प्रज्ञान युगात एक दिवस ....
मी रस्त्याने जात असताना सगळ अगदी वेगळं वेगळं भासत होतं मला. आपण नक्की आलोय कुठे? आपल्या पुण्यातच आहोत ना? रस्ते एकदम गुळगुळीत चेहरा बघावा असे.. हे बरय बाहेर जाताना आपला अवतार कसा आहे हे बघायला गाड्यांच्या आरश्यात, काचेत नको बघायला रस्त्यात दिसेल प्रतिबिंब... आणि हो हे विचार माझ्या मनात यायचा अवकाश कि माझ्या समोर एक पाटी आली.. use only for walking..
अरे वा पाटी म्हणजे पुण्यातच आहोत ..मग हे इतकं बदलल कसं?
आजुबाजुला माणसं बघावी तर काही दिसेना.. माणसं नाहीत असं झाल तरी काय हे ?... तितक्यात काही तरी विचित्र यंत्रासारखी दिसणारी आकृती मला दिसली. हे काय आहे म्हणुन कुतुहलाने बघायला गेलो जवळ जाउन बघीतलं तर.. काही कळेना .हे यंत्रा इथे का? आणि असं रस्त्यात कोणी आणुन ठेवलं ? मी हात लावायला गेलो तर अचानक त्या यंत्रातुन दोन हाता सारखे दिसणारे सुळे बाहेर आले आणि मला एका झटक्यात उडवलं .. अरे बाप रे? हे काय ..मी परत ऊठुन त्याच्या जवळ गेलो..माझ्या मनातले विचार त्याला कळले असावे बहुदा.. त्याने एक शिंग असलेला त्याच्या वरच्या बाजुला वर घातला होता तसा टोप पुढे केला.. हे काय आता? मी प्रश्नार्थक मुद्रेने बघीतले त्याच्याकडे तर त्याने त्याच्या डोक्याकडे म्हणजे वरच्या बाजुला , तो मला झटकणारा सुळ्यातला एक सुळा उचलला.. बाप रे हा परत उचलतो आता मला.. मी मागे सरकलो ..परत विचार आला हे असं घाल अस तर सुचवत नसेल हा.. .. ठिके....बघुया काय होते ते म्हणुन मी तो टोप डोक्यात घातला.. आणि काय गंमत मला आवाज ऐकु आला
"कोण आहेस तु? कूठला?
" मी सुबोध..पुण्यातला"
" सुबोध हा कुठला नविन कोड?"
मला कोड हे काय नविन मी माझ्या हातांकडे बघीतले . छे कुठे कोड होते..ए काही काय बोलतो...
" कूठलाय"
"पुण्यातलाच"
"पुण्यातला म्हणजे कुठला ग्रह?" अरे बाप रे कोण आहे हा विचित्र प्राणी पुणे ग्रह... मला दशम ग्रह माहीत होता बायको ऐकवायची बर्याचदा ? ह्याला ते हवय का?
" म्हणजे मी नाही समजलो?"
" पुणे पृथ्वीवर आहे , महाराष्ट्रात, भारतात..? तुला ईतके ही माहीत नाही..आहेस कुठला तु?आणि कोण माणुस आहेस कि यंत्र"
" माणुस हा कुठला प्रकार? आम्ही सगळे स्ट्रक्चर आहोत वेग वेगळ्या युनिकोडचे.. पण माणुस म्हणुन फ़ार पुर्वी जवळपास दहा हजार वर्षा पुर्वी एक स्ट्र्क्चर होतं जुन्या पृथ्वी ग्रहावर...ही नविन पृथ्वी तयार होण्याआधी..त्याला आम्ही अनार्य युग म्हणतो तु अनार्य युगातला "
" दहा हजार वर्षे?... बाप रे..आणि हे कुठले युग मग"
" हे प्रज्ञानयुग!... आणी तुम्ही काळजी करू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हात पुढे करा त्यावर एक स्क्रिन येईल त्यात दिसतील..माझा कोड आहे hyta2004. माझा कोड तुम्ही मनात आणला की मी तुम्हाला कनेक्ट होईल "
" ए नको बाबा..तुझ्या बरोबर ने मला"
" चला पण माझ्या सोबत रहावे लागेल. थांबा हे बटन दाबतो आता तुम्ही ईनव्हिसिबल व्हाल फ़क्त मला दिसाल"
