Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>अरे कुठे पाहताय तुम्ही?
>>अरे कुठे पाहताय तुम्ही?
कलर्स मराठी
अरेरे. ऑनलाईन लिंक नाहीये का
अरेरे. ऑनलाईन लिंक नाहीये का पहिल्या सिजन सारखी कुठे?
माझ्या घरी TV नाहीये त्यामुळे मोबाइल के भरोसे आहे
रि, आपण उद्या वूट वर बघू :p
रि, आपण उद्या वूट वर बघू :p
चालेल
चालेल
फत्तेशिकस्त फेम वाघमारे >>>
फत्तेशिकस्त फेम वाघमारे >>> ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे.
सगळ्या बॉडी बिल्दरची पलटण
सगळ्या बॉडी बिल्दरची पलटण बघता ,बिग बॉस कमी आणि रोडीज जास्त होइल असे वाटतय.
अरेरे मला नाही पाहता येणार.
अरेरे मला नाही पाहता येणार. थोडेफार इन्स्टा किंवा युटूबवर क्लिप्स बघता येतील. यावेळी फार कोणी माहितीचे नाहीयेत.
पण स्नेहा वाघ नक्की मेघा दाढेला कॉपी करणार. ती सर्व हिंदी मराठी बिग बॉस फॉलो करायची, ट्विटर वर ऍक्टिव्ह असायची, त्यामुळे नक्की तयारीने आली असणार. बघूया माझा अंदाज बरोबर ठरतो का !
अक्ष् य वाघमारे आमच्या
अक्ष् य वाघमारे आमच्या सिनिअर सरांचा मुलगा. नक्की त्याला फॉलो करणार.
अरेरे
अरेरे
काल ती मीरा जयसोबत का भांडत
काल ती मीरा जयसोबत का भांडत होती?
अक्षय दादा कोंडकेचा नातेवाईक
अक्षय दादा कोंडकेचा नातेवाईक आहे असं सांगितलं काल
सगळे टगे आहेत.
सगळे टगे आहेत.
मुळूमुळू गायत्रीला पहिल्या आठवड्यातच पाठवतील घरी.
भांडण पाहिजेच. सगळे
भांडण पाहिजेच. सगळे गुणगोविंदयाने नांदायला लागले तर शो कोण बघेल?
जय दूधाणे आणि स्नेहा वाघ
जय दूधाणे आणि स्नेहा वाघ आमच्या गावचे आहेत. काल महाड वाई असं काहीतरी बोलत होते.
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक दिसली.... तिला पाहिल्यावर मेघा पुन्हा आली असंच वाटलं... अजून कोणाला वाटलं का असं?
मला वाटतंय जय जिंकायला पाहिजे
मला वाटतंय जय जिंकायला पाहिजे.
उत्कर्ष शिंदे जिंकणार 101%...
उत्कर्ष शिंदे जिंकणार 101%...
colors मराठीचा माणूस...
ठरले असावे आधीच..
पण एकंदरीत स्पर्धक पाहता हाय वोल्टेज ड्रामाला
तुटवडा नसणार हे नक्की
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक दिसली.... तिला पाहिल्यावर मेघा पुन्हा आली असंच वाटलं... अजून कोणाला वाटलं का असं?>>>>>अगदी अगदी मलाही तसेच वाटले
दारव्हेकर सोडला तर कोणाचेच negative vibes नाही आले...
स्पर्धकांचे फोटो टाका कोणीतरी
स्पर्धकांचे फोटो टाका कोणीतरी.
ॲानलाईन कुठे बघायला मिळेल?
मी इथे येऊन वाचत जाईन.. रोज
मी इथे येऊन वाचत जाईन.. रोज आरडाओरडा नि घसा कोरडा.. बघायला जमणार नाही.. मला पण उत्कर्ष वाटतोय.. एकदम डिप्लोमॅटिक
हिना च्या जागी मीनल ला घेतलंय
हिना च्या जागी मीनल ला घेतलंय आणि शिवानीच्या च्या जागी मीरा जगन्नथ ला.. आधीपण सुरेखा आणि आतापण सुरेखा..
>>स्नेहा मध्ये मला मेघाची झलक
>>स्नेहा मध्ये मला मेघाची झलक दिसली.... तिला पाहिल्यावर मेघा पुन्हा आली असंच वाटलं... अजून कोणाला वाटलं का असं?
हो मोक्षू, मलापण वाटले असे!! मेधा इतके पोटेन्शिअल आहे की नाही ते कळेलच पुढे!
>>आधीपण सुरेखा आणि आतापण
>>आधीपण सुरेखा आणि आतापण सुरेखा
आणि थत्ते कोण?
मेघा आणि स्नेहा चांगल्या
मेघा आणि स्नेहा चांगल्या मैत्रिणी आहेत.
