घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि हिरव्या वनराईने नटलेला असेल तर मनाला आणि शरीराला नवचैतन्य लाभते.
शहरात राहायला जागा अपुरी पडत असताना घरामागे मनासारखी बाग फुलविणे खरंतर अशक्य गोष्ट आहे.
परंतु सुदैवाने आम्ही राहत असलेल्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने आम्हांला विविध प्रकारची झाडे लावता आली. आंबे, केळी, चिकू, फणस, जांभूळ, सीताफळ, लिंबू, डाळींब, चेरी, काजू, पेरू , पपई , नारळ अश्या अनेक प्रकारच्या फळझाडांची तसेच रातराणी, टगर, मोगरा, अबोली ह्या फुलझाडांची लागवड केली आहे. ह्या झाडांनी आम्हांला सढळहस्ते त्यांच्या फळांचे आणि फुलांचे दान केले आहे त्या झाडांप्रती आम्हांला खूप प्रेम आहे. घरामागील बाग फुलविण्यात आमच्यापेक्षा जास्त सासऱ्यांची खूप मेहनत आहे . ह्या झाडांना खत म्हणून शेणखत, सुकी मच्छी साफ केल्यावर राहणारा कचरा, खराब झालेले पीठ , लोणी काढल्यावर उरणारे पाणी तसेच देवघरातील निर्माल्य कुजवून केलेले खत वापरतो.
सकाळी स्वयंपाकघराच्या खिडकीतून मागील परसातील झाडांवर किलबिलाट करणारे पक्षी पाहिले की खरचं दिवसाची सुरुवात खूप छान होते.

अडळूसा

अळूचे रोप

आंबा ( केसर)

