मानसी

Submitted by mee_na on 9 June, 2009 - 21:04

दुपारची वेळ होती. टाईमपास म्हणुन काहीतरी वाचत पडले होते. धोंडो केशव कर्वे यांनी मुलींची शाळा काढ्ली. मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षण दिले. असे काहीसे वाचले.
खरच आज आपण त्यांची क्रुपा म्हणुन लिहायला, वाचायला शिकलो. नोकरी करु शकतो. पण खरेच स्व या शब्दाचा अर्थ किती मुलींना लग्ना आघी कळतो.
कालच अंजुची कथा एकली होती. अंजु, खुप हुशार. नामवंत बापची लाडकी लेक. अतिशय मनमिळाऊ. डॉक्टर झाली. २ वर्ष नोकरी झाली. मग आई बाबांनी छानसा मुलगा पाहीला एकुलता एक आणी लग्न लाऊन दिले. लग्नानंतर अमेरीकेत जायचे म्हणुन नोकरी सोडली. तिथे USAMLE च्या परिक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षांचे फी भरणे त्या मुलाच्या जीवावर आले. मग काय सारखे घालुन पाडुन बोलणे, येता जाता अपमान, मुलाकडुन आणी त्याच्या आईवडीलांकडुनही. तिला कळेचना. अरे मी तुझी बायको या घराची लक्ष्मी म्हणुन आले आणी हे काय. तिला कुठे माहीत होते लक्ष्मी घरात आणली ती लक्ष्मी मिळवण्यासाठीच. तिला कुठे माहीत होता स्व चा खरा अर्थ. तिला मिळणार्या शाब्दिक माराने बिचारी निराश झाली. मग हळु हळु भानावर आली तेंव्हा कुठे खरच कळले, की स्व म्हणजे काय. मुलींनी नोकरी करणे किति जरुरी आहे. नवरा आजचा काय पुर्वीचा काय, तो तसाच राहणार. तो बायकोसाठी थोडे जरी पेसे खर्च करायची वेळ आली की कुरकुरणारच. मग काय फरक होता तिच्या आणी मीनाच्या नवर्यात?
तिच गोष्ट मीनाची. मीनाची आई भांडे घासायची अंजुच्या घरी. मीना पण यायची शनीवारी, रवीवारी तिच्या आई सोबत. तिची आई मीनाच्या नावे चांगलीच ओरडायची शाळेत निट मन लावुन अभ्यास नाही करत म्हणुन. १२/ १३ वर्षाची होती मीना. नुकतेच मुलीचे स्री बनली होती. आणी एका मुलाबरोबर नको ते करुन बसली. तिला दिवस गेले. मीनाला आईने खुप रागवले. तर ती म्हणाली, तो लग्न करणार आहे. त्याने लन्ग केले. मीना मोठ्या आनंदाने आपल्या मुलाला घेउन आली होती. पण मग काही दिवसांनी कळले की तो मुलांचे सगळे निट करायचा. दारु अजिबात नाही प्यायचा. पण मीनासाठी काही करयचे म्हटले की जा आईकडे. मीनाची आई गर्वाने सांगायची. दारु पित नाही , मुलांचे सगळे करतो. मीनाचे मात्र मन खट्टु होते. मुल त्याची, मी नाही क कुणी ? ती नेहमी प्रश्न विचारायची, मुले पाहीजे म्हणुन लग्न केले मग आता बायकोने जरा काही मागीतले तर याच्या का जिवावर येते ? गोस्ट छोटीशीच वाटावी अशी. पण प्रत्येक वेळी आपण याचे कुणी नाही याची जाणीव करऊन देणारी.
