अनोखी शवचिकित्सा
* -------------------- *
पीएसएम आणि शवचिकित्सा! होय! मी पैठणला असतांना काही शवचिकित्सा ( पोस्टमार्टम) केलेत. असं करणारा पीएसएमचा एकमेव प्रोफेसर असावा. ही हकिकत आहे एका अनोख्या शवचिकित्सेची
*
पोलिस एक कुलुपबंद ट्रंक घेऊन आला आणि म्हणाला "याचं पोस्टमाॅर्टम करायचंय!" आत मृतदेहाचे तुकडे असावेत ही अपेक्षा! पण निघाली हाडं. नोटा मोजून घ्याव्या तद्वत मी हाडं मोजून घेतली.
*
मला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची होती
१. ही मानवी हाडं आहेत कां?
२. असल्यास स्री की पुरुष?
३.वय काय असावं?
४. मृत्यु केंव्हा झाला असावा?
५. मृत्युचं कारण काय असावं?
ह्या बाबतीत मी अत्यंत नवखा. मग धीर धरुन औरंगाबादला जाऊन व्हीएल देशपांडे सरांना गाठलं. फोरेन्सिक मेडीसीन या विषयातले ते तज्ञ. त्यांनी मोलाच्या सुचना केल्या. त्यावरुन आणि काही पुस्तकं वाचून मी अहवाल तयार केला. फक्त नियमानुसार वय निश्चिती साठी प्रकरण प्रोफेसर Anatomy कडे पाठवलं.
यात मृत्यु केंव्हा झालाअसावा आणि मृत्युचं कारण ठरवणं या बाबी अवघड होत्या. हाडं जमिनीत काही रसायनं शोषतात. त्याच्या प्रमाणावरुन हा अंदाज देता येतो हे देशपांडे सरांनी सांगितलं होतं. ती तपासणी सरकारमान्य प्रयोगशाळेतून करवून घेतली.
डोक्याच्या हाडाला fracture होतं. ते मृत्युपुर्व आणि कुर्हाडी सारख्या शस्त्रानं झालं हे माझं मत कोर्टानं ग्राह्य धरलं. तेच मृत्युचं कारण हे माझं मतही मान्य झालं
*
कोर्टातली उलटतपासणी मात्र टेरीफिक आणि टेरीबल अशी दोन्हीहि होती. मी एमडी ला केली नसेल अशी तयारी करुन गेलो होतो. एमडीची व्हायवा परवडली अशी सत्वपरिक्षा झाली.बचावपक्षाचे वकील औरंगाबादचे नामवंत वकिल. त्यांनी अनेकप्रकारे मला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण देशपांडे सरांच्या टीप्स आणि रंगीत तालिम कामाला आली. साक्षसंपल्यावर ते वकील बाहेर भेटले. मला बघून ते थांबले, माझ्याशी हस्तांदोलन करुन ते म्हणाले ः " वेल डन , डाॅक्टर!"
मी काय म्हणालो आठवत नाही. कल्पनाही नसलेलं बक्षिस अनपेक्षितरित्या मिळाल्यावर माणूस काय करतो? काय बोलतो?
मी तसंच काही तरी केलं असणार! मी तसंच काहीसं बोललो असणार!
*
- अशोक कुलकर्णी
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
रोचक आहे! अजून सविस्तर
रोचक आहे! अजून सविस्तर वाचायला आवडेल. पीएसएम म्हणजे काय?
अशाच विषयावरची 'बोन्स' ही अमेरिकन सीरिज मला खूप आवडायची. अर्थात त्यातल्या केसेस आणि तुमच्यासारख्या तज्ज्ञांना हाताळायला लागणाऱ्या केसेसमध्ये बराच फरक असणार. तुमचं काम नक्कीच किती तरी कठीण असणार. जमल्यास नक्की सविस्तर लिहा.
छान माहीती , शवचिकित्सेची
छान माहीती , शवचिकित्सेची सविस्तर माहीती वाचायला आवडेल.
मस्त.यावर अजून माहिती लिहा.
मस्त.यावर अजून माहिती लिहा.
रोचक . अजून लिहा यावर
रोचक . अजून लिहा यावर
डॉक्टर, कोर्टरूम ड्रामा थोडा
डॉक्टर, कोर्टरूम ड्रामा थोडा विस्ताराने लिहा जमल्यास.
रोचक आहे! अजून सविस्तर
रोचक आहे! अजून सविस्तर वाचायला आवडेल. पीएसएम म्हणजे काय? ----------------------- Preventive and Social Medicine (रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र)
(आता ह्या विषयाला Community Medicine (सामाजिक वैद्यकशास्त्र) म्हणतात).
छान लेख, विस्ताराने लिहा
छान लेख, विस्ताराने लिहा जमल्यास
छान लिहिले. पण खूप संक्षिप्त
छान लिहिले. पण खूप संक्षिप्त वाटतेय डॉक्टर. थोडा अजून विस्तृत लिहिले असते, तर अजून मजा आली असती.
डॉक्टर जबरदस्त लिहिलं आहे,
डॉक्टर जबरदस्त लिहिलं आहे, हॅट्स ऑफ तो युअर स्किल्स
धन्यवाद सर्वाांचे!
धन्यवाद सर्वाांचे!
रोचक आहे हे पण सविस्तर लिहा.
रोचक आहे हे पण सविस्तर लिहा.
छान लेख आहे. जमल्यास सविस्तर
छान लेख आहे. जमल्यास सविस्तर लिहा.
रोचक. सविस्तर वाचायला आवडेल.
रोचक. सविस्तर वाचायला आवडेल.