टीव्ही, टीआरपी अन त्याचं गणित

Submitted by DJ.. on 28 July, 2020 - 01:24

टी.आर.पी. म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट.

टी.आर.पी.चं गणित डिजिटल सिग्नलिंग मुळं खुप सोप्पं झालंय. कुठल्या चॅनेलच्या कोणत्या सिरियल ला किती व्युज मिळतात हे एका मिनिटात कळतं. तुम्ही जाता जाता नुसतं सर्फिंग करताना १ मिनिट एखाद्या चॅनेलवर थांबला तरी तो त्या चॅनेलचा व्यु असतो. त्यामुळं टीआरपी जास्त असणार्‍या मालिका ह्या खरोखर चांगल्या असतीलच असं नव्हे. प्राईम टाईम मधे बरेच लोक टीव्ही समोर येऊन सर्फिंग करत बसतात. जास्त लोक एकाच वेळी कोणत्या स्लॉट मधे टीव्ही समोर येतात तो प्राईम टाईम असतो आणि या वेळात कोणत्या चॅनेलच्या कोणत्या कर्यक्रमांना किती व्युज मिळाले तो असतो टीआरपी

सोमवार ते शुक्रवार प्राईम टाईम स्लॉट हा साधारण रात्री ८ ते १० असा असतो तर शनिवारी तो रात्री ७ ते ११ असाही असु शकतो. त्यामुळे या वेळात जी सिरियल टेलीकास्ट होते ती बर्‍याचदा जास्त टीआरपी ची असु शकते. हा टाईम स्लॉट मिळावा म्हणुन प्रॉड्युसर्स ज्या चॅनेलला जास्त व्युअर्स आहे त्या चॅनेलचे अक्षरशः उंबरे 'झी'जवत असतात. मग त्या प्रॉड्युसरच्या सीरियल मधे किती पोटेंशियल आहे हे साधारण त्या चॅनेलच्या मार्केटींग हेडला कळत असतंच. ती सिरियल कोणत्या बँड वर आणावी हा त्या त्या चॅनेलचा प्रश्न असतो. मग त्या त्या चॅनेलच्या ठरलेल्या चाकोरीत बसणारी (व्युअर्स ला नेमकं काय हवं ते दिल्यामुळे आपला चॅनेल नंबर वन होऊ शकतो याची चॅनेलवाले आधी काळाजी घेतात.. त्यानंतर एकदा चॅनेल सेट झाला की मग ते म्हणातील तीच पूर्व दिशा असते..!) मालिका असेल तर तिला प्राईम बँड मिळातो.

मराठी चॅनेल साठी रात्री ८.३० ते ९.३० हा टाईम स्लॉट मिळाला तर तो सोन्याहुन पिवळा ठरतो. कारण या स्लॉट मधे कोणताही बघणेबल हिंदी कार्यक्रम नसतो अन मराठी लोक शक्यतो मराठीच कार्यक्रम बघण्याला प्राधान्य देतात हा गेल्या काही वर्षांतला ट्रेंड आहे. त्यामुळे शक्यतो हा स्लॉट इंडस्ट्रीतल्या मातब्बर मंडळींना आंदण दिलेला असतो. या स्लॉट मधल्या कार्यक्रमांना तगड्या ब्रँड्च्या जाहिराती मिळातात त्यामुळे चॅनेल आणि प्रॉड्युसर यांना भरपूर नफा मिळातो. इंडस्ट्रीतली मातब्बर मंडळी आणि एखादा होतकरु प्रॉड्युसर यांचा योग्य मिलाफ साधला गेला तरच चॅनेल नंबर वन पोझिशन वर तग धरु शकतं. कारण इंडस्ट्रीतल्या मातब्बर मंडळींकडे नेम अन फेम असलेले कलाकार पडीक असतात. त्यांच्या जिवावर कसल्याही सिरियल्स अथवा कार्यक्रम फुळ्ळ पाणीदार करुन वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या माथी मारता येतात. तसेच मातब्बर मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊसला पैशांची कमी नसते त्यामुळे त्यांच्या सिरियल्स मधुन सहसा कोणी कलाकार पैसे मिळाले नाहीत म्हणुन एग्झीट घेऊन चॅनेलला अडचणीत आणणारे प्रसंग येणे जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे अशी बाप मंडळींच्या सिरियल्स आपल्या चॅनेलवर असाव्यात असं चॅनेललाही वाटत असतं. त्यामुळे अशा लोकांना प्राईम बँड साठी नेहमीच रेड कार्पेट घातलं जातं.