तिच कथा स्वातीची. स्वाती BSC झालेली. नंतर computer चा course केला. आणी छान MNC मघे लागली. ८ वर्ष नोकरी केली. abroad ला पण जाउन आली. तिचे विचार पक्के होते, मनाला पटेल असा चांगला मुलगा मिळे पर्यंत नाही करणार नोकरी. तिला वाटायचे आपल्याला स्व चांगलेच कळले आहे. ३० वर्षाची झाली. तेव्हा एक छान मुलगा सांगुन आला. लंडनला रहायचा. एकुलता एक, मोठ्या घराण्यातला. स्वभावाने फार छानच वाटला. तिने तिन चार वेळा भेटुन खात्री केली. आवडलाच तिला तो. लग्न केले सहा महीन्यानी. त्या काळात फोन वर बोलणे internet वर बोलणे असे सगळे पाहुन पडताळुनच मग लग्न केले तिने. पण लग्न झाले आता fiance चा तो नवरा झाला होता. तिला नोकरी सोडावी लागलेली, दुसर्या देशात जाण्यासाठी. आता साघ्या साघ्या गोस्टीसाठी त्याला पौसे मागणे आणी त्याचे तिला नाही म्हणणे हे सुरुच. phone card तु pre paid घे तुला काही गरज नाही post paid ची. अरे पण मला आहे ना गरज ती म्हणे. अग राणी तेव्हढेच पौसे वाचतील. तुला काही गरज नाही पुर्ण महीन्याचा बस चा पास काढण्याची. अरे पण मला जावे लागते ना भाजी आणायला, GF कडे. काय गरज आहे GF कडे पॅसे खर्च करुन जाण्याची. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मन मारावे लागयचे. बर्याचदा त्या गोष्ती तिला नाही वाटायच्या त्याच्या बरोबर आहेत. ज्या गोष्टींसाठी तिला नाही म्हणायचा स्वतः मात्र तेच करायचा. अस्सा राग यायचा. पण सांगतेय कोणाला. मग कळले स्वतःचे पेसे स्वतः मिळवल्याखेरीज काही खरे नाही. पण स्वतःचे पेसे मिळवुन तरी काय होते आहे.
प्रिया छान नोकरी करायची. MNC मघे engineer. पगार कुठुन यायचा आणी कुठे खर्च व्हायचा हे तिला माहीतच नव्हते. १०/१२ हजार डॉलर कमवायची महीन्याला. पण पगार सगळा नवर्याच्या हाती. नवीनच लग्न झालेले. आघी आपण काही वेगळे करतो आहे किंवा चुक करतो आहे हे लक्षातच नाही आले तिला. तसा नवरा फार काही म्हणायचा नाही. छान होता तो असे तिला वाटायचे. काहीही हवे असेल तर तो त्याला जर योग्य वाट्ले तर आणुन देई पटकन आणी त्याला वाटले नाही तर समजवुन सांगे. एकदा ती गेली एकटीच बाजारी. तिला छान केळाचा stand दिसला. २ डॉलरचा stand तो. तिने घेतला. आणी घरी गेली मोठ्या आवडीने दाखवला नवर्याला. झाले गहजब झाला. का आणले कुणी खर्च करायला सांगीतले होते ? मला न विचारता कसे आणले ? अरे बापरे. तिला क्षणभर वाटले की तिने महाल बिहाल खरेदि केला की काय. २ डॉलरचा मेला तो stand वाटला म्हणुन घेतला तर काय मोठे. तिच कथा बर्याच घरात आई वडीलांना काही मदत करायला गेले किंवा काही गिफ्ट द्यायला गेले की होते. अरे.. पण मी नाही का कमवत... खरेच नुसते पेसे मिळवुन उपयोग नाही. आपल्या पायावर उभे राहणे म्हणजे काय हे नक्की नाही कळले अजुन पण शोघ सुरु आहे. ...

