Submitted by मोहिनी१२३ on 4 June, 2022 - 06:07
यु-ट्युब वर भाडिपाची B.E. Rojgar वेबसिरीज कोणी पहातंय का? छान आहे. विषय, कलाकार, अभिनय सगळंच मस्त. दर शुक्रवारी नवीन भाग येतो. आत्तापर्यंत ३ भाग रिलीज झाले आहेत. सई ताम्हणकर छान दिसतेय;छान अभिनय करतेय. बाकी दोघेही जबरदस्त.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खेडेगावातून शहरात शिकायला
खेडेगावातून शहरात शिकायला आलेली तरूण मुलगी एकाच घरात २ मुलांसोबत राहते, हे मला ही झेपलं नाही>> पण एकूणच तीचं कॅरेक्टर बिनधास्त दाखवलंय.. मेकॅनिकल एंजिनिअरींग केलेली, मामाच्या गॅरेजमधे काम करून गाड्या वगैरे दुरूस्त करण्यात एक्सपर्ट अशी टॅाम बॅाय इमेज दाखवली आहे प्लस ज्यांच्या बरोबर एकत्र राहताना दाखवलीए ते तीचे कॅालेज मित्रच आहेत म्हणून मला फार काही नवल नाही वाटलं.. बाकी सईने नागपूपकडचा टोन मस्त पकडलाय आणि पापड्याचं कॅरेक्टर पण जबरदस्त आवडलं
म्हणून मला फार काही नवल नाही
म्हणून मला फार काही नवल नाही वाटलं..
>>>>
प्रश्न पोरापोरींच्या मॉडर्न विचारांचा नाही तर त्यांच्या घरच्यांच्या विचाराचा आहे.
मुलगीच नाही तर ते मुलगेही असे एका मुलीसोबत राहायचा विचार करणार नाहीत असे त्यांच्या घरचे वातावरण दाखवले आहे.
अरे पण तिचे बाबा आलेले रूमवर
अरे पण तिचे बाबा आलेले रूमवर तेव्हा त्यांना पण धक्का बसलेला ना ती अशी मुलांच्यात राहते ते पाहून.
तिने घरी सांगितले नव्हते
ज्यांच्या बरोबर एकत्र राहताना
ज्यांच्या बरोबर एकत्र राहताना दाखवलीए ते तीचे कॅालेज मित्रच आहेत >>>+१ आणि पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे भाडे भरायला. मनात आले म्हणून एकत्र राहतात असे नाही दाखविले. घरी चालत नाही म्हणून त्यांना न कळवता राहतात.
धक्का बसणे वगैरे आणि पैसे
धक्का बसणे वगैरे आणि पैसे नाहीत हे कारण केवळ त्यांचे एकत्र राहणे कथेची गरज होते ते जस्टीफाय करण्यापुरते दाखवलेय. पण तरी ते तितके जस्टीफाय होत नाही. धक्का बसूनही राहणे चालूच असते एकत्र.
मी वालचंदला पेईंग गेस्ट म्हणून राहायचो तेव्हा तिथले घरमालक आम्हाला रूमवर अभ्यासालाही मैत्रीण आणू द्यायचे नाहीत. तिने येऊन मुक्कामाला राहणे तर दूरची गोष्ट. हे वालचंद सांगलीचे. हे कथानक घडते तो एरीया वेगळा असावा ते वेगळे. पण साधारण मराठमोळाच दाखवला होता.
ईथे मुंबईतही सोसायट्यांमध्ये नियम असतात की कॉलेजच्या पोरांना पेईंग गेस्ट म्हणून ठेवत असाल तर रूमवर मुली नाही आल्या पाहिजेत आणि व्हायसे वर्सा. नाहीतर अलाऊडच करत नाहीत बॅचलर लोकं.
एका पोरीला नवरा मारतो त्याने सोडू नये म्हणून त्याला हुंडा देणारे आपल्या मुलीला असे एकटे दोन मुलांसोबत कसे राहू देऊ शकतील. धक्का बसलेला दाखवले की राहायला मोकळे झाले का..
बरं सरजी, तुमचंच खर.
बरं सरजी, तुमचंच खर.
एक डाव माफी द्या, पुन्हा चुकूनही तुम्हाला प्रतिवाद करणार नाही
छे हो.
