हम्पी

Submitted by योगेश आहिरराव on 24 April, 2023 - 08:11

हम्पी
Hampi.jpg
मागे दुपारी प्रकाश कुंटे यांचा २०१७ साली आलेला हम्पी झी टॉकीज वर पाहिला. चित्रपटाची सुरुवात ईशा ( लहान सोनाली) ... तर ती आपल्या आई वडिलांच्या घटस्फोट मुळे काहीशी डिस्टर्ब होऊन तिच्या मैत्रिणी सोबत हम्पी फिरायचा प्लान करते. मैत्रीण न आल्या मुळे ही एकटीच निघते. सुरुवातीलाच अंतर्वस्त्र वाळत घालताना तिची कबीर (ललित प्रभाकर) सोबत ओळख होते. जे कर्म धर्म संयोगाने एकाच लॉज मध्ये राहत असतात. खरंतर माझ्या वैयक्तिक मते या सीनची काहीच गरज नव्हती, उगाचच मराठी चित्रपट बोल्ड होतोय हे दाखवायचा फुकाचा अट्टहास. तो तिचा फोटो घेतो मग काहीशी व्यक्तिविशेष त्याची वही दाखवत त्यात लावतो. मग भेटी गाठी एकत्र फिरणं, हळू हळू प्रेमात पडणं हा चित्रपटाचा भाग.. हॅपी गो लकी या स्वभावाचा कबीर तर झाल्या प्रसंगामुळे काहीशी नाराज आणि धक्क्यातून सावरलेली नसलेली जणू काही चांगलं घडणारच नाही अशी धारणा मनी ठेवून असलेली ईशा.
मला स्वतःला वाटलं की हम्पी चा योग्य वापर सिनेमेटोग्राफर ला अजुन चांगल्या रित्या करता आला असता. इतकी हम्पी ची भव्यता आहे. १५-१६ व्या शतकातले सर्वात समृद्ध असे विजयनगर चे साम्राज्य. राजा कृष्णदेवराय.. शेकडो मंदिर आणि अनेक महाल वाडे तलाव सर्व काही त्यात या जागेला रामायणाचा पौराणिक संदर्भ सुद्धा आहे. सीतेचा शोध घेताना किष्किंधा नगरी हे वाली चे राज्य ज्याचा नंतर सुग्रीव वध करून राजा झाल्यावर रामाला मदत करतो. याच तुंगभद्रा नदीच्या पलिकडे एका अंजनी टेकडीवर हनुमानाचा जन्म झाला अशी अख्ययिका आहे. त्याच किष्किंधा नगरीत जवळच वालीचा किल्ला. इतिहासात नंतर बहमनी सुलतानांनी हे सारं साम्राज्य विध्वंस केले. बिदर शाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, कुतुबशाही या सर्व याच बहीमनी च्या शाखा, सारे एकाच माळेचे मणी. १४ व्यां शतकातील फारूखी राजवटी नंतर यांचा शिरकाव कसा झाला त्या बद्दल नंतर कधीतरी.. या सर्व शाह्या एकत्र येऊन जवळपास दिड वर्षे हे सुवर्ण हिंदू साम्राज्य लुटत जाळत तोडत होत्या. एवढं करून आता हे हम्पी पाहून डोळे दिपतात तर या आक्रमण होण्याआधी राजा कृष्णदेवराय ज्याच्या काळात एकदम पीक पॉईंट ला असताना कसे असेल याची कल्पनाच करवत नाही. असो.. आता थोड वर्तमानात येऊ. एकंदर चित्रपटात फोकस फक्त हम्पी मधील मुख्य देवाचे मंदिर अर्थातच विरूपाक्ष मंदिर. त्या मागील हेमकुटा परिसर. मंदिरा मागील तुंगभद्रा नदीचे पात्र तिथले काही लँड् स्कॅप भारी. बाकी विठ्ठल मंदिर तेथील जग्गनाथ पुरी येथील रथा सारखा रथ जो राजाने इथे हम्पी मध्ये बनवून घेतला तो तर मुख्य आकर्षण. राण्याचे महल लोटस टेम्पल तिथे ईशा चा डान्स. एक सीन मातंग टेकडी वर घेतला आहे. ईशा ची मैत्रीण, गिरिजा ( प्राजक्ता माळी) हीची एन्ट्री झाल्यावर चित्रपट वेग घेतो. तिचा वावर सहज आणि आवडणारा. इथल्या मोठ्या पाषाण शिळे भोवती थोडीफार फिलॉसॉफी उलगडत जाण्याचा कबीर प्रयत्न करतो. पर दुनिया मे किताना गम है पर उससे कही जादा मेरा गम है याच आविर्भावात ईशा असते. मोठे शब्द वापरून प्रसंगात जान आणली आहे अशाच एके ठिकाणी कबीर आणि ईशा मध्ये बाचाबाची होते. कबीर तिला इतरांच्या दुःखाच्या तुलनेत आपण सुखी आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण नाही... मग नेहमी प्रमाणे ईशा ला नंतर घडल्या प्रकरणाचे वाईट वाटते. त्याची माफी मागावी असे ठरवून दुसऱ्या दिवशी पाहते तर कबीर चेक आउट करून गायब. इथे गिरिजा ला परत जावं लागतं. मग सुरू होतो तो ईशाचा विरह मग त्याचा शोध घेत हम्पी मध्ये फिरणं. त्यांनी एकत्र घालवले क्षण ती आठवण. तिथल्या स्थानांची तिच्या मनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न चांगला जमलाय. तिथल्या ओळख झालेल्या व्यक्तींचा निरोप घेत हम्पी तून निघते. तोच वाटेत एका वरातीत हॅपी गो लकी कबीर नाचताना दिसतो. पुढे एकदुसऱ्याच्या प्रेमाची कबुली... चित्रपट संपतो.. जेमतेम दीड पावणेदोन तासातच...
कॉमन लव स्टोरी, बॅक ग्राउंड वर दाखवण्यासाठी खूप काही अर्थात पुन्हा हे माझेच मत. पण फार भट्टी जमून नाही आली. बाकी चित्रपटातील एक संवाद लक्षात राहतो. "पैसा है तो तिरुपती जाओ, पैसा कमाना है तो मुंबई जाओ, आंख है तो बेलूर जाओ, पैर है तो हम्पी आओ."

गेल्या काही वर्षेआधी भेट दिलेल्या माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्या हम्पी बद्दल हा छोटासा लेखन प्रयत्न...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा: . फारच सुंदर लेख. हम्पीच्या विशाल, भव्य, नयनरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या विरह आणि प्रेम कथात्मक चित्रपटाचे सुंदर रसग्रहण.