******************************
अस्मादिकाची वरात त्याच्या मागुन निघाली..मी कनेक्ट होतो त्याला त्यामुळे माझ्या मनात काय बोलणे चालेय ते त्याला कळायचे.. अरे बाप रे वातावरणात कोलाहाल नाही पण हे रिस्कीचं आहे.. कुणाला कनेक्ट झालो की आपल्या मनात काय आहे ते त्याला कळनार..आणि त्याच्या मनातले मला.. पण हे भयंकर आहे"
"नाही भयंकर नाही तुझ्या मनातले विचार तुला समोरच्याला नसतील कळु द्यायचे तर तु तुझा सिग्नल ऑफ करु शकतो.आणि तो बॅटरी डाऊन असे दाखवेल.. "
सही आहे यार हे.. मी त्याला स्वीच ऑफ़ केला आणि विचार करायला लागलो. मजाच मजा..माझा जळकुटा सहकारी माझ्याबद्दल काय विचार करतो..ऑफिसातली चिकणी ऑपरेटर येता जाते हसते माझ्याशी पण काय विचार करत असेल ना माझ्याबद्दल ते कळेल. ओ हो आणी भांडकुदळ बायको..तिचा तर स्विच मी कायम ऑफच ठेवेल..कशावरुन भांडायला लागेल नेम नाही.. बाहेर फ़िरायला जाताना तर नाहीच नाही.. एखादी सुंदरी गेली जवळुन मन कितीही स्वछ्छ असलं तरी, नाही म्हटल तरी विचार येणारच ना मनात..त्यापेक्षा कनेक्टीव्हीटी बंद आणि केली सुरु फक्त तीची तरी माझी बॅटरी डाउन आहे असे समजुन ती लक्ष देणार नाही..सही है भिडु..
मी परत मी त्याच्या मागे जायला लागलो..
आता आपण कुठे आलो
हा गोट आहे.काय गोट.. म्हणजे पुर्वी तुमच्या भाषेत ऑफिस"
"ऑफिस..म्हणजे गोट.. मग बोकड म्हणजे?..आणि नाव भारी आहे फ़क्त एक दुरुस्ती हवी होती गोट ऐवजी गोठा . अगदी पर्फेक्ट"
" कसला गोठा?" त्याने विचारले. अरे हा कनेक्ट आहे नाही का?
" जनावरे रहातात तो.."
"जनावरे ? हे कुठल्या ग्रहावरचे"
" अरे बाबा पृठीवरचेच"
" ओ पृथीवर दोन स्ट्रक्चर होते का..माणसे आणि जनावरे असे '
"अरे बाबा आता काय सांगु तुला पृथीवर देव झाले राक्षस होते, माणसे होती, जनावरे, पक्षि.. अगदी नको नको ते जीव होते"
" फक्त एकाच ग्रहा वरचे रहायचे तिथे"
" म्हणजे काय एकाच ग्रहावर ईतकी दाटी होती कि परग्रहवाल्यांना नो प्रवेश..ईतकच काय एका देशातुन दुसर्या देशात, नव्हे एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायची सोय नव्हती बाबा..मला तर माझ्या घरून दुसर्या घरी पण जाता येत नव्हत"
मग मी गप्प बसलो आणी त्याच्या गेटात काय चालते ते बघायला लागलो.सगळे एक सारखेच दिसत होते.. बाई आणि पुरुष असा ही भेद नाही का ईथे?
" आहे तर हे बघ डोक्यावर दोन अॅन्टिने दिसतात ते पुरुष आणि तीन अॅन्टिने दिसतात त्या स्त्रीया..
म्हणजे आमच्या भाषेत पुरुष म्हणजे स्क्रु.. "
"आणि स्त्री म्हणजे स्क्रू ढिला "
" नाही नाही..स्त्री म्हणजे रिस्क्रु"
" शी काहीतरीच नाव हे"
मग मी बघु लागलो तीन शिंगावाल्या बर्याच जणी होत्या आणि दोन शिगावाले कमी दिसत होते..स्त्री राज्य दिसतयं
" हो आमची बॉस रिस्क्रु म्हणजे तुमच्या भाषेत स्त्रीच आहे"
तितक्यात त्याचे एक एक कलिग यायला लागले सगळे जमा झाले. मला कळवे म्हणुन मग त्याने अजुन एक उपकरण जोडले माझ्या अॅटिनाला आणि मी त्यांच्या गप्पा ऐकु लागलो.
" पहिल्यांदा .. हं" सगळे हुंकार आले आणि सगळ्याचे हातासारखे सुळे एका बटणाकडे गेले..मी मनात म्हणलो हे काय तेव्हा तो म्हणाला" अरे बॉसची कनेक्टीविटी ऑफ केली" म्हणजे दहा हजार वर्ष झाली तरी बॉस बदलले नाही की ही मेंटलिटी बदलली नाही..