याउलट जे प्रॉडक्शन हाऊस पैशाने कमी पण प्रतिभावान असतात त्यांच्या कलाकृती प्रेक्षकच डोक्यावर घेतात. अशावेळेस त्या सिरियलना प्रायोजक आरामात मिळतात. थोडा धोका पत्करुन अशा कलाकृती प्राईम बँड वर एखादवेळेस चॅनेलवाले दाखवु शकतात. मग या अशा कमी बजेट पण भरपुर प्रायोजक मिळत असल्याने इंडस्ट्री मधल्या मातब्बर मंडाळींचं स्थान डळमळु शकतं असं लक्षात आल्यावर कुरघोडींचं राजकारण सुरु होतं. मातब्बर मंडळींकडे पैशाच्या जोरावर चॅनेलला हवं तसं वाकवायचं तंत्र अवगत असतं त्यामुळे बर्‍याचदा चांगल्या चाललेल्या प्रतिभावान सिरियल्सचा गळा घोटावा लागला तरी बेहत्तर पण मातब्बर मंडळ कायम सोबत असावं असंच चॅनेलला वाटत असतं. त्यात गैर काहीच नाही कारण चॅनेलवाले काय किंवा प्रॉडक्शन हाउस वाले काय कोणीही आपलं नाव कमावुन पैसा खेचण्यासाठीच या गळेकापु स्पर्धेत उतरलेले असतात. त्यामुळे प्रतिभावान प्रॉडक्शन कधी कधी नाराज होऊन दुसर्‍या चॅनेलकडं वळतं. वळले तर वळले. नंबर वन पोझिशन वर असणार्‍या चॅनेलला जास्त फरक पडत नाही कारण प्रेक्षकांना त्यांचंच चॅनेल आवडु लागलेलं असतं. Bw

चॅनेलवर काम करणारे प्रॉग्रामिंग हेड आणि मार्केटिंग हेड यांना आपल्या चॅनेलचा दर्शक नेमका कोण हेही बघावं लागतं. जास्त प्रेक्षक संख्या असणारे दर्शक हवे असतील तर मग त्या त्या कम्युनिटी वर आधारीत कार्यक्रम ठेवावे लागतात. मग ते दर्शक मुंबैचे की कोल्हापुरचे की सातार्‍याचे की लातुरचे की नागपुरचे की सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे हे सर्व लक्षात घेऊन मांडणी करावी लागते. कुठल्या भागातला प्रेक्षक किती वाजता जेवणं-खाणं उरकुन किती वाजता झोपतो हेही पहावं लागतं. यात पुन्हा प्रादेशिक अस्मितांना झुकता कल देणारा फेटा, टोपी, पागोटं, पगडी, मुंडासं यांचीही वेगळी गणितं असतात. अस्मिता दुखावणारं काही दाखवलं गेलं की प्रेक्षक दुरावलाच म्हणुन समजा. त्यामुळं एकीकडे इंडस्ट्रीतली मातब्बर मंडळी तर दुसरीकडे प्रादेशिक अस्मिता आणि या सार्‍यांना सांभळुन जमेल तेवढी प्रतिभा अशा त्रांगड्यातुन तावुन सुलाखुन जे चॅनेल बाहेर पडतं तेच नंबर वन होतं. त्यांनाच चांगल्या प्रॉडक्शन हाउसची पसंती मिळते आणि टी.आर.पी.चं रहाट गाडगं अव्याहत फिरत रहातं.

अशा वेळेस मग प्रेक्षकांच्या लक्षात ही गोष्ट राहतच नाही की ज्यांच्या स्वतःच्या पैशातुन १ मिनिट का होईना सर्फिंग केलेल्या चॅनेलला आणि त्यावर चालु असलेल्या सिरियल ला नंबर १ टी.आर.पी. मिळत आहे. ते बिचारे फुल्ली फालतु कार्यक्रम कसे काय जास्त टी.आर.पी. खेचत आहेत असा विचार करत चॅनेल जे दाखवेल तेच बघत राहतात आणि चॅनेलवाले टी.आर.पी. चार्ट दाखवत प्रेक्षकांनाही कसं हेच लागतं त्याला आम्ही तरी काय करु शकतो असं म्हणत जबाबदारी झटकतात.

