काळजी

Submitted by सुर्या--- on 3 May, 2021 - 06:57

रात्रीचे २ वाजले असतील, प्रकाश जोरातच ओरडत उठला... अस्मिताही धडपडत उठली. काही बोलायच्या आतच तो Toilate मध्ये गेला. light लावली, flush केलं. तिला काहीच समजत नव्हते, चेहऱ्यावरील घाम ती मनातून किती घाबरलेली आहे हेच सांगत होते. थोड्या वेळाने पाण्याच्या खंदळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला . light off करून त्याने खाड्कन दरवाज्या बंद केला. मोकळा झाल्याचा सुसकारा टाकत पून्हा अंथरुणात येऊन पडला. ती त्याच्याकडे पाहतच होती. तो मात्र कसलीच दाखल न घेता झोपी गेला. आणि बघता बघता काही क्षणातच डाराडुररं घोरू लागला.
अस्मिताची मात्र झोप मोड झाली होती. कूस वारंवार बदलत झोपी जाण्याचा प्रयत्न ती करत होती. पहाट झाली तरीही तिला मात्र झोप लागली नाही. मनातल्या मनात पुटपुटत होती." किती~~~ वेळ जातो हा.... बाहेर कुठे जायची सोयच नाही याच्याबरोबर "
६.३० चा गजर झाला तशी ती उठली, तोंड धुवून त्याच्यासाठी डब्बा बनवायला घेतला. ७ वाजले तरीही तो अजून अंथरुणातच पडून होता. तिने आवाज दिला. अहो ~~~ अहो..., आज कामाला जायचं नाही का? अहो~~~ उठा~~~, किती वेळ झोपता?... उठा~~~...उशीर होतोय..."
ती लाडवेल आवाजातच त्याला हाका देत होती. स्वप्नभंग झाल्याच्या आवेशात प्रकाश डोळे चोळतच उठला. बाथरूम मध्ये जाऊन ब्रश घेतला. नळाचा आवाज आला तशी तिला जाणीव झाली, हा उठला म्हणून.
शेगडीवर एका बाजूला भाजी घालून दुसऱ्या बाजूला चहा ठेवत ती टॉवेल, फाटकी चड्डी आणि भोक पडलेली बनियान काढून बेडवर ठेवत मनातल्या मनात पुन्हा पुन्हा पुटपुटू लागली. "कपडे पण घेता येत नाहीत, आतून फाटके कपडे, वरून भारीतले कपडे आणि सेंट कारून नुसताच नवरदेव मिरवतोय." प्रकाश मात्र आपल्याच खयालात मध्ये बाथरूम मधून बाहेर येत tv लावतो. पुन्हा कपडे घेऊन बाथरूम मध्ये जातो. बाथरूमचा दरवाज्या लावून गिझर ऑन करतो आणि जोरजोरात गुणगुणू लागतो. "आता तरी देवा मला पावशील का ?"
ती त्याच गुणगुणणे ऐकतच असते, हसू कि रडू या अविर्भावात. tv वरील बातम्यांचा आवाज येतच असतो. "नमस्कार आजच्या ठळक बातम्या ....मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातात ३ गाड्यांचा चक्काचूर, ६ ठार ५ जखमी..."
मनात संशयाचा कल्लोळ उठतो आणि ती tv समोर येते.. हातातील भांडे तसेच खाली सोडत जोरात किंचाळते . त्या आवाजाने तो हि टॉवेल लावून गडबडीतच बाहेर येतो.
बातमी पाहून त्यालाही वाईट वाटतेच. परंतु तिच्या घाबरण्यामागचं कारण मात्र त्याला समजलेले नसते. ती सुद्धा काही बोलत नाही. तीच सांत्वन करून तो ऑफिस ला जायला नॉघतो. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती डोळे लावून पाहत राहते. डोळ्यात पाणी तरळलेले असते. काळजीने चेहऱ्यावर काळभीर ओढवलेली असते. tv बंद करून ती बेडरूम मध्ये जाते. कपाळावर आडवा हात ठेवत, छताकडे पाहत बेडवर पडून ती विचारांत डुबते.
