कुणी तरी कधी तरी मला विचारल तुम्हाला किती भाषा येतात. तशा खूप, पण खर म्हणजे एकही समजत नाही.
आपल्या जरूरी पुरत्या शिकलो दोन तीन परदेशी भाषा, हे पण खरं. पण ते काही खरं नाही.
पहिली म्हणजे इंडोनेशियाची. आता हिची गमत म्हणजे औरच. चांगले चार पायाचे प्राणी. - ते म्हणे बिनाटांग; तीन चाकी रिक्शा - बेचाक; आनंद - भयंकर (चेष्टा नाही करत) पण मला त्यांच एक खूप आवडलं ते पुरुषाच्या आयुष्यातील स्थित्यंतरासाठीचे शब्द.
कसे आहे बघा. लहान मूल - अनक (म्हणजे त्यांच्या भाषेत सोने); मुलगा -लकी लकी ; तरुण - प्रिया; नवरा- स्वामी. (जरा ऐका हो मराठी भगिनींनो .) पण या नवर्याचा एकदा का बाप झाला की त्याची इस्त्री (म्हणजे बायको) अशी काही इस्त्री फिरवते की या बिचार्या स्वामिंचा होतो - "आया" (बाप). आता यासारखे समर्पक सलग शब्द आहेत का कुठे पुरूषावस्थे साठी. तिथ अजून एक गंमत. जाता जाता सांगतो. तिथे तुम्हाला कोणी तोंडावर नाही म्हणणार नाही. त्यांना वाटत, ऐकणारा चेटूक करेल.
पोर्तुगीज आणि स्पॅनिश, माझी चांगलीच खिचडी झालीय. पण या बाब्तीत माझा थोडा फायदा होतो. पोर्तुगीज लोकांना वाटतं माझं स्पॅनिश चांगलं आहे मग ते स्पॅनिश मध्ये बोलतात, आणि या उलट स्पॅनिश लोकांचं.
या नाही वरुन आठवलं , आपण (यच्चयावत सगळे भारतीय) हो म्हणताना जी वेडी वाकडी मान हलवतो ना, जगात इतर सगळ्यांना , ते नाही म्हणून वाटते. माझ्या पहिल्या परदेश भेटीत या मुळे आमच्या चांगल्या चाललेल्या वाटाघाटी मोडायला आल्या होत्या. वेळीच लक्षात आले म्हणून बरे. (देहबोली एक वेगळच शस्त्र आहे म्हणा. (शास्त्र म्हणायचं होतं पण काही फारसं चुकलं नाही. काही मंदळींच भाषे पेक्शा हेच शास्त्र धारधार असतं, नाही का.))
अहो, आपल्याकडे घरी नाही का, नाही म्हणजे हो, हो म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आणि हो म्हणजे आत्ता हो म्हणते, पुढचं नंतर बघू. म्हणजे तुमची एकंदर वागणुक बघून बघू, (हे नागपूरी झालय, पण वाक्यरचना बरोबर आहे), (आमची ही नागपूरची, कधी कधी घेतो फिरकी स्वातंत्र्य. आपण पण पुढच नंतर बघू))
मात्र मला आज काल एक शंका यायला लागलीय. मला मराठी तरी कळते का?. मूलं म्हणतात, बाबूजी , तुम्हाला काही कळत नाही, आम्ही आईशी बोलू. अशा वेळेस ही जर का मला म्हणाली,(म्हणजे म्हणतेच) आपण नंतर बोलू ,तर मग काय शिक्कामोर्तबच. आता हिच्या भाषेबद्दल (आणि खरम्हणजे त्याच्या अर्था बद्दल) एक वेगळा लेख होईल. (घाबरू नका, अभ्यास पूर्ण झाल्यावरच लिहीन, अजून वेळ आहे. सात जन्म. हो सध्यातरी त्यांनी शब्द दिलाय.)
आणि इतर मराठी तरी काय. एस एम एस ची वेगळी, काँप्युटर वाल्यांची वेगळी, सहकार्यांची वेगळी अणि त्यांची साहेबा समोरची वेगळी , मित्रांची र्वेगळी, आणि त्यांचीच त्यांच्या बायकांसमोरची वेगळी. शेवटी परिणाम, आमचीच सगळीकडे जाम हजेरी. बाकी सगळे साळसूद. प्रत्येकाची प्रत्येक वेळी भाषा वेगळी. कोण काय म्हणतंय, आणि कुणाला कधी काय म्हणायचय, काही मेळ बसत नाही. शेवटी मी माझ्या समाधानासाठी एक थियरी मांडली. साधी माणसं , साधी भाषा. आता चिंता करायची नाही. आपली काही चूक नाही. त्यांच त्यांना.
पण परवा हिची एक लेकूरवाळी मैत्रीण आली होती. आता हे गोजीरवाणं दिसणारं बाळ, म्हणजे साधच नाही का. बराच वेळ माझ्या कडे खेळल्यावर बाळाने भोकाड पसरल. जसा काही मीच कंटाळून चिमटा काढला. आई आली त्याची धावत धावत. माझ्याकडे रागाने बघत बघत. त्याच्या तोंडात दुधाची बाटली दिली. बाळ चुटकिसरशी शांत झालं , पण एक डोळा बारीक करून माझ्याकदे बघून नक्कीच ते हसत होतं.
छान लेख.
छान लेख. हलका फुलका.
आवडलं
आवडलं
छान लेख !
छान लेख !
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.