थीम गार्डन्स, परसदारची बाग, घरातील बाग, भाजीपाला उगवणे - युट्युब चॅनेल्स

Submitted by मामी on 19 June, 2020 - 06:02

या धाग्यावर बाग फुलवणे आणि जोपासणे, गार्डन इम्प्रुवमेंट, घरच्या घरी भाज्या फळे उगवणे विषयावरील व्हिडिओज इ. शेअर करूयात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गार्डन इम्प्रूव्हमेंटचे मी पाहिलेले पहिले पहिले व्हिडिओज (बहुधा नेटफ्लिक्सवर) होते - Big Dreams Small Spaces

या सिरीजमध्ये माँटी डॉन नावाचा या विषयातला तज्ज्ञ इंग्लंडातील गावातील घरांच्या अगदी छोट्या छोट्या बागांना त्या त्या घरमालकाच्या आवडीनुसार अगदी सुंदररित्या तयार करून देतो. मी आधाश्यासारखे ते सगळे सिझन्स संपवले. अतिशय सुंदर होते.

आता ते नेफिवर दिसत नाहीयेत. पण युट्युबवर काही एपिसोड्स दिसतायत. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की नक्की बघाच.

भारतीय विडिओज पाहताना एक लक्षात येतं की - विडिओ बरोबर काढत नाहीत किंवा गुंडाळतात किंवा उगाचच वाढवतात / माझी बाग पाहा असा प्रकार असतो.
----
बंगाली लोक बरे दाखवतात.

laal garden चानेलमध्ये खूप विडिओज नाहीत पण जे वीसेक आहेत ते पूर्ण आहेत. ( बेंगळुरुचे आहेत. उंची १००० मिटर्स. त्यामुळे तेवढा रिझल्ट मुंबईत येणार नाही.)

मी एकता चौधरींचे काही व्हिडियो बघितले आहेत. चांगले वाटले.
https://www.youtube.com/channel/UCYojAzy9MPIDgyPvajB2EuQ

गच्ची वरील बाग म्हणून पण एक चॅनेल आहे त्यांचे ही काही व्हिडीयो चांगले वाटले होते
https://www.youtube.com/channel/UCKRTdqIbs_l4d1xsZcq0XyA

@हर्पेन , त्या दुसऱ्या लिंकवाल्या channel वरचा कांद्याच्या पाण्याचा व्हिडीओ मस्त आहे. करून बघते जास्वंदीसाठी.

How To Grow Mushrooms Easily at home : https://www.youtube.com/watch?v=mUVWIaQ-2R0

श्री सूरज अगरवाल यांचा हा व्हिडिओ छान आहे. इंग्लिश फार चांगलं नसल्याने त्यांचं बोलणं जरा झेपवून घ्यावं लागतं पण त्यामागची त्यांची पॅशन जाणवते.

यांची दोन युट्युब चॅनल्स आहेत - इंग्लिश आणि हिंदी.

इंग्लिश - Gardening is my Passion : https://www.youtube.com/channel/UCRDDzwk2ZsV_3Wp-A8uflBg
आणि
हिंदी - Gardening Is My Passion (Hindi Version) : https://www.youtube.com/channel/UCvmYNYsPtf9gskgAYNs8FLA/featured

त्या दुसऱ्या लिंकवाल्या channel वरचा कांद्याच्या पाण्याचा व्हिडीओ मस्त आहे. >> हो, मी देखिल तो पाहिला. मस्त आहे.

Jasmine/मोगरा लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण उगवला नाही. गार्डनिंग एक कला आणि विज्ञान दोन्ही आहे.

घरातली बाग हा विषय एका वेगळ्याच पातळीवर नेलेला पहायचा आहे? इथे बघा : Gardeners' World, 2020, Episode 1 , 20th March 2020 : https://www.youtube.com/watch?v=1TlE2QHaTaw इथे ६.५५ पासून पुढे १२.४७ पर्यंत अचंबित करून टाकणारी 'घरातली बाग' दिसेल.