" अरे काल मला म्हणाली की जास्त वेळ थांब... मी नाही म्हणालो.. त्याने कोडींग मधे काही बदल घडणार असेल तर थांबतो म्हणलो.. नाहीतर घरी उशीरा गेलो की घरच्या कोडींग मध्ये फ़रक पडायचा..प्लस च मायनस व्हायच ..त्यातुन बॉस ने थांबवलं म्हणजे अजुनच ....बाहेर थांबावे लागले तर चार्जिंग होणार नाही..मग उद्या ईथे डिस्चार्ज म्हणुन परत डिबग़ींग "
"पण हे सगळे ते मंगळा वरचे आहेत ना त्यांच्या मुळे..येतात इथे पृथ्वीवर..त्यांच्या इथे कामे मिळत नाही मग करतात काम मान मोडेपर्यंत..आणि लागते यांना सवय राबवुन घ्यायची"
" अरे पण आवाज उठवलाय ना त्यांच्या विरुध्द अतिरेक्यांनी"
अतिरेकी..इथे पण आले का?"
" नाही तुम्ही म्हणयचे तसा नाही हा शब्द अतिरेकी..ईथे जे समाज कार्य करतात."
"म्हणजे राजकारणी'
"हं तसच त्यांना अतिरेकी म्हणतात"
" तुमचा समाज म्हणजे काही जातीपाती असतात का?"
" नाहीआमच्या स्ट्रक्चरचे झोन असतात हा मंगळियन, हा झोन शनियन..असे"
" क्या बात है..बरेच शब्दप्रयोग मात्र सही आहेत तुमचे, डिक्शनरी बघावी लागेल तुमची "
" डिक्शनरी नाही आमच्या मधे, प्रत्येकाच्या मेंदूत सायबॉटस आहेत ते हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करतात..आता आंम्ही बोलतो ते तुम्हाला नाही का तुमच्या भाषेत ऐकु येतं..आणि तुम्ही बोलता ते आम्हाला आमच्या भाषेत.."
" म्हणजे शाळेत भाषा विषय नाही?"
"शाळा ते काय असते?"
मला तर इसे शाळा पता नही असे नाचत ओरडत सांगावेसे वाटले ये पीएसपीओ नहि जानता स्टाईल ने..
" अरे बाबा जिथे आपल्या शिकायला मिळते..माणुस म्हणुन कसे जगावयाचे याचे पाठ मिळतात थोडक्यात अगदी रानटि जंगली माणसांना माणसाळले जाते" पण मी याला का सांगतोय हे याला माणुस,
जनावर काही कळत नाही तर शाळा कुठुन कळनार.
तो म्हणला "त्यात काय पाहीजे ती डिस्क मेंदुत टाकली की त्या लहरी मेंदुपर्यन्त पोहोचतात आणि ते समजते त्यासाठी शाळा? बाप रे भलतेच अवघड होते तुमचे जगणे'
" हो रे बाबा ..या एवढ्या बाबतीत तुझे आणि माझे एक मत झाले बघ.. काय सांगू काय काय सहन करयचो लहाणपणापासुन... आई वडिलांचा धाक, शिक्षक नावाची शिक्षा , तरुणपणी नोकरीसाठी वणवण लग्न.. मग बायकोचा धाक..आणि म्हातारपणी पोरांचा धाक.. जगण कसल बाबा धाकण ते"
" आम्हाला इथे फ़क्त रिस्क्रुला घाबराव लागत ना कारण डिझायनर बेबी साठी त्यांची गरज असते ना नाहीतर कोणी विचारले असते त्यांना वैताग आणतात बघ अगदी..सतत आपला तिसरा आन्टिना उगारलेलाच"
अरे च्या म्हणजे कितीही सहत्र वर्ष झाली तरी हा त्रास कायमचा आहेच म्हणायचा पृथ्वी ग्रहावर..मला जरा आनंदाच्या गुदगुल्या झाल्या फ़ार हेवा वाटत होता याचा मघापासुन आता बस लेको..मजा करताय काय..तुमच्या ही मागे आहेच ग्रह दशा की नुसती दशा म्हणतात यांच्यात कोणास ठावुक.पण काही प्रेम बीम करतात की नाही कोण जाणे.
माझ्या मनीचे ओळखुन तो जरा हसल्याचा आवाज आला मला
"काय रे काय हसतोय" मी असे विचारताच तो अअॅन्टेना धरुन वाकला . . हे काय..
"मल लाज वाटली.."
