ईटगीर... भाग १

Submitted by सुर्या--- on 7 May, 2021 - 07:35

ईटगीर...

अबोली आणि अविनाश ची भेट एका वाचनालयात झाली होती. दोघेही वाचनाचे छंदी होते. अविनाशला लिखाणाचीही आवड होती. बऱ्याचदा त्याचे स्वप्न तो त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवत असे. परंतु त्याला पडणारे स्वप्न डायरीत वाचून त्याच हसू होईल या भीतीने तो ती डायरी कुणालाही दाखवत नसे. अबोली पासूनही त्याने हि गोष्ट लपवली होती. त्यामुळेच त्याच्याकडे स्वप्नांची आणि इतर लिखाणाची डायरी वेगवेगळीच होती. पुढे जाऊन अबोली आणि अविनाश लग्न करतात. घरच्यांचा विरोध असल्यामुळे अविनाश ईटगीर च्या बाहेर टेकडीवर छोटा झोपडीवजा घर बांधून आपला संसार थाटतो.
ईटगीर सोडल्यापासून तो काहीसा बैचेन असतो. संसार चांगला चालला असला तरीही आर्थिक अडचणींमुळे शांत झोप नव्हती, त्यामुळे त्याला हल्ली स्वप्न येणे तसे बंदच झाले होते. आणि लिखाणाची डायरी सुद्धा जुन्याच घरी राहिल्यामुळे तो फारसा लिहताना अबोली ला दिसत नसायचा. हसता खेळता कधी कधी कविता बोलूनही जायचा. लग्न होऊन एक वर्ष झालं असेल, अबोली ला गर्भारणेची चाहूल लागली होती. अविनाश कामानिमित्त बाहेर होता. तो आल्यावर त्याला हि गोड बातमी दिल्यावर तो किती खुश होईल याचा ती विचार करत बसली होती. संध्याकाळची वेळ झाली होती, अंधार पडायला लागला होता, वीजा चमकत होत्या, वादळी वाऱ्या सोबतच पाऊस चालू झाला होता. अबोली सर्व खिडक्या दारे बंद करून light गेल्यामुळे मेणबत्ती च्या उजेडात अविनाश ची वाट पाहत बसली होती.
बराच उशीर झाला तरीही अविनाश अजून आला नव्हता, त्यामुळे ती चिंतातुर होती. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. वीजा कडाडायच्या थांबल्या, वाराही शांत झाला. बाहेर कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली. "भूषण" अविनाश चा मित्र आणि त्याच्या सोबत गावातील काही मंडळी अबोलीला भेटावयास आले होते. अबोली काही बोलायच्या आताच भूषण बोलू लागला. "वहिनी. काही सांगायचे आहे, मन घट्ट करा" भूषणच्या बोलण्याने अबोली आणखीनच चिंतातुर झाली. भूषण सांगू लागला," वहिनी घात झाला, अविनाशचा येताना अपघात झाला, झाडावर वीज पडली आणि तो झाड रस्त्यावरून येणाऱ्या अविनाश च्या गाडीवर कोसळला. अविनाश चा मृत्यू झाला." अबोलीला ऐकून धक्का बसला. ती थंडगार पडली तरीही कपाळ घामाने भरला, तोंडातून शब्द फुटायच्या आधीच ग्लानी येऊन ती दारातच कोसळली.
इकडे एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच अविनाश च्या आई-वडिलांची प्रकृती खालावली. भूषण आणि शेजाऱ्यांनी अबोली आणि अविनाश च्या आई-वडिलांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले. अविनाशच्या आई-वडीलांची हास्पिटल मधेच प्राणज्योत मावळली.
डॉक्टरांच्या तपासणीत अबोली पोटाशी असल्याचे समजले. अबोली शुद्धीत आल्यावर ती धायमोकळून रडू लागली. दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता. भूषण आणि शेजाऱ्यांनी सर्व कार्य उरकून अबोली ची समजूत घातली, आणि तिला गावातील घरी राहण्यासाठी मनवल.

