एक होता अवचट --- भाग ५

Submitted by देवभुबाबा on 8 July, 2021 - 23:52

अवचट चा दुसरा दिवस शाम्भवीच्या दर्शनाशिवाय सुरु होऊन मोठ्या नाटयमय प्रसंगात बदलला होता. शिवाय ५० लोकांच्या ऑर्डर्स बरोबरच काही जास्तीचे हार दुकानावर किरकोळ विक्रीसाठी बनवायचे होते. त्यामुळे आल्यापासूनच अवचट आणि पवळ्या हार बनवण्यात गुंग होऊन गेले.
पोरगा पहाटे गेलेला दुपार होईपर्यंत घरी न आल्याचे पाहून अवचट ची आई त्याच्या दुकानावर येते. काही न खाता पिता करत असलेली धावपळ आणि मेहनत पाहून तीच मन भरून येत. काहीही न बोलता ती घरी परतते. दोघांसाठी जेवणाचा डब्बा भरून पुन्हा येते.

अवचट ची आई:- (फुले एका बाजूला सारत, डब्बा ठेवते) पोरांनो खूप मेहनत करताय, आता थोडं खाऊन घ्या. (डब्बा बाजूला ठेऊन अवचट ची आई सुद्धा त्या दोघांना मदत करू लागते)

अवचट:- (पवळ्याला जेवायला बोलावत डब्बा उघडतो, अवचट आणि पवळ्या जेवता जेवता बोलू लागतात.)
"पवळ्या , होतील का रे संध्याकाळपर्यंत एवढे हार?
पवळ्या :- होतील रे, टेन्शन नको घेऊ. आता आपण सरळ एका धाग्यात फुल ओवून घेऊ आणि मग त्यांना तोरण जोडून पॅकिंग करायला घेऊ. जास्तीत जास्त २ तासात आपलं काम आटपेल .
अवचट :- ठीक आहे. हे काम झाल्यावर थोडी विश्रांती घेऊ.

संध्याकाळी ५ वाजल्यापासून पवळ्या इतर भागात हार पोहोचवायचे काम सुरु करतो. आणि त्यांच्या एरिया मध्ये अवचट स्वतः हार वाटप करून पुन्हा दुकानावर येणार असतो.
अनेक ठिकाणचे वाटप करून शेवटी अवचट भुरकटरावांकडे पोहोचतो. दरवाज्यामध्ये पोहोचताच शाम्भवीचे दर्शन होते. शाम्भवी हॉल मधून kitchen मध्ये जाताजाताच अवचटकडे पाहते. थोडी नजरा नजर होते. अवचट चा दिवसभराचा थकवा त्या एका क्षणात विरून जातो. मीनाक्षीदेवींना हार टेबलं वर ठेवल्याचे सांगतो. शाम्भवीचे बोलके डोळे, आणि हसरे गोजिरे रूप डोळ्यांत साठवून अवचट दुकानावर परततो.
अवचट, शाम्भवीच्या स्वप्नात हरवलेला असतानाच पवळ्या सुद्धा दुकानावर परततो.

पवळ्या :- (सायकल स्टॅन्ड ला लावत) अवचट मज्जा आली रे. हार द्यायला गेलो तर जो तो आपल्याबद्दल विचारत होता. आणखी ४-५ ऑर्डर मिळाल्या आहेत.
अवचट:- पवळ्या मला पण मज्जा आली रे (हसतच... )
शाम्भवीने माझ्याकडे पहिले. आज ती काय दिसत होती माहितीय. (सूर बदलत)
पवळ्या ... उद्या तू फुल आणायला जा. मी तुला सकाळी उठवायला येईन.
पवळ्या :- (कंटाळलेल्या स्वरात) अव्या अरे आज जाम दमलोय रे. पहिल्यांदाच एवढ्या ठिकाणी हार टाकलेत. please यार, उद्या तू जा, परवा हवं तर मी जाईन.
अवचट:- ठीक आहे. असं अध्ये मध्ये आलटून पालटून आपण जात जाऊ फुले आणायला.

शाम्भवीच्या त्या चेहऱ्याला मनात आठवत अवचट तिच्या स्वप्नातच झोपी जातो.
तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून तो फुले आणायला जातो.
इकडे पुन्हा तीच परिस्थिती .... पूर्ण सन्नाटा .... पुन्हा उशिरा उठणे...
पण कालची परिस्थिती लक्ष्यात घेता, कोणी गेलं म्हणून बोम्ब होत नाही. सर्वांनाच उशीर झाल्याने, बाल्कनीत सगळे उभे राहून एकमेकांना विचारू लागतात, "नक्की काय झालय कालपासून? "इतना सन्नाटा क्यू है? कोई मरा तो नही है? जॉन अंकल विचारतात.
शेजारची म्हातारी आवाज देते, "कालपासून कुत्रें भुंकत नाहीत."
आणखी एक जण आवाज देतो, "हो ना. आम्हाला अलार्म ची सवय नाही". तिसरा बोलतो," हो ... तो अवचट नाही दिसला दोन दिवस, पोरांना रस्त्याच्या बाजूला बसवल्यावर दगडी फेकतो हळूच".
तेवढ्यात आणखी कोणीतरी आवाज देतो, " हा अवचट येत नाही आजकाल मॉर्निंग वॉल्क ला, तो आल्यावर कुत्रे भुंकायला लागतात. आणि तो यांना हाकलायला लागतो."
झालं ... सन्नाटे का कारण पता चलते हि हिरो फेमस होतोच.
आणि त्यामुळेच नेहमीच दुर्लक्षित राहिलेला अवचट आता सर्वांच्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचा घटक होता हे सर्वांना कळून आले. रोजची सकाळ अशी सामसूम न जावी अशी सर्वांचीच ईच्छा होती. सकाळ चांगली तर दिवस चांगला हा तसा मनाचा समजच असतो.

सगळ्यांच्या मनाला असा अवचटच्या अनुपस्थितीचा चटका लागल्यामुळे दिवसभरात अवचट ला अनेक लोकांकडून विचारणा होते.
"अवचट आजकाल सकाळी दिसत नाहीस. "
अवचट सर्वांनाच कामाचे कारण देतो. पण, जेव्हा शाम्भवी आणि मीनाक्षीदेवी जाता जाता त्याला विचारतात तेव्हा त्यालाही त्याच्या मॉर्निंग वॉल्क च महत्व कळतच.

मीनाक्षीदेवी:- काय रे अवचट , आजकाल तुझी फार चर्चा असते सर्वत्र?
अवचट:- काय झालं नानी ?
मीनाक्षीदेवी:- काही नाही, चाळीमध्ये चर्चा होते, तू सकाळी मॉर्निंग वॉल्क ला जात नाहीस म्हणून कुत्रे शांत झोपतात म्हणून...
शाम्भवी:- (हसता हसता मीनाक्षीदेवीचा हात खेचत त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करते)
अवचट:- काय पण काय नानी ...
मीनाक्षीदेवी:- अरे, खरंच... बघ सगळे बोलतायत , तू मॉर्निंग वॉल्क ला जात नाहीस म्हणून सकाळ अगदी सामसूम असते.
शाम्भवीलाच विचार हवं तर...
(अवचट शाम्भवी कडे पाहत मिश्किल हसतो.
शाम्भवी हसतच मान हलवून मीनाक्षीदेवीच्या बोलण्याला दुजोरा देते.)

Group content visibility: 
Use group defaults