चोली के पीछे क्या है!!

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2024 - 01:49

परवाच वीकांताला क्रु नावाचा मजेशीर चिक फ्लिक गर्ली चित्रपट बघितला. क्लायमॅक्समध्ये नाट्य मय प्रसंग घडत असताना चोली के पीछे गाण्याची रिमिक्स व्हर्जन आहे. दिल्जित दोसंथ व इतर मंडळी, जास्त रॉकिन्ग संगीत आहे. तेव्हाच घरी गेल्यावर चित्रपटाचा साउंड ट्रॅक स्पॉटिफाय वर ऐकायचे ठरवले होते. तसा तो ऐकला. गाणे छान आहे. पण ओरिजिनलची सर नाही. म्हणून लेखन प्रपंच.

आयटम साँग हा बॉलिवुडचा एक भारी करमणूक प्रकार आहे. ही मला आवडतात. कारण ती कुठेही कधीही येतात. मोस्टली पुरुष प्रेक्षकांसाठी डिझाइन्ड असतात. जमेल तेवढा चावटपणा, थोडी मोकळी ढाकळी, उ भा भाषा, व ते चॅलें ज स्वीकारुन उत्तम पणे निभावुन नेणार्‍या आपल्या
तारका. एखादेच यशस्वी आयटेम साँग ; जे गो ड इनोसंट हिरवीण पुर्वी करु शकत नसे; तारकेला स्टार बनवुन टाकते ओव्हरनाइट. आपल्यातली पॉवर दाखवायची त्यांना एक संधी असते ही. यशस्वी गाणी नुसती बघायला येणारे पण प्रेक्षक असतात. तुम्ही कधी असा मंत्रचळे पणा केला आहे काय? पेश है मेरे टॉप टेन फेवरिट्स.

१) चोली के पीछे क्या है. : नर्तकी माधुरी( आपली) संगीत लक्ष्मिकांत प्यारे लाल व शब्द आनंद बक्षी. गाण्याची
सिचुएशन भन्नाटच आहे. ओजी खलनायक ह्याच्या कडुन माधुरीला काहीतरी सिक्रेट जाणून घ्यायचे आहे त्यासाठी हा नाचाचा प्रपंच!!! तिचा ड्रेस जबरदस्त फ्लेमिन्ग ऑरेंज- लाल रंगाचा आहे. व राजस्थानी दाग दागिने श्रिंगार आहे. त्यात ती ही थोडी लबाड थोडी इनोसंट अ‍ॅक्टिन्ग करते लाजवाब!! मागे काउंटर पार्ट नीना गुप्ता जी अनुभवी जरा वयाने मोठी आहे. व इतर नर्तकी पण हँडलुमचे घागरे चुनरी चोळ्या घालुन आहेत. त्यांच्या दागिन्यांच्या व गोंदणाच्या प्रेमात पडायला होते. गाणे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा देशाची झोप उडवली होती. अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली. त्या आधीच्या नायिका जरातरी हेल्दी असत. नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. संगीत तर एकदम एकदम रॉकिन्ग आहे. एस्प. माधुरी गायब झाल्यावरचा तालवाद्यांचा दंगा मुळातुनच ऐकण्यासारखा आहे. मी हे गाणे ऐकते जास्ती. पण झेपेल तेवढे बघा नक्की. पहिल्या कडव्यात माधुरीला एक झकास ढोलकीचा पीस देण्यात आला आहे. एक ही अ‍ॅक्षन व्हलगर नाही. सौतन बना ना जाए, जोगन रहा न जाए!! हा काय प्रॉब्लेम आहे हिचा. खलनायक तिला पन्नासच्या नो टा ऑफर करतो तेव्हा अंमळ हसूच येते. गेला तो जुना काळ .
https://www.youtube.com/watch?v=teCIQnIZXYw

