एक होता अवचट - भाग ११

Submitted by देवभुबाबा on 17 July, 2021 - 00:50

भुरकटराव घरी येऊन २ दिवस झाले होते. थोडा अशक्तपणा असला तरीही आता व्यवस्थित होते. त्यामुळे बोलता बोलता मीनाक्षीदेवींनी विषयाला हात घातलाच. विषय संवेदनशील होता. मुलीच जमलेलं लग्न मोडायचं म्हणजे कठोर निर्णय.
मीनाक्षीदेवी:- तुम्हाला राग येणार नसेल तर बोलायचं होत.
भुरकटराव:- बोला देवी. राग कसला येणार. आपल्याला तयारीला आता वेळ उरला नाही. पैसा हातात होता तो हि खर्च झाला.
मीनाक्षीदेवी:- हो. तेच बोलायचं होत. तुम्ही ऍडमिट असताना शाम्भवी चा विचार घेतला. (घडलेला प्रसंग सांगत)
तिला मुलगा पसंत नाही हो....
भुरकटराव:- (एकदम चकित होऊन) काय? मुलगा पसंत नव्हता तर आधी का नाही सांगितलंस? (pause)
(थोडं शांत होत) शाम्भवी अगं तुझ्या मनाविरुद्ध काही करणार आहोत का आम्ही. आता जर तू हे सांगितलं नसत तर किती मोठा घात झाला असता. पूर्ण आयुष्य पसंत नसलेल्या व्यक्तीबरोबर तुला घालवाव लागलं असत.
शाम्भवी:- पप्पा... आधी नव्हतं तस काही जाणवलं.
पण मग .... (पाहायला आल्यापासूनच सर्व प्रसंग ती सांगू लागली)
भुरकटराव:- अच्छा तर असं आहे... ठीक आहे, आपण आत्ता लगेचच त्यांना लग्न मोडल्याच कळवू. शाम्भवी:- त्याची काही आवश्यकता नाही, पप्पा. तुम्ही शांत राहा. मी message करून कळवेन.

दुसऱ्या दिवशी अवचट पवळ्या कडे येत असतो. सकाळची वेळ, नेहमीप्रमाणे शाम्भवी बाल्कनीमध्ये उभी असते. अवचट मात्र चिंतेत, दाढी वाढलेली, केस वाढलेले, कामाचा ताण आणि आईच्या आजारपणातली धावपळ त्याच्या थकलेल्या शरीरयष्टीवरून समजून येत होती. कर्तृत्वाने व्यक्ती सौन्दर्यालाही मागे टाकतेच. शाम्भवीची नजर अवचटकडे गेली. मनात एक वेगळाच भाव निर्माण झाला. ती स्मितहास्याने त्याच्याकडे पाहू लागली. नेहमीसारखा हसतमुख अवचट आज मात्र त्याच्याच तंद्रीत जिना चढून वर आला. चेहऱ्यावर कसलाच भाव नाही. शाम्भवीकडे पाहूनही दुर्लक्ष्य करत तो पवळ्याच्या घरात गेला. शाम्भवी तोंड उघडून काही बोलणारच होती पण शब्द आवरत ती पुन्हा स्तब्ध तेथेच थांबली.

अवचट घरात आल्याबरोबर पवळ्याची आई आणि पवळ्या त्याच्याशी बोलू लागले.
पवळ्याची आई:- कशी आहे तब्येत आईची?
अवचट:- अजूनही परिस्थितीत सुधारणा नाही. औषधांचा काही फरक पडत नाही.
पवळ्या :- (अवचटला चहा देत) अवचट तू आज इथेच आराम कर, मी जातो हॉस्पिटल ला.
पवळ्याची आई:- हो. अवचट तू आराम कर, खूप थकलास रे.

अवचट शांतपणे बसून राहतो. पवळ्या हॉस्पिटलसाठी निघून जातो. शाम्भवी न राहवून आत येते. कोमल मृदू आवाजात अवचट ला विचारते.
शाम्भवी :- कशी आहे तब्येत मावशींची ?
अवचट:- (आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो) अजून फारशी सुधारणा नाही.
शाम्भवी:- हम्म . होतील बऱ्या. काळजी घे. काही मदत लागलीच तर नक्की कळवं.
अवचट:- हो. ठीक आहे.
(शाम्भवी पुन्हा बाहेर जाते.)

त्या छोट्याश्या संवादात खूप मोठी शक्ती होती. अवचट चहा पिऊन तेथून निघू लागतो.
पवळ्याची आई दारापर्यंत त्याला सोडायला जाते. बाहेर शाम्भवी बाल्कनीतच उभी असते. अवचट जाईपर्यंत ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भारावलेल्या नजरेने पाहतच असते.
पवळ्याची आई मागून येऊन शाम्भवीच्या खांद्यावर हात ठेवते.

पवळ्याची आई:- काय झालं... शाम्भवी, असं का पाहतेस?
शाम्भवी:- आत्या, देव कोणत्या स्वरूपात येऊन मदत करून जाईल आपल्याला कधीच ओळखता येत नाही. पप्पांच्या आजारपणाचा बहाना होताच, पण त्यामुळेच माझाही आयुष्य बरबाद होता होता वाचल.
पवळ्याची आई:- बरोबर बोलतेस गं. पण माणसं ओळखणे आपल्या सारख्या सामान्यांना तरी कसं जमणार.
हा अवचट बघ. साधा, भोळा, वेंधळा, रिकामटेकडा फिरायचा. अगदी वाया गेलेला पासून नको नको ती विशेषणे दिली लोकांनी, आणि तोच आज या सर्वांना, घरात स्वतःची आई आजारी असतानादेखील मदत करतोय. कसलीही अपेक्षा न ठेवता.
शाम्भवी:- खरयं आत्या. ती मुलगी किती भाग्यवान असेल ना, जिच्या आयुष्यात अवचटसारखा नवरा असेल.
पवळ्याची आई:- अगदीच मनातलं बोललीस. पण मग तुझही भाग्य काही कमी नाहीत ना.
शाम्भवी:- म्हणजे?
पवळ्याची आई:- म्हणजे काही नाही. पण तुला कसा वाटतो अवचट?
शाम्भवी:- (लाजून) खूप चांगला मुलगा आहे तो.
पवळ्याची आई:- चांगला आहे ते सर्वांनाच माहीत आहे. पण तुला कसा वाटतो?
(शाम्भवी लाजतच, हसतच निघून जाऊ लागते. )
पवळ्याची आई:- मला सांग हा, तुला काय वाटत ते.

शांत पाण्यात दगड मारून वलय उठावेत तसे शाम्भवीच्या मनात तरंग उठले होते. का कुणास ठाऊक पण मग अवचट चे ते खट्याळ क्षण, वेंधळेपणाच्या घटना आठवून ती गालातल्या गालात हसू लागली होती.

Group content visibility: 
Use group defaults