छे हो.
मला मालिका आवडली आहे.
आणि बघताना हे माझ्या लक्षातही आले नाही. मी उगाच आवडीच्या गोष्टीत लॉजिक शोधत नाही.
पण आता चर्चेत आलेय. विचार करतोय तर हे नॉर्मल आहे हे काही पटत नाही.
मी वालचंदला पेईंग गेस्ट
मी वालचंदला पेईंग गेस्ट म्हणून राहायचो तेव्हा तिथले घरमालक आम्हाला रूमवर अभ्यासालाही मैत्रीण आणू द्यायचे नाहीत. तिने येऊन मुक्कामाला राहणे तर दूरची गोष्ट. हे वालचंद सांगलीचे>> तू २० एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहेस .. आता बरेच बदल घडले आहेत
२० नाही १७ .. प्लीज वय ३
२० नाही १७ .. प्लीज वय ३ वर्षांनी वाढवू नकोस.
मला सिरीअल जिथे घडत होती तिथले कल्चर फार काही वेगळे वाटले नाही. त्या तिघांच्या घरातील वातावरण तर बिलकुल नाही.
एका पोरीच्या मारहाण करणाऱ्या नवऱ्याला हुंडा द्यायला म्हणून दुसऱ्या पोरीचे लग्न लावत आहेत आणि तू म्हणतेस वीस वर्षांनी काळ बदललाय
एका पोरीला मारहाण करणाऱ्या
एका पोरीला मारहाण करणाऱ्या पोरीच्या नवऱ्याची तक्रार केली म्हणून बहिणीच्या सुखी(!) संसारात विष कालवते म्हणून संबंध तोडणारे मुलगी दोन मुलांसोबत राहते हा धक्का मात्र पचवतात
एक मिनिट, तुमच्यापैकी कुणी
एक मिनिट, तुमच्यापैकी कुणी ground ० रिपोर्ट घेतलाय का? माझ्याकडे आहेत examples.. अगदी गेल्या 5, 6 वर्षातले.
एकदा तर मी स्वतः रूम शोधत असताना फेसबुक सारख्या ओपन फोरम वर मुलीनेच ad टाकलेली, ज्यात gender preference नव्हता काहीच.
फेसबुक सारख्या ओपन फोरम वर
फेसबुक सारख्या ओपन फोरम वर मुलीनेच ad टाकलेली
>>
ती मुलगी आपल्या बहिणीचा नवरा तिला मारहाण करतो त्याला हुंडा म्हणून लग्न करणारी आणि तिच्या घरचे बहिणीच्या नवऱ्याची तक्रार केली म्हणून तिला वाळीत टाकणारे असतील का हे चेक केलेत तर तो ग्राऊण्ड झिरो रिपोर्ट झाला.
सांगायचा मुद्दा हा की बिलकुल अश्या मुली असतात.
पण सिरीजमध्ये जसे त्यांचे घरचे वातावरण दाखवलेले ते पाहता शक्य वाटत नव्हते.
सईचे सोडा. उद्या त्या उरलेल्या दोन मुलांचेच आपापसात प्रेम दाखवले आणि थोडासा धक्का पचवून त्या दोघांच्या घरचे लग्नाला तयार झालेले दाखवले तर असे होते, आम्ही पाहिले आहे म्हणण्यात काय हशील आहे.
त्यांचा घरमालक कोण आहे बघता
त्यांचा घरमालक कोण आहे बघता त्याला जोपर्यंत भाडे मिळते तोपर्यंत १ काय १० मुली घरी आल्या तरी त्याला काही फरक पडत नसतो. तसेच धक्का बसला किंवा नाही बसला तरी ती कुठे त्यांच्याबरोबर गावी परत जाणारे. मुल ऐकत नाही म्हटल्यावर गप्प बसणारे काही पालक असतात. त्याउलट कितीही गरीब असो आपल्या मुलीला जावई मारतो हे कळल्यावर त्याला चोप देणारेही पालक असतात.