ही अशी? हे लाजण..बापरे..मग रागावण , प्रेम करण कसं असेल?
" मी ना प्रेमात पडलोय"
"काय?..कुणाच्या"
" एका रिस्क्रु च्या" अरे रे..बिच्चारा मला वाईट वाटले...
" नाव काय तीच"
" नाव नाही कोड kll 6778" शी कोड बरोबर कसं प्रेम करायचं?
" सोप्पय तिच्या ब्रेन मध्ये माझ्या नावाची डिस्क द्यायची कनेक्ट झाली तर मग जमल नाहीतर मग दुसरीकडे ट्राय"
" कनेक्टीव्हीटी झाली तर मग पुढे काय"
" पुढे सोप जरा ग्रह कुठला म्हणुन येतो प्रॉब्लेम"
अजुन कुंडलि बघतात काय ही.पण तोच पुढे म्हणला
मंगळवरची चालते पृथ्वीवरच्याला पण शनी वरची नको म्हणतात.. हल्ली आम्ही नविन पिढी काही बघत नाही म्हणा इतकं.. आमचे आई वडिल ही गप्प बसतात ..शेवटी काय त्यांचा कोड पुढे चालल्याशी कारण"
" ए प्रेम कसं करतात रे तुमच्यात"
" प्रेम त्यात काय अवघड ...कनेक्टीव्हीटी मॅच झाली की मग वेग वेगळ्या डिस्क ट्राय करायच्या.."
बाप रे मन भावना काही काही नाही...ह्याला काय जगण म्हणतात? शी काय हे जगण्..बरं झाल मी आधीच जन्मलो ते,... ह्या अश्या यंत्र युगात आणी प्रज्ञान युगात जन्मण्यापेक्षा..पण माझ्या लक्षात आले मी कनेक्ट होतो त्याच्याशी... जरा जपुनच विचार करायल हवा..द्यायचा कुठल स्विच ऑफ करुन तर बसायचो दगड होउन..
पण त्याला ते कळालच .. मला म्हणला आम्हाला नाव ठेवतोस...अरे कसे जगत होता तुम्ही अनार्य युगातली अजुन काही डिस्क मिळतात आम्हाला..आणि स्वतः ईतके मागास असुन आम्हाला नाव ठेवतोस म्हणुन त्याने माझी एक वायर तोडली...
"अरे अरे..मी ओरडत होतो पण माझा आवाज जात नव्हता...तितक्यात आमची फटकडी ऑपरेटर आली तिथे , तीचे आणि त्य यत्राचे लाईट एकदम चमकले..दोघामधे काही तरी संभाषण घडत होते...आणि तीने माझ्या कडे बघितले व माझ्या दिशेने येवुन तिचे शिंग खुपसले माझ्या डोक्यावर्..
"आई आई..मेलो मेलो" मला कोणी तरी जोरदार हलवले... आणी शब्द कानावर आले
बायको वैतागुन म्हणत होती.." हजारदा सांगते कुठलीही पुस्तके वाचु नका.. नको नको ते सिनेमे बघु नका पण नाही....मग पडतात स्वप्न आणि बसतात ओरडत..आम्हाला रोजचा त्रास...
अरे च्या म्हणजे स्वप्न पडल तर्..मी निरखुन तिच्या कडे बघीतल..अचुक कसे ओळखते माझी बायको माझ्या मनातले..पण मला तिच्या डोक्यावर शिंग दिसले नाही...या युगातही माझ्या मनातले ओळखायला हिला शिंग लागत नाही ... बिनशींगी..आणि मनोमन हसलो..माझ हसण बघुन ती दोन शिंग... नाही नाही...डोळे रोखुन माझ्याकडे बघत होती.. बरं झाल कनेक्टीव्हीटी नाही..मी विचार केला
अरे वा
अरे वा पाटी म्हणजे पुण्यातच आहोत ..
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
>>>>मला तर
>>>>मला तर इसे शाळा पता नही असे नाचत ओरडत सांगावेसे वाटले ये पीएसपीओ नहि जानता स्टाईल ने..
सही आहे हा विनोद.........:D
प्रेम
प्रेम त्यात काय अवघड ...कनेक्टीव्हीटी मॅच झाली की मग वेग वेगळ्या डिस्क ट्राय करायच्या>>>
(No subject)
स्वप्न
स्वप्न मस्तच आहे
हजारदा
हजारदा सांगते कुठलीही पुस्तके वाचु नका.. नको नको ते सिनेमे बघु नका पण नाही....मग पडतात स्वप्न आणि बसतात ओरडत..आम्हाला रोजचा त्रास...