खेळ जुने-नवे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 June, 2009 - 06:44

आठवतात का पहा तुम्हाला तुमचे हे पुर्वीचे खेळ, पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता.

तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.

काही बैठे खेळ होते जसे बुद्धीबळ, सापशिडी, व्यापार, लुडो, कोडी घालणे, गोष्टी सांगणे ह्यातून मुलांचा बौधिक विकास होत होता.

आता काळ बदलला आई बाबा दोन्ही नोकरी करु लागले आहेत. मुलांना द्यायला खुप कमी वेळ आहे. नोकरी मुळे म्हणा की न पटल्यामुळे कुटुंबे विभक्त झाली आहेत. घरात जुने खेळ खेळण्यासाठी आजी आजोबा नाहीत, मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने नाहीत जागा अपुरी आहे मग मुलांना. ह्या धकाधकीच्या जीवनाचा फायदा उठवून जुने खेळ कालबाह्य ठरवून व्हीडीओ गेम, कॉम्प्युटर गेम, कार्टून फिल्मस ही ह्या परकीय खेळ, मनोरंजनांनी धुमाकूळ घातला आहे.

हल्ली जे कार्टून फिल्म दाखवतात ते लहान मुलांचे आहेत अस वाटतच नाहीत. त्यातील बरीचशी पात्र हिंसक असतात. काही फिल्मस मधे तर हिंदी-इंग्लिश चित्रपटांप्रमाणे प्रेमकहाण्याही असतात. काही पौराणीक फिल्मही चालू आहेत. हा चांगला उपक्रम आहे, पण ह्यातील बरीचशी माहीती बनावट असते. त्यामुळे मुलांना योग्य माहीती मिळत नाही.

हे खेळ, मनोरंजन कॉम्पुटर, टी.व्हीच्या स्क्रिनवर असल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर परीणाम होतच आहे शिवाय मुलांच्या मनावर आई वडीलांपेक्शा जास्त वेळ कार्टून, गेम मध्ये घालवल्यामुळे अशा कार्टून चे संस्कार मुलांच्या मनावर रुजत चालले आहेत. तासन तास ते खेळ आणि टीव्ही पाहील्यामुळे शरीराचा व्यायाम तर खुंटलाच आहे. मुल सुस्त, हट्टी बनत चालली आहेत.अर्थात ही समस्या प्रत्येक घरात असेल असे नाही. अजुनही बरीच एकत्र कुटूंब आहेत, विभक्त असले तरी आई वडीलांचा मुलांना पुरेसा सहवास आहे.

पुर्वी मुलांना वाचनाचे, मातीची भांडि बनविण्याचे, चित्रकलेचे, तिकीट जमा करणे, नाणी जमा करणे, कागदांच्या वस्तू बनवणे व इतर अनेक असे छंद होते ज्यातून त्यांची कल्पना शक्ती वाढत होती.

पण आता बाजारात रेडीमेड क्ले सकट साचे मिळू लागले आहेत. रंगित टॅटु मिळू लागले आहेत. रेडीमेड चित्र रंगवायला मिळत आहेत. त्यामुळे मुलांच्या कल्पना साचेबंद झाल्या आहेत. वाचनाची गोडी मुलांमध्ये कमी झाली आहे त्यामुळे मुलांना बोधपर गोष्टी, जनरल नॉलेज, इतिहासाची माहीती ह्याला मुकावे लागत आहे.

ह्या सगळ्यामध्ये दोष मुलांचा वा पालकांचाच आहे अस नाही म्हणता येणार. दोष परिस्थीतीचा आहे. पण ह्यातून ही समस्या पालकांमार्फत दूर होऊ शकते. जेवढा वेळ मिळेल त्यातून पालकांनी स्वतः मुलांबरोबर लहान होऊन जुन्या खेळांची माहीती द्यायला हवी. बोधपर गोष्टी सांगायला हव्यात. कुठले कार्टून चांगले आहेत ते निवडून द्यायला हवेत. स्वतःवाचून मुलांमध्ये वाचनाची गोडी मुलांना लावायला हवी. कुठल्या कलेत आपल्या मुलाला रस आहे हे ओळखून त्या कलेत त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.

चु.भु.द्या.घ्या.