२) कजरारे कजरारे: ऐश्वर्या, जास्त सांगणे न लगे. काळे डोळे. अप्रतिम दिसते व वैभवीने कोरिओ ग्राफ केलेला डान्स एकदम छान आहे. अगदी कमी दागिने आहेत. सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. सर्व पोरकट पणात मध्येच हा जालीम तडका येतो. ह्या नंतर अमिताभचा एक लै भारी जोक आहे तो ऐकून चित्रपट बंदच करते मी तर. तेव्हा ती घागरा थोडासा वर करायची अ‍ॅक्षन आधीच पॉप्युलर झाली होती बाबुजी धीरे चलो गाण्यात म्हणून ऐश्वर्याने ती आपण करुन बघावी असा आग्रह धरला असावा हे मा वै म. तन्वांगी सुंदरी व मोहक काळे डोळे. रुपगर्विताच ती. हे गाणे ही श्रवणीय आहे. नुसते बघणीय नाही.

https://www.youtube.com/watch?v=4dsFQFCvVGU

३) मुन्नी बद नाम हुई:
मलाइका अ‍ॅट हर बेस्ट. सुपर एनर्जॅटिक डान्स. व झंडू बाम ची एडिटोरिअल एं डॉर्स मेंट. मध्येच सल्लु भाई शिट्ट्या वाजवत पोलिस गाडीतुन येत असता. ओरिजिनल युपी फ्लेवरः शब्द जरा रिस्के वाटू शकतात पण चित्रपटात एकदम फिट होतात. दबंग ऑफ ऑल थिंग्ज. मलाइका वर छैया छैया पासून प्रेम आहे. मग काय कमी म्हणून सल्लु भाई येतात!!! तु अ‍ॅट्म बाँब हुई मेरे लिए. इंडीड!! गुड फन साँग. देसी पार्टीत नाच करायला मस्त आहे. डिजे ला सांगून ठेवा.

https://www.youtube.com/watch?v=83XfpQQ5qVA

४) बी डी जलाइले: परवा होली पार्टीत हे फार वाजले आमच्या इथे. पब्लिक बेहोश उन्हात नाचत होते. बिपाशा खुपच सॉफिस्टिकेटेड दिसते पण शी ब्रिन्ग्ज हर एनर्जी अँड अपील. गुलझारांचे लिरिक्स असल्याने मी काही बोलायची गरजच नाही. एंजॉय द डान्स. विवेक ऑबेरॉय पण किती तरुण व रसरशीत दिसतो. बिना जुर्म के हजूर मर गये ( बिचारे) सगळी मजा गंमत चालू आहे. पुढचे महाभारत घडायचे आहे. एक प्रणय दृश्य पण आहे. जस्ट वार्निग्न.
https://www.youtube.com/watch?v=XLJCtZK0x5M

५) नमक इस्क का: एकाच पिक्चर मध्ये दोन आयटम सॉन्ग का व ते इतके छान आहेत. हे मला जास्त आवडते. बिपाशा सुरेख सावळी दिसते. व तो घराण्याचा एकमेव दागिना तिने घातला आहे ज्या मुळे पुढचे संशयकल्लोळ नाट्य घडते. गुलझार इन नॉटी फॉर्म.

https://www.youtube.com/watch?v=NJ-N3OjTWA4

६) छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनियां: आपली उर्मिला!!! काय एनर्जी ने नाचते!!. ड्रे स अगदी साधा आहे व ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी. जी तिला फार शोभते. अगदी साधे सेटिन्ग आहे. आजुबाजुला चार म्हातारे नेहमी प्रमाणेच. मी हे लार्ज स्क्रीन वर बघि तले नाही. पण जोरदार इम्पॅक्ट असेल.
https://www.youtube.com/watch?v=1ZnPY1c3u_0

७) गुप चु प गुपचुपः आपली ममता कुलकर्णी. राजस्थानी सेट अप. व एक नॉटी स्टोरी आहे. पण शेवटी तसे काही घडले नाही. नर्तकी इनोसंटच आहे. जीव भांड्यात पडतो. ममता फा र गोड दिसते व नाचते. इथे पण एक जुजा म्हातारी आहे. जी उगीच नावाला पंचनामा करत आहे. जॉनी लिव्हर पण बाईचे कपडे घालुन आहे. व सलमान शारुख मागे काहीतरी बारुद गोळा लावायच्या गडबडीत आहेत. हे व्हिलन इतके कसे लंपट व बावळट. पण ते ही ममताच्या जादु मध्ये हरवुन जातात. इथे पण इला अरुण चा तडका आहे. चोली के पीछे ची धाकटी बहीण म्हणावे असे गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=EvOAmbPkSVs

८) तु लगावेलु जब लिपस्टिकः हे गाणे मी बघत नाही पण ऐकते. मजेशीर वाटते मला भोजपुरी आहे. लिं क देत नाही पण भारतात तरी फारच लोक प्रिय आहे. स्पॉटिफा य वर उपलब्ध आहे.

