The Woman in the House Across the Street from the Girl in the Window ची चीरफाड अर्थात स्पॉईलर्ससहीत

Submitted by मामी on 3 February, 2022 - 15:36

वरील लांबलचक नावाची नेफ्लि सिरीज आताच जस्ट संपवली.

स्पॉईलर अ‍ॅलर्ट ** स्पॉईलर अ‍ॅलर्ट ** स्पॉईलर अ‍ॅलर्ट ** स्पॉईलर अ‍ॅलर्ट

मालिका बघून झाली असेल तरच धागा वाचा. आधी वाचलात तर तुमच्या जबाबदारीवर वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅरडी आहे अशी समजूत घालून घेते.>>> असं म्हणलं की नावं ठेवता येत नाहीत.
स्वाती आंबोळे यांनी म्हटल्याप्रमाणे लॉजिक लावायचे नाही.
मला तर वाटतं, सीरिज बनवताना सस्पेन्स थ्रिलर म्हणूनच बनवली असेल. मग तयार झाल्यावर बघितली तर काहीतरी विचित्र प्रकरण वाटल्यामुळे ' पॅरडी आहे' असा पवित्रा घेतला असेल. Proud

कुत्र्यांचे portraits , pregnancy मध्ये अचानक फुलांची चित्रे काढायची उर्मी हे पण विनोदी

मला आपले मध्यमवर्गीय पडलेले प्रश्न, ही बाई काय काम करते की ढिगाने वाईन बाटल्या आणते. काय खाते आणि एवढं मोठ्ठं घर कशी चकाचक ठेवते. तो mailman नक्की काय करत असतो आणि असा कसा attic मध्ये राहतो आणि शेजारी कुर्‍हाड का घेऊन जातो. आणि मध्ये तो बदलला असं काहीतरी शेजारीण म्हणते ना, त्याचं काय होतं. ते tombstone वरचे सुविचार कसे बदलतात?

पॅरेडी आहे हे बहुदा सिरीज फसल्यावर ठरवले असावे Wink
मला जस्पाल भट्टीच्या ‘फ्लॉप शो ‘ मधला एपिसोड आठवला, जस्पाल भट्टी त्या एपिसोड मधे मुव्ही मेकर असतो, त्याला प्राइझ मिळतं , त्याचं सिक्रेट : ‘सर, हमने बनयी कॉमेडी थी लेकिन बेस्ट ट्रॅजेडी अ‍ॅवॉर्ड मिल गया‘.

पॅरडिच आहे. नांवावरुनं हिंट मिळायला हवी - गर्ल ऑन द ट्रेन, वुमन इन द विंडो या सिनेमांचे रेफरंस आहेत. अगदि फुल ब्लोन पॅरडि नाहि, स्केरी मुवि सारखा, पण बरेच सटल जॅब्स आहेत...

हो खरं.. मी ते सिनेमे नाही पाहिलेत त्यामुळे मला पहिले भाग आवडले, तिच्या मुलीचा प्रसंग सोडला तर. मला रहस्यभेद पटला नाही कितीही बुद्धी ताणली तरी.

वरची चर्चा वाचून न राहवून पुणे ५२ बघितला, सगळा त्रास सहन करत. दोन्ही चित्रपटांत खूप साम्य आहे. 'करायला गेलो गणपती आणि झाला मारुती' असा फील येतो. शिरीष कणेकरांच्या शब्दात 'तुम्ही पहिल्या अंकात जर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार हा वाजलाच पाहिजे. मग इथे सिनेमाच्या सुरुवातीपासून त्या माला सिन्हाला घागरीच्या घागरी पाणी भरून नेताना दाखवलं, ते काय बापाच्या दाढीसाठी? तुम्हाला माला सिन्हाची दोन चमचे अंघोळ नाही दाखवता येत?' अश्याच प्रकारे दोन्हींत इतके क्लूज नुसते लूज सोडलेत, त्याचं पुढे काय होतं ते कळतच नाही.

पुणे ५२चं 'द वुमन इन द हाऊस ...' व्हर्जन सांगायचं असेल तर असं म्हणायला लागेल की पुणे ५२ ही एक पॅरडी आहे.