गायत्री मला पहिल्या सिझनमधल्या रड्या जुई गडकरीसारखी वाटते.बघू काय करते ते.
पण कलर्सचा एकतरी हिरो फायनल मध्ये पोचतो.सिझन 1 मध्ये आस्ताद काळे,सिझन 2 मध्ये वीणा ,आता सिझन.3 मध्ये विकास पाटील आहे.
स्नेहा वाघ मेघासारखी वाटली
स्नेहा वाघ मेघासारखी वाटली खरी जरा. बघू या. तो दारव्हेकर इरिटेटिंग वाटला. मीरा इज अ प्लेयर डॉ उत्कर्ष इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटले. सगळ्याच बाबतीत पोटेन्शियल आहे त्याच्यात, आणि " पब्लिक ला लाइकेबल" फॅक्टर पण असावा.
शिवलीला ताई आणि तृप्ती ताई त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दादा वाटत असल्या तरी बिबॉ च्या घरातल्या ड्राम्यात जास्त टिकणार नाहीत असा माझा अंदाज. गायत्री उगीच गोग्गोड आणि बोरिंग वाटली.
बाकी फिट आणि हँडसम हन्क्स बरेच आहेत टास्क्स चांगली टफ द्या म्हणावे बिबॉ ला.
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक दिसली.... तिला पाहिल्यावर मेघा पुन्हा आली असंच वाटलं... अजून कोणाला वाटलं का असं?
<<
हो आणि मेघा तिला सपोर्ट करतेय, मी मेघाच्या स्टोरीला रिप्लाय देऊन सांगितल कि ही तुझ्या सारखी वाटतेय तर मेघाने चक्क रिप्लायही दिला ‘she is my soul sister’
मला यावेळी स्पर्धकांची डायव्हर्सिटी फार म्हणजे फार आवडली आहे , सगळे गेम साठी तयार आहेत, वेळ वाया न घालवता गेम सुरु होईल डे १ पासून , पहिल्या सिझनच्या आडाणी लोकां सारखे कोणी लोळत पड्णार नाही!
अत्ताच्या बिगबॉस ओटीटी मधे जसे सिझन लहान असल्य्सने स्पर्धकांना वेळ वाया घालवून चालणार नाही माहित होते, लिट्रली स्टेज वरच्या एंट्री पासून गेम खेळायला पंगे घ्यायला सुरवात केली होती स्पर्धकांनी , तसच या सिझनच्या स्पर्धकांनाही कल्पना आहे , मज्जा येणार !
मला पोटेन्शिअल वाटलेले स्पर्धक :
जय दुधाणे
मीरा जगन्नाथ
स्नेहा वाघ
उत्कर्ष शिन्दे
सुरेखा कुडेची
अक्षय वाघमारे
मीनल शाह
Btw most men are fit and women chubby !
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/bigg-boss-marathi-3-...
इथे दिसतील फोटो. Sonalisl.
>>Btw most men are fit and
>>Btw most men are fit and women chubby !
होय की!
मला आवडलेले: अक्षय, सोनाली, स्नेहा
दादूस आणि अविष्कार पण मनावर
दादूस आणि अविष्कार पण मनावर घेतील आता.
कुडची आणिस्नेहा सोडल्यास बाकी बायका पण ठीक वाटल्या
मोमो आज किती कटकट करत होती.
मोमो आज किती कटकट करत होती. शिवलीलामध्ये दम आहे अस वाटत. तिला पोहताही येत. कुणाचाही आधार न घेता ती स्विमिन्ग पूलमधून बाहेर पडली. मोमो आणि तृप्ती मात्र पाण्यात उडी मारायला घाबरत होत्या.
स्नेहा आविष्कारला बघून ऑकवर्ड झाली होती रविवारी. आज आविष्कारने तिच्यासाठी कविता केली होती वाटत.
मला पोटेन्शिअल वाटलेले स्पर्धक :
जय दुधाणे
मीरा जगन्नाथ
स्नेहा वाघ
उत्कर्ष शिन्दे
सुरेखा कुडेची
अक्षय वाघमारे
मीनल शाह>>>>>>>> सहमत. विकास पाटील सुद्दा चान्गला खेळेल अस वाटत.
स्नेहा मध्ये मला मेघाची झलक दिसली.... तिला पाहिल्यावर मेघा पुन्हा आली असंच वाटलं >>>>>>>> सेम पिन्च
विशाल निकम शिवची कॉपी करतोय अस कुणाला वाटत नाही का?
गायत्री जयबरोबर कनेक्शन जुळवायचा प्रयत्न करतेय.
दादूस पहिल्याच आठवडयात जाईल जर ह्या आठवडयात एलिमिनेशन असेल तर.
अजून सोळावा स्पर्धक यायचाय.
Pages