९) सलामे इश्कः ओजी रेखा व अमित. हा माझा सर्वा त फेवरिट मुजरा आहे. रेखे ने उमराव जान मध्ये एक वरची लेव्हल गाठली आहे.
इथे लता व किशोर आहे. दिल की चोट खाये हो तो गाना जरुर पसंद आयेगा. ऑसम लिरिक्स.

https://www.youtube.com/watch?v=0N6enWBR-FM

१०) महबुबा महबुबा: १९७५ मधील शोलेतील हेलेन चे नृत्य. इथे पण धरम पाजी व अमित मागे काही कारवाया करत आहेत. आम्हा ममव मुलांना हा एकदम कल्चर शॉक होता. हेलनचे उत्फुल्ल नृत्य. आर्डीचा आवाज. एकंदर नशीला माहौल. हा एकच रिलीफ आहे इंटरव्हल नंतर पुढे सर्व वाइटच होत जाते. जलाल आगा उत्तम फॉइल. दिलरुबा घेउन नाचतो. गब्बर च्या डोळ्यात सर्व पॅशन भरलेली आहे. वॉट अ व्हिलन बॅड गाय धिस वन. असे सौंदर्य नेहमी हाताबाहेर असते.

https://www.youtube.com/watch?v=ajIn2W5ZBi4

ऑनरेबल मेन्शनः झूठ बोले कौवा काटे डिंपल. कोळी मुलीच्या गेटप मधे असे दिलखेचक नृत्य केले आहे की भान हरपते. काय ती ज्वेलरी, काय तो आत्मविश्वास. तरी पहिलाच पिक्चर!!!

तर मं डळी एंजॉय करा ही प्ले लिस्ट. भर टाका पण काही आक्षेपार्ह लिहू नका ही विनंती. हे सर्व कलाकार आहेत लव्ह देअर पर्फॉरमन्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघु आचार्य इज म्हणींग द राईट
मानव पृथ्वीकर इज म्हणिंग द राँग
चित्रपटात घुसडलेलं आणि गाण्यापुरत्या आणलेल्या बाईने ( होय बाईच, नको तिथे एक्वलीटी आणू नये ) सादर केलेलं असलं तरच ते आयटेम साँग म्हणता येईल.
टेक्निकली स्पीकायचं झालं तर चोली के पीछे आयटेम साँग नाही. आता कशाला उद्याची बात ( मीच दिलं असलं तरी) आयटम साँग नाही. कारण ते मेन हिरोईन ने गायलंय.
विकिपीडिया हे काही ब्रह्मवाक्य नाही, पण तिथेही अशीच डेफिनिशन दिलीय.

पूर्वीच्या काळी आयटम गीत सादर करणारी बाई वेगळी आणि मुख्य कलाकार नायिका वेगळी असायची.कारण नर्तिका जे कपडे,हावभाव करायच्या ते कोणीही नॉर्मल घरातल्या बाईने करणे तत्कालीन प्रेक्षकांना झेपले नसते(याच कारणास्तव जुन्या लॉरेन्स ओलिव्हिए च्या 'रिबेका' मध्ये नायकाने एक्स वाईफ चा खून केला असं न दाखवता ती मेली आणि याने फक्त बोटीत डिसपोझ केली हे दाखवलं होतं.रिबेका च्या नंतर आधुनिक काळात आलेल्या प्रत्येक व्हर्जन मध्ये पुस्तकाला प्रामाणिक राहून नायकाने एक्स वाईफ ला गोळी मारलीय.)
नंतर आधुनिक काळात हे भेदभाव राहीले नाहीत, नाच हे परफॉर्मन्स म्हणून कोणाही घरातल्या नायिका स्त्री ला विदाऊट जजमेंट सादर करता यायला लागले आणि पैसे वाचवायला नायिका पण आयटम सॉंग करू लागल्या.
त्यामुळं आयटम सॉंग ची व्याख्या पूर्ण करून नायिका, पाहुणी कलाकार, नायक, बहीण, भाऊ आई वडील कोणीही सादर करावे.ते आयटम सॉंग राहील Happy
बापरे इतके प्रतिसाद मी एक धाग्यावर क्वचित लिहिले असतील.एकंदर निरुपयोगी विषयात डोके जास्त चालते.