त्यामुळे टीआरपीचं गणित आपल्याच रिमोटवर अवलंबुन आहे याचा साक्षातकार जोपर्यंत प्रेक्षकांना होत नाही तोवर रटाळ मालिका, तेच ते जाडे भरडे आणि किलोभर मेकप थापलेले रद्दड चेहरे, मक्ख चेहर्‍याने अभिनय(!) करणारे नेपोटिक , गेली २० वर्षं कुठल्यान कुठल्या चॅनेलवर रोज दर्शन देणारे अन आज ८० वर्षांच्या घरात पोहोचलेले असतानाही वीग संभाळात, मानेला झटके देत, थोडसं नाक मुरगाळुन दात काढत आपल्या माथी मारले गेलेले सो कॉल्ड अनुभवी कलाकार आणि या सर्वांना दावणीला बांधणारे कॉन्व्हेट मधुन शिकलेले आणि मराठी कथा लिहिणारे दळभद्री लेखक, पटकथा लेखक यांच्या पाणचट कलाकृती(?) मधुन शोन्या, बबड्या पहात बसण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

जर टीआरपीच्याच गणिताने या सर्वांचा बदला घ्यायचाच असेल तर शेवटी रिमोट तुमच्याच हाती आहे. जे कार्यक्रम तुम्हाला आजिबात आवडत नाहीत त्यांच्या नावाने बोटं मोडण्याऐवजी त्या कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेत तुम्ही त्या चॅनेलवर फिरकुच नका. मग बघा त्यांचा नक्षा कसा उतरतो ते. एखाद्याचे दुकान चालु ठेवणे अथवा बंद करणे गिर्‍हाईकाच्याच हाती असते हे जेव्हा सर्वांना कळेल त्यावेळेसच त्या गिर्हाईकाला चांगला दर्जेदार माल पुरवण्यासाठी दुकानदार डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवेल ना.!! Bw

उदाहरणादाखल लॉकडाउनच्या आधी कोणत्या सिरियल साठी किती टी.आर.पी. होता त्याची माहिती खाली देत आहे त्यावरुन कोणता चॅनेल नंबर वन पोजिशनला आहे याची कल्पना येऊ शकेल Wink .

टी.आर.पी. कालावधी आणि रेटिंग्स - २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२०

१. स्वराज्य रक्षक संभाजी - ५२,६७,०००
२. चला हवा येऊ द्या - ३३,७४,०००
३. अग्गंबाई सासुबाई - २८,८९,०००
४. माझ्या नवर्‍याची बायको - २७,४८,०००
५. मिसेस मुख्यमंत्री - २७,०३,०००
६. रात्रीस खेळ चाले - २६,९५,०००

तर लॉकडाउन लागल्यानंतर रिपिट टेलिकस्ट मालिकांमुळे टी.आर.पी. चं गणित पुर्ण उलटं फिरलेलं दिसतं :

टी.आर.पी. कालावधी आणि रेटिंग्स - २३ मे ते २९ मे २०२०

१. स्वराज्य रक्षक संभाजी - १०,४४,०००
२. चला हवा येऊ द्या - ९,७१,०००
३. महाराष्ट्राची लोकधारा - ८,१५,०००
४. फुलपाखरु - ७,७१,०००
५. सह्याद्री बातम्या - ७,५५,,०००

जूनच्या शेवटच्या आठवड्याचे टी.आर.पी. रेटींग्स अजुन आलेले नाहीत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तविक, “रेटिंग्ज” ही संकल्पना जेव्हा एसीनिल्सन (इलेक्ट्रिकल अभियंता आर्थर सी निल्सेन यांनी १९२३ मध्ये स्थापना केली) ने रेडिओ प्रेक्षकांचे लक्ष्यित सर्वेक्षण सुरू केले आणि रेडिओ स्टेशन आणि जाहिरातदारांना निकाल प्रदान करणे सुरू केले जेणेकरुन त्यांना त्यांच्या प्रेक्षकांविषयी स्पष्ट ज्ञान मिळावे आणि कोणत्या प्रोग्राममुळे जाहिरातदारांसाठी सर्वाधिक विक्री होते.

