मला आवड्लेल्या व्यक्ती

Submitted by mee_na on 14 May, 2009 - 21:42

काही काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणी मनात घर करुन राहतात. कधी कधी आपण त्यांना माहीत असु की नाही माहीत नाही पण त्या व्यक्ती आपल्याला व्यक्तीमत्व देउन जातात. अशाच काही व्यक्तींची ही आठ्वण.
कालच orkut वर चाळा करत बसले होते. अचानक सोनालीचे profile दिसले. सोनाली, माझ्या लहान बहिणीची मेत्रीण. तीचे अस्तीत्व म्हण्जे जणु चेतंन्याचा झरा. ईतकी जिवंत व्यक्ती कधीच पाहीली नव्हती. कुठ्लीही गोस्ट करयची म्हणजे समरसुन. १००% . ती घरी आली की सारे घर नकळत तिच्या ताब्यात जायचे. तिच राहण, तिच वागण, तिच बोलण सगळ जगावेगळ. मनाला पटेल तसे वागयचे. ज्या काळात आणी ज्या गावात स्कर्ट घालणे म्हणजे modern समजले जायचे, त्या वेळी ही आपली मस्त मिनी घालुन हिडायची. पण तिला ते दिसायचेही छान. ईतके वेगवेगळे कपडे घालुनही कघीही तिने मर्यादा ओलांड्ली नाही, मिनी काय, slevessless, tanks सगळे कुणाला त्या काळात कल्प्नाही करवणार नाही असले सगळे कपडे घालुन बाईसाहेब मस्त फिरायच्या. पण त्याच वेळी दिवाळीत ती साडी घालुन आली तर सगळे पहातच राहीले. ज्या gracefully मिनी घालयची त्याच gracefully साडीपण.
आमच्या घरी राहायला आली की मस्त मस्त पदार्थ बनवायची. सगळे मन लावुन करायची सवय होतीच. मग काय अगदी पोहे सुद्ध खावे तर तिच्याच हातचे. हातच राखुन या पोरीने कधीच काहीच केल नाही. मला काय सार्या गावालाच हेवा वाटायचा. सगळया जीवनाचा मंत्रच जणु सगळ १००% करायच हाच होता. साध सरळ पण elegant . तिला बघुन राजहंसाचीच आठ्वण व्हायची. असा हा आमचा राज हंस hostel वर रहायला गेला, आणी तिथे दुसर्या राजहंसाच्या प्रेमात पडला. हे प्रेम ही खुल्ल्मखुल्ला. सगळे जगाला या जोडिगोळीने सागुंन टाकले अगदी पहील्या दिवशीच आमच प्रेम आहे. जगाची पर्वा न करणारे ते दोघेही. स्वतःच्या मनाप्रमाणे जगणे या खेरीज त्यांना काहीच माहीत नव्हते. तो, संदीप पण तिच्या सारखाच. दिसायला अगदी राजासारखा. ती राणी सारखी. त्या दोघही नेहमी सगळीकडे पुढे. कधीही कशातही त्यांना मी मागे पाहीले नाही. college चे nss चे शेत खणायचे काम असो वा परीक्षा. कघीही वर्गातुन पहीला नंबर आणी दुसरा नंबर हुकला नाही. कघी तिचा तर कघी त्याचा. असे चार वर्ष त्यांनी अगदी गाजवुन ठेवले. जणु देवाने एकमेकांसाठीच त्यांना बनवले होते. झाले चार वर्ष संपले. तिने त्याला विचारले, का रे आपण लग्न करुया. तो म्हणाला हो का नाही, पण मला आघी नोकरी तर घेउ दे. आणी तिथुन काहीतरी वाद झाला आणी ही जोडी फुटली. कुणालाच माहीत नाही काय झाले नक्की. सगळे आयुष्य open book प्रमाणे जगणर्या या जोडीच काय बिनसल हे कुणालाच माहीत नाही. पण मी हे १००% सांगु शकते, ते प्रेम खर होत १००%. तो वादही खरा होता १००%. हजारदा विचारुनही तिनेही सांगीतले नाही की त्यानेही.
आजही तोही जगतो आहे ती ही जगते आहे, पण जणु कुणी जीवन रस काढुन घेतला. सोनालीचे आज साध्या वेशातले कपडे घातलेले फोटो पाहीले, आणी विश्वासच बसला नाही. खोल गेलेले गाल पाहीले आणी विश्वासच बसला नाही. डोळ्यात मात्र सच्चेपणा आजही तसाच आहे १००%. मला क्षणात वाटले काहीतरी असे व्हावे, कुणीतरी यावे आणी एक फुंकर मारुन पुन्हा या दोन डोलदार प्राण्यांना जिवंत करावे. मला जिवन रंगेबिरंगी कसे करायचे ते शिकवणार्या त्या दोघंना हा सलाम.

गुलमोहर: 

आवडलं.
----------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

>>कुणालाच माहीत नाही काय झाले नक्की.
ह्म्म. बहुसंख्य बाबतीत मतैक्य/समान असल्याने मनाजोगते घडत गेल्याने कदाचित तडजोडीची क्षमता कमी झाली असेल.

>>कुणीतरी यावे आणी एक फुंकर मारुन पुन्हा या दोन डोलदार प्राण्यांना जिवंत करावे
त्याची गरज नाही, mee_na. आयुष्य इतके आसुसलेपणाने जगणार्‍या त्या मुलीला तिची वाट स्वतःच सापडेल. सध्याची अवस्था तात्पुरती समजा आणि तुमच्या शुभेच्छा कायम तिच्या पाठीशी असू द्या.

आपल्या आसपास असलेल्या अशा अनेक 'God of small things' ची दखल घेण्यार्‍या तुमच्या समजूतदारपणाला सलाम.

छान लिहिलेत. आवडले.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

कुणीतरी यावे आणी एक फुंकर मारुन पुन्हा या दोन डोलदार प्राण्यांना जिवंत करावे. मला जिवन रंगेबिरंगी कसे करायचे ते शिकवणार्या त्या दोघंना हा सलाम. >> हे आवडलं.
लेख चांगला आहे.