अनु , धमाल पोस्टी.
सकाळी सकाळी 'मनाचे श्लोक' म्हणावेत तसं इथं काय नवीन आलं आहे बघितलं जातं.

आयटम साँगचे एकच कारण असते, sex sells ! स्वर्गाचा राजा इंद्र सोमरस प्राशन करत रंभा- उर्वशी यांचे आयटम साँगच बघत असेल, पृथ्वीवासी नोरा फतेही, मलैका अरोरा वगैरेंचे. आदीम भावना आहेत हाकानाका. Lol

आता कशाला उद्याची बात हे १. पूर्वीच्या काळी २. मुख्य कलाकार नायिकेने ३. नॉर्मल घरातल्या बाईने केले नसते असे कपडे, हावभाव करून सादर केलेले ४. तत्कालीन प्रेक्षकांनी झेपवून घेतलेले गाणे आयटेम साँग आहे असे म्हणणारे प्रतीपक्षाचे वकील वरच्या प्रतिसादात स्वतःला काँट्राडिक्ट करत आहेत ही बाब मी कोर्टाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो Happy

हो टेक्निकल आयटेम साँग्ज म्हणजे हेलन, तिच्या एक्स सूनबाई मलाइका, बिन्दु, अरुणा इराणी, पद्मा खन्ना , जयश्री टी. वगैरे लोकांची गाणी. , नवीन मधे कजरारे , प्रबुदेवा चे चिकबुकचिकबुक रैले / चिन्ता ता चिता /गो गो गो गोविन्दा, रुक्मिणी रुक्मिणी , माइया माइया , फेविकॉल से, मुन्नी , शीला , राम चाहे लीला, मला जाऊ दे, नोरा फतेही, सनी लिऑनी पब्लिक्॑ची गाणी जी कॅरॅक्टर्स सिनेमात नाहीत , फक्तं डान्स पुरती गेस्ट अपिअरन्स म्हणून येतात .
पण आजकाल डान्स नंबर = आयटेम साँग्ज अशी नवी डेफिनेशन आहे

एकंदरीत न्यायालयासमोर झालेल्या सर्वपक्षीय काथ्याकुटानंतर न्यायालयाचे असे मत झालेले आहे कि आयटम साँगच्या व्याखेबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सरकारने एक तज्ञांची समिती गठीत करावी. गठीत करणे हा वाकप्रचार योग्य आहे कि अयोग्य हे तपासण्यासाठी हपा समिती नियुक्त करण्यात यावी. या समित्या नीट काम करत आहेत कि नाही यासाठी आणखी एक समिती नेमण्यात यावी.
या तिन्ही समित्यांनी आपसात गोंधळ घातला तर त्यावर मायबोलीवर काथ्याकूट व्हावा ( हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीच्या बाहेरील असल्याने सध्या इतकेच. आम्हास सन्मानाने कारकीर्द पूर्ण करायची आहे).

मोरोबा, सध्या डिनरपश्चात झोपेने डोळे जड होत असल्याने तुमचे वाक्य खांद्यावरून गेले आहे, परत समजवा.

