एक होता अवचट - भाग १०

Submitted by सुर्या--- on 12 July, 2021 - 06:56

मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी रिक्षातून घरी येत असतात. पवळ्याची आई दरामध्ये थांबुन त्यांना विचारपूर करते.

पवळ्या ची आई:- कशी आहे गं, तब्येत आता?
मीनाक्षीदेवी:- रात्रीपेक्षा ठीक आहे. पण ऑक्सिजन लेवल कमी आहे. इन्फेकशन जास्त आहे. इंजेकशन चालू केलंय.

मीनाक्षीदेवींना रडू फुटले. पदराचे टोक डोळ्यांना लावत त्या बोलू लागल्या. "पोरीच्या लग्नासाठी पैश्याची जमवा जमव करत होते. दिवसरात्र धावपळ करत होते. आणि आता जमवलेला पैसा पण हॉस्पिटल वर जातोय.
काय करावं काहीच कळत नाही. कुणाचा आधार नाही. हॉस्पिटल ला बसण्याची सोय नाही. कोरोना पेशंट आहेत त्यामुळे बाहेरच उभं राहावं लागतंय."
(मीनाक्षीदेवीचं रडणं पाहून शाम्भवी आणि पवळ्याची आई देखील आसवे टिपू लागली.)

पवळ्याची आई:- नको रडू मीने ... शाम्भवी, तू पण गप्प राहा. अवचट आणि पवळ्या गेलेत ना तिकडे. नका काळजी करू.
मीनाक्षीदेवी:- हो ग बाई. लेकरं वेळेवर धावून आली. आम्ही दोघींनी कुठे कुठे लक्ष दिल असत.
पवळ्याची आई:- पाहुणे (नवरदेव) येणार आहेत का?
मीनाक्षीदेवी:- (नकारार्थी मान हलवत) आपण कळवायचं काम केलाय. इथे रक्ताची नाती मदतीला येत नाही, तर अजून न जोडलेली नाती कशी येणार?
पवळ्याची आई:- खरयं गं मीने ... तू हो शांत. पवळ्या आणि अवचट आहेत.

हॉस्पिटल मध्ये अवचट ची स्टाफ सोबत चांगली ओळख निघते. अनेकांना मदतीला धावून गेलेल्या अवचटला सर्वच जण अभिमानाने आदराने मदतीस पुढे येत होते.
संकटसमयी जसे पेराल तसे उगवते.

पवळ्या घरी येऊन फ्रेश होऊन जेवायला बसला. मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी तेथे आले. पवळ्याची आई तेथेच असते.
पवळ्या :- नानी आता तुम्हाला तिथे जाऊन थांबायची गरज नाही. स्टाफ मधले बरेच जण अवचटच्या ओळखीचे झालेत. त्याचा आणि माझा नंबर आहे स्टाफ कडे. काहीही लागल्यास फोन करतील, शिवाय अध्ये मध्ये विडिओ कॉल करून अण्णांशी बोलताही येईल.
अवचटने त्याच काम सांभाळून अण्णांचीही चांगली व्यवस्था लावून दिली.
मीनाक्षीदेवी:- अगदी खरं आहे. अवचट सारखा पोरगा होणे नाही.
(हीच संधी साधत, शब्द उचलून घेत पवळ्याची आई बोलू लागते.)
पवळ्याची आई:- हो, तर. अवचट सारखा गुणी मुलगा शोधून सापडणार नाही. मला मुलगी असती तर त्यालाच जावई करून घेतला असता.
मीनाक्षीदेवी:- हम्म बरोबर आहे. आमच्या शाम्भवीच्याच नशिबात का असा भेटलाय कळत नाही.
पवळ्याची आई:- का गं मीने, काय झालं? पाहुणे काही बोलले का?
(मीनाक्षीदेवी रडतच सर्व प्रकार सांगू लागतात.)
पवळ्याची आई:-अगं शाम्भवी, तुला मुलगा पसंत आहे ना गं मनापासून?
बघ हा , आत्ताच खरं सांग, जे काय मनात असेल ते.
(शाम्भवी काहीच न बोलता खाली मान घालून आठवू लागते. पाहायला आल्यापासूनचा एक एक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जातो. डोळ्यांत पाणी तरळतो. गालावरून असावे ओघळू लागतात. नकारार्थी मान हलवत ती हुंदके देऊन रडू लागते.)

मीनाक्षीदेवी:- (शाम्भवी ला शांत करत) शाम्भवी ... अगं हे तू आधीच का नाही सांगितलंस?. तुझं चांगलं होईल म्हणून आम्ही या स्थळाला होकार दिला होता गं.
पवळ्याची आई:- शाम्भवी, तुला दुसरं कोणी पसंत आहे का? तुझ्या मनात कोणी?
(शाम्भवी नकारार्थी मान हलवते.)
मीनाक्षीदेवी:- शाम्भवी नको रडूस पोरी. तूच खुश नसशील तर पुढे जाऊन काय फायदा. मोठ्या घराचे पोकळ वाशे. आत्ताच मग्रुरीने वागणारा नवरदेव, पुढे तुला खुश ठेवेलच कि नाही सांगता येणार नाही. हे बरे होऊन येऊ देतं. मग आपण त्यांना नकार कळवू.

लग्न कॅन्सल होणार आहे त्यामुळे शाम्भवी आणि मीनाक्षीदेवींवरचे ते एक दडपण कमी झाले होते. शिवाय भुरकटरावांची तब्येतही सुधारत होती. पवळ्या करवी शाम्भवीचे लग्न कॅन्सल झाल्याचे कळाल्याने अवचटही थोडा आनंदी होता. पण समस्या कमी नव्हती झाली.
अवचटची आईदेखील कोरोनाने आजारी पडली. अवचट ला दुसरा आधार नव्हता. आईकडे लक्ष देणार कि नोकरीकडे. तरीही पवळ्या, पवळ्याची आई, आणि अवचटचे इतर मित्र जमेल तशी मदत करत होते.

भुरकटराव बरे होऊन घरी आले. अवचट आणि पवळ्याचे आभार मानावेत म्हणून मीनाक्षीदेवी पवळ्याला फोन करतात.
मीनाक्षीदेवी:- पवळ्या , अरे कुठे आहेस? हे बरे होऊन घरी आलेत, म्हणून फोन केला होता. अवचट ला पण सांग. नाहीतर थांब, तो तिथे असेल तर त्याच्याकडेच फोन दे.
पवळ्या :- नानी मी हॉस्पिटल बाहेर आहे. अवचटची आई Admit आहे. अवचट कामावर गेलाय, patient ला घेऊन मुंबईला जाणार होता.
मीनाक्षीदेवी:- बरं ठीक आहे, मी नंतर फोन करते.

मीनाक्षीदेवी, शाम्भवी आणि भुरकटराव, पवळ्याच्या आईशी बोलू लागतात.
"काय हा पोरगा?, आई ऍडमिट आहे, कसलाच आधार नाही, तरीही दुसऱ्या patient ला घेऊन गेलाय.
कालपर्यंत चौकात टवाळक्या करणारा, मोकाट फिरणारा, वेंधळा म्हणून ज्याची टिंगल केली जायची, तो असा देवमाणूस आहे, हे कुणालाच कसे कळले नाही."

Group content visibility: 
Use group defaults