मनमोहक फुललेला बहावा

वांगी

हिरवी वांगी

चेरी

डाळींबाचे झाड

गवती चहा

कढीपत्ता

काजू

वेलची केळी

लिंबूचे झाड

मेथी, शेफूचे वाफे

पसरलेली नागवेल आणि हळदी रोप

पेरुच्या झाडाला लपटलेली नागवेल

पांढरे जांभूळ

औषधी पानफुटी

पपईचे झाड

हिरवागार पुदिना

बोरीच्या झाडाला लपटलेली शतावरी

सिताफळाचे झाड

टॉमेटोची रोपे

बटरफ्लाय ट्री
बटरफ्लाय ट्री

स्वयंपाक घराच्या खिडकीतून
जिज्ञासा माझा मोबाईल वर्क
जिज्ञासा माझा मोबाईल वर्क नाही करत आहे.. गुगल वर pandan leaves पहा..
व्वा लकी ! मस्त बाग आहे.
व्वा लकी ! मस्त बाग आहे.
धन्यवाद मीरा...
धन्यवाद मीरा...
खुपच छान.
खुपच छान.
धन्यवाद वीरूजी...
धन्यवाद वीरूजी...
छानच बाग फुलवली आहे. आवड आणि
छानच बाग फुलवली आहे. आवड आणि जागा दोन्ही आहे. तुम्ही आणी तुमचे सासरे दोघेही भाग्यवान आहात.
धन्यवाद स्मिताजी..
धन्यवाद स्मिताजी..
Wow!!! Lucky u!
Wow!!! Lucky u!
पांढरे जांभुळ मी पहील्यांदा
पांढरे जांभुळ मी पहील्यांदा ऐकलं नाव. जांब म्हणतो आम्ही, मला जाम आवडतात, कोकणात पण होतात. अर्थात हा भागही कोकणातलाच म्हणा.
धन्यवाद नानबा..
धन्यवाद नानबा..
हो अन्जुजी, जांब म्हणतात पण आम्ही त्याला पांढरी जांभूळे असे ओळखतो. जांब ची जांभूळ करून टाकतो.
आहाहा कित्ती छान !!
आहाहा कित्ती छान !!
आहाहा कित्ती छान !!
आहाहा कित्ती छान !!
आहाहा कित्ती छान !!
आहाहा कित्ती छान !!
श्रवु, धन्यवाद! बघितले गुगलवर
श्रवु, धन्यवाद! बघितले गुगलवर. नवीन माहिती मिळाली!
धन्यवाद तेजो...
धन्यवाद तेजो...
रूपाली ....अन्नपूर्णा
रूपाली ....अन्नपूर्णा
ओह! आज बघितले अन्नपूर्णा चे
ओह! आज बघितले अन्नपूर्णा चे झाड. कधी ऐकले पण नव्हते. धन्यवाद लावण्या.
रुपाली ते शेवटच्या फोटोत झाकलेय ते कम्पोस्ट केलेय का?
धन्यवाद लावण्या..
धन्यवाद लावण्या..
हे झाड आहे घरामागे पण ह्याला अन्नपूर्णा म्हणतात ते माहित नव्हते. बरं झालं तू फोटो टाकलास.
जांब ची जांभूळ करून टाकतो. >>
जांब ची जांभूळ करून टाकतो. >>>
हे मस्त.
नुसत अंजू म्हणा, जी वगैरे नको प्लीज.
लावण्या, मस्त आहे अन्नपुर्णा. मी पहिल्यांदाच बघतेय.
नुसत अंजू म्हणा, जी वगैरे नको
नुसत अंजू म्हणा, जी वगैरे नको प्लीज.>> आता नुसतं अंजू म्हणेन...
घरामागे लावलेलं आहे अन्नपूर्णाचे झाड तरी मला नाव माहित नव्हतं.
रुपाली ते शेवटच्या फोटोत
रुपाली ते शेवटच्या फोटोत झाकलेय ते कम्पोस्ट केलेय का?<< अगं ते प्लास्टिकचे कापड आहे काळ्या जांभळ्यांच्या झाडाखाली टाकलं होत. जांभळे खाली पडल्यावर जांभळांना माती लागू नये म्हणून आणि पांढरी पिशवी दिसतेय त्यात शेणखत आहे.
ओह रुपाली . मी दोनदा शेणखत
ओह रुपाली . मी दोनदा शेणखत घातलं होतं व मुंग्या खूप यायच्या म्हणून बंद केलं. आता अर्थात झाडं ही कमीच आहेत.
मस्त उन्हाळ्यात जांभळाची चंगळ असेल नाही. माझ्या आजोळी झाड होतं. महिनाभर जांभळं खायचो आम्ही .
हो गं,... लहान आणि मोठी
हो गं,... लहान आणि मोठी दोन्ही प्रकारची जांभळे आहेत. मोठ्या जांभळांवर खारुताई डल्ला मारते. ह्यावर्षी लहान जांभळे भरपूर आली होती. मज्जाच होती ह्यावर्षी.
वा! खूपच छान... भाग्यवान आहात
वा! खूपच छान... भाग्यवान आहात रुपाली....
धन्यवाद सुतो...
धन्यवाद सुतो...
बटरफ्लाय ट्री म्हणजे खुळखुळा
बटरफ्लाय ट्री म्हणजे खुळखुळा आहे
यावर टायगर प्रजातीची फुलपाखरे येतात
धन्यवाद ऋतूराज..
धन्यवाद ऋतूराज..
चांगली माहिती दिलीत झाडाबद्दल..
मराठीत नाव माहित नव्हते.
खुपचं सुंदर बाग आहे. मला खूप
खुपचं सुंदर बाग आहे. मला खूप आवड आहे पण इतकी जागा नाही आणि माती सुद्धा नाही..
इथले बाग बगीचे पाहून टेरेस वर या वर्षी बाग करायचा विचार चालू आहे.. पाहू जमतंय का..
तुम्ही कुठे राहता? काजू चेरी वगैरे इकडे टिकवण अवघड असेल अस वाटलं मला. पण तुमच्या बागेत खुपचं सुंदर दिसताय चेरी..
टेरेस गार्डन for begginer असा एखादा धागा काढा अनुभवी मायबोलीकरांनी. तेवढीच आमच्या सारख्या आवड असून अज्ञान असणाऱ्या लोकांना मदत होईल.
टेरेस गार्डन for begginer असा
टेरेस गार्डन for begginer असा एखादा धागा काढा अनुभवी मायबोलीकरांनी. तेवढीच आमच्या सारख्या आवड असून अज्ञान असणाऱ्या लोकांना मदत होईल.
+111
भावाने गच्चीवर लावलेली
भावाने गच्चीवर लावलेली कोथिंबीर, पुदीना, कडीपत्ता, गुलाब आणि मोगरा.
Pages