सदाफुली - Catharanthus

Submitted by अक्षता08 on 24 May, 2020 - 00:21

घरी एखाद फुलझाड आणायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली नजर गुलाब, जास्वंद, जाई-जुई या मोहक, सुवासिक आणि तितकच वाढवण्यास कठीण फुलझाडांवर जाते. कठीण कारण त्यांची बरीच काळजी घ्यावी लागते. सदाफुली हे एक अस फुलझाड आहे जे सुंदर व मोहक आहे अपवाद सुवासिकता.परंतु तरीही सदाफुली "पहिल्या १०" च्या यादीत येत नाही.
सदाफुली बऱ्याच रंगात उपलब्ध आहे. सदाफुलीला वर्षभर बहर असतो (नावातच अर्थ दडला आहे). सदाफुलीच्या पूर्णतः पांढऱ्या फुलांना औषधी महत्त्व आहे. छोट्याश्या छोट्या कुंडीतही सदाफुलीची रोपटी तग धरून फुलं येतात. अगदी एका बाटलीतही ह्याच रोपट छान वाढत.दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्याव लागतं (मातीत ओलावा कायम राहिला पाहिजे). प्रखर ते मध्यम सूर्यप्रकाश चालतो. त्यामुळे आपण घराच्या आत खिडकीजवळही हे रोपट वाढवू शकतो. सदाफुली पाण्यातही उत्तम वाढते. एखादी फांदी कापून आपण पाण्यातही वाढवू शकतो. एकंदरीत, सदाफुलीची नाममात्र काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वाढवण्यास अगदी सोप्प अस फुलझाड आहे.

माझ्यासाठी सदाफुली अशी एक व्यक्ती आहे जी इतरांकडून जास्त काही न मागता भरभरून देते

IMG20200523161738.jpgCollageMaker_20200523_222757288.jpgCollageMaker_20200523_222224772.jpgIMG20200523183858.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच....अगदी underrated झाड...फुलांनी लगडलेलं सदाफुलीचं झाड अगदी गुलाबाच्या ताटव्याचाच आनंद देऊन जातं. पण कमनशीबी आहे बिचारं.
images (5).jpeg

माझ्याकडे होती.सदाफुली इतर झाडांना वाढू देत नाही. एका कुंडीतली सदाफुली ४ कुंड्यात पसरून माझी २ झाडे गेली त्यावेळी सदाफुली काढून टाकली.एरवी तिच्या शेंगा काढून टाकायचे.

फोटो मस्त
शेवटचं वाक्य विशेष आवडलं

>> शास्त्रीय नाव विन्का रोझिया
येस अगदी हेच मनात आलं की शाळेत विन्का नावाने ओळख झाली होती. त्या दोनच्या जोडीत असणार्‍या बारक्या शेंगांच्या आकृत्या काढल्याचंही आठवतंय..
खरंच दुर्लक्षित फुलझाड आहे. सुवास नाही पण पाकळ्यांचा आकार, रंग किती सुरेख असतात.

@मी चिन्मयी
सहमत !
सुंदर फोटो !!

@जाई.
धन्यवाद Happy
नक्की लावा !

@तेजो
धन्यवाद Happy

@देवकी
होय.सहमत
सदाफुली खूप भराभर वाढते

@BLACKCAT
माहितीबद्दल धन्यवाद (शास्त्रीय नाव विन्का रोझिया)
होय. Blood pressure आणि diabetes वरही उपयुक्त आहे

@वर्षा
सहमत. सुवास वगळता ह्या फुलाकडे सगळं काही आहे

देवाला ही फुलं वाहतात का? माहीत नाही म्हणून विचारते. असेल तर लावायला चांगली आहे रोज पूजेत मिळतील.

@Sparkle, @Kashvi
धन्यवाद Happy Happy

@सान्वी
होय. वाहतात देवाला ही फूलं

खूप छान लेख आणि फोटो.
माझी एक सदा हसतमुख रहाणारी मैत्रीण होती तिला मी सदाफुली म्हणायचे Happy .

फोटो छान आहेत.
बागकाम सुरू करण्यासाठी उत्तम झाड.

@मी_अस्मिता
धन्यवाद Happy
हाहाहाहाहाहाहा Lol उपमा भारीच (मी सदाफुली म्हणायचे)

@Srd
धन्यवाद Happy
होय. खरंच (बागकाम सुरू करण्यासाठी उत्तम झाड)

छान आहे जाई.
मी सदाफुली पण लावली आहे..गुलाबी रंगाची.. छान बहरते.

थँक्स मृणाली! फोटो टाक तुझ्या सदाफुलीचे. गुलाबी
रंग पण छान दिसतो. हे झाड तस मेंटेनस फ्री आहे. फक्त पाणी आणि सूर्यप्रकाश नियमितपणे मिळाला की झाले Happy

IMG_20210425_124248.JPG

सगळे फोटो सुंदर आहेत.
मला सगळीच फुले सुंदर वाटतात, अगदी बाहेर आजूबाजूला असलेले वीड मधली फुलेही.
पाडव्याला देवापुढे ठेवायला फुले नव्हती. तेव्हा मागच्या अंगणातली hyacinth ची फुले ठेवली. तसे फुले तोडून ठेवायला मला जीवावर येते त्यामुळे कुंडीतल्या रोपाला फुल आले कि ती कुंडीच २-४ दिवस देव्हाऱ्याजवळ ठेवते.

छान , सगळ्यांचे फोटो ही सुरेख . यात आता खूप कलर्स दिसतात नर्सरीत. पण ते थोडे जपावे लागतात. फिका गुलाबी आणि ब्लड रेड . माझा फिका गुलाबी गेला . आता लाल आणलाय.

20210425_213556.jpg

मी जी सदाफुली लावली होती तिला उन्हाळ्यात चांगल्याप्रकारे फुलं येऊन गेली. पण जून महिन्यापासून नुसतीच वाढतेय. फुलं येतच नाही आहेत. ढगाळ वातावरणामुळे ऊन जरा कमी आहे . काय करावं लागेल ?

नवीन पालवी फुटल्यावर त्या कोवळ्या फांद्या थोड्या सशक्त होईपर्यंत (म्हणजे पोपटी वरून गर्द हिरव्या पानांची होईपर्यंत) कळ्या येत नाहीत. Bw