कदाचित १५-२० वर्षांपूर्वी
कदाचित १५-२० वर्षांपूर्वी मलाही मुले मुली एकत्र राहतात हे पाहून धक्का बसला असता पण आता नाही बसत. १२ वर्षांपूर्वी माझा भाचा अमेरिकेत एका पंजाबी मुलीबरोबर अपार्टमेंट शेअर करत होता. तेव्हा मी प्रथम असे प्रकरण ऐकले व पहिले. त्या दोघा फ्लॅटमेंट्सची घर नीट व स्वच्छ ठेवण्यावरून भांडणेही होत. पण बाकी केवळ फ्लॅटमेट एवढेच नाते असते हे तेव्हा पहिले. नंतर पण अशी भाडे वाचवण्यासाठी अनेक उदाहरणे पाहिली. मग ही सगळी नॉर्मल लाइफस्टाइल वाटू लागली . जर आपला इरादा नेक असेल तर काय हरकत आहे. फक्त एखादा weirdo फ्लॅटमेट नसला म्हणजे मिळविले.
भारतात अजून तरी इतके कॉमन नसावे. पण मुलामुलींना काही करण्यासाठी एकत्रच राहायला पाहिजे हे जरूरी कुठे आहे. ज्यांना काही संबंध ठेवायचे आहेत ते अगदी संस्कारी आई वडिलांच्या घरी आणि धाकात राहूनही करतातच की !
या सिरीज मध्ये प्रेमाचा अँगल नकोच दाखवायला. निखळ मैत्रीच असूदे त्या तिघांत.
सारन्ग साठेची सगळ्यात बकवास
सारन्ग साठेची सगळ्यात बकवास सिरिज म्हणजे ती कान्देपोहे वाली > +१११
मलाही बिलकुल आवडत नाही पण नेमके suggestion लिस्ट मध्ये येतेच ती. अगदीच बोर. आई आणि मीचाही आता कंटाळा आलाय. त्यात ती मुलेही आता लहान दिसत नाहीत.
घरमालक च मजा मारायला
घरमालक च मजा मारायला मैत्रिणींना आणत असतो त्याला कशाला काही प्रॉब्लेम
बाकी ती घरच्यांना जुमानत नाही हे तिने दाखवून दिलेच आहे आणि काही केलं मनाविरुद्ध तर ती कुठलेही पाऊल उचलेलं याची खात्री असल्याने घरचे फक्त धमक्या देण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही
बाकी खुद्द सर लॉजिक बद्दल बोलत आहेत हे पाहून गंमत वाटली
बाकी ती घरच्यांना जुमानत नाही
बाकी ती घरच्यांना जुमानत नाही हे तिने दाखवून दिलेच आहे >>> कुठे दाखवले? कधी दाखवले? रडत रडत लग्न करायला चालली होती ती.. ती दुसरी एक बाई सल्ला देते तसे मग काहीतरी पाऊल उचलते..
घरमालक च मजा मारायला मैत्रिणींना आणत असतो त्याला कशाला काही प्रॉब्लेम >>>> घरमालकालाही मैत्रीणीसोबत रोमान्स करायला गपचूप यांचे घर वापरावे लागते म्हणून तो राहायला परवानगी देतो. त्यांना हाकलून घर रिकामे करून त्या मैत्रीणीला बिनधास्त तिथे रोमान्स करायला आणता येत नाही. कारण तो ही घाबरत असतो.
कुठे दाखवले? कधी दाखवले?
कुठे दाखवले? कधी दाखवले?
तिचे वडील घरी येतात तो सिन पहा परत
मुळात आई आणि बहिणीला ती मुलांसोबत राहते हे माहितीच नसते
तिला जॉब नाहीये हेही नही
वडिलांना माहिती असते फक्त आणि ते गप्प रहातात
लग्न करायला तयार होते कारण तिला इमोशनल ब्लॅकमेल करतात
आई बहीण मिळून
तिचे वडील घरी येतात तो सिन
तिचे वडील घरी येतात तो सिन पहा परत>>+१
त्या सीनबद्दल लिहिलेय की वर
त्या सीनबद्दल लिहिलेय की वर
धक्का बसला असे दाखवले आणि त्यानंतर घेतले चालवून असेही दाखवले.
मुळात बहिणीचा हुंडा द्यायला मनाविरुद्ध लग्न करणारी सो कॉलड मॉडर्न मुलगी घरी न कळवता अशी मुलांसोबत राहायची डेअरींङ करते ईथपासूनच ते पटत नाही.