गुलमोहर: 

जागु सहीच...मी तुला चावी द्यायचं काम केलय तर..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235

अगदी बरोब्बर आहे हा लेख!
खरच, अगदी असच होतय शहरातून

माझ्या घरी आमच्या बिल्डींगमधल्या आणि आजुबाजुच्या घरांमधल्या चिल्या पिल्यांची रोज जत्रा भरते. मी त्यांच्याशी त्यातलीच एक होउन खेळते. मी बर्‍याचदा 'हिप्पो' असते, जो त्यांच्या अंगावर धाऊन जातो. परवा पोरं म्हणाली 'आंटी, आम्ही आता बेन टेन असणार आणि तु 'रेड ड्रॅगन'. आम्ही तुला फाडुन मारणार...' देवा रे! विचित्र कार्टून्स बघुन तसं वागायला बघणार्‍या पोरांचं काय चुकलं? चुक आपली आहे.
तर, मी अशी खेळते तर त्यांच्यातल्या एकीच्या आईला फार आश्चर्य वाटल, 'तुम्ही खेळता मुलांशी असं?' असं म्हणजे? नसतं खेळाय्चं का? त्यांच्या मुलांना माझ्याकडे पाठवुन ह्या स्वतः त्यांच्या घरी फालतु मालिका बघत बसतात. अश्शी चीड येते.....
तुमचे तुम्ही खेळा म्हंटल्यावर पोरं विचारतात, 'काकु, कॉम्प्युटर लाव ना मग.' कशाला? गेम खेळायला. अरे म्हंटलं, पकडापकडी खेळा, लपाछपी खेळा... पोरं म्हणतात, 'आम्हाला बोर होतं. घाम येतो घाणेरडा.' आता बोला!!!

छान ग पल्ली, छानच करते आहेस तू.. Happy आमच्याकडेही सुट्टीत शेजारची तिन्ही मुलं असतात नेहेमी त्यांना हवं ते करायला, आयांना सासबहू सिरियल्स पाहायच्या असतात.. Sad मुलं मोठी असल्याने त्यांना आई नको असते कडमडायला ! मनी (म्हंजे माझी मुलगी) लहान असताना तिच्या सुदैवाने घरात तीन मोठी माणसे होती, मुलात मुल होऊन खेळायला तिच्याशी.. Happy
बाकी जागू, तू लिहीलस अशीच परिस्थिती आहे शहरांतून.. Sad
कामकरी आईवडिलांनी पण टीव्ही मोह सोडून मुलांना वेळ द्यायला हवाय..

योगिता, लिंबुदा धन्यवाद.
अनघा, पल्ली आमच्या घरी आम्ही जेवण उरकल्यावर माझ्या मुलीबरोबर आणि पुतण्याबरोबर पकडापकडी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर (माझ्या मुलीचा आवडता खेळ), रुमाल उडवी, मडका फोडी असे खेळ रोज खेळतो. मुलगीही रोज हट्ट करते ते खेळण्यासाठी. शिवाय संध्याकाळी तिची आजी तिच्याबरोबर काही खेळ खेळते. भातुकलीही खेळते.

जागू
आम्ही ठिकरी(फरशीचा छोटा तुकडा) नावाचा खेळ खेळत असू. मस्त एका पायावर लंगडी घालत एकेक घर पार करायचे.त्यात मनाची एकाग्रता, एका पायावर केला जाणारा बॅलन्स, ठिकरी योग्य त्या घरात फेकताना अचूक नेम अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. खूप जबर्दस्त मज्जा यायची.
आणि बसून खेळायच्या खेळात सागरगोटे(याला आम्ही गजगे म्हणत असू.) यातही बैठ्या खेळाची म्हणून जी काय मजा असेल ती अगदी पुरेपूर यायची.

आणि तू वर उल्लेख केलेले सर्व खेळ आम्ही खेळत असू.

जागु,
तुझ्याशी पुर्णपणे सहमत आहे. तु उल्लेखिलेले खेळ खेळणारी आपली पिढी शेवटची होती बहुतेक,
त्यानंतर सगळे कॉम्पवरच खेळ खेळू लागले. Sad

खरंय जागु. आजकाल मैदानी किंवा मोकळ्या हवेतले {?} खेळ म्हंजे क्रिकेट एके क्रिकेट, ज्याला भरपूर साहित्य, भरपूर जागा हवीच हवी! नाही, तर मग रस्त्यांवर करा वाहतुकीची गोची. घरात बसून बैठे खेळ खेळणं कुणाला आवडतं आजकाल? मग सुट्टी सुरू झाली, की मी काय करू? म्हणून भंडावून सोडायचं! आपल्या वेळचे खेळ आता इतिहासजमा झाले आहेत बहुधा!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

आपल्या वेळचे खेळ आता इतिहासजमा झाले आहेत बहुधा!>> का झाले? आपणच ते पुन्हा चालु केले पाहिजेत. नाहि का?