मायबोलीवर लोक असल्या topics ना भलत्या सलत्या प्रतिक्रीया देत सुटतात. मी या नंतर या लेखावर काहीही बोलणार नाही. मी माझे मत मांडले.. तुम्हाला आवडो वा न आवडो.

गुलमोहर: 

केळाचा स्टँड म्हणजे काय?

मी_ना, हे सत्य आहे, बर्‍याच ठिकाणी ओळखीत असे सुशिक्षित नमुने बघितलेत. बायको गृहिणी असेल, तर तिच्या घरकामाची, मुले वाढवण्याची किंमत शून्य केली जाते, वर ती नोकरी करून घरात पैसे आणत नाही याची तिला जाणीव वेळोवेळी करून दिली जाते.
तर नोकरी करणार्‍या मुलींना पण बरेचदा तू माझ्यापेक्षा कमी कमावतेस, किंवा नोकरी करूनही पैसे कुठे खर्च करायचे ही अक्कल तुला नाही असेही सांगितले जाते.
लक्ष्मी घरात आणली ती लक्ष्मी मिळवण्यासाठीच>>>> ही मानसिकता आजकाल बर्‍याच ठिकाणी दिसते. अर्थात हे मी पाहिलेले नमुने आहेत. बरेच लोक याच्या उलटही बघितलेत, ज्यांना बायकोच्या कष्टांची जाणीव असते आणि बायकोला खर्‍या अर्थाने 'अर्धांगिनी' म्हणून वागवायची समज असते.

अडमा, केळाचा स्टँड म्हणजे केळी अडकवून ठेवायचा. त्याला लाकडी बेस असतो आणि स्टीलचा हूक. त्यात केळी अडकवून ठेवता येतात.

१२/ १३ वर्षाची होती मीना. नुकतेच मुलीचे स्री बनली होती. आणी एका मुलाबरोबर नको ते करुन बसली. >> १२ - १३ वर्षांची मुलगी ?? Uhoh
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

मि_ना असतात अशी माणसेही. मी देखिल बघितली आहेत. जसं भाग्या म्हणते तसं चांगली देखिल असतात पण तू लिहीली आहेस त्या प्रकारची माणसे देखिल बरीच आढळतात.
माझ्याच ऑफिसला एक भारतीयच मुलगी आहे.. तीचा पण पूर्ण पगार तीला नवर्‍यालाच द्यावा लागतो. तीचे ATM card देखिल त्याच्याच जवळ असते. तीला जेव्हा पैसे लागतील तेव्हा त्याच्या परवानगीने तीला ते बँकेतून काढुन मिळतात. असे तीने मला सांगितले आहे.

ह्यात मुलींचाच दोष आहे संपूर्ण.. अन तू मुलगी आहेस, तुला कसही करून मान्-अपमान पचवून सासरीच रहायचे आहे तर सासरी मान खाली घालून रहा, उलटून बोलू नको, स्वाभिमान सुध्दा जपू नको असा कळत्-नकळत संस्कार देणार्‍या आईबापांचा/घरातल्या इतर मोठ्या माणसांचा सगळ्या सगळ्यांचा... Sad
मी इथ ठामेठोक बसलेला/बसलेली आहे, काहीही अडचण आली तुला तर, असा मॉरल सपोर्ट ज्या मुलींना मिळतो त्या इतक्या गरीब गाईंसारख्या वागणार नाहीत.. म्हणजे त्यांनी वाईट वागावे, शिंगं मारावीत अस मला अजिबात म्हणायच नाहीय्ये.. पण आपला आत्मसन्मान जपणे हे प्रत्येकाचे कर्तंव्य आहे, स्त्री असो वा पुरूष..
अन ही सगळी उदाहरणे मागल्या पिढीतली असावीत, हल्ली मला नाही वाटत मिळवती असो वा नसो मुलगी इतकं सहन करेल म्हणून.. करत असेल तर तिच्या अवस्थेला तीच जबाबदार..

