्यांसाठी चिपी विमानतळावर नवीन दोन टर्मिनल काढून आतरराष्ट्रीय फ्लाईट येणार असे काहीतरी दाखवायला हवे.
काल बघितला ! मिक्स रिव्ह्युशी
काल बघितला ! मिक्स रिव्ह्युशी सहमत, बरेचसे मुद्दे आधिच वर येवुन गेलेत..माधवला बाबुलीचा नातु दाखवल असत तरी स्टोरीत काहि फरक पडला नसता...तो त्याचा मुलगा वाटत नाही.बाकी प्रभावळकर आहेत त्यापेक्षा यात उगाच जास्त म्हातारे दाखवले आहेत..त्याची गरज नव्हती.
बाबुली सारखा अन्गात बळ नसलेला म्हातारा माणूस ज्याला द्रुष्टीदोष आहे हे करतो हे तितक अपील होत नाही पण बहुधा दशावतारातिल काही अवतार त्याच्यात सन्चारतात आणी तेच त्याला बळ देतात अस काहिस दाखवायच असाव...तो इफेक्ट अजिबात दिसत नाही.
दिलिप प्रभावळकर उत्तम कलाकार आहेत, वाचन, लिखाण भरपुर असलेला कसलेला कलाकार पण खेदाने म्हणावस वाटतय या भुमिकेला ते तितकासा न्याय देवु शकलेले नाहित.. यात त्याच्यापेक्षा डायरेक्टरची व्हिजन कमी पडली अस वाटतय.
बाकी सगळ्यानी काम उत्तम केली आहेत..प्रियदर्शीणीने चान्गल काम केलय की, माधवच काम केलेल्या कलाकाराच सगळयात जास्त आवडल..भरत जाधवला निगेटिव्ह रोल मधे पहिल्यादाच पाहिल.
ठिगळ लावाव तस उगाच ममा ना घेतलय...पहिल्याच शॉटला ते तावडेना सूटलेल्या पोटावरुन बोलतात..हा एक विनोदच होता.
Pages