Plants under 30 days - फक्त ३० दिवस

Submitted by अक्षता08 on 9 May, 2020 - 23:47

बागकाम करताना एक स्वभावगुण असणं विशेष महत्त्वाचं आहे. तो स्वभावगुण म्हणजे संयम. बी लावल्यापासुनचा फळं-फूलं येईपर्यंतचा प्रवास हा खूप लांब असतो. म्हणूनच म्हणतात वाटतं, "सब्र का फल- फुल मीठा और खुबसुरत होता है|"
पण हा गुण सगळ्यांमध्ये नसतो. Slow train पेक्षा fast train ला प्राधान्य देणाऱ्या मला वाट बघण खूप कठीण जातं. परंतु, चांगली बातमी ही आहे की, काही फळझाड,फुलझाड, herb, असे आहेत जे आपण ३० दिवसात harvest करू शकतो. त्यापैकी माझ्या आवडीच्या ३ वनस्पती :

१. अळू :
अळूचे कंद एका कुंडीत लावले की ३० दिवसांमध्ये आपण harvest करू शकतो. अळू ही लावण्यासाठी अतिशय सोप्पी वनस्पती आहे. ह्याला मुबलक पाण्याची गरज असते. भरपूर (direct sunlight) ते मध्यम सुर्यप्रकाशात (medium sunlight) छान वाढते.

२. कांद्याची पात :
कांद्याच्या बी पासून कांदा / कांद्याची पात मिळायला बराच कालावधी लागतो. परंतु, आपल्याकडे असलेला कांदा एका कुंडीत लावला तर १०-१५ दिवसात घरच्या घरी कांद्याची पात मिळते.

३. गव्हांकुर :
गहू एका कुंडीत पेरावे. ३-४ दिवसात अंकुर आल्यावर गव्हांकुर १०-१२ दिवसांमध्ये कधीही harvest करू शकतो. गव्हांकुराचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत. त्यातील एक गुण म्हणजे गव्हांकुराचा रस उष्णता कमी करण्यास मदत करतो.

कमी वेळात, कमी जागेत, कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या ह्या वनस्पती container gardening ( कुंडीतील बाग) साठी उत्तम पर्याय आहेत.
IMG20200321134136.jpgIMG20200329135506.jpgWhatsApp Image 2020-05-10 at 9.15.03 AM.jpegCollageMaker_20200510_082142644.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पालक सुद्धा लौकर येतो ना?
लहानपणी केली होती पहिल्या मजल्यावर बागायत:
अळू, पालक, वांगी, कारली, कोथिंबीर, पुदिना वगैरे.
कुठल्या भाजीला किती दिवस लागायचे हे नाही आठवत आता.

@बोकलत
धन्यवाद Happy

@वावे
धन्यवाद Happy
होय. ( २-२.५ महिने ?) नक्की लक्षात नाही

@राजसी
तुम्ही कुंडी किती मोठी घेता त्यावर आहे. परंतु, मध्यम आकाराची कुंडी घेणार असाल तर ७-८ कंद आरामात मावतात.अळुचे कंद specific spacing ठेवुन लावले नाही तरी चालण्यासारख आहे.

@मानव पृथ्वीकर
होय. पालक, मेथी, lettuce २ महिन्यांत तयार होतात.
मस्तच !! आपण kitchen garden आपल्या घरी पण करु शकतो हे ध्यानीमनी पण आलं नाही माझ्या लहानपणी. तुमची तर संपूर्ण बाग होती !!

Sowing seeds of happiness: Emotional well-being while home gardening similar to other popular activities, study finds

Princeton researchers found that gardening at home had a similar effect on people’s emotional well-being (or happiness) as biking, walking or dining out. The benefits of home gardening were similar across racial boundaries and between urban and suburban residents, and it was the only activity out of the 15 studied for which women and people with low incomes reported the highest emotional well-being. The results suggest that household gardens could be key to providing food security in urban areas and making cities more sustainable and livable.

https://environment.princeton.edu/news/emotional-well-being-while-home-g...

@अभि_नव
वरील link (Sowing seeds of happiness)मधील लेख मस्तच Happy
धन्यवाद !

अक्षता, छान धागा.
किती दिवस लागतात, याकडे काटेकोर लक्ष नाही दिले. पण कुंडीमध्ये मी कायकाय लावले आहे आजवर, ते सांगते. कढीपत्ता, गवती चहा, पान ओवा, टोमॅटो , वांगे ,अळू , चवळी ,पुदिना, कोथिंबीर, मेथी, पालक, भेंडी, चुका, चाकवत, माठ.
ज्यांच्याकडे कढीपत्ता आहे, तिथे आजूबाजूला छोटी रोपे उगवतात, ती मुळासकट उपटून कुंडीत लावली. आपण cut करत राहिलो, तर जास्त मोठे होत नाही आणि खूप छान वाढते.
मेथी, कोथिंबीर, चाकवत, माठ, चुका यांच्या बिया पेरते . पालक मात्र बियांपासून वाढण्यापेक्षा मुळे लावली, तर लवकर उगवतो. त्यामुळे विकत आणलेल्या जुडीला मुळे असतात ना, तो भाग कापून जमिनीत लावला. पटकन पाने फुटतात.
पान ओव्याची फांदी कापून आणायची आणि कुंडीत लावायची. घोसाळ्याची /पालकाची भजी करतो ना बेसनपीठात बुडवून, तशी पान ओव्याची पाने वापरून भजी करतात. मस्त लागतात. किंवा पराठा, थालीपीठात चिरून वापरू शकतो.
गवती चहा /अळूचा एक कंद लावला, तर त्याला नवे कंद फुटत जातात. वाढते झाड.
वांगे, मिरची, टोमॅटो यांची रोपे लावते. 2रोपे लावली ना, तर एका फॅमिलीपुरते उत्पन्न मिळते नक्की.
चवळी यावर्षी पहिल्यांदा लावली. छान शेंगा आल्या आहेत.
भेंडी, गवारी च्या बिया लावल्या आहेत. पहिल्यांदाच लावली. आत्ता फुले आलीत दोघांनाही. पाहूया किती भेंण्डी -गवारी येतेय.