माझी प्रिय......"

Submitted by अक्षता08 on 30 January, 2022 - 01:33

बोगनवेल / कागदी फुलं ही माझी अतीव प्रिय फुलं आहेत. रस्त्यावरून जाताना, कुठेही फिरताना त्यांचा बहर बघितला की हे सुद्धा फुलझाड आपल्याकडे असावं असं वाटायचं (असं तर सगळ्याच झाडांबद्दल वाटतं). बोगनवेलीला इतर झाडांच्या तुलनेने मोठी कुंडी लागते आणि बाल्कनीमध्ये एवढ्या मोठ्या कुंडीसाठी जागा करणे जरा कठीण काम आहे. परंतु, बोगनवेल लावायचा मोह आवरला नाही आणि एक प्रयत्न करून बघण्यासाठी झुपकेदार बोगनवेल लावली. बोगनवेलीसाठी ३५ cm व्यास असलेली कुंडी वापरली ( जेवढी मोठी कुंडी वापरता येईल तेवढी वापरावी ) आणि त्यातच गुलाबाचे रोपटे लावले ( सहसा एका कुंडीत मी दोन झाडं लावते). बोगनवेलीला पाणी कमी लागत. परंतु, त्याच कुंडीत गुलाबही लावला असल्याने एक दिवसआड पाणी देते. प्रथमतः बोगनवेल N-E दिशेला ठेवली होती तोपर्यंत फूलं फूलली नाहित फक्त झाडाची वाढ झाली. नंतर S-W दिशेला कुंडी ठेवल्यावर तीन-चार महिन्यात बोगनवेल बहरली.

बोगनवेलीला सुगंध नसतो पण काटे असतात. परंतु, त्याचा बहर बाल्कनीमधून बघणं म्हणजे सुख. बोगनवेल खरं तर खूप सोप्प फुलझाड आहे. परंतु, फुलं यायला, ते झाड कुंडीत रुजायला फार वेळ लागतो.
बोगनवेलीला पाणी कमी लागतं. त्यामुळे दोन-तीन दिवसातुन एकदा पाणी द्यावे. खत दिले नाही तरी चालण्यासारखं आहे. परंतु, पंधरा दिवसातून एकदा जीवामृत द्यावे. बोगनवेलीचा बहर सरल्यावर त्या फांद्यांची छाटणी करावी. कुंडी medium to large आकाराची वापरावी.

एक वर्ष वाट बघितल्यावर मला तिने दर्शन दिले. परंतु, वाट बघितल्याचं सार्थक झालं.

& She bloomed !

IMG20220129163125-01_0.jpegIMG20220126181315-01_0.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख
छान वाटतं हि फुलं बघायला.

छान
मलाही आवडतात ही फुले बघायला
पण नाव नव्हते माहीत. आज समजले Happy

बोगनवेल माझ्या आईचं अतिशय आवडतं झाड. आई गेल्यावर पुण्याच्या स्मृती वनमध्ये बोगनवेलीची झाडं लावली होती तिची आठवण म्हणून. माझ्या माहेरी ( एन आर सी ला) बोगनवेलीचा खुप बहर असायचा. आणि सगळे रंग खुपच छान दिसतात याचे.
अक्षता सुरवातीचा फोटो खुपच आवडला. आणि लेख पण. बोगनवेल म्हंटली कि आईच आठवते मला Happy

@mrunali.samad, @ऋन्मेऽऽष
धन्यवाद Happy

@स्वस्ति
२ वेळा फांद्यां रुजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी न झाल्याने शेवटी नर्सरी मधून रोपट आणल.

@SharmilaR
(मला पण आवडतात ही फुले बघायला) Happy Happy

@धनुडी
धन्यवाद Happy
(बोगनवेलीचा खुप बहर असायचा) किती छान !!
(बोगनवेल म्हंटली कि आईच आठवते मला) Happy
आई म्हणल की मन हळवं होत....