दररोज सकाळी 2 ते पहाटे 6 पर्यंत, लोक मीटर मागील दिवसापासून डेटा नील्सेनला पाठवते. यास अंदाजे दोन मिनिटे लागतात आणि दोन मार्गांनी पूर्ण केले जातात - आपल्या fixed line वर आउटबाउंड फोन कॉलद्वारे किंवा लोकांमध्ये बसविलेले सिम कार्डद्वारे . आपल्याकडे fixed line नसल्यास मार्केट प्लेयरपैकी एक, TAM काही शहरी भागात निवडलेल्या कुटुंबात बसविलेले पीपल-मीटर नावाचे डिजिटल TVMS डिव्हाइस वापरते, तर नकाशामध्ये नमुने असलेल्या टीव्हीवरील टीव्ही दर्शकांचा डेटा गोळा करण्यासाठी टेलीकॉन्ट्रॉल VIII डेटा रेकॉर्डिंग युनिट्स वापरली जातात. हे नमुना घरात टीव्ही सेटसह जोडलेले आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला रिमोट्स नियुक्त केले आहेत, जे 24x7 आधारावर पाहिल्या जाणा monitoring्या मीटरचे परीक्षण करत आहेत आणि दर्शकांच्या पसंती दर्शविण्यासाठी आवश्यक डेटा स्वयंचलितपणे रेकॉर्ड करतात, जो वेळोवेळी प्रसारित केला जातो. निवासी टेलिफोन लाईन किंवा समर्पित मोबाइल कनेक्शनद्वारे केंद्रीय संगणक. आवश्यक विश्लेषणा नंतर, नकाशा रात्रीच्या आधारावर डेटा प्रकाशित करतो तर टीएएम डेटा साप्ताहिक आधारावर जारी केला जातो.
Actually, the concept of “ratings” began when ACNielsen (founded by electrical engineer Arthur C Nielsen in 1923) started taking targeted surveys of radio audiences and providing the results to radio stations and advertisers so that they could have a clearer understanding of their audience and which programs were likely to drive the most sales for advertisers.

From 2am to 6am each day, the peoplemeter sends the data from the previous day to Nielsen. This takes approximately two minutes and is done either of two ways — via an outbound phone call on your fixed line or through a SIM card mounted into the peoplemeter should you not have a fixed line

one of the market player, TAM uses Digital TVMS devices called People- meters placed in selected households in a few urban areas, while a Map uses Telecontrol VIII data recording units to collect TV viewership data from TV's in the sample homes. These are attached to the TV set in the sample home and remotes are assigned to each individual in the household, with the meter monitoring what is being viewed on a 24x7 basis and automatically records the data required to indicate viewer preferences, which is periodically transmitted to a central computer, by means of the residential telephone line or a dedicated mobile connection. After the requisite analysis, a map releases the data on an over nightly basis while TAM data is released on a weekly basis.

अँड्रॉइड टीव्ही असेल तर इंटरनेट जोडलेलं असल्यामुळे गूगलकडे आपण बघत असलेल्या वाहिन्यांंची माहिती जाते का?

अशा प्रकारे टीआरपी घोटाळा करुन चॅनेल पैसे कमावत असतील तर ते खरंच निंदनीय आहे. बरे झाले यानिमित्ताने टीआरपी चा नवा कंगोरा समोर आला.

हे कुठे लिहू ते समजत नाहीये. मी आत्ता पराग कान्हेरेला बघितलं कलर्स मराठीवर आज काय स्पेशल मधे. कलर्सने त्याला कामाची संधी दिली बहुतेक.

त्याने आधीही कलर्स मराठीवर जास्त शोज केलेले.

https://www.youtube.com/watch?v=uQx8BZpSbYU

पहील्या पाच स्टार प्रवाहच्या आहेत यावेळी.

मी सध्या गौरी जयदीपची बघत नाहीये, ती ज्योतिका परत आल्याने पण ती आवडते सिरीयल मला आणि तीच सध्या नं. वन झालीय.

Pages