चित्रपट परीक्षण - लुटकेस

Submitted by भागवत on 28 August, 2020 - 07:50

ब्लॉग : चित्रपट परीक्षण - लुटकेस

समजा एखाद्या सामान्य माणसाला घरी जात असताना रात्री अडीच वाजता पैशाने खचाखच भरलेली सूटकेस सापडली तर तुमची अवस्था काय आहे तशीच अवस्था नंदनची झाली झाली आहे. मध्यमवर्गी लोकांचे जीवन चक्र असते आणि त्या जीवन चक्रामध्ये तो सतत फिरत असतो. ऑफिस, घर, परत ऑफिस आणि मित्र मंडळ यांच्यात मध्यमवर्गीय लोकांचं आयुष्य सामावलेला असते.

कोण असतो नंदन कुमार? एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रमुख, त्याची सुशील पत्नी लता आणि पोरगा आयुष. असं छान त्रिकोणी कुटुंब असते. नंदन आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलाला, पत्नीला सुखी ठेवायचा प्रयत्न करत असतो. कधी सिनेमा बघायला, कधी कधी चायनीज गाडी वर घेऊन जात असतो. नंदन एका प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला आहे. त्याचा बॉस त्याला "किरोडीमल एम्पलोयी ऑफ द इयर" ह्या अवॉर्डचे अमिश दाखवून काम जास्त करून घेत असतो.

विजय राज ने बाला ठाकूर ची भूमिका केली आहे. डिस्कव्हरी /नॅशनल जिओग्राफिक चैनल बघणारा डॉन उभा केला आहे. प्रत्येक प्रसंगा मध्ये जंगली प्राण्याची गोष्ट सांगणारा. खरे तर या गोष्टी पंटर लोकांच्या डोक्यावरून जात असतात. पण या गोष्टी विनोदाचा तडका लगावून जात असतात. रणवीर शोरे ने इन्स्पेक्टर माधव कोलते चा दमदार रोल उभारला आहे. डोळ्यात आग, अतिशय हुशार आणि खुनशी, मोठे काम असले की त्याच्या अड्ड्यावर जायची मस्त पद्धत. भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. ऐन वेळेला सगळ्यांना डबल क्रॉस करून पाटील ला अडचणीत आणतो.

चित्रपटा चा मुख्य खलनायक भूमिका "पाटील MLA" "गजराज राव" यांनी साकारली आहे. "बधाई हो" मधील त्यांची ऍक्टिग नावाजली होती. इथे त्यांनी भूमिकेला चार चांद लावले आहेत. पुढच्या व्यक्तीला थोडीशी सुद्धा धमकी न देता आपले काम कसे साध्य करून घायचे. दोन नावाजलेले डॉन, पोलीस यंत्रणा, सगळे आपल्या कामाला लाऊन लुटकेस कशी परत मागवता येईल यांचे नियोजन करत असतो. जबरदस्त अभिनया ने पूर्ण चित्रपट खाऊन टाकतो.

इकडे नंदन पैश्याची भरलेली लुटकेस घरी घेऊन येतो. लुटकेसला बाजूच्या घरात ठेवतो. आणि नाव देतो "आनंद पेटीकर". नंदन आनंद सोबत बोलत असतो, नाचत, गात असतो. नंदन साठी कुणाल खेमु ची कास्टिंग अतिउत्तम आहे. अभिनय जबरदस्त आहे. कुणालला बघतोय असे वाटतंच नाही. त्याने अस पात्र रंगवलय, जगवलंय. रसिका दुग्गलने नंदनला प्रामाणिक साथ दिली आहे. नवऱ्यावर बारीक लक्ष ठेवणारी लता. प्रामाणिक, लुटकेस पोलिसाला परत दे म्हणणारी लता चांगले पणाची प्रतीक आहे. लताचा मुलगा निरागस खोड्या करून आपल्या मागण्या काढून घेतो.

बाकी कास्टिंग उत्तम आहे. कथा सुद्धा आपली पकड सोडत नाही. क्लासिक कॉमेडी नसून प्रसंगनिष्ठ कॉमेडी आहे त्यामुळे तेच जुने कळकट्ट संवाद नाहीत. एक सीन मध्ये नंदनला विचारतात "तू किस गॅंग का आदमी है" नंदन उत्तर देतो "मै लता का आदमी हू" दोघे गोंधळतात. "मै आखरी बार पुछ रहा हू किसका पैसा है"असे संवाद मज्जा आणतात. नंदनचा बॉस आणि ऑफिस मित्र आपआपली कामे चोख बजावतात. नंदनचा बॉस दारू पिऊन त्याच्या वडिलांची गोष्ट सांग आणि नंदनला पिडतो.

पाटील दोघां डॉनला कोलतेच्या मागावर पाठवतो. त्यातून शेवटी जोरदार ऍक्शनचा मसाला, विनोदाचा जोरकस तडका, त्यातून होत जाणारा खुलासा, त्यात टेबलावर मांडवली चा प्रयत्न आणि परत पहिल्याच वळणावर संपणारी गोष्ट. एकच ठीक गाणं, पांचट विनोद नाही, इतर क्लासिक कॉमेडी सारखा नसला तरी प्रसंगनिष्ठ कॉमेडी मध्ये एक नंबर आहे. मी या चित्रपटाला 4 स्टार देतो. प्रसंगनिष्ठ कॉमेडी साठी 1 स्टार, गजराज राव आणि कुणाल खेमु साठी 1 स्टार, पटकथा, कथा, संवाद सादरीकरणासाठी 1 स्टार, आणि उत्तम दिग्दर्शन आणि इतर कलाकारा च्या अभिनयासाठी 1 स्टार. 1 स्टार कमी होईल कथेच्या नाविन्यपूर्णता नसल्याने, विनोदी मसाला कमी पडल्या मुळे ही कथा क्लासिक कॉमेडीच्या उंचीवर जात नाही. पण चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही. Hotstar चा पैसे वसूल चित्रपट.

lootcase.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चित्रपट ठिकठाक आहे. मला कुणाल खेमुचा अभिनय अतिशय ओढुन ताणुन विनोद या कॅटगोरीतला वाटला. अरुण शोरी आणि विजय राज मात्र भन्नाट. या दोघांकरता हा चित्रपट पहा, अजुन पाहिला नसेल तर...

हो, रणवीर शोरी. आय स्टँड करेक्टेड. Wink

रणवीर पेक्षा अरुण शोरी मोठं नांव आहे म्हणुन अनवधाने तसं झालं...