आणि घरचे जेव्हा मुलीला मारहाण करणार्या जावयाला हुंडा द्यायला तयार असतात तेव्हा त्यांच्या लेखी मुलीच्या आब्रूला किती महत्व असेल बघा. मार खा, पैसे देतो, पण परत येऊ नकोस नाहीतर लाज जाईल आमची.. पण शहरात पोरांसोबत राहा. तो धक्का पचवून घेऊ आम्ही. त्याबाबत आम्ही थोडे मॉडर्न आहोत
लाज जायचा संबंधच नाही. ती घरी
लाज जायचा संबंधच नाही. ती घरी आली तर तिला आणि असतील तर तिच्या मुलांना कोण पोसणार हा प्रश्न आहेच. ही पैसे तरी पाठवते आहे. मला माझ्या आयुष्याचे काहीतरी करू द्या म्हणते तरी आहे. जाऊदे!
हुंडा द्यायला मनाविरुद्ध लग्न करणारी >>> नाही करत ती लग्न. फक्त तोंड बंद करायला वैतागून हो म्हणते.
धक्का बसला असे दाखवले आणि त्यानंतर घेतले चालवून असेही दाखवले.>> वडिलांनी धक्का पचवल्याचे फारच मनाला लागलेले दिसत आहे. मुलगी पळून गेल्यावर धक्का बसणारे आणि मग तिचे सगळे चालवून घेणारे पाहीले नाहीत का आपण? नसतील तर मला माफ करा.
ऐकतच नाही म्हटल्यावर लोक सांगायचे सोडून देतात. तिच्या वडिलांनी तेच केले. मीही तेच करते आता. धन्यवाद.
लाज जायचा संबंध नाही, आणि
लाज जायचा संबंध नाही, आणि केवळ मुलीला पोसायला पैसे नाहीत म्हणून लोकं मुलीला मारहाण चालवून घेतात हे काही पटत नाही.
आणि वर पैसे देतात जे मुलीला पोसायला नसतात, पण जावयाने तिला पोसावे म्हणून असतात
नाही करत ती लग्न. फक्त तोंड बंद करायला वैतागून हो म्हणते. >>> सारे सोडून लग्न करायला जात असते. मग रस्त्यात तिला उपदेशाचे डोस मिळतात आणि परतते असे दाखवले आहे. अन्यथा जाऊन लग्न करायचेच होते तिला..
वडिलांनी धक्का पचवल्याचे फारच मनाला लागलेले दिसत आहे >>> ईथे माझ्या मनाला लागायचा प्रश्न कुठे येतोय,. फक्त विरोधाभास दाखवतोय. विचारांची सुस्पष्टता नाही वाटली.
छे हो. >>>>
छे हो. >>>>

असं कसं सर... माफी तर द्यायलाच लागेल. तशीही आज गुरुपौर्णिमा आहे, माफी दिल्याशिवाय पायचं सोडणार नाही तुमचे
सगळ्यांचेच विचार सुस्पष्ट
सगळ्यांचेच विचार सुस्पष्ट असतात ना, असायलाच हवेत. वाह!
केवळ मुलीला पोसायला पैसे नाहीत म्हणून लोकं मुलीला मारहाण चालवून घेतात हे काही पटत नाही.>>>तुम्हाला पटले नाहीतरी जगात असे घडत असते. तीही म्हणतेच आहे कि माझ्या अन माझ्या नवऱ्याच्या मधे पडू नको.
मग रस्त्यात तिला उपदेशाचे डोस मिळतात आणि परतते असे दाखवले आहे. >> तेच कोणीतरी समजावते आणि तिला दुसरा मार्ग सुचतो. जसे तिने तिच्या वडिलांना तिच्यापरीने समजावलेले असते मग ते घरी निघून जातात.
तुमचा टिपिकल मलाच सगळे माहित
तुमचा टिपिकल मलाच सगळे माहित आणि मी सांगतो तेच ऐका मोड सुरू आहे, तरीही थोडं लिहितो आता. मी जे फेसबुक ऍड बद्दल लिहिलं होतं तेवढं एकच नाहीये. पुण्यात कोथरूड पासून तर पिंपरी चिंचवड पर्यंत असे अनेक शेठ लोक आहेत ज्यांना घरात कोण राहतंय पेक्षा जास्त, नियमित भाडे कसे येईल एवढेच पाहिजे असते. बॅचलर फ्रेंडली घर शोधताना अगदी या सिरीज मध्ये दाखवलेय तसे घर, त्यात mutual understanding ने फ्लॅट share करून राहणारे तरुण तरुणी बरेच पाहिले आहेत. तुम्हाला पडलेत तसे बावळट प्रश्न मी विचारले देखील होते. एका घरात ३ मुली आणि २ मुलं होती, त्यातल्या एकाला चहा घेता घेता ते बावळट प्रश्न विचारले पण होते.