बाय द वे ती गर्ल खून का करत सुटते.

बघणार नाहीये, आमच्याकडे नेफ्लि नाहीये पण उत्सुकता आहे म्हणून विचारलं.

अंजुताई ,ती सायको असते , पण त्याचं काही नीट स्पष्टीकरण नाही.
मला त्या दोघींची शेवटची फाईट बघून झपाटलेला मधल्या तात्या विंचूचा बाहुला आणि लक्ष्याची झटापट आठवली. फक्त ओम फट् स्वाहा ऐवजी Casserole होतं.. ....

मला त्या दोघींची शेवटची फाईट बघून झपाटलेला मधल्या तात्या विंचूचा बाहुला आणि लक्ष्याची झटापट आठवली. फक्त ओम फट् स्वाहा ऐवजी Casserole होतं.. >>> हाहाहाहा खूप हसतेय हे वाचून आणि इमॅजिनून!

काही अ आणि अ आहे सिरीज.
ती मुलगी मेलेली दाखवली आहे ना शेवटी..मग ह्या अ‍ॅना ला निर्दोष कसे काय सोडवतात ? ..कोण विश्वास ठेवेल का ..की ती मुलगीच खून करीत होती म्हणून...?
सधारण लहान मुलांना च बेनेफिटॉफ डाऊट मिळणार ना?
आणी शेवटी काय...? ती भयानक को पॅसेंजर....... ए२ सीट वरची......त्याचे? सिक्वेल ची तयारी?

त्या मदतनीस वाचतो ना हल्ल्यातून, त्याने साक्ष दिली असेल अशी समजूत करून घेतली मी.

अंजुताई ,ती सायको असते , पण त्याचं काही नीट स्पष्टीकरण नाही. >>> ओहह, असं आहे का, धन्यवाद अस्मिता.

त्या मदतनीस वाचतो ना हल्ल्यातून << हो तिचा नवरा म्हणतो हॉसपिटल मधे की तो मदतनीस वाचला नसता तर तुझ्यावर सगळे आले अस्ते..

मला अजुन ही असे वाटते की हे सगळे तिचा नवरा तिच्याकडुन हे करुन घेतो. ९ वर्षाच्या मुली कडुन हे सगळे होण अशक्य आहे..

तिचा नवरा तिच्याकडुन हे करुन घेतो>>त्याचा काय फायदा?.
त्या गफ्रे च्या प्रेताचे तुकडे आणि विल्हेवात वडिलांना न कळू देता तर निव्वळ अशक्य आहे काहिहि

क्रिस्टन बेल 'द गुड प्लेस' मध्ये प्रचंड आवडली होती. इथेही छानच काम केलंय. गुणी अभिनेत्री आहे. आधी मला वाटलं तो चिडीच इथेही तिचा नवरा आहे की काय.->+१
माझ्या बायकोने अन्दाज लावलेला की ती मुलगीच खुन करत असेल. बायको सायको आहे अस वाटतच होत मला...आता खात्रीच पटली. Happy
मला त्या दोघींची शेवटची फाईट बघून पण हसु आलेल. मि म्हणालो पण बायकोला कि हे नन्तर खुप हसले असतील.
राज म्हणतात तसे पॅरडिच असेल त्या सिनेमान्ची तर ठिक आहे ..नाहितर फारच गन्डलेली आहे.

गेल्या आठवड्यात ही मालिका बघितली...अ आणि अ पणा बघून अवाक झाले आणि एक दु:स्वप्न बघितलं असं ठरवून विसरून जाऊ म्हणून कोणाशी चर्चा करण्याच्या भानगडीत पण नाही पडले. पण... पण...पण...आज दुर्देवाने हा धागा ऊघडला...
आता डोकं फोडून घेतेय परत...!!!

त्या गफ्रे च्या प्रेताचे तुकडे आणि विल्हेवात वडिलांना न कळू देता तर निव्वळ अशक्य आहे काहिहि>> हो ना... तिने विल्हेवाट कशी लावली, काही दाखवलंय का?

Pages