कलर्स वाहिनीवरील नवी मालिका "तुझ्या रूपाचं चांदणं"

Submitted by Sharadg on 16 December, 2021 - 11:27

ही नवी मालिका कलर्स वर 27 दिसेम्बर पासून रात्री चालू होतीय.
पण प्रोमो पाहूनच वाटतंय की खरंच ही मालिका महाराष्ट्रात घडतीय? आपला महाराष्ट्र 2021 मध्ये असा आहे?

त्रास होतोय प्रोमो पाहून.

Group content visibility: 
Use group defaults

रेसिस्ट अ‍ॅट अनदर लेव्हल, टोटली राँग ऑन सो मेनी लेव्हल्स…
मुळात सुंदर्=गोरे, कुरुप = काळे, त्यासाठी कोळसा फासणे.. सिरीयसली ??
शक्य तितक्या लोकांनी निषेध नोंदवा कलर्स पेजवर.

हिंदीत अशी एक मालिका येऊन गेलीय.
प्रोमो पाहून त्रास होतोय, तर मालिकेसाठी मुद्दाम वेगळा धागा काढून प्रमोशन का करावं?

गरीबी + सौंदर्य हा शाप समजला जाते हे खरं आहे. यामुळे मुलींची शिक्षणं थांबवणे, लहान वयात लग्न करून देणे वगैरे प्रकार घडतात हेही ऐकून माहितेय. पण प्रोमो अतर्क्य आहे. आणि मुलींविषयी वाईट नजर बाळगणार्या लोकांना फक्त स्किन कलरविषयी हव्यास असतो ही समजूत लेखक/दिग्दर्शक मानसिकरित्या बिगरीत असल्याचे दर्शवते.

अजून एक ट्रेलर आलाय

मुलगी काळी आहे म्हणून अपशकुनी असा काहीतरी.. पुर्ण ट्रेलर पण पहावला नाही Sad

अत्यंत फालतू प्रोमो...
भारतात हा प्रकार चालतो... कितीही म्हणा.... गोरीच बायको हवी असे कित्येक लग्नाळू मुलांचा करायटेरिया असतो...
कटू आहे पण वास्तव आहे... नाकी डोळी सुंदर असेल तरी रंग पाहिला जातो... उगाच फेयर आणि लव्हली इतकी खपते का भारतात???

waastavachi पुनरावृत्ती karnyat kay point ahe. स्त्रियांना स्वतःला मुक्त करण्याचा पर्याय आहे आणि ते अंमलात आणण्यासाठी त्या कशा मजबूत होऊ शकतात हा संदेश जायला हवा का?