बागकामासाठी साहित्य, वस्तूंची खरेदी करणे (कुंडी, माती, रोपटी, खत) हे कपडे खरेदी करण्यासारख आहे. जेवढ्या वस्तू घ्याव्या तेवढ्या कमीच. त्यामुळे कुठेतरी बजेट ठरवावं लागतं. आणि हा खर्च काही अंशी कमी करण्यासाठी पर्यायी साधनं/ वस्तू आपल्या घरीच उपलब्ध असतात.
"चहा पावडर" हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे
चहा पावडर ही चहाबाज/चहाप्रेमी लोकांच्या मूलभूत गरजांमधली एक गरज आहे. (अन्न-वस्त्र-निवारा-चहा). परंतु हा चहा बनवून झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीचं धन होते. त्याऐवजी हीच टाकाऊ चहापावडर आपण बागकामात झाडांचा खाऊ /खत म्हणून वापरू शकतो. चहा पावडर हे खूप slow आणि mild fertilizer आहे. त्यामुळे आपण हे ३-४ दिवसांमधून एकदा एका कुंडीत वापरू शकतो. चहा पावडर मध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे झाडाच्या वाढीला मदत मिळते, ज्या झाडांना फळे-फुले येत नाही (foliage plant) त्यांच्यासाठी चहा पावडर हा खत म्हणून उत्तम पर्याय आहे.
चहा बनवून झाल्यावर जी चहा पावडर उरते ती दोनदा धुवून घ्यावी व लगेच कुंडीत घालावी. जर लगेच कुंडीत घालायची नसल्यास ती चहा पावडर उन्हात सुकवून डब्यात साठवून ठेवावी.
दिवसातून ५-६ वेळा चहा पिऊन झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीत टाकताना कुठेतरी चरररर् व्हायचं पण आता नक्कीच मी माझ्या चहाला पूर्ण न्याय देते असं वाटतं
गुलाबासाठी चहा पावडर वापरून
गुलाबासाठी चहा पावडर वापरून नाही चालणार का?
@मी चिन्मयी
@मी चिन्मयी
चहा पावडर हे खत म्हणून कोणताही रोपट्याला चालू शकत. परंतु जेव्हा एका झाडाला/ रोपट्याला फळं - फुलं येत असतात तेव्हा त्याला अश्या खताची गरज असते ज्यामध्ये phosphorus प्रमाण अधिक असेल.
<<गुलाबासाठी चहा पावडर वापरून
<<गुलाबासाठी चहा पावडर वापरून नाही चालणार का?>>
नक्कीच चालते. मी ती धूवून सुकवून गुलाबांना घालते. नक्की फरक दिसतो.
चहा पावडर धुवून का वापरता?
चहा पावडर धुवून का वापरता? साखर चालते की झाडांना.
चहा पावडर धुवून का वापरता?
चहा पावडर धुवून का वापरता? साखर चालते की झाडांना.--------मुंग्या येतात आणि मुळांना कुरतडतात.
वा उपयुक्त माहिती! धन्यवाद.
वा उपयुक्त माहिती! धन्यवाद.
@वर्षा धन्यवाद
@वर्षा
धन्यवाद
उत्तम माहीती.
उत्तम माहीती.
कॉफी पण टाका आणि गुलाब,
कॉफी पण टाका आणि गुलाब, जास्वंद, अनंता बहरतील..
अवाकडो पण..
@सामो
@सामो
धन्यवाद
@झंपी
नक्की try करेन.(कॉफी पण टाका आणि गुलाब, जास्वंद, अनंता बहरतील..)
ईथले वाचून Tomato च्या रोपाला
ईथले वाचून Tomato च्या रोपाला चहा पावडर टाकायला सुरुवात केली. सध्या सात-आठ कळ्या आल्या आहेत. आता बघू पुढे.
चहाच्या वाळवलेल्या पावडरी
चहाच्या वाळवलेल्या पावडरी मध्ये लींबोणीची पावडर २५% मिसळल्यास झाडांच्या मुळांना मुंग्या, किडे लागणार नाहीत नायट्रोजनचे प्रमाण मुळांच्या टोकाला अधिक काळ टिकून राहील.
आल असलेली चहा पावडर वापरु
आल असलेली चहा पावडर वापरु शकतो का?
@स्वस्ति
@स्वस्ति
व्वा.. मस्तच
@Sanjeev Washikar
माहितीबद्दल धन्यवाद
@shubhadap
होय. वापरु शकतो. मी सुद्धा आलं असलेली चहा पावडर वापरते
आल्यामुळे थंडी/वारं बाधणार ही
आल्यामुळे थंडी/वारं बाधणार ही नाही,हा अजून एक फायदा..(हलके घ्या)
व्वा छान च!!
व्वा छान च!!
@तेजो
@तेजो
(आल्यामुळे थंडी/वारं बाधणार ही नाही,हा अजून एक फायदा..)
हाहाहाहाहाहाहाहा
मग तर गवती चहा सुध्दा हवा
@Kashvi
धन्यवाद
छान माहिती. या वर्षी आम्ही
छान माहिती. या वर्षी आम्ही बरिच फूल झाडे , काकडी, गाजर लावली आहेत. बघायचे शेती कशी होते.
गवती चहा घरी लावता येतो?
गवती चहा घरी लावता येतो? त्याची माहिती/ अनुभव काय आहेत?