अविनाशने कमावलेल थोडं फार आणि वडिलोपार्जित घर आणि थोडी फार जमीन यावर अबोली आणि तिच्या बाळाची गुजराण होणार होती. अबोली खचली होती परंतु अविनाश चा अंश तिच्या गर्भात वाढत असल्याने तिने पुन्हा मनाची तयारी केली. गावातील मुलांच्या शिकवणी घेऊन दैनंदिन खर्च सोडवू लागली. मोकळ्या वेळात घर सावरणे, अविनाश च्या कविता वाचणे, त्याचे फोटो न्याहाळत बसने यात अबोलीचा वेळ जात होता. बघता बघता दिवस सरले आणि अबोलीने दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला. अबोलीच्या बाळंतपणात भूषणच्या घरच्यांनी तिला चांगला आधार दिला. भूषण आपल्या बहिणीप्रमाणेच अबोली आणि तिच्या मुलाकडे लक्ष देत असे.
अबोलीने दोन्ही मुलांची नावे ठेवली, अमल (निर्मळ) आणि अलक (कुरळ्या केसांचा). अमल आणि अलक यांच्यात लहानपणापासूनच एक गोष्ट खास होती. ते म्हणजे ते दोघेही कोणत्याही गोष्टीत एकत्रित सामील व्हायचे, खाणे-पिणे खेळणे-बागडणे, रडणे, फिरणे, भांडणे. दोघांच्या आवडी-निवडी सारख्याच होत्या. हळूहळू दोघेही मोठे होऊ लागले. अमल आणि अलक जन्मताच हुशार होते. पैकी अमलची आकलन शक्ती आणि अलकची वक्तृत्व आणि लेखनातील गुणवत्ता वाखाणण्याजोगी होती.
अमल आणि अलक त्यांच्या या गुणांमुळेच शाळेतही सर्वांचेच प्रिय होते. मस्तीखोर पणामुळे कधी खोड्या केल्या तरीही त्या दुर्लक्षित होत होत्या. एक दिवस अमल आणि अलक लवकरच झोपी0020गेले. अबोली सुद्धा सर्व आवरून झोपी गेली. पहाटेची वेळ होती. अमल झोपेतून दचकून उठला. अबोली ने light लावून त्याला धीर दिला. "काय झाले अमल?" अमल काहीहि न बोलताच पुन्हा झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी अलकने त्याच्या नोटबुक मध्ये स्वतःच्याच मर्जीने एक मजकूर लिहून काढला. शाळेतून घरी आल्यावर दोघा मुलांचा अभ्यास घेताना अबोली चे लक्ष त्या मजकुरावर गेले.
मजकूर खालीलप्रमाणे...
चौफेर फुलांच्या राशीतून, गुलाल उधळतोय सर्वत्र ...
नाच गाण्यांच्या तालामध्ये मग्न असतात मित्र...
अचानक बैल उधळतो आणि चेंगराचेंगरीस होतात पात्र...

अबोली अलक ला विचारते, "काय रे अलक, हे काय लिहिलंय?"
अलक पटकन बोलून जातो, "आई, ते न मला असं काहीतरी वाटलं म्हणून मी लिहिलं."

अबोली कुतूहलाने त्याला विचारत होती. परंतु लहान वयाच खोडकर बाळ ते. त्याला काही ठिकस उत्तर देता येत नव्हतं .
अबोली तरीही आनंदी होती. तिला वाटत होत अविनाशच्या लेखणीतले गुण अलक मध्ये आले आहेत.
तीन दिवसांनी गणपतीचे आगमन होते. सार्वजनिक गणपतीची मिरवणूक करत आणण्याचा, गावात नेम असतो, त्यामुळे गावातील मंदिरासमोर मोठ्या पटांगणात गणपती पूजनासाठी मोठे मंडप, फुलांच्या माळा , lights अशी सजावट केली होती. पटांगणात रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला होता. अमल आणि अलक , त्याचे मित्र आणि अबोली सर्वजण मिरवणूक पाहण्यासाठी तेथे जमले होते.
"पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा ..."
गाण्याने वातावरण दुमदुमत होते. रंगीबेरंगी कपडे घालून छोटे मोठे सर्व जण मिरवणूक पाहण्यासाठी तेथे जमले होते.
ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. जल्लोष सर्वत्र होत होता. गावकऱ्यांची गर्दी एकवटत होती. फटाक्यांच्या माळा रस्त्यावर पसरवून त्यात सुटली बॉम्ब जोडून फटाके फोडले जात होते. थोड्याच वेळात फाट फाट फाट्याकक फाट फट फटाक फार्रर्र फटाक्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमला. धुराने आणि गुलालाने समोरचे काहीच दिसत नव्हते . फटाक्यांच्या आवाजाने बिथरलेला एक बैल अचानक गर्दीत शिरला. मान हलवत शिंगे मारण्याच्या प्रयत्न करू लागला. गर्दीवरचे नियंत्रण सुटले. लोक सैरभैर पळू लागले आणि काही क्षणातच अमल आणि अलक चे काही मित्र चेंगराचेंगरीमध्ये दुखापतग्रस्त झाले.

वेळ सावरली गेली . पालक आपापल्या मुलांना घरी घेऊन गेले. अबोली सुद्धा अमल आणि अलक यांना घरी घेऊन येते. साधारण घटना समजून ती घरातल्या कामाला लागते. अमल आणि अलक बाहेरच खेळात असतात. अमल , अलक जवळ येऊन बोलतो," मला ना असाच स्वप्न पडला होता त्यादिवशी"
अमल आणि अलकच असच बोलणं चालू असत , तेवढ्यात अबोली दोघांनाही जेवायला बोलावते.

क्रमशः ...भाग २ ...लवकरच...

Group content visibility: 
Use group defaults

ईटगीर...
म्हणजे काय ? क्रमशः आहे का?
प्लीज तस असेल तर लिहाना

छान आहे
भाग -1 असे लिहिले तर लक्षात येईल

उत्कंठावर्धक...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!

ओके
आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

@अनंतनी
हो. कथा काही कारणास्तव REMOVE कराव्या लागतात.

Ok