एक होता अवचट --- भाग ७

Submitted by सुर्या--- on 10 July, 2021 - 07:44

दिवसेंदिवस परिस्थिती रौद्ररूप धारण करत होती. tv वर corona बातम्यांशिवाय काहीच उरल नव्हतं. रस्ते ओस पडले होते. घराबाहेर पडण्याची भीती सर्वांमध्येच होती.गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नियमांना डावलून अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन नियम धाब्यावर बसवल्याच्या घटना कानावर येत होत्या. किंबहुना त्यामुळेच कोरोना केसेस वाढत होत्या.

lockdown वाढला होता. दुकानाला लागणारा माल मिळत नव्हता. त्यामुळे दुकान बंद करून नव्या कामाच्या शोधात अवचट होताच. मित्राकडूनच नगरपालिकेतर्फे covid ऍम्ब्युलन्स साठी ड्राइवर ची आवश्यकता आहे अशी बातमी समजली.

अवचट ने तो जॉब करायचा निर्णय घेतला. अनेकांनी त्याला तो जॉब न करण्याचाच सल्ला दिला. साहजिकच परिस्थितीचे गाम्भीर्य आणि भीतीच तशी होती. अवचटमुळे त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना corona ची भीती राहणार होती.
पण हातावर हात धरून बसेल तो हिरोच काय कामाचा.

अवचटचा कामावरील पहिलाच दिवस. रात्रपाळी. रात्री ८ वाजता नगरपालिकेच्या जवळ ऍम्ब्युलन्स उभी होती. रुजू होताना लागणाऱ्या सर्व formalities पूर्ण करून अवचट त्याच्याबरोबर असणाऱ्या सहकार्यांशी ओळख करत होता, तोच त्याचा फोन वाजला. "तारांगण हौसिंग को. ऑप. सोसायटी मधील एक वृद्ध रुग्णाला आणायला जायचं आहे."
सूचना मिळताच तातडीने, मिळालेल्या पत्त्यावर अवचट गाडी घेऊन पोहोचला. सोसायटी च्या दारात गाडी पोहोचली तरीही तिथे कोणीही दिसत नव्हते. आलेल्या नंबर वर अवचट ने फोन केला. समोरून माहिती मिळाली. patient चे नातेवाईक कोणीही जवळ राहत नाहीत. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती तुला येऊन भेटतील. काही वेळातच एक तरुण गाडीजवळ आला. घाबरलेल्या अवस्थेत सांगू लागला. "ते वृद्ध आजोबा पाचव्या माळ्यावर राहतात. त्यांना चालत येन शक्य नाही. बरोबर एक आजी आहेत फक्त. त्यांची मुले बाहेरगावी राहतात". बिल्डिंग ला जिना नव्हता. अवचट आणि त्याचा सहकारी दोघेही गोंधळले.

petient ला पाचव्या माळ्यावरून खाली आणून गाडीत बसवायला देखील कोणीही नव्हते. सोसायटी मधील सर्वांनी दारे लावून घेतली होती. खिडकीच्या आतून काय ती बघ्याची भूमिका घेत फक्त गम्मत पाहत बसले होते. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता आणि लोकांना विनवण्यातसुद्धा. अवचटने त्या तरुणाला आणि सहकाऱ्याला विणवले . त्यांना तयार केले. कोणतेही PPE किट अंगावर नव्हते. मास्क तोंडावर चढवला, हॅन्ड ग्लोव्हस घातले. दरवाज्या ठोठावला. रडत असलेली म्हातारी दार उघडताच आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून समोर उभी राहिली. आयुष्यभर ते हात कुणासमोर जोडले गेले नसतील. त्या थरथरणाऱ्या हातांनी ज्या मुला-मुलींना मोठे केले ते आज मदतीला येणार नव्हते. ज्या हातांनी शेजारच्यांचा आणि पाहुण्यांचा कधी पाहुणचार केला होता त्या हातांना आज कसलाच आधार मिळत नव्हता. अगदीच असहाय्य्य. "माझ्या नवऱ्याला वाचवा हो " तिची गळा काढून निघणारी आर्त हाक कानात कर्ण कर्कश्य होऊन घुमत होती. मनाला कंप फोडत होती. मेंदूला झणझण्या याव्यात तस डोकं सुन्न होत होत. डोळ्यातून आसवे वाहत होती.

तो वृद्ध कालपासून काहीच न खाता, कळवळत होता. अवचट ने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. बेडच्या बाजूला असलेली चादर पसरली, त्यावर त्या वृद्धाला झोपवले. चादरीचे कोपरे तिघांनी व्यवस्थित पकडून हळूहळू खाली आणले. तो तरुण हॉस्पिटल पर्यंत यायला तयार नव्हता. शेवटी नाईलाजाने फॉर्म वर सही लागणार म्हणून त्या वृद्ध महिलेला सोबत घेऊन अवचट होईस्पिटलला पोहोचला. हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नव्हता. डॉक्टर ने patient, पुढें नेण्यास सांगितले. patient ची तब्येत नाजूक होत होती. डॉक्टरांचाही नाईलाज होता. अवचट ने डॉक्टरांशी बोलणं केलं. पुढे हि हीच परिस्थिती असेल तर patient ची हेळसांड होईल. वेळेत उपचार मिळाले नाहीत तर ....?
डॉक्टरांनी फोन काढला. एक नंबर dial केला. "हॅलो डॉक्टर प्रताप... मी डॉक्टर शुभम बोलतोय, एक patient पाठवतोय तिकडे, ऍडमिट करून घ्या"
समोरून (फोनवर) हॅलो डॉक्टर... ऐका जरा... इकडेसुद्धा बेड उपलब्ध नाहीत. ..."
डॉक्टर शुभम ने फोन कट केला. एका कोपऱ्यामध्ये बेडजवळ गादी टाकून patient ला ऍडमिट करून उपचार सुरु केले.

त्या वृद्ध महिलेला घरी पोचवण्यासाठी व्यवस्था करून तिला आम्ही लक्ष देऊ असे सांगून अवचट पुढच्या कॉल वर गेला.
रात्रंदिवस ऍम्ब्युलन्स ड्राइवर ची हीच अवस्था. कधी वेळेवर जेवण मिळेलच याची सुद्धा खात्री नाही. PPE किट नव्हते. सोबतीला सहकारी नसेल तर स्वतः पुढाकार घेऊन मानवसेवा करायची. एका ठिकाणी बेड नसेल तर दुसऱ्या ठिकाणी, तिथेही नसेल तर आणखी पुढे. पोटासाठी जीव ओवाळून टाकणे म्हणतात ते यालाच. या corona महामारीच्या काळात हे असे अनेक corona योध्ये होते जे नेहमीच दुर्लक्षित राहिले.
(हि घटना बदलापूर मध्ये घडलेली असून, ऍम्ब्युलन्स ड्राइवर दीपक ईश्वर तारू यांचे या मानवसेवेबद्दल मनपूर्वक आभार.)

Group content visibility: 
Use group defaults