अस्मिताचे आई-बाबा तिला भेटायला येणार असतात. शहराकडे एकट्याने कधी आले नाहीत, सोबत मोबाइल सुद्धा नाही, त्यामुळे चिंतेने व्याकुळ होऊन ती भेदरलेल्या मनस्थितीत सुन्न पडून असते. त्यातच तिचा डोळा लागतो. अचानक दाराची बेल वाजते. लगबगीने केस सावरत ती दार उघडते. समोर आई-बाबांना पाहून आनंदाने फुलून जाते. दरवाज्या उघडून आईच्या गळ्यात पडते. स्वतःला सावरत त्यांच्या हातातील सामान आतघेत दरवाज्या बंद करते. प्रकाश सुद्धा ट्रेन मध्ये चढलेला असतो. मागील आठवड्यातच त्याचा मेडिकल रिपोर्ट आलेला असतो. कोलोरेक्टल कॅन्सर ची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगितल्यापासून तो सुद्धा अस्वस्थ असतो. हातात पुरेसा पैसे नसल्याने तो उपचार घेण्यास टाळाटाळ करत असतो. शिवाय घरी कुणाला सांगितल्यास घरातील सर्व टेन्शन मध्ये येतील आणि "ती", ती तर त्याचा काळीज असते. तिला हा धक्का सहन होणार नाही याची त्यालाही जाणीव असते. त्यामुळे सर्व काही लपवून हा तिच्यासमोर वेगळे बहाणे करून नॉर्मल असल्याचं दाखवत असतो.

प्रकाश संध्याकाळी ऑफिस मधून लवकरच निघतो, येताना आठवणीने तिच्यासाठी तिला आवडणारा मोगऱ्याचा गजरा आणि "kitkat" ची कॅटबरी आणतो. दरवाज्याची बेल वाजते . ती लगबगीने दार उघडताच तिला गोड आवाजात साद देत खुर्चीत बसवतो. पुढे तो काही बोलायच्या आतच ती त्याला आई-बाबा आल्याचे सांगते. तो थोडा दबकतच विचारतो," कधी आले? मला सांगितलं नाहीस?"
ती त्याला पाणी देता देता बोलत असते, "अचानक ठरलं त्यांचं, तुम्हाला surprise, म्हणून नाही सांगितलं". तो तिच्या आई-बाबांना नमस्कार करत त्यांची विचारपूस करतो. साधारण गप्पा गोष्टी चालू असतात. एका बाजूला tv चालू असतो. ती आणि तिची आई जेवण बनवतात. मग एकत्र जेवायला बसतात. जेवण उरकून तो आतल्या खोलीतील गॅलरीमध्ये एकटाच विचार करत उभा असतो. तो त्याच्या आजाराच्या काळजीने, घरखर्चाचा आणि भविष्याचा हिशेब मांडत असतो. तिचे बाबा हळुवार पावलांनी त्याच्या जवळ येतात. खांद्यावर हात ठेवत धीरगंभीर आवाजात त्याला साद देतात. "प्रकाश...~~ अरे बेटा एक बोलू का?" प्रकाश दचकून मागे वळून पाहतो. "हा ..बोला ना बाबा". प्रकाश म्हणतो.
"तू खूप शांत वाटतोस?, काय झालं? काही टेन्शन आहे का?" बाबा विचारतात.
तोंडावर खोटं हसू आणत, "नाही ओह्, कसलं टेन्शन? काही नाही, जस्ट उभा आहे" प्रकाश म्हणतो.
बाबा बोलू लागतात, "प्रकाश, तू एकटा आहेस असं समजू नकोस, आमच्या पासून किती दिवस लपवून ठेवणार होतास?, आम्हाला परके समजतोस का?" बाबांच्या अश्या बोलण्याने प्रकाश च्या डोळ्यांत पाणी तरळते , ओठ थरथरतात , गळ्यांत आवंढा गिळत , प्रकाश हुंदके देऊ लागतो.