१. तुम्ही हे असं एकत्र कस राहता?- रेंट share होते. यातली एक आमच्या जिल्ह्यातली आहे, सोबत कोर्स करत होतो. PG मधल्या जेवणाला कंटालून मग रूम शोधला.
२. घरच्यांना माहित आहे? - मी आणि तो दुसरा मुलगा घरच्यांच्या लेखी PG ला राहतो. मुलींच्या घरचे काही इथे येत नाहीत. एकदा तिसरीची बहीण आलेली, तेव्हा आम्ही दोघे मित्राच्या रूम वर..
३. लिव्ह इन आहे कि काय मग अहं अहं मज्जा आहे तुझी! - तसं काही नाही आमच्यात- जस्ट फ्रेंड्स, उलट आमच्यात ज्याचा bf / ज्याची gf येते त्यांना मोकळेपणी एक रूम दिल्या जाते.
४. मालक राहू देतो का पण असं ? कि त्याला पण माहिती नाही तुम्ही असे राहता म्हणून? - त्यांना काही देणं घेणं नसतं.. मालकाच्या नावाने फक्त एक acc नंबर माहित आहे आम्हाला..
५. पण तरीही तुमचं गाव वगैरे म्हणजे एवढ्या मॉड वाटत नाहीत या मुली..- नाहीचेत, इलाज नाही म्हणून हे असं राहतोय. pg पेक्षा खर्च कमी पडतो, आणि आम्ही सगळे एकमेकांना बऱ्यापैकी ओळखतो., अवघडलेपण नाही.. (इथे त्याच्या तोंडावर जरा इरिटेटिंग भाव दिसले म्हणून आवरते घेऊन सटकलो मी.)
आता सिरीज मधला प्रसंग. सईच्या
आता सिरीज मधला प्रसंग. सईच्या वडिलांना माहिती नव्हते ती मुलांसोबत राहते असं. त्यांना तर तिची नोकरी गेल्याचेही माहित नसते. कंपनीच्या गेटचं कुलुप बघुन आलो असं म्हणतात ते. धक्का बसलेला असतो खरा पण मुलगी पार इकडे पुण्यात, इथल्या गोष्टी तिथे काय कळतील असाही विचार केला असेल त्यांनी काय सांगावे?
तुम्ही तिकडे सौथ बॉंबे, हि इकडे स ता साकारतेय ते पात्र विदर्भातल्या कुठल्यातरी गावातल्या, ST ड्राइवरच्या मुलीचे.. तुमच्यासाठी हे पोटापाण्याखातर, मायबापांनी दिलेल्या शिक्षणाचे पांग फेडायला मराठवाडा विदर्भातल्या, तुम्हाला नाव माहित नसलेल्या गावातून येणारे तरुण तरुणी एलियन आहेत, तरी या विषयात तुम्ही न पडलेले बरे.
अजून एक चमत्कारिक गोष्ट सांगू
अजून एक चमत्कारिक गोष्ट सांगू का? काही समाजात मुलींची संख्या इतकी कमी आहे कि मुलीच्या वडिलांना हुंडा मिळतो. जळगाव भागात एक लेवा पाटील समाज आहे. त्यातल्या शेतकरी तरुणांना लग्नासाठी स्वजातीय मुली मिळत नाहीत, दूर मध्य प्रदेश विदर्भातुन मुलीच्या वडिलांना पैसे देऊन कोणत्याही जातीची मुलगी ते लग्न करून घरी आणतात. अगदी असेच या सिरीज मध्ये नसले तरी, एके ठिकाणी लग्न केल्यावर पैसे मिळतील असा उल्लेख आहे. सदर पात्र वडा हे त्यात इंजिनिअर आहे. ती रिबेल आहेच पण आई आणि बहिणीने केलेले ब्लॅकमेल सहन न होऊन, शिवाय इतर मार्ग खुंटल्यावर ती लग्नाला तयार होते असे दाखवले आहे. असो..