मला एक विरुद्ध उदाहरण देखिल माहीत आहे.. ते म्हणजे नवर सर्व पैसे कमवून बायकोकडे देतो. त्याची सर्व बँक अकाउन्ट्स वैगरे बायकोच सांभाळते. त्याला बायकोला विचारुन पैसे काढावे लागतात Proud ..
बायको म्हणते कि त्याला अजिबात पैसे खर्च करायची अक्कल नाही आहे.. वेड्यासारखे तो खर्च करतो.
म्हणून तीच सर्व पैश्याचे व्यवहार मॅनेज करते. पण त्याला सुद्धा साधा साधा खर्च बायकोला विचारुन करावा लागतो.
म्हणजे दोन्हीही आहे. फक्त स्त्रीच बिच्चारी बिच्चारी असते असे देखिल नाही ,.. कधी कधी पुरुष देखिल बिच्चारा बिच्चारा असतो. Wink

ह्म्म्म्म. आहे खरं अशि उदाहरणं डोळ्यासमोर. आणि एक नाहि, बरिच.
या मुलान्च्या घरातलं वातावरण कारणिभुत असत असावं अशा प्रकारच्या वागण्याला.
अशा मुलान्च्या आई ला घरात कशी वागणुक मिळते, व्यक्ति म्हणुन आदर मिळतो का, व्यक्ति स्वातन्त्र जपलं जात का?
याच सगळ्या गोष्टी बघुन मुलं मोठि होतात. मग तिच वागणुक आपल्या बायको ला द्यायला जातात. तिथे गोचि होते. तरुण , शिकलेली , स्वतः चे विचार असलेलि मुलगी हे का सहन करेल?
मग होणारच वाद.

ह्म्म्म्म. आहे खरं अशि उदाहरणं डोळ्यासमोर. आणि एक नाहि, बरिच.
या मुलान्च्या घरातलं वातावरण कारणिभुत असत असावं अशा प्रकारच्या वागण्याला.
अशा मुलान्च्या आई ला घरात कशी वागणुक मिळते, व्यक्ति म्हणुन आदर मिळतो का, व्यक्ति स्वातन्त्र जपलं जात का?
याच सगळ्या गोष्टी बघुन मुलं मोठि होतात. मग तिच वागणुक आपल्या बायको ला द्यायला जातात. तिथे गोचि होते. तरुण , शिकलेली , स्वतः चे विचार असलेलि मुलगी हे का सहन करेल?
मग होणारच वाद.

या मुलान्च्या घरातलं वातावरण कारणिभुत असत असावं अशा प्रकारच्या वागण्याला. >>> अनुमोदन.
आपल्या आईशी आपले वडिल कसे वागतात, घरातली वडिलधारी मंडळी घरातल्या गृहिणीशी कशी वागतात याचा मुलांच्या मनावर नकळत परिणाम होत असतो. आणि तसाच त्यांच्या वागण्या बोलण्यात तो परावर्तित होत असावा. अर्थात आपला आत्मसन्मान जपणे हे बर्‍याच अंशी आपल्या हातात असते.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

अरुंधती, माधवी ह्यांस अनुमोदन!!!

मि_ना. तुझं ऑबझर्वेशन बरोबर आहे.अशी कित्ती उदाहरणं मी पण पाहिली आहेत. माझ्या शाळेत एक शि़क्षिका होत्या. यंग आणी उत्साही.. नवरा आणी सासू महा कुचकट. तिनी आपल्या पैशातून फ्रीज घेतला तर रागाने नवरा फ्रिजचे थंड पाणी प्यायला नाही वर्षभर.पण ती नेहमी आनंदी राहायची.छान नवीन साड्या बिड्या घ्यायची. पण नवर्याला कधी दाखवायच्या भानगडीत पडायची नाहीं. पण तिचीही नॅचरल इच्छा असणारच ना कि नवीन साडी नेसली कि नवर्याने कौतुक करावं . पण तिने अशा कित्येक सामान्य इच्छा मारुन टाकल्या असतील नै?मिळवत्या स्त्री ची ही कथा ,तर बाकीच्यांची कथा काय वर्णावी. खरच पायावर उभे राहणे म्हणजे नेमकं काय करणे?? आपला आत्मसन्मान राखणे हे फार महत्वाचे आहे.त्याचबरोबर आपल्या आधिकाराची आणी कर्तव्याची जाण असणेही तितकचं महत्वपूर्ण आहे.

-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

Happy Happy

बाकी लेखास अनुमोद्न.............