मिनिएचर गार्डन उर्फ पऱ्यांचा बगीचा

Submitted by मनिम्याऊ on 7 March, 2021 - 12:24

घरातला किंवा बाल्कनीतला एक हिरवा कोपरा. कोपरा कशाला? केवळ एक कुंडी, एखादा ट्रे किंवा छोटाश्या पॉट मध्ये फुलवलेला अक्खा बगीचा.
मिनिएचर गार्डन ची कन्सेप्ट आजकाल बऱ्यापैकी प्रचलित झालेली दिसते. अतिशय लहान आकारात असलेली ही बाग बहुधा एखादी थिम घेऊन बनवलेली असते. घरी तशी खूप मोठी बाग आहे. पण लॉकडाऊनच्या सुरवातीच्या दिवसांत मुलीला बिझी ठेवण्यासाठी एक वेगळी कल्पना म्हणून उपलब्ध असलेल्या लहानसहान वस्तू वापरून पहिलावाहिला मिनी बगीचा बनवला. आणि प्रयोग सक्सेसफुल. लेक पण खूष तिचा पर्सनल गार्डन म्हणून आणि मी खूष तिला बागकामाची गोडी लागली म्हणून. मिनिएचर गार्डनचे दुसरे नाव आहे फेअरी गार्डन. जणू परिकथेतल्या चिमुकल्या पऱ्यांसाठी असलेला चिमुकला बगीचा.
7.jpg

मिनी बाग करताना एखादी मध्यम किंवा लहान आकाराची कुंडी/ ट्रे घ्यावा. त्यात झाडे निवडताना जी खूप मोठी होत नाहीत किंवा जास्त पसारा नसलेली अशी घ्यावीत. ऑरनामेंटल प्लांट्स या सदरात मोडणारी झाडे, ग्राउंडकव्हर म्हणून वापरले जाणारे गवत किंवा सक्युलंटस अशी निवडावीत. उदाहरणार्थ अळीव, गणेशवेल, पुदिना, थाइम, विविध प्रकारची फर्न्स, सक्युलंटस, कोरफड, शतावरी असे खूप पर्याय आहेत.

सजावट करताना शंख-शिंपले, रंगीत दगड, खेळण्यातल्या लहान लहान टेबल खुर्च्या, मातीची बोळकी वापरून एखादी रचना करावी. मग अगदी जसे मन म्हणेल तसे गार्डन सजवत जावे. आपोआप आयडिया सुचत जातात. मग कधी अगदी एखाद्या जुन्या फुटलेल्या मगात देखील बगीचा फुलतो.

या बागेसाठी काहीही विशेष कष्ट नाहीत. घरातच उपलब्ध असलेल्या वस्तू, मुलांची जुनी खेळणी, रंगीत दगड आणि जराशी क्रिएटिविटी.
2
2.jpg
.
3
1.jpg
4
8.jpg
5
6.jpg
6
9_0.jpg
7
IMG_20210307_223523.JPG
8
10.jpg
9
IMG_20210307_224250_0.JPG
10
IMG_20210307_224218_0.JPG
11
IMG_20210307_224046.JPG
मिनिएचर तळे
IMG_20210307_224102.JPG
12
IMG_20210307_224236.JPG
13
3_0.jpg

बागकामाची आवड असलेल्या प्रत्येकाला आवडेल.
Why try to explain miracles to children when you can just have them plant a garden?
-Robert Brault

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर आहे आयडिया.. तुम्ही सजवलंय हि खूप छान..मी नवीन नवीनच बाल्कनीत रोपं लावायला सुरू केलेय त्यालाच मुलं दिवसभर पाहत असतात, असं काही मस्त केलं तर बच्चे कंपनी खुष होईल !!

छान

सहजच...

IMG_20210701_210138.JPG
.
IMG_20210701_193939.JPG
.

छान