करकर्र्र् आवाजात दार वाजतं . ती आणि तिची आई आत येतात.. ती प्रकाश च्या हाताला हात लावत सांगत असते," मी डॉक्टरांना फोन केला होता, तुम्ही त्या दिवशी माझ्यापासून काही लपवत होते, मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला?,
"त्यानंतर डॉक्टरांना भेटून मी पूर्ण चौकशी केली" ती म्हणते.
मधेच तिची आई पुढाकार घेत बोलू लागते, " तू अनाथ नाहीस बाळा, आम्ही आहोत ना अजून, कश्याला फिकीर करता पोरांनो?, एका शब्दाने सांगायचस तरी, तेव्हाच प्रयत्न केले असते?
तिचे बाबा बोलू लागतात, “उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. खर्चाच टेन्शन नको घेऊस, प्रसादशी (प्रकाश ऑफिस मधला मित्र) बोलून सुट्टीच करून घेऊ, ३ ते ४ आठवड्यांत ट्रीटमेंट पूर्ण होईल. "
तो मध्येच बोलणं थांबवत " पण बाबा"
बाबा त्याला मोठ्यांच्या मायेने," आता पण नाही नि बिन नाही, ठरलय, उद्या जायचंच". प्रकाश मोठ्याने रडत बाबांच्या मिठीत पडतो. एका हातानें तिला जवळ घेत तिला सॉरी म्हणतो.
ती त्याची समजूंत काढते," आपली परिस्थिती ती आपली आहे, आपल्या सर्वांची आहे, माझ्यापासून लपवून प्रॉब्लेम संपले असते कि वाढले असते?"
तो होकारार्थी मान डोलवत तिच्या म्हणण्याला दुजोरा देतो.
सगळे झोपायला जातात. तो आणि ती त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. तो तिला विचारतो, " तुला माहीत होत तरीही सकाळी बडबड?"
ती म्हणते, "मलाही दाखवायचं नव्हतं, मला माहित आहे ते." तिच्या डोक्यावरून हात फिरवत, तिचा चेहरा हातात घेत, तिच्या डोळयांत तो हरवून जातो.
सकाळी लवकर उठून सर्वजण दवाखान्यात जातात. प्रकाश ची ट्रीटमेंट चालू होते. तिचे आई-बाबा तिच्या सोबतच असतात. एका महिन्यानंतर प्रकाश घरी येतो. प्रकाश घरी आल्याच्या आनंदात सर्व जण असतात, तेवढ्यात एक कुरिअर येत. ती ते उघडून पाहते. तिच्या बाबांच्या नावाने काही कागदपत्रे असतात. बाबा ते कागदपत्रे पाहून रडू लागतात. तिला आणि तिच्या आईला काहीच काळात नसते, काय झालय. तेवढ्यात दाराची बेल वाजते. तिची आई दरवाज्या उघडते. प्रसाद आत येत प्रकाशची विचारपूस करतो. बाबांच्या हातातील कुरिअर पाहून बोलतो," अरे व्वा " कागदपत्रे मिळाली का? बरं झाल. दोन गोड बातम्या एकत्रं "
बाबा त्याच्या कडे आश्चर्यचकित होऊन पाहत विचारतात, "म्हणजे"?
प्रसाद सांगतो, "प्रकाश ने केलेल्या कामामुळे त्याच्या कंपनीचे भारी नुकसान होण्यापासून वाचले होते. त्यामुळे कंपनीने त्याला कामात बढती देऊन दहा लाखाचा पुरस्कार दिला होता. तो घरी येऊन सांगणार होता, पण बोलायला संधीच मिळाली नाही आणि पुढे ट्रीटमेंट वगैरे, परंतु दरम्यानच्या काळात या सर्व गोष्टींवर चर्चा करताना प्रकाश ने मला माहिती काढायला सांगितली होती. तुम्ही तुमचं घर गहाण ठेऊन कर्ज काढल्याचं समजल्याबरोबर प्रकाश ने मला ते सोडवायला सांगितले होते." प्रसादचे बोलणे ऐकून ती व तिचे आई-बाबा रडू लागतात. प्रकाश त्यांचं सांत्वन करतो. प्रसाद परिस्थितीला वेगळं वळण देत विषय बदलतो. सर्व एकत्र हसत खेळात जेवण उरकतात.
-----------------समाप्त -------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users