अजिंक्यराव,
अजिंक्यराव,

मी जे लिहिलेय ते "मलाच सगळे माहीत आहे" या मोडमध्ये आहे आणि तुम्ही लिहिले आहे ते आणखी कुठल्या मोडमध्ये आहे हे कसे ठरवलेत
यावरून कळते की माझी पोस्ट वाचायच्या आधीच ती खोडायचा विचार करून वाचत आहात
तसेच दक्षिण मुंबईच्या लोकांना विदर्भातल्या लोकांबद्दल माहीत नसते हे जनरलायझेशनही गमतीशीर आहे

आता हे खोडायला मी आणाव्यात का दक्षिण मुंबईकरांच्या मुलाखती
(तरी तुमच्या माहितीसाठी म्हणून, गडचिरोली, सिरोंचा, आलापल्ली वगैरे भागात बांधकाम विभागात मी काम करून आठ दहा महिने राहून आलोय)
असो, मुद्यावर येऊया
आधी तुम्ही फेसबूक अॅडचे उदाहरण दिले. ते ईनवॅलिड होते, म्हणून आता कोथरूड परीसरातील उदाहरण दिले.. ठिक आहे.. पण खरे तर,
मी नाही तर मागच्या पानावर ईतर कोणीतरी लिहिले होते,
की कोथरूडात असे मुलामुलींना एकत्र रेंटवर राहू दिले हे पचायला जड आहे. त्यावरून ही चर्चा सुरू झाली होती.
तुम्ही म्हणता कोथरूडात असे घडते तर घडत असेल.
मला काही ऑब्जेक्शन नाही.
मी माझ्या एका पोस्टमध्ये म्हटले देखील आहे की तो कोथरूड भाग मूळ कसा आहे, मला बिलकुल कल्पना नाही.
पण सिरीजमधील मुले कुठल्या विचारांची दाखवलीत आणि त्यांच्या घरचे वातावरण कसे आहे, सईचे कॅरेक्टर कसे दाखवले आहे, तिच्या बहिणीचे, बहिणीच्या नवर्याचे वगैरे संदर्भ काय आहेत त्या अनुषंगाने हे पटत नाही, विरोधाभास वाटतो असे म्हटले होते. हे सगळे डिटेल सेम ठेवून कोथरूडच्या जागी मुंबई दाखवली असती तरी पटले नसतेच
बाकी तुम्ही जी चमत्कारीक गोष्ट म्हणत आहात की मुलीच्या वडिलांना हुंडा मिळतो ती मला तरी फार चमत्कारीक वाटत नाही. डिमांड असेल तर मिळणारच हुंडा. दूरचे उदाहरण कश्याला द्या, मी स्वतः माझ्या लग्नासाठी एकप्रकारचा हुंडा दिलाय
या सिरीजमध्ये मात्र एका मुलीसाठी हुंडा दिला जातोय तर तिच्या बहिणीसाठी हुंडा घेतला जातोय हे एकवेळ चमत्कारीक म्हणू शकता.
पण अर्थात,
सई आहे ती.. कोणीही देईल हुंडा
पण सिरीजमधील मुले कुठल्या
पण सिरीजमधील मुले कुठल्या विचारांची दाखवलीत आणि त्यांच्या घरचे वातावरण कसे आहे, सईचे कॅरेक्टर कसे दाखवले आहे, तिच्या बहिणीचे, बहिणीच्या नवर्याचे वगैरे संदर्भ काय आहेत त्या अनुषंगाने हे पटत नाही, विरोधाभास वाटतो असे म्हटले होते. >> बरं
पण सिरीजमधील मुले कुठल्या
पण सिरीजमधील मुले कुठल्या विचारांची दाखवलीत आणि त्यांच्या घरचे वातावरण कसे आहे, सईचे कॅरेक्टर कसे दाखवले आहे, तिच्या बहिणीचे, बहिणीच्या नवर्याचे वगैरे संदर्भ काय आहेत त्या अनुषंगाने हे पटत नाही, विरोधाभास वाटतो असे म्हटले होते. >> बरं बरं
Pages