शूट आऊट ॲट वडाळा मधे बबली बदमाश है हे प्रियांका चोप्राचं पाहिलं आयटम साँग होतं
ओम शांती ओम मधलं दीवानगी आयटम साँग म्हणता येईल
तसंच हे बेबी चं टायटल साँग आणि मस्त कलंदर सुद्धा

मराठीत तो it/ hot factor नाही. 'चमचम करता नशीला बदन' होते सोनालीचे पण समोर संजय नार्वेकर. त्याने ॲव्हरेज झाले सगळे. ( निळू फुले सोडून) इथं बघणारे हपापलेले वाटतात, लंपट नाही. Lol तेच 'ऊं अंटावा' मधला पुरुष वर्ग कसला पर्फेक्टली हलकट दिसतो. आपण हलकटपणातही मागेच, छ्या!

Lol Thank you for proving my point.. आपली हलकटपणाची व्याख्या 'सत्तर रुपये वारणे, इस्राएलचे मधुमेहाचे औषध, लपून बनियनात (घालून ओतून नाही) चहा पिणे', आणि म्हणणारा पांढऱ्या झब्ब्यातला सुधीर जोशी.

मायबोली वर एक असा ग्रुप किंवा टोळी आहे कि त्यातल्या एखादीने एखादा लेख लिहिला तर त्यावर त्या टोळीतल्या बायका इतके सकारात्मक प्रतिसाद देतील की क्या बात है! अशा प्रतिसादांची मालिकाच सुरु होते. जिला प्रतिसाद लिहायला जमत नाही ती मम म्हणून मोकळी होतें, किंवा +१, +१११, +१११११ अशा दक्षिणा दिल्या जातात. मग तो लेख किंवा कथा कितीही टुकार वा भिकार असू दे, तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवते किंवा उष्ट्राणां विवाहेषु , गीतं गायन्ति गर्दभाः । परस्परं प्रशंसन्ति , अहो रूपं अहो ध्वनिः चा प्रकार असतो. आता या मामीने लिहिलेल्या लेखात काय शिकण्यासारखे आहे? उत्तान हावभाव? बीडी पेटवणे? स्तन लपवणे, की दाखवणे? मामी स्वतःच कॅबेरे डान्स शिकवत असाव्यात अशी शंका का येवू नये? सविनय विरोध कशाला? सरळ स्पष्ट सांगा कि लेख एकदम भिकार आहे.

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की ह्या टोळीचा
भाग असून देखील त्यातली काही मोजकी मंडळी समंजस, सुसंस्कृत, शालीन आणि खऱ्या अर्थाने शिकलेली आहेत. अशा सभासदांचे लेख आणि कथा वाचनीय असतात. प्रतिसाद मुद्देसूद असतात आणि प्रसंगी एखाद्याने लिहिलेल्या लेखात अधिकच्या माहितीची भर घालतात, संदर्भ देतात, चुका दुरुस्त करतात, प्रोत्साहन देतात. मायबोलीवर अशाच प्रतिभावान सभासदांसाठी यावे असे वाटते, परंतु अशा व्यक्तींची संख्या अगदी नगण्य आहे. १९ फेब्रुवारी रोजी मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा लेख लिहिला. त्याला मोजून एक प्रतिसाद आहे. विचार करा शिवाजी महाराजांच्या लेखावर मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या मायबोलीचा केवळ एक प्रतिसाद? माबोकरांची संख्या हजारात आहे त्यात केवळ एक प्रतिसाद? मायबोलीवर ही एकच व्यक्ती देशाभिमानी असेल. शिवाजी महाराज वाचणारी केवळ एक व्यक्ती आणि आयटेम साँग मिटक्या मारत वाचणारे शेकडो लोक? मायबोलीची उच्च प्रतीची पातळी ढासळू नये असे वाटते.

मामी स्वतःच कॅबेरे डान्स शिकवत असाव्यात अशी शंका का येवू नये?
>>
Admin इकडे लक्ष द्या. या बाईचा आयडी उडवण्याची वेळ मागेच आली होती पण तुम्ही फक्त लेख उडवलात. आता तरी योग्य कारवाई व्हावी ही अपेक्षा.

या बाईंनी लिहिलेला वर नमूद केलेला लेख वाचला, बाई झंदुत्ववाडी झोंबी कॅटेगरीत आहेत, लवकर उडतील तर बरे

Pages