जागु, विषय छान आहे...

मी ह्याच विषयावर माबोवर लेख लिहीला होता. अगदी ह्याच सर्व खेळांचा उल्लेख होता माझ्या लेखात.
हि घे लिंक..

http://www.maayboli.com/node/5305

जागु. ही व्यथा बर्‍याच जणांची असणार.. तू त्याची मांडणी छान केली आहेस... पण हे बदल काळानुरुप होणारच होते आणि आता त्याला कोणीही बदलु शकत नाही.
................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?

जागु, रिया जेव्हा तु लिहिलेल्यापैकी खेळ पुण्याहुन शिकुन आली तेव्हा ती आमच्या सोसायटीतल्या तिच्या मित्र-मैत्रिणींना शिकवत होती तेव्हा एकजात सग़ळे तिच्यावर वैतागले की असले फालतु खेळ शिकवु नकोस, त्यापेक्षा तु घरुन गन घेऊन ये आपण टेररिस्टचा गेम खेळुयात.

पण तु लिहिलेले वाचुन मला माझे बालपण आठवले.

माझ्या लेकीला तिच्या मित्र मैत्रिणींना आपण खेळायचो ते खेळ अजुनही आवडतात.

काळा प्रमाणे थोडाफार फरक हा होणारच, पण अस सगळच पुसुन टाकल जात नाही. सगळा दोष परिस्थीतीच्या माथी मारुन आपण मोकळे नाही होऊ शकत.

सगळच राहील जसच्या तस अशी अपेक्षा करणही चुक पण म्हणुन सगळ पुसल जाण पण चुकच ना? मला हे खेळ कळले ते माझ्या आई मुळे, मग आजुबाजुच्या मैत्रिणींमुळे. मग माझ्या लेकीला पण ते शिकवायची जबाबदारी कोणाची? अर्थात माझीच. जागे अभावी काही खेळ नाही खेळता येणार पण बर्‍याच चांगल्या गोष्टी नक्कीच देता येतील.

वाचनाची आवड मुलांना लागायला आधी ती आपल्याला हवी. मुल आपसुक आपल अनुकरण करायला लागत अगदी न कळत्या वयापासुन. आपण रुजवायच तर काम करायच, निगा राखायची सगळच नाही पण १० तल्या ५ गोष्टी तर फळतील.

नविन गोष्टींमधल्या देखील सगळ्याच वाईट कुठे असतात. ९xn चॅनल पेक्षा कार्टुन नेटवर्क बर आहे की, नॅशनल जिऑग्राफीक, अ‍ॅनिमल प्लॅनेट कुठे वाईट आहेत. फक्त किती वेळ ह्या गोष्टींमधे रमु द्यायच हे आपण ठरवायच (ह्यातही आपणच जास्त रमत असु तर मुल तर रेंगाळणारच ना?) लहान असतानाच "वेळ घालवण्याचे, रमण्याचे" चांगले पर्याय उपलब्ध करुन दिले तर मुलं ह्या ईडीयट बॉक्स कडे फार फिरकत नाहीत हा माझा अनुभव आहे.

नोकरी करणारे आई बाबा, कमी वेळ देऊ शकत असतील पण जेव्हढा मिळतो तेव्ह्ढा वेळ सत्कारणी लावला तरी चांगल्या सवयी लावु शकतो.

मुलं ७-८ वर्षाची होई पर्यंत ह्या सवयी आपण जाणुन बुजुन लावु शकतो. आधी नाही लावल्या आणि टिन एज मधे जर एकदम त्यांना मोल्ड करायला गेलो तर तो बुमरॅन्ग होऊ शकतो.

अजुन बरच काही आहे मनात पण सार एकच - आपली जबाबदारी आपण उचलायची जुन्या बरोबर नव्यातलही चांगल शोधायला शिकायच आणि समन्वय साधायचा (आपल्या परीने)

'आम्हाला बोर होतं. घाम येतो घाणेरडा.' आता बोला!!!<<
राजाराणीला घाम हवा असं एक नाटक होतं त्याची आठवण आली.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!